Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40
माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.
Videographer साडे तीन लाख रुपये.
Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.
पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.
हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.
तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा...
विनय
तुमच्य
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेळी जी थोडी गफलत होत आहे असे
शेळी जी
थोडी गफलत होत आहे असे वाटत आहे
मी जेम्स बॉन्ड आहे जेम्स बॉण्ड किंवा जेम्स बाँड नाही
परदेसाईजी सहमत. शक्यतो
परदेसाईजी सहमत.
शक्यतो भारतातल्या मोठ्या शहरांमधले भाव हे तितकेच जास्त किंवा लग्नकाळात तितकेच फुगवलेले असतात.
बंगलोर, चेन्नई, मुंबई, दिल्ली ही ह्यामधे येतात.
मित्राच्या बहिणीचे लग्नात अल्बमची किंमत २५,००० होती ..(२००८ मधे)...अल्बम फक्त फोटो नाही.वेगळा स्टुडिओच स्थापन केला होता. जेवणात १७ प्रकारची नुस्ती लोणचीच होती.
जयमाला/वरमाला विधीसाठी वधु-वरांना घेवुन गोल गोल फिरुन १५ फुट वर जाणारे व पुष्पवर्षाव करणारे स्टेज बनवले होते.
मित्र पंजाबी आहे.
जयमाला/वरमाला विधीसाठी
जयमाला/वरमाला विधीसाठी वधु-वरांना घेवुन गोल गोल फिरुन १५ फुट वर जाणारे <<<
ऐन लग्नात वधूवरांसाठी सर्कशीबरोबर चक्कर फुकट?
विषयांतराबद्दल क्षमस्व.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
नीधप
नीधप
>ऐन लग्नात वधूवरांसाठी
>ऐन लग्नात वधूवरांसाठी सर्कशीबरोबर चक्कर फुकट? >>
नंतरचे रोजचे राह्णे बोअर होत
नंतरचे रोजचे राह्णे बोअर होत असेल का? << नसावे.. नंतर उणीदुणी काढायला महागडे विषय सापडतात ना..
(माझ्या वडिलांनी म्हणुन तुम्हाला फुक्कट सर्कस दाखवली. नाहीतर तुमच्या खानदानात.... ) वगैरे..
आज पाटील फार्मात...
आज पाटील फार्मात...
नंतरचे रोजचे राह्णे बोअर होत
नंतरचे रोजचे राह्णे बोअर होत असेल का? << नसावे.. नंतर उणीदुणी काढायला महागडे विषय सापडतात ना..
(माझ्या वडिलांनी म्हणुन तुम्हाला फुक्कट सर्कस दाखवली. नाहीतर तुमच्या खानदानात.... ) वगैरे.. >> नाहि त्यांना हि बोअर होते नसेल आणि आपल्याला सुद्धा नाहि. कारण त्यांना उणीदुणी काढायला महागडे विषय सापडतात आणि आपल्याला उणीदुणी काढायला महागडे लग्न करणारे लोक सापडतात. दिवा घ्या
मला तर हे सगळे वाचून वाटतेय
मला तर हे सगळे वाचून वाटतेय की दिड वर्षापूर्वी माझ्या बहीणीचे लग्न झाले ते वर्चुअलच असावे. ;). त्यात वधू-वर, त्यांचे आई-वडील अन फुकटात आलेले (:फिदी: हो, त्यांना जेवण सोडून काहीही दिले नव्हते. ;)) व आशिर्वाद अन शुभेच्छा देणारे, आणि वरुन 'लग्न छान झाले, जेवण छान होते' असे म्हणणारे पाहुणे हे सोडून तबकड्या वाजवणारा , जीब कॅमेरे, हवेतील रपेट हे काहीही नव्हते. थोडक्यात काय, लग्नाच्या नावाखाली फसवणूकच होती म्हणायची.
