लग्न समारंभ आणि भारतातले भाव..

Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40

माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.

Videographer साडे तीन लाख रुपये.

Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.

पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.

तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा...

विनय

तुमच्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमीरच्या सत्यमेव जयतेमधल्या हुंड्याशी संबंधित कार्यक्रमाची सुरुवात लग्नातील डामडौल, भपका, उधळपट्टी याच मुद्द्याने झाली होती.

<<<मी स्वतः ही चुक केलीय आज मागे वळुन पाहिलं तर मला आज वाटतं की आपण किती मोठी चुक केलीय. त्यामुळे आज मला पटतयं की हा निव्वळ वेडेपणा आहे.>>>

या उलट माझ्या बाबतीत घडलेय, मी नि माझा नवरा या वायफळ खर्चाच्या अगदी कट्टर विरोधात होतो, त्यातून इंटरकास्ट सो... साधेपणाने लग्न झाले... मात्र माझ्या वडीलांनी त्यांच्या पश्चात भावाच्या बरोबरीने मलाही हीस्सा देवू केला जो आज माझ्या कठीण काळात( नव-याच्या अकाली निधनानंतर) खचितच मोठा आधार वाटतोय.

-सुप्रिया.

'साधेपणा' हे मूल्य आता जवळपास कालबाह्य झालेले आहे. भपका किंवा दिखाऊपणा हा नियमच आहे. एखादी गोष्ट फार साधी असली किंवा साधेपणाने केली, तर उलट ती चर्चेचा विषय होते / त्याकडे लक्ष वेधले जाते असा माझा अनुभव आहे !

सबब, तुम्हाला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, किंवा आपला समारंभ चर्चेचा विषय व्हावा असे वाटत असेल तर तो शक्य तितका साधेपणाने, थोडीफार कल्पकता दाखवून करा. (जीन्स आणि खाली कोल्हापुरी चप्पल हे जसे स्टाईल स्टेटमेंट होते, तसे काहीसे. :))

<<<<सबब, तुम्हाला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, किंवा आपला समारंभ चर्चेचा विषय व्हावा असे वाटत असेल तर तो शक्य तितका साधेपणाने, थोडीफार कल्पकता दाखवून करा. (जीन्स आणि खाली कोल्हापुरी चप्पल हे जसे स्टाईल स्टेटमेंट होते, तसे काहीसे. )>>>>

हम्न!

कुछ तो (भी) लोग कहेंगे
लोगोंका काम है कहेना....:-(

लोक कंजूष म्हणतात हो. उगाच भिडेखातर नको तो खर्च होतो.
मात्र बिझनेस वाल्याम्साठी हा खर्च भपका ही एक अ‍ॅसेट ठरतो काही वेळा इनवेस्टमेंटही Wink
आम्हाला तर आर एम पी पासून कंपाऊंडरपर्यंत सगळ्यांशी पब्लिक रिलेशन वाढवायला असे फंक्शन उपयोगी पडतात.

जास्त खर्च , वायफळ खर्च या सापेक्ष संज्ञा आहेत असे माझे मत सध्या झाले आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे या समारंभातून ते साध्य होते की नाही पहायचे.
एकाने सरी घातली म्हणून आपण लगेच दोरी घालू नये.

आता विनय याम्च्या प्रश्नाबद्दल.
डीजे जर तसाच प्रसिद्ध असेल तर ही किंमत आणि इतर बिदागी योग्य किंवा कमीच आहे.
फुलाम्चे भाव किमान तिप्पट तरी जास्त साम्गितलेत. . पण केवळ फुले पुरवणे असे नसून सजावट एखाद्य थिमप्रमाणे किंवा एक्सक्लुजिव वैगेरे असेल किंवा सजावतकार तसाच प्रसिद्ध असेल तर्‍ किम्मत सांगणे कठिण आहे. पत्रिकेची निवड आपल्या हातात आहे.
१.अमेरिकन म्हणून जास्त भाव बहुदा नसावे. अजूनही घासाघीस होऊन ३०% तरी कमी होऊ शकतात.
२.भारतात आजकाल सगळेच महाग आहे Wink

@ साती...

"लोक कंजूष म्हणतात हो. उगाच भिडेखातर नको तो खर्च होतो....."

