अळीची चळवळ

Submitted by पुरंदरे शशांक on 18 October, 2012 - 23:17

7750331-cartoon-illustration-of-a-happy-green-caterpillar.jpg

अळीची चळवळ

वळवळ वळवळ
अळीची चळवळ
किती ती धावपळ
करे ना खळखळ

चालते कस्ली
खालीवर खालीवर
लाटच जशी
फिरते अंगभर

हिर्वी हिर्वी चादर
पांघरते अंगावर
कधी कधी रंगीत
ठिपके त्यावर

उचलून डोके
बघते कायतर
शेंगा पान फुले
खाऊ तो कुठवर

मटार सोलता
सोनूची धावपळ
कथ्थक डिस्को
नुस्ती तारांबळ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गोड. अळीला किती धन्य वाटेल. नेहमीच तिरस्कार करणारी लोक, तुमच्यामुळे अळीवर चक्क कविता वाचताहेत. Happy

मोकिमी, मस्त अळी. Happy ( प्रत्यक्ष आयुष्यात असं कधी म्हणवणार नाही. )

मस्त गोड. अळीला किती धन्य वाटेल. नेहमीच तिरस्कार करणारी लोक, तुमच्यामुळे अळीवर चक्क कविता वाचताहेत. >>> अळीच्यावतीने सर्वांचे अनेक आभार....;) Wink

माझ्या सर्व बालकवितांवर निखळ प्रेम करणार्‍या व आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व जाणकार रसिकांचे पुन्हा पुन्हा मनापासून आभार.