Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09
दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही ना... रात्री उशीरा लावलं
नाही ना... रात्री उशीरा लावलं तरी सकाळपर्यंत आंबट होतं. रात्री साडेदहा वाजता लावलं आणि साडेपाचला उठून फ्रिजमध्ये ठेवलं तरी आंबट झालेलं असतं.
थोडक्यात, सध्याच्या हवेत चार-साडेचार तासांत विरजण लागतंय, ते दही जास्त लावून मी तीन तासांत विरजतेय.
शनि-रवि काही प्रॉब्लेम नसतो, नेहमीसारखं चिमूटभरच दही लावते दुधाला.
अरे तुम्हा लोकांचं इतक्या
अरे तुम्हा लोकांचं इतक्या लवकर कसं विरजण लागतं ?
तीन-चार तासांत दही म्हणजे तर जादूच वाटली मला !
मी कोमट ( थंडीच्या दिवसांत गरम ) केलेल्या दुधाला दुपारी चार वाजता विरजण लावलं तर दुसर्या दिवशी सकाळी अदमुरं दही होतं. आंबट तर कधीच नाही. थंडीच्या दिवसात तर चोवीस तासही लागतात दही लागायला
डॅनोनच्या दह्याचं विरजण वापरते म्हणून की काय ?
डॅनोनच्या दह्याचं विरजण
डॅनोनच्या दह्याचं विरजण वापरते म्हणून की काय ?>> हो अगो... विकतच्या दह्याचं विरजण घरी नीट लागत नाही. जवळ एखादी लोकल डेअरी असेल तर त्याच्याकडून थोडंसं दही घेऊन ये किंवा मी/ ललीसारखी शेजारीण शोध
अगं मागे एकदा डेअरीतून आणलं
गोड दही खाणारी शेजारीण शोधायला हवी आता.
माझ्याकडेही सद्ध्या ३-४ तासात
माझ्याकडेही सद्ध्या ३-४ तासात दही विरजलं जातंय
मी एकाच मोठ्या वाडग्यात विरजते आणि फ्रिजमध्ये ठेवून दुसर्या दिवशी सकाळ संध्याकाळ खाते. हल्ली उन्हाळ्याचं घरी गेल्यावर मोठा ग्लास भरुन थंड ताक पितेय.
मुंबईमध्ये हिवाळ्याचे दोन
मुंबईमध्ये हिवाळ्याचे दोन महिने सोडले तर ३-४ तासात दही विरजलं जातं आणि बाहेर रहिलं तर ते आंबट ही होतं पटकन. मी दही विरजलेला वाडगा एका पसरट भांड्यात पाणी घालुन त्यात ठेवते. नॉर्मल कोमट दुध आणि नेहमी एवढचं विरजण. अशा तर्हेने सावकाशीने विरजलेल्या दह्याची चव खूप चांगली लागते.रात्री विरजलं तर सकाळी मस्त लागलेलं असतं दही योग्य चवीचं आणि घट्ट ही . करुन बघा हा सोपा उपाय.
घराच्या ओव्हरऑल तापमानावर पण
घराच्या ओव्हरऑल तापमानावर पण हे अवलंबून आहे. माझ्या सध्याच्या घरात रात्री गार असतं छान. त्यामुळे रात्री १०-११ वाजता लावलेलं दही सकाळी ६ वाजता आंबट नाही होत.
किंवा मी/ ललीसारखी शेजारीण शोध >>>


पूर्वी गावाहून वगैरे आलं की शेजार्यांकडून विरजण आणणे हे किती कॉमन होतं. मला मात्र लग्न झाल्यास बिनवासाचं विरजण मिळणारे शेजारी लाभलेलेच नाहीत कधी
कुणाचं काय, तर कुणाचं काय
अगो बाहेरच्या विरजणाने दही
अगो बाहेरच्या विरजणाने दही नीट लागत नाही. डेअरीतून लोकल दही आण आणि त्याचंच विरजण लाव. आंबट नको असेल तर विरजण लावताना अगदी सपाट चमचा दही घालायचं विरजण म्हणून . आणि ३-४ तासात भांडं नुसतं हलवून (किंचित हं नाहीतर गदागदा हलवशील :फिदी:) दूध सेट झालय असं वाटलं की अजून अर्ध्या एक तासाने सरळ फ्रिजात टाकायचं. खूप वेळ बाहेर ठेवलं तर दही आंबट होतं. मी आठवड्याभराचं दही एकदम लावते. दुपारी १२ ला वगैरे लावून जाते आणि रात्री १० ला फ्रिजात. अजिबात आंबट होत नाही. करून पहा एकदा.
दक्षिणा, डेअरीतल्या दह्याची
दक्षिणा, डेअरीतल्या दह्याची चव आवडली नव्हती मागे. परत आणून बघते.
