लग्न समारंभ आणि भारतातले भाव..

Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40

माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.

Videographer साडे तीन लाख रुपये.

Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.

पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.

तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा...

विनय

तुमच्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.nytimes.com/2010/03/19/world/asia/19india.html

For India’s Newly Rich Farmers, Limos Won’t Do

"In India, as in many places, a wedding has always been equal parts religious ceremony, theatrical production and wealth demonstration project. For the country’s elite, the latest matrimonial trend is destination weddings in Bali or palaces in Rajasthan. For the new rich, hiring a helicopter is motivated by the same impulses for excitement and one-upmanship. "

Mr. Yadav also had hired a truck — the Reenu Rock Star 2010 Hi-Fi DJ — to lead the procession. It was playing Hindi pop so loudly that the brick homes of the village seemed to shake.
नवरा मुलगा हेलिकॉप्टरमधून विवाहस्थळी आल्यावर the father said: “The whole village will remember. The whole world will remember.”
सगळा खेळ आकड्यांचाच आहे तर हे दोन विंट्रेस्टिंग आकडे. वरपित्याचे वय ३६ वर्षे, वराचे वय १९ वर्षे.

काही वर्षांपूर्वी एक भारतीय विवाहसमारंभ विमानात साजरा झाला होता.

.

सगळ्यात विनोदी म्हणजे हॉट एअर बलून मध्ये वर जाऊन लग्न. व्हॉट्स डा पॉइंट? रिलेशन शिप सॉलिड हवी असेल तर निदान दोघे जमिनीवर तर हवेत. >> काहीच्या काहीच मामी तुमचे, सॉलिड रिलेशन शिप नि लग्न कुठे केले ह्याचा काय संबंध ? जमीनीवर केलेली लग्न सॉलीड असे काही असते तर घट्स्फोट हा प्रकारच अस्तित्वात नसता.

मला वाटते ह्यात बहुदा पियर प्रेशरच जास्त असावे. दुसऱ्याने केले मग मी का नको. किंवा अरे हा जे करू शकतो ते मी का नाही वगैरे भावना. मध्यंतरी वर किंवा वधूला मंगलाष्टके झाल्यानंतर माळ घालायच्या आधी एकदम वर उचलण्याची प्रथा आली. मग त्या माधुरी दिक्षित बाईने जोडे पळवले तेंव्हापासून चपला पळवाच्याची टूम निघाली. आता तर म्हणजे एकंदरीत भलतेच चालू झालेले दिसते. ५० एक वर्षांपूर्वी ६-७ दिवस लग्न चालायची आणि हुंडयाचा खर्च झेपेनसा झाला म्हणून लोकांनी बोंबाबोंब केली. माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी म्हणजे साधारण पणे १९८५च्य सुमारास अति खर्च होतो आपल्याकडे, काय तो मानपान वगैरे म्हणून त्याने साधे लग्न केले. किंवा त्याच्या बऱ्याच मित्रांनी पण अशीच रजिस्टर लग्ने केली. आता बहुदा पुन्हा जास्त खर्चाची लग्ने करायची टूम आलेली दिसते.

.

एका इव्हेंट वर लक्ष, पैसे, एनर्जी केंद्रित करण्यापेक्षा रिलेशन शिप सॉलिड, मीनिन्गफुल सस्टेनिन्ग असावी ह्यावर जास्त लक्ष दिले गेले तर बरे पडेल. दिखाऊ पणावर किती रिसोर्सेस वाया घालवले जातात. >> मामी परत तोच प्रश्न आहे. दिखाऊ लग्न नि "रिलेशन शिप सॉलिड, मीनिन्गफुल सस्टेनिन्ग " ह्याचा काय संबंध ? लग्न दिखाऊ/दिमाखदार जे तुमच्या सोयीनुसार असू शकते, पुढे कय होईल ह्याचा त्याच्याशी दर वेळी संबंध असेलच असे नाही. तेंव्हा असे सरसकट generalization नको.

एकूणच डेस्टिनेशन किंवा फॅन्सी वेडिंग्ज्स किंवा जे असे पाण्याखाली जाऊन, इथे तिथे व्हाउज म्हणतात त्यांना फक्त लक्ष वेधून घ्यायचे असते किंवा त्यांची १५ मिनिट्स ऑफ फेम हवी असतात >> अगदी साधेपणाने केलेली आपली लग्ने इथल्या (परदेशातल्या) बर्‍याच जणांना लोकांना दिखाऊ वाटू शकतात ह्याबद्दल काय म्हणाल ? Wink

दिखाऊ पणावर किती रिसोर्सेस वाया घालवले जातात. >> मामी एक बाजू पकडा... एक तासापुर्वीच तुम्ही अशी लग्न अटेंड करायला मजा येते असं लिहीलंय.. Uhoh

