Submitted by समीर चव्हाण on 15 January, 2013 - 07:33
काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते
बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते
उरली न आता जिद्द जगण्याची, जणू
आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते
लागे जिव्हारी बोल कोणाचा असा
काटा उरी तुटल्याप्रमाणे वाटते
आता स्मरेना नेमके माझे मला
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते
(हौस संग्रहातून)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा वा!... सगळेच शेर
वा वा वा!...
सगळेच शेर क्लास!
संपादित
चुभुदेघे.
-सुप्रिया.
तुटल्याप्रमाणे योग्य आहे
तुटल्याप्रमाणे योग्य आहे सुप्रिया
मायबोलीवर पुनर्प्रकाशनासाठी आभार!
गझल अप्रतिम आहेच.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
आता स्मरेना नेमके माझे
आता स्मरेना नेमके माझे मला
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते
>> अगदी अगदी....
व्वाह!!
बोलायचे होते तुझ्याशी,
बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते
लागे जिव्हारी बोल कोणाचा असा
काटा उरी तुटल्याप्रमाणे वाटते
>>>>>>>
मजा आ गया बॉस...!!
खूप भारी. पहिल्या शेरापासून
खूप भारी. पहिल्या शेरापासून शेवटच्या पर्यंत incrementally आवडले.
मस्त समीर जी.... प्रमाणे ऐवजी
मस्त समीर जी....
प्रमाणे ऐवजी 'सारखे' बरे वाटेल का ?
मनमोकळ्या प्रतिसादासाठी
मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद.
सुप्रियाजी प्रतिसाद संपादित करण्याची गरज नसावी.
अरविंदजी आपल्या प्रश्नावर थोडेफार निरोपातून कळवले आहे.
धन्यवाद.
समीर.....प्रतिसाद संपादित
समीर.....प्रतिसाद संपादित केला आहे.
सतीशजी: धन्यवाद. मला वाटतं
सतीशजी:
धन्यवाद.
मला वाटतं आपले प्रात्यक्षिक हे आपल्या दोघांपुरते असल्यामुळे ते निरोपातून दिले तर योग्य राहिल.
मी जरूर माझे मत देईन पण निरोपातूनच.
कृपया आपला हा प्रतिसाद संपादित करून हाच मजकूर निरोपातून कळवावा ही विनंती.
गझल आवडली. काहीतरी
गझल आवडली.
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते हा शेर विशेष.
हौस मधल्या सर्वात जास्त
हौस मधल्या सर्वात जास्त आवडलेल्या गझलेपैकी एक.
अप्रतिम गझल.
विजयजी आणि कैलासजी: अनेक
विजयजी आणि कैलासजी:
अनेक आभार.
ही गझल माझ्या लेखनटप्प्यातील महत्त्वाची आहे.
२००३-२००४ च्या सुमारास माझ्या मुंबईच्या स्टे मध्ये लिहिली गेली.
बोलायचे ह्या शेराला दाद देणारा प्रथम होता अनंत.
सांगताना अतिशय आंनद होतो की हा शेर ऐकण्यासाठी अनंत आणि चित्तरंजन ह्यांनी अनेकदा रात्री-मध्यरात्री फोन केलाय. एकदा मी वैतागून अनंतला म्हटलं की मी काय एकच चांगला शेर लिहिलाय?
त्यावर अनंत हसत म्हटला की सारखी तेजाळणारी ओळ एखादीच असते (ही ओळ भटांची आहे).
मलाही तोपर्यंत लक्षात आले नव्हते ह्या शेराचे महत्त्व.
मन मोकळं करावेसे वाटलं म्हणून बोललो, इतकेच.
धन्यवाद.
समीर
सुंदर गझल..! एक नेहमी चर्चा
सुंदर गझल..!
एक नेहमी चर्चा झालेली शंका...
तुटल्याप्रमाणे
सुटल्याप्रमाणे... इथे अलामत , काफिया ठरल्या नंतर
पुढे...फिटल्याप्रमाणे,
भरकटल्याप्रमाणे,
तुटल्याप्रमाणे,
म्हटल्याप्रमाणे>>>> या बद्दल तुमचे मत ऐकायला आवडेल.
विरोपातूनही चालेल.
........................ शाम
शामः माझ्या माहितीप्रमाणे
शामः
माझ्या माहितीप्रमाणे अलामत ही संकल्पना उर्दूत ठळकपणे नोंदवल्याचे नाही.
कुणी एखादा लेख, पुस्तक निर्दशनास आणून दिल्यास मदत होईल.
मरहूम शायर हनीफ सागर ह्यांना विचारले असता ते म्हटले की त्यांना असं काहीही माहिती नाही.