ललिता, हो, घरातल्या टेंपरेचरने नक्कीच फरक पडत असणार पण तरी संध्याकाळी लावलेलं दही रात्री अकराला आत हे भारीच अप्रूपाचं वाटलं
बिनवासाचं विरजण मिळणारे
बिनवासाचं विरजण मिळणारे शेजारी >>
संध्याकाळी लावलेलं दही रात्री अकराला आत>> संध्याकाळी नाही, रात्रीच! आठ वाजता काळोख झालेला असतो ठाण्यात
काहीही म्हणा, पिढ्या बदलल्या तरी दही-दूध-लोणी हा जिव्हाळ्याचाच विषय राहिला आहे हे छापील वाक्य इथे छापायचा मोह मी आवरणार नाहीये
पूर्वी गावाहून वगैरे आलं की
पूर्वी गावाहून वगैरे आलं की शेजार्यांकडून विरजण आणणे हे किती कॉमन होतं. >+१. ( माहेरी पूर्वी `संध्याकाळ्चं विरजण मागून आणायचं नसतं ' असा समज होता. त्यामुळे संध्याकाळी हवं असेल तर दुधाचं पातेलच शेजारी नेऊन द्यायचं आणि ' विरजण लावून ठेवा ' म्हणून सांगायचं.:) )
अगो डेअरीतल्या दह्याची चव
अगो डेअरीतल्या दह्याची चव आवडली नव्हती म्हणजे नक्की काय? ते फक्त विरजणापुरतं वापरायचं गं.
विरजणाचं दही कितीही आंबटचिंबट असलं तरी आपण दही लावताना ते विरजण म्हणून किती घालतो आणि ते दही म्हणून लावलेलं प्रकरण किती वेळ बाहेर ठेवतो ते ही महत्वाचं आहे.
विरजणाचं दही कितीही आंबटचिंबट
विरजणाचं दही कितीही आंबटचिंबट असलं तरी आपण दही लावताना ते विरजण म्हणून किती घालतो >>> बस हेच लिहायला आले होते.. सध्या उन्हाळा असल्याने मी छोट्या पातेलीत अगदी नखभर विरजण फ्रीजमधल्या दुधाला लावून घोटून ढवळून ठेवते. सकाळी सहाला मस्त दही तयार. हिवाळयात मात्र कोमट दुध करावे लागते अन विरजण किंचीत वाढवायचे.
डेअरीतलं दही खूप आंबट होतं
डेअरीतलं दही खूप आंबट होतं आणि विरजलेलं दही जरी तितकं आंबट नाही झालं तरी त्या चवीचा आणि वासाचा अंश त्यात उतरला. गोड, दुधाळ चवीचं ( हे वर्णन करुन सांगणं अवघड आहे
) दही बनलं नाही त्याचं.
अनघा., ओके, मग मी विरजण जास्त घेतलं होतं. डॅनोनच्या दह्याचं भरपूर विरजण घ्यावं लागतं तरच दही लागतं. साधारण वाडगाभर दह्यासाठी मोठा चमचा भरुन. तेच मी डेअरीच्या दह्यासाठीही केलं.
सध्या उन्हाळा आहे तर असं नखभर विरजण घालून दही लागतंय का प्रयोग करते.
डॅनोन काय आहे माहित नाही.
डॅनोन काय आहे माहित नाही. डेअरीचे मोळू (खाटू च्या विरूध्द
) दही आणते मी विरजणासाठी अधूनमधून - विरजण बदलायला. अन दुधाच्या प्रमाणानुसार विरजण किंचीत वाढवत जाणे. चमच्याने चांगले ढवळायला विसरू नको. अन इथे खूपच उन्हाळा आहे, पुण्यात कदाचित रूम तापमानाचे दुध घ्यावे लागेल दह्यासाठी.
Danone brand चे दही. हो,
Danone brand चे दही.
हो, चमच्याने चाळीस वेळा ढवळते. मंजूडीप्रमाणेच मी ही अवचटांना धन्यवाद देते
खरंतर चितळ्यांच्या दह्यानेही लावून बघायला पाहिजे विरजण. ते दही खूप छान असते ( घरच्याइतके गोड नसले तरी ! ) पण फुल फॅट असल्याने आणत नाही फार.
मंजूडी, मी रात्री झोपायच्या
मंजूडी, मी रात्री झोपायच्या आधी फ्रिजमधल्या थंड दुधालाच विरजण लावते ( फक्त उन्हाळ्यात).
