सही दही!

Submitted by मंजूडी on 8 October, 2012 - 06:09

दही विरजणे, साय विरजणे, ताक करणे, लोणी काढणे इत्यादींसाठी टिपा बाफ.
लोण्याच्या पुढच्या पायरीचे प्रश्न वारंवार आले तर आपण निराळ्या धाग्यावर चर्चा करू. Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दही हा इतक्या मंडळींचा जिव्हाळ्याचा विषय हे वाचून आपलेही एक विरजण लावायचा मोह आवरला नाही.

ब्राझिलमधे असताना घरच्या दह्याची बोंब. पुढच्या भारत वारीनंतर परत जाताना दह्याचे एक चमचा कल्चर नेले. नंतर मस्त दही. आसपासच्या पोर्तूगीज बायकांमधे आमच्या मंडळींनी लई भाव खाउन घेतला.

लहानपणी ३ फूट उंची असताना असताना ३ फूट उंचीच्या रवीने (लाकडी ब्लेंडर) दोराचा वापर करून रांजणात ताक केल्याचे आठवतेय. पण हे काम करायची परवानगी देण्याआधी अजून एखाद काम किंवा अभ्यास आई करून घ्यायची. म्हणजे थोडावेळ शहाण्यासारख वागायच. पण ते परवडायचे. Happy

कल्हई लावलेल्या पितळ्याच्या भांड्यात कढवतात ना लोणी? म्हणजे मी तरी लहानपणापासून तसंच पाह्यलंय. अजूनही बाबा लोणी बाहेरून आणून घरी कढवतात.
मी पण तसंच एक जुनं कल्हईचं पितळी पातेलं उचलून आणलंय पुण्याहून लोणी कढवायला (करत नाही ते जौद्या! Wink )

दहीपुराण मस्त जोरात चाललंय Happy

बंगालमधे ताकबिक प्रकरण नसतं आणि दूध-विरजण-साय-दही-ताक-लोणी करत बसायला मला वेळ आणि उत्साह सध्यातरी नाहीये त्यामुळे गरज पडेल तसं मदर डेअरी किंवा मस्ती दही आणते.

मला एकदम लहानपणचं 'दत्त दत्त दत्ताची गाय' हे बडबडगीत आठवलं

दही लागलं आता कढवण्याबद्दल सुरू आहे नं Wink

परदेशात दही लावायचं(च) असेल तर सौदींडियनांकडून विरजण मिळवावं...कुणा आद्य सौदीने त्यांचं फुल टू वरिजिनल विरजण आणून त्यांच्या रोजच्या कर्ड राइसची सोय केली असे एक बखर सांगते Wink आणि त्यामुळे कधीही पाहिलं तर त्यांच्याकडे नेहमी घरचं (आणि चविष्ट) दही/विरजण मिळतं...निदान तेवढ्यासाठी थोडी फार गुंडूमुंडू भाषा ऐकुन त्यांच्या ग्रुपमध्ये शिरकाव करून घ्यावा..;) आणि मग आपलं विरजण पुन्हा हरवेपर्यंत तरी निश्चिंती....

आणि उगा दह्याला लोण्यापर्यंत जाता येईल का असा विचारही करू नये..तूप तर विकतच्या बटरचं किंवा विकतचंच... Proud

<<<<बरं दही लागलं ताकही झालं आता लोणी तुपाचं बोला की थ>>>>
कविन, मी बोलू का थोडं Wink तुमच्या पोस्टपुर्वी लिहिलेलेच परत लिहितेय आणि त्यावर फोटो फ्री Wink

सायीचे दही करताना : स्टीलच्या भांडयात साय घेउन पहिल्याच दिवशी थोडसे विरजण लावून फ्रीजमधे ठवायचे.
दुसर्‍या दिवसापासून फक्त साय त्या भांड्यात घालून चांगले हलवून ठेवायचे. शनिवार-रविवारी (आठवड्याने) हे साईचे दही बाहेर काढून ठेवायचे. तासानंतर फूडप्रोसेसर मधून ताक करायचे.लोणी काढून स्वच्छ पाणी येइपर्यंत ते लोणी धुवून मस्त पैकी कढवायचे. मीठाची कणी टाकली तर छान तूप निघते. बेरी पण अगदि थोडीशी असते.
बेरी माझ्या मुलाला फार आवडते, पण मध्यंतरी कुणीतरी सांगितले कि, बेरी तब्येतीला चांगली नसते त्यामुळे मी पटकन बेरी टाकून देते. पण खरं काय आहे ते जाणकारांनी सांगावे....
हे आठवड्याचे लोणी/तूप आहे .

१) butter 1.jpg

२)ghee 1.jpg

३)ghee 2.jpg

४)Ready Ghee 2.jpg

दक्षिणा...आता फायनल स्टेप-बाय-स्टेप कृती लिही बरं.:) दुधाचा सध्याचा ब्रॅन्ड कोणता आहे तुझा?

सुमेधाव्ही, कविन धन्यवाद !
आम्ही गेले २५ वर्षे चितळे म्हशीचे दूध घेतोय. वरील तूप हे रोज १.५ लिटर दुधाचे आठवड्याचे आहे.