मवा.. त्यांचा परत एकदा बार
मवा.. त्यांचा परत एकदा बार उडवून टाका जीब कॅमेरे, DJ, उडणारी तबकडी वगैरे घेऊन, 'आम्ही कोण तुमचे?' पध्द्तीने.. आम्हालाही बोलवा.. काही राहून जायला नको..
पण मला खरंच त्या उडती तबकडी
पण मला खरंच त्या उडती तबकडी स्टेजची एखादी क्लिप बघायचीये. डोळ्यासमोर जे येतंय ते भीषण आहे
परदेसाई, अगदी अगदी. . पण
परदेसाई, अगदी अगदी. :). पण त्यासाठी आई-वडीलांना लग्न चांगले झाल्याच्या व आपण मध्यमवर्गीय असल्याच्या सुखस्वप्नातून जागे करुन सद्यपरीस्थितीची जाणीव करुन द्यायला लागेल.
कदाचित कुणाला मुक्तपीठातील
कदाचित कुणाला मुक्तपीठातील लेख वाटेल पण तरीही शेयर केल्याशिवाय रहावत नाही . लग्न अणि समारम्भ यावरून आठवणी खुप मागे गेल्या . माझ्या दुसर्या बहिणीच्या लग्नातील प्रसंग . वडिल नाही हे quallification सोडले तर सगळे qualifcations तिच्यात होते. आईची एकाच अट होती ते म्हणजे शिकलेला मुलगा हवा . मोठ्या बहिणीच्या वेळेस आइने प्लाट विकला अणि लग्न केले या बहिणीच्य लग्नाच्या वेळेस आईला (सम्पूर्ण ) दागिने विकावे लागले. ४ मामा (ऊतम स्थितीत ,१ काका अणि १ आत्या सुस्थित असताना ) एकानेही दखल घेतली नाही. उलट "आक्काला" कशाला इतका शिकलेले जावई हवा असे शेरे मारले. लग्न कुठल्या परिस्थितीत होतो आहे ही बहिणीला सम्पूर्ण कल्पना असल्याने ती स्वत भयानक अस्वस्थ होती. वर मंडळी तर नाराज होतेच. (परदेशी शिक्षण घेतलेल्या आपल्या मुलाला फक्त teacher ची मुलगी ) लग्न दिवशी सम्पूर्ण खर्च वजा होता कार्यालयाचे भाड़े रु ६०० शिल्लक होते. (२२ वर्षांपूर्वी त्या कार्यालयात कार्यानंतर भाड़े घेत )
लग्न मुहुर्ताच्या आधी वर मंडळी नी सांगितले मणी मंगलसूत्र आणले नाही ते तुम्ही दया नंतर पैसे देऊ .मोठी बहिण अणि दूसरी बहिण सोनारकडे
रु ६०० घेउन गेल्यात अणि एकदाचे लग्न पार पडले. संध्याकाळी कार्यालयाचा हिशोब करायच्या वेळेस मी (वय १४ ,भाऊ १६ अणि तीसरा
नबर बहिण २२ वर्षे ) अणि आई इतकेच कार्यालयात .सगळे नातेवाईक वरात निघायच्या आधीच निघून गेलेत . आईला तर धड्किच भरली की आता पैसे द्यायचे तरी कुठून? पण कार्यालयाचा व्यवस्थापक आईला म्हणाला तुम्ही खुप थकल्या आहेत . हिशोब एक तारखेला करू ( लग्नाची तारीख २९ दिसम्बर ) एक तारखेला आईचा पगार झाला अणि हिशोब झाला. आमच्या चार बहिणीच्या लग्नात आईने होते नव्हते ते विकले . आज आम्ही जरी सुस्थित आहोत तरी ते दिवस विसरु