आणि विरजणाकरता लावताना मीठ वगैरे काहीच न घातलेलं थोडं ताक / चमच्याभर दह्यात पाणी घालुन चांगले ढवळुन ते दुधात घालते. सकाळी सात पर्यंत चांगले घट्ट कवडी दही होते. आल्या आल्या काही करायचे नसेल तर असे एकदा थंड दुधाचे लावुन बघ होतेय का. पण हो ललिता म्हणतेय तसं तापमानावरही अवलंबून असेलच.
गोड, दुधाळ चवीचं ( हे वर्णन
गोड, दुधाळ चवीचं ( हे वर्णन करुन सांगणं अवघड आहे स्मित ) दही बनलं नाही त्याचं >> असं हवं असेल तर दूध उकळून गार होता होता (अगदी कोमट) असताना विरजणाला अर्धा चमचा जे असेल ते दही (बाहेरचं नव्हे) घालून ३-४ तासात फ्रिजात टाक. हवंतर मी एकदा दही लावून देते तुला.
एक मोठा (पाउण लिटर चा ) कप
एक मोठा (पाउण लिटर चा ) कप दुधात एक तुकडा डेअरी मिल्क टाकली कि साडे आठ तासात मस्त कवडी दही तयार .....छान गोड सुध्दा
अग्गो बै . क्रायला हवे
अग्गो बै . क्रायला हवे
मस्तय.
मस्तय.
>>एक मोठा (पाउण लिटर चा ) कप
>>एक मोठा (पाउण लिटर चा ) कप दुधात एक तुकडा डेअरी मिल्क टाकली कि साडे आठ तासात मस्त कवडी दही तयार .....छान गोड सुध्दा>>
हे खरचं असं होतं का ?
की उगीच आपली गम्मत....
डेअरी मिल्क टाकली ?????
डेअरी मिल्क टाकली ?????
मी तर हवामाना प्रमाणे कोमाट
मी तर हवामाना प्रमाणे कोमाट दुधात अंदाजे विरजण टाकते आणि hand mixer नी एखादा मिनिट फिरवते.
मी गाईचे दुध वापरात असून सुद्धा कवडी दही लागते.
दुध गाईचे असल्या मुळे एकदा मोडल्यावर पाण्याचे प्रमाण किती जास्त आहे ते कळते. पण आमच्या कडे तसेच कमी तुपकटच दही लागते.
चाळीस वेळा चमचा फिरवण्या एवजी एकदा hand mixer फिरवून बघा बर .
मृणाल सेम पिंच. मी पण दह्याला
मृणाल सेम पिंच. मी पण दह्याला गायीचं दूधच वापरते. म्हशिच्या दुधाचं ताक केलं की तुपकट होतं ते.
गाईच्या दूधाच दही हलक हलक
गाईच्या दूधाच दही हलक हलक वाटत ( निट नाही सांगता येत पण ) ज्यांना सायीच दही आवडते त्यांना खूप फरक जाणवेल
गायीच्या दुधात फॅट कंटेंट कमी
गायीच्या दुधात फॅट कंटेंट कमी असतो, पाण्याचा अंश जास्त आणि टोटल सॉलिड्स कमी असतात. तसेच, मिल्क प्रोटिन्स पण कमी असतात. दही बनण्याच्या प्रक्रियेत आम्लामुळे प्रोटिन्स कोअॅग्युलेट होतात. मुळात प्रोटिन्स कमी असल्याने जडत्व/घट्टपणा कमी.
कात्रजचे दुध घेतो आम्ही. दही
कात्रजचे दुध घेतो आम्ही.
दही नीट नाही लागत अजुनही.
वाचुन बघतो उपाय.
हवंतर मी एकदा दही लावून देते
हवंतर मी एकदा दही लावून देते तुला. >>> दक्षिणा, कधी येतेस ?
डेअरीतून दही आणून विरजण लावले की अपडेट देईन इथे परत.
आमच्याकडे अमूल ताजा गायीचे दूध असते. त्याला फारशी साय तशीही येत नाही त्यामुळे तेवढी साय विरजणाबरोबर घोटून घेते.
उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिसच्या
उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिसच्या डब्यासाठी ताक घरूनच नेलं तर जेवेपर्यंत ते आंबटढाण होतं. म्हणून टप्परवेअरच्या टंबलरमध्ये कोमट दूधाला विरजण लावून न्यायचं. घर ते ऑफिस या (खाचखळग्यांच्या) प्रवासादरम्यान मस्त विरजण लागतं. ऑफिसमध्ये तीन तासात उत्तम आंबट चवीचं (आंबूस नव्हे) दही लागतं. ऑफिसमध्ये लंचटायमाला पाणी घालून टंबलर हलवायचा. (गार पाण्याची सोय असेल तर फारच उत्तम) सुरेख ताक प्यायला मिळतं. डब्यासाठी दह्यातली कोशिंबीर, दही भात नेत असाल तरी हीच पद्धत.
Pages