किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्‍याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसा... लोहगड ?

कविताभाई, चुकलं Sad

संदीप, मला ते श्रिवर्धन वाटत नाहिय Sad त्यांची उंची तशी कमी आहे.

सचिन प्रचि ११ चा क्लू दे.
मल्ली प्रचि १३ चा क्लू दे

आबासाहेब राजमाची सुंदर Happy

सचिन प्रचि ११ चा क्लू दे.
<< गडावर पहाण्यासारखे काही शिल्लक नाही , गडाला तटबंदी सुद्धा नाही, काही पाण्याची टाकी आहेत,
किल्ल्याचा उपयोग टेहाळणी पुरता होत असावा
पायथ्या पासून माथ्यावर जायला अर्धा तास पुरेसा आहे

प्राची १३ क्लु...

हा गड कर्जतच्या पुर्वेला आहे. गडावर चिमणी सारखा भाग आहे, ज्याला आतुन आतड्यासारखी वाट आहे.

प्रचि १५: गडावर जाताना आधी देऊळ लागते.. वर कड्याच्या पोटात एक गुहा आहे.

किल्ला : सिद्धगड
उत्तर : आनंदयात्री

प्रचि १५: इंद्रा, गोरखगड? फोटो वरुन वाटत नाहीये पण गोरख मुरबाड तालुक्यात आहे ना? आणि त्याच्या पायथ्याशी देऊळ आहे वर कड्यावर जाताना आधी गुहा पण आहे

प्रचि १९

prachi 19.jpg

फार कमी वेळा केला केलेला हा ट्रेक आहे (हा किल्ला नाही) ह्या लेण्या आहेत. पावसाळ्याच्या आगेमागे गेले असता मेन गुहेच्या बाहेरील बाजुने पाण्याचा पातळ पडदा तयार झालेला दिसतो. देवाच्या नावावरुन ह्याचे नाव पडले आहे

उत्तरः गणपती गडद
उत्तर देणारा : इंद्रधनुष्य

Proud

जल्ला, इन्द्रुने नुसताच गडाच्या पायाचा फटु टाकला आणि वळखा म्हणतोय. Happy
आयाने तरिबी वळीखला. ग्रेट. Happy

जि. रायगड
गडावर पाण्याची काही टाकी आहेत, गडाची माची , आणि बालेकिल्ल्यावर काही अवशेष शिल्लक आहेत
पायथ्या पासून माथ्यावर पोहोचायला २०-२५ मी पुरेसे आहेत

G1.jpg

Pages