मला जरा बेरी खायला योग्य कि अयोग्य ते सांगा ना ...........:)

कालच भाभीच्या तोंडुन ऐकलं... विकतच्या दह्याचे विरजण लावले तर नविन दह्याला तार आली... Happy

मी तुप नेहमी कॉपर बॉटमच्या स्टीलच्या भांड्यात मंदाग्नीवर करते... अजुनपर्यंत तरी कधी जळवले नाहीये... पण ताईसाहेबांवर विश्वास ठेउन तुप कढायला ठेवले की हमखास जळणार याची गॅरंटी... आतापर्यंत एकदाच पुर्णतः जळलेलं जवळजवळ पाऊण किलो तुप टाकुन द्यावं लागलयं... तेही मी घरीच नसताना ताईनं काम उरकायच म्हणुन लोणी शिजत ठेवलं नि सवयीप्रमाणे जळायचा वास येईपर्यंत किचनमधे गेलीच नाही...

स्वच्छ पाणी निघेपर्यंत लोणी धुवून घेतले की जास्त बेरी जमत नाही असा अनुभव आहे... अधनमधन लोणी हलवत राहीलं की तुप जळत नाही... योग्यवेळी गॅस बंद केला जातो...

मीठाचा कण टाकुन बघेन यावेळेस... पाण्याचा हबका मारुन चेक करायची आयडीया भारीये... धन्यवाद... Happy

लहानपणी आमच्या ईथे कोल्हापुरातनं एक मामा यायचे लोणी घेऊन... लोणीवाले मामाही लोण्याच भांड खायच्या पानांनी पुर्ण कव्हर करायचे... आजी लोणी शिजवताना त्यात खायचे पान टाकायची...

ब्लेंडरचा प्रयोग मात्र नेहमी फसतो... फुड प्रोसेसरवर ट्राय केलं पाहीजे एकदा...

कॉपर बॉटमच्या स्टीलच्या भांड्यात>>
अशी भांडी जनरली फार पातळ बुडाची असतात ना? तरीही लोणी खालून लागत नाही म्हणजे कमाल आहे. (हल्ली स्टीलचे कॉपर बॉटमचेह वाडगे किंवा पातेली मिळतात त्याबद्दल बोलता आहात असे गृहीत धरून लिहितेय.)

मंजूडे ऑल थँक्स टू यू ओन्ली..

फ्रिजातलं दूध बाहेर काढून उकळवून गार करून मग लावते दही.
ब्रॅण्ड चितळेच

(हल्ली स्टीलचे कॉपर बॉटमचेह वाडगे किंवा पातेली मिळतात त्याबद्दल बोलता आहात असे गृहीत धरून लिहितेय.)>>>... निंबुडा बोलतेयस असेही चालेल... Happy

हो हो त्याच कॉपर बॉटमच्या पातेल्यात करते... तळाशी बेरी जमते नक्कीच... पण थोड्या थोड्या वेळाने हलवत राहीले तर ती जळत नाही... सो जळकट वास नाही येत...

एकदा अवनमधेही कढवले होते तुप... पण बॉईल होताना सॉलिड उडते वरती... पाच-सहा वेळा टिशुने पुसले तेव्हा कुठे चिकटपणा गेला...

मंजूडे ऑल थँक्स टू यू ओन्ली..>> अगं मागच्या पानावर मलाही धन्यवाद दिले आहेस Proud मलाही दे थोडं श्रेय, काढून घेऊ नकोस! Wink

आजकाल रोज सकाळी दह्याचं भांडं बघताना दक्षिणेची आठवण येते!! उचक्या लागतात काय गो तुला? Happy

पौर्णिमा.. तुला पण धन्यवाद खूपच.. Happy क्रेडीट काढून घेऊन कुठं जाऊ मी?
१-२ वेळेला दही नीट लागलं तरि पुढे अडचणी आल्यावर तुमचाच आश्रय की Happy

माझा सायीच्या दह्याचा प्रॉब्लेम जैसे थे आहे. या आठ्वड्यात दुधाचा ब्रँड बदलून बघितला. पॅकेटवर ६टक्के फॅट असे लिहिलेले आहे. प्रत्यक्षात साय जास्त येत नाही. जी साय आली तिला विरजण लावून ताक केले तरी लोणी येत नाही. नुस्ता फेस येत राहतो.

इथे दुधाला भरपूर फेस आला म्हणजे चांगले दूध असे मानतात. मद्रासी फिल्टर कॉफी करायला त्यांना बह्रपूर फेस अपेक्षित असतो. म्हणून दुधात काही केमिकल्स घालत असण्याची मलातरी शक्यता वाटतेय. एकंदरीत घरचे लोणी इथे असेपर्यंत तरी विसरावे लागतेय. Sad

६टक्के फॅट >> हे फॅटचं प्रमाण जास्ती आहे की कमी? तुझ्या पोस्टवरून ते जास्ती आहे असं वाटतंय कारण तु 'प्रत्यक्षात साय जास्त येत नाही" असं लिहिलंयस.
या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही. दिलं पाहिजे खरंतर.

Pages