Submitted by समीर चव्हाण on 15 January, 2013 - 07:33
काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते
बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते
उरली न आता जिद्द जगण्याची, जणू
आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते
लागे जिव्हारी बोल कोणाचा असा
काटा उरी तुटल्याप्रमाणे वाटते
आता स्मरेना नेमके माझे मला
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते
(हौस संग्रहातून)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही गझल सर्वांनी वाचावी म्हणून
ही गझल सर्वांनी वाचावी म्हणून मुद्दाम वर आणत आहे.
धन्यवाद वर आणली म्हणून
धन्यवाद वर आणली म्हणून
इतरांच्याही वाचनीय गझला वर आणाव्यात ही विनंती
(आमचाही नंबर लागला तर बरे होईल !!! ;))
Pages