शकत नाही .वडिल असताना हेच नातेवाईक पैसे उड़वयाला यायचे .४ मामा होते ते लोकाना सांगायचे आमची आक्का फार कर्तृत्ववान आहे तीला कुणाची मदत नको . पण नेमकी बहिणीला काय गरज आहे ही कुणीही जाणली नाही. लग्नाचे स्वरुप पुढे बदलेल असे वाटत होते पण या ठिकाणी खर्च वाचले की धककाच बसतो . आता माहित नाही पण १५ वर्षापूर्वी वडिल असणे /नसणे ह्यावर तुमची कीमत
लग्नाच्या बाजारात केली जायची. (खरड बोर्ड्चा सराव नाही त्यामुले चूका माफ असाव्यात )
नी उडती तबकडीवालं स्टेज
नी उडती तबकडीवालं स्टेज बघितलं नाहीये, पण माझ्या दोन धाकट्या दिरांच्या लग्नात जमिनीपासून ७-८ फुट उंचीचे गोलाकार फिरते स्टेज बनवले होते जयमालासाठी. त्यावर चढताना एक वधू आणि ते गोल गोल फिरताना एक वधू खाली पडणार होत्या, वराने पकडून सावरले म्हणून बरे. आधीच ५-६ इंचाची हिल असलेली चप्पल घातलेली, पायघोळ आणि वजनदार लहंगा आणि फिरते स्टेज म्हनजे वधू पडायची पूर्ण गॅरंटी.
काही तरी गैरसमज होत आहे. उडतं
काही तरी गैरसमज होत आहे.
उडतं स्टेज अस मी म्हटलेलं नाही. काही मान्यवरांनी स्वतःचा कल्पनाविलास तिथपर्यंत पोहचवलेला दिसतोय.
अल्पनाजी, बॉण्डजी.. मी
अल्पनाजी, बॉण्डजी.. मी अतिउत्साहाच्या भरात 'उडती तबकडी' म्हणालो.. आपण फिरत्या स्टेजबद्दलच बोलत होतो..
आणि ही 'जयमाला' प्रत्येक लग्नात काय काय करवते ती कोण तीही माहीत नाही..
वेब, वाईट वाटले वाचून. आता
वेब, वाईट वाटले वाचून. आता सर्व सुखात असाल, अशी आशा करतो.
amhi kadhi asala stage
amhi kadhi asala stage baghitala nahi bond tyamule kalpanavilasashivay dusara kay karanar? Madhyamvargeeyanchi lokanchi doki ashich chaltat asa mhana ani sodun dya!
Alpana, mhanaje circus barobar hoti tar!
बरेच वर्षांपूर्वी नाटकात
बरेच वर्षांपूर्वी नाटकात फिरते रंगमंच असायचे.
आता प्रायोगिक नाटक मंडळीने असे वर जाणारे, उडणारे रंगमंच करून बघावे. त्यात दाखवण्याजोगे एखादे नाटक बसवावे.
एक कल्पना - पूर्वी नाटकात लांब लांब स्वगते असायची, नि बिचारे बाकीचे नट नट्या अस्वस्थ होऊन बघत बसत. आणि कधी कधी काही प्रेक्षकसुद्धा कंटाळून, त्या बाकीच्या नट नट्यांकडे बघून, त्यांनी काही वेडेवाकडे केले की त्यातून विनोद शोधत!!
त्या ऐवजी, स्वगत आले की एकदम रंगमंच वर, खाली पडदा. स्वगत संपले की रंगमंच खाली, नाटक पुढे सुरू!
धन्यवाद दिनेशदादा . तुम्ही
धन्यवाद दिनेशदादा . तुम्ही हे वाचावे अशी इच्छा होती. का वाचावे याला सन्दर्भ आहे
कधीतरी प्रत्यक्ष भेटलात तर बोलूया
प्रत्यक्ष जेम्स बॉन्ड नी
प्रत्यक्ष जेम्स बॉन्ड नी लिहिल्यावर असे वेगळेच काहीतरी वाटणार की हो. ... हलकेच घ्या.