मराठीत अलामत भटांनी आणली.
कदाचित तेव्हाच्या नवशिक्या मराठी गझलकारांना ध्यानात घेऊन असेल.
अलामत हे संबोधन काहीसे अयोग्य वाटते कारण त्याचा अर्थ चिन्ह असा होतो.
भटांना स्वरचिन्ह अपेक्षित आहे.
असो, उर्दूमध्ये अलामत भंगलेल्या/नसलेल्या अनेक गझला आहेत. गालिबची पुढील गझल पहावी:
बसकि दुश्वार है, हर काम का आसां होना
आदमी को भी मयस्सर नही इन्सां होना
गिरियः चाहे है खराबी मेरे काशाने की
दर-ओ-दीवार से टपके है, बयाबां होना
पुढील शेरात हैरां, मिशगां वगैरे येते.
गालिबच्याच अजून एका गझलेत शर्म-ए-नारसाई, पारसाई असे मत्ल्यात आल्यावर पुढे गदाई, आशनाई येते.
अजूनही अश्या गझला देता येतील. वली दकनी पहावा.
असो, मला वाटतं नियम नवशिक्यांसाठी असतात.
जसे लहान मुलाला पालक सांगतात की हे चूक आहे ते बरोबर आहे.
पुढे जाऊन त्याच्या लक्षात येते की चूक-बरोबर हे इतकं ढोबळ नसून परिस्थितीवरही अवलंबून असते.
तसेच माझ्या गझलेचे.
धन्यवाद.
खूपच उपयुक्त माहीती
खूपच उपयुक्त माहीती दिल्याबद्द्ल धन्यवाद!
.......................................
काफियानुसारी गझला पाडणार्यांनी हे वाचणे अत्यंत गरजेचे आहे.
.......................................
मला वाटतं नियम नवशिक्यांसाठी असतात.>>> हे मात्र पटले नाही
नियम सर्वांसाठी सारखेच असायला हवेत ना?
...................................... शाम
मस्त आठवण शेअर केलीत समीर. मन
मस्त आठवण शेअर केलीत समीर.
मन मोकळं करावेसे वाटलं म्हणून बोललो, इतकेच.>>> अहो, कधीही बोला त्यात औपचारिकतेची गरज नाहीये माझ्याबाबतीत.
हौस हा संग्रह मुंबईत कुठे
हौस हा संग्रह मुंबईत कुठे मिळेल?
शाम: मला वाटतं नियम
शाम:
मला वाटतं नियम नवशिक्यांसाठी असतात.
हे वाक्य आयसोलेशन मध्ये घेऊ नये.
आयुष्याचेही नियम परिस्थिती/काळानुसार बदलतात.
बाकी, उर्दूत बहुसंख्य गझला अलामत सांभाळल्या गेलेल्या आहेत, हेही खरे आहेच.
तसेच मी अलामतविरोधी असेही मत करून घेऊ नये.
तिचा बाऊ करू नये, असे मात्र वाटते.
अहो, कधीही बोला त्यात औपचारिकतेची गरज नाहीये माझ्याबाबतीत.
धन्यवाद, विजय.
गझल खूप
गझल खूप आवडली
म्हट्ल्याप्रमाणे व फिटल्याप्रमाणे हे शेर खूप आवडले
नियम सर्वांसाठी सारखेच असायला हवेत >>>>> १००% पटले ....भेदभाव कशाला नै का !!
माझा अभ्यास नाही व माझी काही बोलायची पात्रताही नाही ....तरी काही सांगू का ?
माझे निरीक्षण आहे ..........
