Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09
दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मृनिश, ते देखील करून पाहिले.
मृनिश, ते देखील करून पाहिले. तो फेस सगळा फ्रीझमधे ठेवून त्याचं लोणी होतय का बघितलं.
नंदिनी, तुपासाठी डायरेक्ट
नंदिनी, तुपासाठी डायरेक्ट सायच कढवतात तसं तू करून बघ. ते फेसाचं काही कळत नाहीये कितीही लॉजिक लावलं तरी...
नंदिनी साय सॉफ्ट असते
नंदिनी साय सॉफ्ट असते का???... कारण अमूल वैगैरे दुधाची साय प्लास्टिकच्या लेयरसारखी जमते (योग्य शब्द सुचत नाहीये... )... ईतर सायीबरोबर एकजीवही होत नाही... सो मंजू म्हणतेय तशी लोणी काढायची स्टेप वगळून डायरेक्ट सायच कढायला ठेव...
साय सॉफ्ट असते का???...< हो.
साय सॉफ्ट असते का???...< हो. आता चारपाच दिवसानी डायरेक्ट साय कढवून बघते. सायीचे विरजण लावायचे नाही म्हटले की आमचे स्वत: चमच्याने साय खात बसतात.
धन्यवाद मंजू आणि लाडकी.
नंदिनी अशी साय संपत असेल तर
नंदिनी अशी साय संपत असेल तर कठिण आहे तूप निघणं. सरळ विकत आण की..
ओय, दक्षिणा, वाच की गं.
ओय, दक्षिणा, वाच की गं.
सायीचे विरजण लावत नाही म्हणून साय खाल्ली जातेय.
अर्रर्र! नंदिनी.. :जीभ
अर्रर्र! नंदिनी.. :जीभ चावणारी भावली:
आमचे स्वत: चमच्याने साय खात
आमचे स्वत: चमच्याने साय खात बसतात. +10000 आम्चे पण
तूप कढवण्याबाबत एक मजेदार
तूप कढवण्याबाबत एक मजेदार किस्सा इथे लिहावासा वाटतोय.
केनयामधे माझ्या पंजाबी शेजारणीने, आपण तूप कसे कढवतो, याबद्दल मला विचारून घेतले. तिथे दूधावर बरीच
साय येते. शेवटी तिने तूप कढवण्याचा प्रयोग करायचे ठरवले. तिच्या मेडला मी परत सगळे समजाऊन सांगितले.
ईट्स कॉल्ड क्लॅरिफाईंग द बटर, व्हेन द बटर लूक्स अब्सोल्यूट क्लीयर, देन यू रिमूव्ह इट फ्रॉम द चिको ( शेगडी ) असे मी तिला समजावले. आम्ही शेगड्या वगैरे कॉमन अंगणातच पेटवायचो. मेडने रविवारी दुपारची जेवणे झाल्यावर, लोणी कढवत ठेवले. आम्ही आपापल्या घरी वामकुक्षी घेत होतो. थोड्या वेळाने मस्त वास सूटला, म्हंटलं जमलं कि हिला आणि मी गाढ झोपलो.
आणखी थोड्या वेळाने धुराच्या वासाने जाग आली. गॅलरीत येऊन बघितले तर मेडने यज्ञच केला होता.
क्लॅरिफाय म्हणजे पूर्ण नितळ होईल असे तिला वाटले. बेरीचे माझ्या डोक्यातच नव्हते. ती त्याची वाट बघत बसली आणि लाकडी चमच्याने ढवळत बसली. थोड्या वेळाने तो चमचा आणि भांड्यातल्या तूपाला आगच
लागली !
होमच पेटला आता तूझ्या लेकाचे लग्नच लावतो, असे म्हणत मी शेजारणीला चिडवले. अर्थात तिने पण
सगळे लाईटलीच घेतले.
आमची एक शाळामैत्रीण,
आमची एक शाळामैत्रीण, लग्नापूर्वी स्वैपाकाचा काहीच अनुभव नाही व एकदम मोठ्या एकत्र कुटूंबात लग्न करून गेली. सासूने फ्रिजमधले लोणी कढवायला सांगितले तर हिने ते पाण्यासकट गॅसवर ठेवले. तोवर सा.बांना स्वैपाक करता येत नाही ते माहीत होते पण त्या दिवशी येत नाही म्हणजे किती येत नाही त्याची लेव्हल समजली
प्रज्ञा असे वरिजिनल
प्रज्ञा असे वरिजिनल लोण्याबिण्याचे फोटो टाकून का गरिबाच्या पोटात आग पाडताय वो
तो फोटो पाहून मला मनोमनी "मनी" व्हावसं वाटतंय ममा, वाचतेयस नं
बाकी "सही पे दही" सुरु राहुदेत.... (मुंबईत असताना हा वाक्प्रचार फारच प्रचलित होता)
सुमेधाव्ही तुझा किस्सा लई
सुमेधाव्ही तुझा किस्सा लई भारी आहे
सुमेधाव्ही
सुमेधाव्ही
तोवर सा.बांना स्वैपाक करता
तोवर सा.बांना स्वैपाक करता येत नाही ते माहीत होते >>> स्वतःला सैपाक करता येत नाही म्हणून हीला लोणी कढवायला सांगितले की काय
वेक्स, वाचते आहे. वाचते आहे.