~ हे फार म्हणजे फारच पटले. माझ्या मुलाच्या लग्नाच्यावेळी मी पक्के ठरविले होते की अंथरून पाहूनच पाय पसरायचे....पण नेमक्या लग्नसमारंभाच्यावेळीच उगवणारी ज्येष्ठ पाहुणे मंडळी त्या आठवड्यात मुलाच्या बापाचा 'भेजा फ्राय' करून टाकतात...विशेषतः आम्हा मराठ्यांना तर 'काय लेकाचा रुबाब मारत असतोय एरव्ही...आणि एकुलत्या एका पोराच्या लग्नात बघा कसा दात कोरून पोट भरायला लागलाय....' अशा छचोर टोमण्यांना सामोरे जावे लागते.

त्यात "दुसरीकडे त्या मुलीकडील लोकांकडे बघा जरा....साखरपुड्याला काय रुबाब आणला होत्या मुलीच्या आईवडिलांनी....एक नंवरी खर्च केला होता....पोराला पिवळं धमाक करून सोडलं की....ते तरी लक्षात ठेवा...पाटील..." ~ अशा कॉमेन्ट्स डोकं भणाणून सोडतात.

खर्चाची कलमं आणि आकडे तक्त्यबाहेर वाहायला सुरुवात होते ती अशा 'हितचिंतकांकडूनच'.

लेटेस्ट माहिती. मागच्याच आठवड्यात मावस भावाचे लग्न ठरवले. मावशी बरोबर मी होतेच...

ए.सी. हॉल. दोन मजली. एका दिवसाचे भाडे = ३ लाख. ह्यात जेवणासहित खर्च समाविष्ट

आदल्या दिवशी = १ मजला फक्त ३ तासां साठी = जेवणासहित ५०,००० ( ७० माणसे)

फुले डेकोरेशन = ३५०००

हनिमुन सुट = १०,०००

भाड्याची गाडी इनोव्हा तीन दिवस + ड्रायव्हर = ६०००

वधुची साडी ( साड्या) = ४०,०००, मेक अप = ५०००, मेहेंदी = ३०००

वराचे पोषाख = ३०,०००

दागीने धरलेले नाहीत. खर्च साधारण ५ लाख. पण दोन्ही पार्टी आर्धा आर्धा वाटुन घेणार आहेत. त्या मुळे मावशीला साधारण पुर्ण लग्न ह्या प्रकाराचा खर्च ४ लाख आला. वर दिलेले २.५ लाख आणि १.५ लाखात दागीने, खोलीचे रीनोव्हेशन, लग्न पत्रिका वगैरे...

ह्यात डी.जे. धरला तर अजुन ५०,००० पकडा.

आमच्या ऑफीस मधे ड. जे हा प्रकार नेहेमीच आमच्या पार्ट्यांच्या वेळी अ‍ॅरेंज केला जातो साधारण २ तासांसाठी २०,००० हा रेट आहे आणि तो ही ५ स्टार हॉटेलातला ( आमच्या ऑफीस ची स्वतःची दोन ५ स्टार हॉटेल्स आहेत . पण अशा पार्ट्यां ना क्न्सेशन मिळत नाही). साधारण ह्या पार्ट्या सगळ्या वरच्या एक्झीक्युटीव्ह लोकांच्याच असतात.

वरील लग्नाचे रेट हे ठाण्यातले आहेत. आणि डी.जे. चे रेट पवई सारख्या हाय-फाय एरीया मधला आहे.

वर तुम्ही दिलेले रेट हे अति-उच्च वर्गीयांचे आहेत...... म्हणजे साधारण पाली हिल किंवा पेडर रोड, अशा.

१५० रुपये ताटाचा भाव? कुठे आहे पुण्यात?
अहो जर बरा हॉल घेतला तरी किमान २५०-३०० हा ताटाचा रेट आहे.
गेल्या महिन्यात आमच्या नात्यातला एक कार्यक्रम केला होता, आपटे रोडच्या एका हॉटेल मधे तर ताटाचा दर ४८० पर हेड च्या आसपास होता. ते पण बारगेन केल्या नंतर.. Sad

@ मोहन की मीरा....