भट साहेबांनी अलामत आणली असेल कारण अनेकदा मराठी सहित्यात अनेक कविता (संत काव्य वगैरे) यमकप्रवण (अलामतसहीत ) आढळ्त नाहीत भट साहेबाना गझलेच्या मराठी आकृतीबन्धास ठरवताना या बाबीस प्राधान्य द्यावे वाटले असेल ही बाब त्याना अतीशय महत्त्वाची वाटली असेल म्हणून त्यांनी खूप अभ्यासाअंती हा नियम बनवला असेल (नवशिक्यांसाठीच नाही सगळ्यांसाठी)
~ बीफीजींची एक ओळ आठवते आहे <<<मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गम्मत असते..............:)
उर्दूत मात्र स्वरचिन्हे म्हणजेच यमक वगैरे असे "भिनले" असावे / अशाप्राकारचे अमुक शब्द असतील तर त्यासाठी वेगळेच नाव असावे /त्यास यमक आपण संबोधतो तसे संबोधन असावे हेच त्यांच्या गावी नसेल वगैरे म्हणून वेगळा नियम वगैरे त्या लोकांनी काढला नसेल (जुन्या उर्दू काव्यात मराठी प्रमाणे यमके आढळतात का याची जिज्ञासा आहे .......उदा: आता विश्वात्मके देवे ।येणे वाग्यज्ञे तोषावे ...। )
वरील वानगीदाखल समीरजींनी दिलेल्या शेरातदेखील ज्यास अलामत म्हणता येईल ते आहे ! आं अशाप्रकारचे एक स्वरयमक काफियाच्या शेवटच्या अक्षरावर पाळले आहे जे मुळात देवनागरीत लिहिताना जड जाते संस्कृतात ते आहे असे स्मरते पण अतीशय कमी वापरले जात असावे उच्चारातही जरासा फरक आहे असेही स्मरते आहे)
उर्दूत लगक्रमही नसतो भटांनी तो पाळलाच की.....कारण काव्य मराठी भाषेत करायचे तर लगक्रम असायलाच हवा होता वृत्तासाठी (बहरसाठी)पण मराठीत असे असते ते असेच ठेवायला हवे म्हणून जर तसे केले असेल तर मराठी.काव्यात अक्षरछंदही पाळला जतो त्यास मात्र भटसाहेबांची परवानगी दिसत नाही का ते समजत नाही
असो
सूट घेतली आहे असे एक वाक्य टाकूनही चर्चा थाम्बवता येते !!
अ उ इ या र्ह्स्व स्वरासाठी एक सूट आहे असे ऐकून आहे.....
अशा वेळी मतल्यात अलामत सिद्ध करतानाच आपण या गझलेत ही सूट घेत आहोत असे स्पष्ट करावे लागते असे ऐकून आहे या गझलेत मतला सूट घेत नाही पण बाकीचे शेर घेतात
थोरामोठ्या गझलकाराने अशा नवनवीन सुटी घेतल्या की त्या जगन्मान्य होतात असे ही ऐकून आहे व त्याच सुटीच पुढे नियम(पोटनियम) बनतात असे मला वाट्ते
(आता असलेली सूट काफियाची आहे वृत्तात तर सूट असूच शकत नाही .....गझलेत रदीफ नसली तरी चालते या पेक्षा मोठी सूट असूच शकत नाही असे माझे एक वैयक्तिक मत आहे शायर नावाजलेला असेल तर तो मतलाही वगळू शकतो असेही ऐकून आहे )
मला यातले काही समजते अशातला भाग मुळीच नाही प्लीज गैरसमज करून घेवू नये !!
-वैवकु
<<< अरविंदजी आपल्या प्रश्नावर
<<< अरविंदजी आपल्या प्रश्नावर थोडेफार निरोपातून कळवले आहे.>>>
मान्य ....
समीरजी मला पडलेल्या प्रश्नाची
समीरजी मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे ; मी माण्डलेली निरीक्षणे वगैरे यावर तुमची मते मला विचारपूस मध्ये कळवाल का ?
वरील प्रतिसादात काहीचुकले असेल तर क्षमस्व खरोखरच माझा काही अभ्यास नसताना मी बोललो
क्षमस्व !!
वैभवजी: मी दिलेल्या गालिबच्या
वैभवजी:
मी दिलेल्या गालिबच्या गझलेत आं हे अलामत कसे होईल.
भटांच्या अलामतीच्या व्याख्येनुसार
अलामत म्हणजे मत्ल्याच्या कवाफीतील न बदलणा-या अक्षरसमूहाच्या अगोदरच्या अक्षराचे स्वरचिन्ह.
गालिबच्या गझलेच्या मत्ल्यात न्सां हा अक्षरसमूह दोन्ही ओळींत येतो. तेव्हा ह्या गझलेत अलामतच सेट होत नाही. हजरत कैसर उल जाफरी ह्यांच्या सल्ल्यावरून भटांनी एक नियम पुढे आणला अनेक अलामतींचा. भटांच्या बाराखडीत दिला आहे. त्यानुसार गालिबच्या गझलेची अलामतीतून सुटका होते. गालिब गेल्यानंतर हे सगळे झाले, ते बरेच झाले. गंमतीत घ्यावे.
उर्दूत लगक्रमही नसतो भटांनी तो पाळलाच की
हे बरोबर नाही. उर्दूत अक्षरवृत्तं आहेत.
.........................................
हौस हा संग्रह मुंबईत कुठे मिळेल?
हा संग्रह मुंबईत उपलब्ध नसावा.
आपल्याला हवा असल्यास मी पाठवू शकतो.
निरोपातून नाव-पत्ता कळवावा.