वेक्स, वाचते आहे. वाचते आहे. चल तु इकडे आल्यावर तुझी सरबराई कशी करु याचा प्रश्न मिटला. तु आलीस कि तुला वेलकम ड्रींक एक मोठा ग्लास भरुन ताक. मग एक वाडगाभरुन लोण्याचा गोळा.
मंजूडे मैत्रिणीला स्वयंपाक
मंजूडे मैत्रिणीला स्वयंपाक येत नाही हे तिच्या सासूला माहित होते, पण त्याची मजल कुठवर आहे ते त्या दिवशी कळलं.. असं आहे ते.
मने ताकाला माझ्याकडे धाड..
मने ताकाला माझ्याकडे धाड..
ते कळलं होतं गं..
ते कळलं होतं गं..
हे दही न जमणे, लोणी न येणे
हे दही न जमणे, लोणी न येणे ह्याचे कारण हे तर नसावे?
पहा हि लिंक...
http://www.ndtv.com/video/player/news/video-story/252023?vod-mostpopular
झंपे मला अॅक्सेस डिनाईड आहे
झंपे मला अॅक्सेस डिनाईड आहे
पुण्यात टेम्प्ररेचर १० पर्यंत असल्याने दह्याचा बोर्या वाजायला सुरू झालेले आहे.
पुण्यात टेम्प्ररेचर १० पर्यंत
पुण्यात टेम्प्ररेचर १० पर्यंत असल्याने दह्याचा बोर्या वाजायला सुरू झालेले आहे.>>> माझे तर अजून छान लागते आहे.
माझि आजि दहि लावताना चिमुट्भर
माझि आजि दहि लावताना चिमुट्भर साखर घालायचि, मि पण तसेच करते, त्याने दहि घट्ट लागते.
मी दह्यासाठी एक प्रयोग केला.
मी दह्यासाठी एक प्रयोग केला. इथे अंगोलात दही मिळते पण ते फ्लेव्हर्ड योगहर्ट च्या रुपात. त्यांच्या कल्पनेप्रमाणे प्लेन असलेल्या योगहर्टमधेही साखरच असते. ते तसे खायला चांगले लागते पण भातावर घ्यायला किंवा इतर पदार्थात वापरायला मिळत नसे.
मी मुंबईला घरी गेल्यावर, एका मोठ्या गाळणीत बाजारचे दही ओतले. ती गाळणी नो फ्रॉस्ट फ्रिजमधे तशीच ८ दिवस ठेवली. तेवढ्या काळात दही सुकून त्याची भुकटी झाली. ती मी इथे घेऊन आलो. "निडो" ची मिल्क पावडर वापरून घट्ट दूध केले. त्यावर साय येईपर्यंत मंद आचेवर तापवले. मग कोमट केले. त्याला घरच्या दह्याच्या भुकटीचे विरजण लावले. शंका नको म्हणून तुरटीचे ५ वेढे दिले. आणि मस्त आपल्या चवीचे घट्ट कवडी दही लागलेय.
दिनेश किती कल्पक आहात तुम्ही
दिनेश किती कल्पक आहात तुम्ही
त्या दह्याला वास नाही
त्या दह्याला वास नाही आला?
आमच्याकडे असे दही पडले तर आख्खा फ्रीज घमघमत असतो
नीधप, अगदी अगदी, शिवाय
नीधप, अगदी अगदी,
शिवाय तिसर्या दिवसापासुन त्यावर पिवळसर थर जमा व्हायला सुरु होतो.
वा! चांगली आहे कल्पना दिनेशसा
वा! चांगली आहे कल्पना दिनेशसा
नी, दह्याला वास न यावा कारण एकतर सध्या चांगली थंडी आहे आणि दह्यातलं पाणी काढून टाकलंय.
नी, दह्याला वास न यावा कारण
नी, दह्याला वास न यावा कारण एकतर सध्या चांगली थंडी आहे आणि दह्यातलं पाणी काढून टाकलंय.>>>>
पाण्या मुळे वास येतो... दिनेशदांची आयडिया भारी आहे... पाणी काढुन टाकल्याने व गाळणी तशीच फ्रिज केल्या मुळे काही सडण्याचा संभवच नाही...
लै भारी आयडिया....
होका? करून पाह्यले
होका?
करून पाह्यले पाहिजे.
आजच करते.
ही अशी पूड किती दिवस टिकेल फ्रिजमधे? बाहेर?
म्हणजे डब्यात भरून ठेवली आणि कधी नेमके विरजण नसेल किंवा प्रवासातून आल्यावर वगैरे दही लावायचे असेल तर?
भुकटी जास्त टिकणार नाही नी.
भुकटी जास्त टिकणार नाही नी. दिनेशदांनी ती पूड एकदाच वापरली आहे बहुतेक. आता चांगलं विरजलेल्या दह्याचंच कल्चर घेऊन ते पुढे विरजण लावत जातील.
आठ-दहा दिवस प्रवासाला जायचं असेल तर मी दह्याचं एक भांडं डीपफ्रिजमधे ठेवून देते. त्यापेक्षा जास्त दिवस बाहेर राहणार असू तर डेअरीचं किम्वा अमूल/ नेस्ले दही झिंदाबाद!
Pages