डोळे पांढरेच झाले माझे....तुमच्या माहितीतील 'आकड्यांचे मोर' नाचताना पाहून.

एक दिवसासाठीच्या हॉलचे भाडे = चक्क तीन लाख !

[तरी अजून तुमच्या यादीत 'फोटोग्राफर....लाईट मीटर' हे दोन महत्वाचे आयटम्स राहिलेतच असे वाटते. कोल्हापूरातील हॉलवाले कार्यक्रमाची ती तारीख उजाडण्यापूर्वीच आदल्या रात्री हॉल ताब्यात देतात आणि त्याच क्षणी आपल्यातील कुणालातरी मुख्य कार्यालयात बोलावून 'मीटर रीडिंग' नोंद करायला सांगतात. कार्यक्रम समाप्तीनंतर काहीबाकी आकडेमोड करून "लाईटची एवढी ही रक्कम डिपॉझिटमधून वजा करीत आहे....' असा शॉकही देतात.

बहुतेक ही पद्धत सर्वत्रच असावी असे वाटते.]

अजून तुमच्या यादीत 'फोटोग्राफर....लाईट मीटर' हे दोन महत्वाचे आयटम्स राहिलेतच असे वाटते.>>>

हो अशोक काका... हे खर्च धरले नाहीत कारण माझ्या दुसर्‍या भावाचा फोटो स्टुडीयो असल्याने ते घरचेच आहे!!!! तरी त्याचे अजुन ५०,००० धरा.

ह्यात वर माई आणि वधु माईच्या साड्या, करवली (म्हणजे मी !!!) ची मानपानाची साडी, त्यांच्या कडच्या करवलीची साडी, दोन्ही पित्यांचे मानपान , तोंड धुण्यावर दिले जाणारे सामान, हे धरलेले नाही. तरी दोन्ही कडचे लोक एक मेकांचे मानपान करणार नाहियेत. फक्त दोन्ही आई, वडिल व करवल्या ह्यांचेच मानपान ठरलेले आहेत !!!!

दोन्ही मुलं एकुलती एक आहेत. उच्च शिक्षित आहेत, वर्षाला ७ अकडी पगार घेतात. दोन्ही कडे प्रशस्त घरं आहेत. आयुष्यात एकदाच लग्न करणार त्या मुळे झोकात आहेत.....

रच्याकने....
आज चांगली कांजीवरम घ्यायची तर नीदान कमीत कमी ३ ते ४ हजार लागतात. माझ्या लग्नाला माझ्या सगळ्या साड्या आणि दोन ड्रेस मिळुन १०,००० झाले होते १५ वर्षां पुर्वी !!!
सध्या माझ्या कडे फर्स्ट हँड माहिती आहे. मावशी बरोबर सगळीकडे हिंडते आहे!!!!

अवांतर:
लग्नात "वायफळ खर्च" करण्यापेक्षा ते पैसे मला द्या, असं वडलांना सुचवल्यावर त्यांचं उत्तरः
तुला हा खर्च तुझ्या लग्नात नको असेल तरी मला माझ्या मुलीच्या लग्नानिमित्ताने सगळ्या आप्तेष्टांना बोलवून दोन दिवस आनंदात घालवण्याची इच्छा आहे. तुला असं लग्न नको असेल तर मी दुसर्‍या काही कारणाने लोकांना बोलावून ते खर्च करीन. कारण इतक्या सर्व मंडळींकडे वेळोवेळी गेल्यावर त्यांना आपल्याकडे काहीच कारणाने कधीच बोलवायचे नाही, हे मला पटत नाही. शिवाय सगळा पैसा स्वतः साठी बँकेत ठेवण्यापेक्षा त्या पैशातून जर सगळ्यांनाच आनंद मिळणार असेल, तर तो मला जास्त महत्वाचा आहे. त्यासाठी योग्य ती तरतुदही मी गेल्या काही वर्षात केली आहे. तुला पैसे कमवण्याची अक्कल अन शिक्षण दोन्ही मी दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या पैशाची काही गरज नाहीये, त्यामुळे देणार नाही. माझे डोळे खाडकन उघडलेच. Happy