वेब वाईट वाटलं वाचुन , आणि
वेब वाईट वाटलं वाचुन , आणि तुमच्या आई खरच धीराच्या आहेत अशा प्रतिकुल परिस्थितीत सगळं व्यवस्थीत पार पाडलं.
आपल्याकडे भरपूर पैसे
आपल्याकडे भरपूर पैसे आहेत....पण हे मित्र-परीवारात दाखवायचे कसे ?
गरज नसताना महागडी गाडी घ्यायची, उगाच घर 5-Star हॉटेल आहे अस डेकोरेट करायचं..पण इथे Audience कमी..मग हे सगळा कुठल्यातरी कार्यात - मुंज, लग्न , साखरपुडा इत्यादी मिरवून घ्यायच.....इथे भरपूर Audience मिळतो स्वताला मिरवायला.
फक्त अशा मिरवा-मिरवीत आशीर्वाद किती मिळतात कोणास ठाऊक .
पैसे जास्त असले खिशात की
पैसे जास्त असले खिशात की प्रेम, जिव्हाळा, माया, माणसं, नातीगोती हे सगळं फक्त मिरवा-मिरवीकरताच असतं का?
म्हणजे ज्यानां माणसं नातीगोती महत्वाची वाटतात त्यांनीं जास्त पैसे कमवू नये आणि कमावले तरी ते खर्च करू नये असं सुचवायचंय का तुम्हाला, विसरभोळा ?
प्रत्यक्ष जेम्स बॉन्ड नी
प्रत्यक्ष जेम्स बॉन्ड नी लिहिल्यावर असे वेगळेच काहीतरी वाटणार की हो. ... हलकेच घ्या.
अरे हो हे मी विसरलोच की. सॉरी बरं का.
नी, पंजाबी, युपीमधल्या
नी, पंजाबी, युपीमधल्या मध्यमवर्गीय्/उच्च मध्यमवर्गीय लग्नांमध्ये फिरते स्टेज हल्ली मस्ट झालंय (खेड्यापाड्यांमध्ये पण असते). त्याचबरोबर दिल्लीसारख्या शहरामध्ये लग्नाच्या हॉलमध्ये एकाबाजूला एक छोटा पडदा टाकून फोटो काढायची सुविधा असते. आपल्याला हव्या त्या पोझमध्ये फोटो काढून घेता येतो बहूतेक.
जर रात्रीचं लग्न असेल (सरदार सोडून बाकी उत्तर भारतात रात्रीचीच लग्नं होतात) तर लग्नाच्या ठिकाण डीजे + बँड असतोच. याशिवाय लग्नाच्या आदल्या दिवशी कॉकटेल /डीजे /संगीत असले समारंभ पण असतात.
पंजाबी लग्न म्हणजे ढोल, डीजे, भांगडा, नाच आणि दारु (+ बहूदा सामिष जेवण )असं समिकरण झालंय हल्ली.
आमच्या घरातली लग्नं संपलियेत आता, नाहीतर तुला तसंल स्टेज दाखवलं असतं.
स्वगत आले की एकदम रंगमंच वर,
स्वगत आले की एकदम रंगमंच वर, खाली पडदा. स्वगत संपले की रंगमंच खाली, नाटक पुढे सुरू!
प्रायोगिक नाटकांनी केलेल्या जखमा किती खोल असतात !!
फूडफुड चॅनेलवर लग्नातल्या
फूडफुड चॅनेलवर लग्नातल्या जेवणावर आधारित एक कार्यक्रम असतो. मी एक लग्न पाहिले त्यात नवरीला बाधकामात वापरतात त्या क्रेनमध्ये बसवुन वर उंच आकाशात नेलेले आणि नवरा आल्यावर ती आकाशातुन खाली उतरली. आतापर्यंत अशा चारपाच नव-या उतरवल्यात खाली असे क्रेनवाल्याने अभिमानाने सांगितले.
आम्ही आपले फक्त पाहुनच आ वासला..
विषयांतराबद्दल क्षमस्व.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
Pages