हल्ली दुसर्‍या लग्नाची नवीन टूम आलेली आहे.. म्हणजे लग्नाला २५/४०/५० वगैरे वर्षं पूर्ण झाली की परत एकदा पहिल्यापासून स्वत:च्याच (हे महत्वाचे) नवर्‍याशी/बायकोशी लग्न करायचे..
आमच्या शेजार्‍याने दोन महिन्यापूर्वी केले, पण मला बोलावलं नाही. Sad

एकदा पहिल्यापासून स्वत:च्याच (हे महत्वाचे) नवर्‍याशी/बायकोशी लग्न करायचे..>>> वन्स फूल्ड शेम ऑन अदर, ट्वाईस फूल्ड शेम ऑन यू Proud

सशल -
पैसे जास्त असले खिशात की प्रेम, जिव्हाळा, माया, माणसं, नातीगोती हे सगळं फक्त मिरवा-मिरवीकरताच असतं का? >> नाही.. अस अजीबात नाही...पण जिथे मिरवा आणि दिखावा असतो तीथे प्रेम, जिव्हाळा, माया, माणसं हे सगळ असत का ?

म्हणजे ज्यानां माणसं नातीगोती महत्वाची वाटतात त्यांनीं जास्त पैसे कमवू नये आणि कमावले तरी ते खर्च करू नये असं सुचवायचंय का तुम्हाला, विसरभोळा ?>> नाही...हे तूमच्याच मनाचे श्लोक... मला आजीबात अस सूचवायच नाहिये.पूर्वी पण लोकांकडे पैसे होतेच की...पण तेव्हा नव्हती होत इतकी मिरवा-मिरव.

अशा मिरवा-मिरावीच्या लग्नात काय होत आहे हे मी सांगायची गरज नाही ... हल्ली हिजड्यांना बोलवून हजार-हजार रुपये दिले जातात...Reception मध्ये imported दारू नसेल तर नाक कापल जात....यातच आल सगळ(प्रेम, जिव्हाळा, माया, माणसं...)

असो...हे माझ वैयक्तिक मत...मन दुखावली गेली असल्यास क्षमस्व.

सरलता मै ही सुंदरता है!!

माझ्या Event Management Company ची जाहीरात पण यायला लागली? Proud

मामी मूळात तेच तर पटत नाही. "एक ते तीन दिवसांचे लग्न प्लॅन करण्यात जोडपी जेवढा वेळ आणि रिसोर्सेस घालवतात तेवढा तरी वेळ ती रिलेशन शिप छान मेंटेन करण्यात घालवावा एव्ढेच हो." हे फक्त वादामधे लिहीण्यासाठी चांगले वाक्य. 'लग्न कसे करता' नि 'रिलेशन शिप छान मेंटेन करण्यामधे किती वेळ घालवावा' हे दोन मुद्देच मूळात पूर्णपणे वेगळे आहेत तर त्यांची सरमिसळ कशाला करायची ? तुम्ही एव्हढा चांगला सल्ला दिलात पण धुमधडाका वेडिंग्ज वाल्या लोकांनाच उद्देशूनच वरचा चांगला सल्ला का ?

एक ते तीन दिवसांचे लग्न प्लॅन करण्यात जोडपी जेवढा वेळ आणि रिसोर्सेस घालवतात तेवढा तरी वेळ ती रिलेशन शिप छान मेंटेन करण्यात घालवावा एव्ढेच हो >>>> लग्न प्लॅन करण्यात वेळ एकत्र घालवणे हेच त्यांच्यासाठी रिलेशनशिप मेंटेन/ग्रूम करणे असु शकते.

जर आमच्या लग्नात चार-पाच लाख रुपये खर्च झाले आणि साडेचारशे लोकं येऊन जेऊन गेली तर आमचं लग्न किती कमीत कमी काळ टीकेल? Proud

उडती तबकडी परवडली असती तर मिळणारे आशिर्वाद किती पटीने कमी झाले असते?

भरजरी शालू/ महागातली पैठणी घेण्याऐवजी मी साधी सुती कॉटनची साडी घेतली असती तर माझ्या लग्नातलं सौंदर्य अजून वाढलं असतं का?

साध्या कार्यालयात लग्न करण्यापेक्षा हॉर एअर बलूनमध्ये किंवा विमानात बार उडवला असता लग्नाचा तर लग्न टिकण्याचा काळ किती वर्षांनीं कमी झाला असता?

परदेसाई, तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील तर समारोपाचे दोन शब्द लिहून टाका.

नी, पंजाबी, युपीमधल्या मध्यमवर्गीय्/उच्च मध्यमवर्गीय लग्नांमध्ये फिरते स्टेज हल्ली मस्ट झालंय >>> त्या लग्नातल्या गमतीजमतीवाल्या धाग्यावर मी या स्टेजचा आंखोदेखा हाल लिहिलाय. त्याच्या विडिओही आहे माझ्याकडे. Happy

सध्या कमळाच्या फुलातल्या लग्नाचा बहर आहे. गुलाबी, भल्यामोठ्या पाकळ्यांचे कमळ. त्याचे दोन समोरासमोर असलेल्या पाकळ्यात लपवलेले दरवाजे उघडून आतल्या स्टेजवर वर-वधू चढतात. पाकळ्या त्यांच्या गुढ्ग्यापर्यंत येतात. मग ते आपले स्टेज आणि गुलाबी कमळ फिरू लागते. अशा रोमँटिक कमळात वरवधू एकमेकांना माळा घालतात.