उत्तर भारतीयांमध्ये ५० हजार ते १ लाखाचा लेहंगा घेतला जातो आणि तो आयुष्यात एकदाच म्हणजे लग्नात घातला जातो असे ऐकिवात आहे. 'लग्न एकदाच होते' या साठी इतका खर्च..... मला वाटतं 'लग्न एकदाच होते' या भावनेला लग्नासंबंधी बिझनेस करणारे एनकॅश करतात. उदा. नुसती मेहंदी काढायचे आणि नवरीची मेंदी काढायचे भाव वेगवेगळे असतात. मेंदी सारखी असली तरीही.... कारण 'लग्न एकदाच होते' Happy रच्याकने, हे माझे वै म आहे. तुम्हाला वेगळा अनुभव येणे शक्य आहे.

"मला वाटतं 'लग्न एकदाच होते' या भावनेला लग्नासंबंधी बिझनेस करणारे एनकॅश करतात....."

~ नेमकी हीच स्थिती असते अशा प्रसंगात. मी माझ्या भाच्याच्या लग्नाचेवेळी वधूपक्षाने त्याच्यासाठी जो 'जोधपुरी की राजस्थानी' पेहराव निवडला होता त्याची किंमत २६ हजार पाहून त्याच्या खरेदीसाठी खूप विरोध केला होता....कारण अशा जोधपुरी ड्रेसचे आयुष्य असते केवळ एकच दिवस...नंतर त्याच्याकडे तो मुलगा ढुंकूनही पाहात नाही ही वस्तुस्थिती आहे. [स्वागत समारंभाचा ड्रेस वेगळाच....तो कधीतरी अधूनमधून तत्सम कार्यक्रमासाठी घातला तरी जातो....पण जोधपुरीबाबत ती शक्यता बिलकुल नसते...]

पण नातेवाईक आपल्या असल्या मताला 'इमोशनल ब्लॅकमेल' करतात असा माझा अनुभव आहे. 'अहो, कशाला विरोध करताय उगाच? लग्न एकदाच होते की, आता त्या मुलीसाठी आम्ही १४ हजाराचा शालू घेतलाय, तो काय ती कायम वापरणार आहे ? एकदाच की अक्षताच्या वेळी....म्हणून काय मग शालू घ्यायचा नाही...."

अगदी उच्चशिक्षित, आय.आय.टी.यन्स असलेल्या मुलाच्या मित्रांनीदेखील "मामा, राहु दे हो....तुम्ही २०-२५ हजाराच्या फटाक्याचा माळा लावताच की लग्नात....बॅन्ड्बाजाचाही तेवढाच खर्च करताच की.....तो देखील एकदाच असतो ना !"

~ काय बोलावे, अशा युक्तीवादापुढे.

कपड्यांचा खर्च खरच वायफल आहे.... एखादा मुलगा उच्च शिक्षित असेल, तर नीदान सुट शिवला तर तो वापरला तरी जातो. पण ते जोध पुरी, वगैरे अजिबात वापरले जात नाहीत....

मी माझ्या लग्नातल्या साडीचा यथा अवकाश ड्रेस शिवला. आणि भरपुर वापरला. तसेच काही काही साड्या खुप वापरल्या. नवर्‍याने देखिल सुट चिक्कार वापरला. म्हणजेच आमची गुंतवणुक बरोबर झाली...

नताशाच्या वडिलांचं उत्तर मार्मिक आहे परंतु त्यातही कुठे "वायफळ खर्च" करा असं म्हंटलेलं नाहीये माझ्यामते. लोकांना बोलावून मनापासून आदरातिथ्य करायचं ठरवलं तर त्यासाठी ४/५ लाखांचा डिजे आणि ३ लाखांची फुलं नक्कीच नाही लागत. इथे मुद्दा त्याचाच सुरु आहे.

बाकी मैत्रेयी, नताशा तुम्ही हौसेबद्दल म्हणताय.. उतर भारतीय, दक्षिण भारतीय किंवा अगदी महाराष्ट्रीय लग्नांत काय.. नक्की हौस कोणाला असते आणि खर्च कोण करतो ?? मयेकरांना अनुमोदन. सत्यमेव जयते मधला एपिसोड आठवा..
आणि नताशा एव्हड्या भपकेबाज लग्नांमधे ओतलेला सगळा पैसा हा नेहमी कायदेशीर मार्गांनीच मिळवलेला असतो असं तुझं म्हणणं आहे? Happy

मीरा...