धन्यवाद.
समीर, प्रतिसाद संपादित करून
समीर,
प्रतिसाद संपादित करून सदर प्रतिसाद निरोपातून तू म्हटल्याप्रमाणे पाठविला आहे. पहाशील का?
धन्यवाद समीरजी माझ्या ओबडधोबड
धन्यवाद समीरजी माझ्या ओबडधोबड व अपरीपक्व पद्धतीने माण्डलेल्या प्रतिक्रियेवरील प्रतिसादासाठी
दुर्दैवाने मला भट गलिब अशा थोर गझलकारांबद्दाल /त्यांच्या गझलेबद्दल फारसे काहीच माहीत नाही
गझलेची बाराखडी मी २-३ दाच वाचली आहे आजवर त्यामुळे फारशी व तंतोतंत तर लक्षातच नाही आहे
अलामत मी तरी अशी पाहतो
आपण जी लय गझल साठी निवडली आसेल त्या लयीत ज्या ओळीत काफिये योजले आहेत त्या त्या ओळीतील लयीच्या ठराविक टप्प्यावरच वारंवार येणारा व काफियातच अंतर्भूत असलेला एकच निश्चित असा न बदलणारा स्वर
आता यात त्या स्वराआधी व नंतर काय व किती अक्षरे/समूह / शब्दसमूह अहेत याच्याशी इर्रिस्पेक्टिव्हली अलामत ची जागा ठरवता येते रदीफ असो नसो(गैरमुरद्दफ) अलामत लयीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या अक्षरावरही का असेना (स्वरांतयमक)
अनेक अलामतीही होतील अशाने असाही विचार आता शक्य वाटतो आहे (फक्त शक्यताच ! मत नाही आहे )
अलामत जिथे येते त्या आधीचे व नंतरचे मात्रांचे गणित (बेरीज) सेपरेटली ,प्रत्येक काफिया असलेल्या ओळीत प्रत्येक वेळी सारखेच येते
गालिब च्या वरच्या शेरात अशा प्रकारे आं अशा अलामतीचा स्वऱकाफिया आहे
भट साहेब म्हणतात त्याप्रमाणे न बदलणारा अक्षरसमूह त्या गझलेतही आहे =होना त्याच्या आधी आं हा स्वर येतो व मी पाहत असलेल्या पद्धतीने ती अलामत आहे असे मला वाटते
फक्त त्यात काफियामधे अलामतीनंतर भटसाहेबाना अपेक्षित असलेली अक्षरे जी बदलत नाहीत ती नाहीत इतकेच
मला अभ्यासकांची मते माहीतच नाही आहेत मात्र तुमच्याकडून तसेच मायबोलीवरील तज्ञ गझलकारांकडून वेळोवेळी खूप शिकायला मिळते हे माझे भाग्यच
मी जे काही म्हणालो त्यात चूक असेल तर क्षमस्व
बाकी भट साहेब काय इतर कुणीही़ काय (देवसर सुद्ध्हा;)) जे जे लिहिले त्यातून मला नवनवीन शिकायला मिळते आहे . ते(भट साहेब) म्हणतात तेही योग्य आहेच यात वाद तो काय !
चूक भूल देणे घेणे
लोभ असू द्या सर
पुनश्च धन्स
आपला
-वैवकु
समीर! मराठी गझलेतील
समीर!
मराठी गझलेतील अलामत/स्वरचिन्ह आणि गझलेतील सांगितीक गोडवा यात काही नाते असते काय?
असल्यास कोणते?
मराठी गझलेतील अलामत/स्वरचिन्ह
मराठी गझलेतील अलामत/स्वरचिन्ह आणि गझलेतील सांगितीक गोडवा यात काही नाते असते काय?
हो,असते.
असल्यास कोणते?
सासू-सुनेचे
काय नातेबिते विचारताय प्रोफेसरसाहेब??
देवसर तुम्हीपण ना काय काय
देवसर तुम्हीपण ना काय काय गमतीजमती करता बुवा !!
असो कावळा यांचा प्रतिसाद मस्त आहे ~सासू -सुनेचे ...:हाहा:
कावळा, प्रश्न कुणाला? उत्तर
कावळा,
प्रश्न कुणाला? उत्तर कुणाचे?
प्रश्नच कशाला ? अन् उत्तर तरी
प्रश्नच कशाला ? अन् उत्तर तरी कशाला??
टीप : कावळा हा माझा ड्यू आय नाही आहे तो कुणीतरी वेगळाच आहे अन् मीही कुणीतरी !!
आता स्मरेना नेमके माझे
आता स्मरेना नेमके माझे मला
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते
व्वा...
Pages