परदेसाई, समारोप करु नका. धाग्याच नाव बदला.
लग्न समारंभ आणि भारतात कोणाकोणाची लग्न कशी झाली.
खूप पोस्टी येतील आणि वाचायला पण मजा येईल.

छान

मी तीन चार वेळा समारोप केला आहे.. आता यापुढे आपल्या हातात नाही.. जोपर्यंत सगळ्यांच्या लग्नकथा पार पडत नाहीत तोवर... Happy

बर्‍याच ठीकाणी फिरत्या बोहल्याचे उल्लेख आलेत. त्या फिरत्या यंत्रातलं काही बिघडलं आणि थांबलं तर ठीक नाहीतर जोरात फिरायला लागेल अशी शंका येऊन हसू येतय पण ते कबूल केलं तर कोणी वाईट म्हणेल का मला? काही कळत नाही. Wink
वर आकाशात जाणारे बोहले जास्त उंचीवर थांबले आणि (मला उंचावर गेल्यास गरगरते) जोडप्याला घेरी आल्यास काय?
हे सगळे उगीच मनाचे खेळ नाहीत. मध्यंतरी वरमाला घालायच्यावेळी वरास उचलून घेत आणि वधूची पंचाईत होई. एक नवरा मुलगा पडला आणि कार्यालयातच त्याचा हात फ्रॅक्चर झाला (मोडला असे म्हटल्यास वावगे वाटेल.). माझ्या भावाच्या लग्नात वधूवराच्या हातात माळा दिल्या आणि साधारण दहा मिनिटात (म्हणजे सगळ्या आत्या, काकवा, मावश्यांनी रचलेली मंगलाष्टके गाऊन होईपर्यंत) त्यातून गांधीलमाश्या बाहेर आल्या. जेमतेम लग्न पार पडले आणि करवल्यांनी ओवाळायच्या आत त्या माळा काढाव्याच लागल्या.
काही गोष्टी नीट पार पडणे याला फार महत्व आहे असे हे लहानसे प्रसंग सुचवतात. Wink
लग्नाआधी घरी होणार्‍या ग्रहमखानंतर नवर्‍या मुलाने अथवा मुलीने घराबाहेर पडत नाहीत (उगीच धडपड नको म्हणून) Wink आमच्या एका नातेवाईकांकडचे वर्‍हाड सातार्‍याहून पेश्शल यष्टीत बसताना घरासमोर एका स्कूटरवाल्याने नेमकी नवर्‍यामुलाला धडक मारली आणि पाय फ्रॅक्चर! आम्ही सगळे लग्नात बघतोय तर हे असे. आता गंमत वाटते पण लग्नातली गंमत काही प्रमाणात कमी झाली हे खरे.

मैत्रेयी +१ सगळ्या पोस्ट्स ना :).
अल्पना +१
देसाई,
हे डिल महाग वाटत असेल होस्ट्स ना तर लोकल लोकां कडून सगळ्या व्हेंडर्स च्या रेट्स ची चौकशी करा.
यु.एस हून कॉल केला असेल किंवा एन आर आय आहेत हे समजले असेल तर रेट जास्तं लावला असु शकतो (त्यांच्या आपेक्षे पेक्षा).


म्हंटल्यावर जास्तंआन त्यो शारुक खान नाचायला येनार आसंन तं किती बज्याट जाईन बरं?
<<<

अगदीच रहावत नाही म्हणून हे विषयांतर !
नाचायला हवाय तर शारुख कशाला, नाचायला ह्रितिक किंवा शाहिद ला बोलवा !
शाहरुख माझ्या लग्नात आला असता नाचायला तर त्यला पैसे देणं दूरच, मीच त्याला दंड भरायला लावला असता त्याचं नाचण(!) सहन करायचा Proud

लग्नात असा काहीतरी घोळ झाला तरच ते लग्न लक्षात रहाते.. आणि मग, 'म्हणजे काय गम्मत झाली...' अशी सुरूवात होऊन कथा सांगितल्या जातात. नाहीतर कसले लग्न....?

आमच्या लग्नात वधूकडची मंडळी बसमधून मुंबईहून निघाली. वाटेत एक टायर पंक्चर झाला. तो बदलला.. मग थोड्या वेळाने दुसरा. तो बदलला. मग इंजिनला घरघर लागून ते बंद पडलं. मग मिळेल त्या गाड्या. त्यात एक जीप, दुसरी मॅटाडोर.. करत करत अजून ३ पंक्चर टायर बदलून मंडळी पोहोचली. 'सावधान.. सावधान...' कितीवेळा सांगावे वाहनाने.... पण नाही.. Lol

Pages