"तसेच काही काही साड्या खुप वापरल्या. नवर्‍याने देखिल सुट चिक्कार वापरला....."

~ करेक्ट. याचाच अर्थ तुम्हा जोडप्याकडे वापराबाबतचे विकल्प होते, नोकरीव्यवसाय, जनसंपर्क आदी कारणामुळे ड्रेस वापरण्याच्या संधीही मिळत गेल्यामुळे ती खरेदी सत्कारणी लागली असे म्हणतो... तुमच्याबाबतीत.

पण येथील तालुका पातळीवर संसार करण्यार्‍या मुलीच काय पण मुलानादेखील 'तसले' ड्रेस दुसर्‍यांदा अंगावर घालण्याचे एकही [होय, एकही] संधी मिळत नाही, याचा मी साक्षीदार आहे. नववधू दुसर्‍या आठवड्यापासून घरकोंबडी होते...एकत्र कुटुंबपद्धती अजूनही ग्रामीण भागात जोर धरून आहे....आणि नवरोबा तर चक्क पोकलॅन मशिनचा मेकॅनिक आहे....कशाला बघतोय लग्नानंतर तो त्या जोधपुरी कोटाकडे !!

उगाच डांबरी गोळ्यांचा खर्च मात्र डोक्यावर बसला आहे.

पराग, माझं म्हणणं आहे की जर तुम्ही कायदेशीर मार्गानी पैसा मिळवलाय तर तो खर्च करायला कुणाची ना असू नये. म्हणूनच "सब घोडे बारा टके" न्यायानी "लग्नात हौशीसाठी खर्च करुच नये किंवा अमुक एक करणं म्हणजे आचरटपणा" अशी लेबलं लावायची गरज नाही. एखाद्याचं कायदेशीर उत्पन्न वार्षिक ५०लाख असल्यास तो त्या प्रमाणात खर्च करणारच अन त्याला फुकट दिखावा/आचरटपणा म्हणायची काय गरज?

४-५ लाखाचा डिजे अन ३ लाखाची फुलं>> पुन्हा तेच पराग. आपल्याला ३ लाखाची फुलं अति महाग वाटतात. पण कदाचित १०-२० हजाराची नाही वाटत. पण असे अनेक लोक असतील ज्यांना फुलांवर वीस हजार हा ही अत्यंत माज वाटू शकतो. त्यामुळे आपणही ३ लाखाची फुलं म्हणजे माज अस म्हणण्यात अर्थ नाही, असं माझं म्हणणं आहे.

हुंडा अन इतर बेकायदेशीर मार्गाने पैसा मिळवून फुकट दिखावा करणार्‍यांना विरोध आहेच. पण जे इतके पैसे खर्च करतात ते सगळे दिखाऊ/आचरट्/माज/फुकटेच असतात, हे लॉजिक जे इथे सर्रास काढले जात होते, त्याला माझा पुर्ण विरोध आहे.

पराग + १ (शेवटचं वाक्य सोडून. तेही पटतंय पण इथे तो मुद्दा नको, कारण चर्चा भलतीकडे वळण्याची शक्यताच जास्त!)

अशोक., <<नवरोबा तर चक्क पोकलॅन मशिनचा मेकॅनिक आहे>> हा विवाद पटणारा नाही. लग्नातले कपडे घालून कोणी म्हणजे कोणीच कामावर जात नाही. त्याने त्याच्या आवडीने घेतलेला सूट असेल आणि तो सूट पुढे त्याच्या मित्रांच्या/ जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात वापरण्याची शक्यताही आहे.

अशोक काका +१

एकदम मान्य.... निव्वळ फुटकळ प्रतिष्ठे पाई नको ते खर्च होतात. आमच्या ड्रायव्हर ने लग्नात ५००० चा सुट शिवला होता. त्याची पँट खुप वापरली. पण कोट जसा चा तसाच आहे!!!!

नताशा तुझ्या बाबांच्या मताला +1

तसेच जे इतके पैसे खर्च करतात ते सगळे दिखाऊ/आचरट्/माज/फुकटेच असतात, हे लॉजिक जे इथे सर्रास काढले जात होते, त्याला माझा पुर्ण विरोध आहे. >> +1

लग्न कसं मस्त असावं. खाणे-पिणे, चर्चा, गप्पा, भेटी-गाठी, लग्न मुलीचे असेल तर लग्न झाल्यावरची उदास संध्याकाळ, अन तरी कार्यालय सोडायची गडबड हे सगळं अनुभवायचे की फक्त कोर्टात जायचे? अर्थात कोर्टात जाऊन लग्न करणाऱ्यांबद्दल आदर आहे आणि तशी परिस्थिती कारणीभूत ठरते हे मान्य, पण जिथे हे दोन्ही नाही, तिथे वडिलधाऱ्यांचा म्हणण्याला मान दिला तर काय हरकत?

खर्च करू तसा असतो. इथे अनेकांनी मध्यमवर्गीयांचे लग्न ४ -५ लाखात कसं होईल ते लिहिले. पण समाजाच्या एका भागासाठी १ लाख खर्च करणे होत नाही त्यांचे काय? मग त्यांनी देखील मध्यमवर्गीयांना नावेच ठेवायला हवीत.

खर्च आपल्याला झेपेल तेवढा करावा. आपल्यापेक्षा वेगळ्या गरजा असणारे समाजात नेहमीच असतात. अल्टो असने ही पण काहींसाठी चैनीची बाब, तर BMW ही काहींची गरज !

वडापावची मजा आहेच पण मॅरिऑट मध्ये जेवण्याचीही मजा औरच! दोन्हीची तुलना कशी होऊ शकते?

बाकी देसाई , भारत अमेरिकेपेक्षा खूप महाग आहे. हे खरं आहे. प्रत्येक बाबतीत. मग ते घर असो की लग्न.

मंजूडी....

"लग्नातले कपडे घालून कोणी म्हणजे कोणीच कामावर जात नाही....."

~ नक्की नक्की....मान्यच. माझा मुद्दा ड्रेसच्या नित्याच्या उपयुक्ततेविषयी होता. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला मी स्वतः सांगून पाहिले होते की, 'मनोहर, या जोधपुरी ड्रेसचे आयुष्य फक्त त्या संध्याकाळपुरते असल्याने त्याऐवजी सूटचे ऑप्शन ठेव. निदान तो एरव्ही कुठेतरी घालता येण्यासारखा असतो...." एरव्ही तो ज्या ग्रामीण भागात राहतोय, व्यवसाय करतो, शेतात येजा करतो, तिथे तर नित्यनेमाने दादा कोंडके धर्तीच्या हाफ पॅन्ट घालूनच त्याला वावरावे लागते....ते चित्र माझ्या नजरेसमोर प्रकर्षाने येत होते.

जोधपुरी घालून तरी कसलेही बिझिनेस डील करायला कुणी बाहेर पडत नसतो, हा मुद्दा माझ्या नजरेसमोर होता.

बाकी देसाई , भारत अमेरिकेपेक्षा खूप महाग आहे. हे खरं आहे. प्रत्येक बाबतीत. मग ते घर असो की लग्न.>>> +११११

इकडे सुरु असलेली चर्चा पाहुन मजा येतेय. Happy
परदेसाई यांच्या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहियेत.
कारण हे सर्व असु शकतही ह्याची कल्पनाही मला नाहिये. Happy

लग्नात किती आणि काय खर्च करायचा ही वैयक्तिक बाब आहे.
मला माझं लग्न साध्या पद्धतीने अथवा रजिस्टर पद्धतीने करायचं होतं पण घरच्यांच्या बर्‍याच युक्तीवादासमोर हार मानावीच लागली. तरिही माझं लग्न खुपच साधेपणाने झालं जर मी लग्नात झालेला खर्चाचा अंदाज काढुन वरच्या आकड्यांसोबत तुलना केलीच तर.. Happy

भारतात १००रु च्या स्टँपपेपर लग्नापासून १०० करोडच्या "सहारा" लग्नापर्यंत सगळी रेंज उपलब्ध आहे. आपले बजेट आधीपासून फिक्स असले की सगळं बरोबर होतं. Happy

Pages