लग्न समारंभ आणि भारतातले भाव..

Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40

माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.

Videographer साडे तीन लाख रुपये.

Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.

पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.

तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा...

विनय

तुमच्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा + १००

नताशाच्या या वाक्यावर हा बाफ बंद करायला हरकत नाही. कोण कशासाठी किती वाजवी/ वायफळ खर्च करतो (आणि पुन्हा भारत - अमेरीका Happy ) त्याच्या चर्चा कशाला?

<<<लग्नात "वायफळ खर्च" करण्यापेक्षा ते पैसे मला द्या, असं वडलांना सुचवल्यावर त्यांचं उत्तरः>>>>>

हे सुचवल्यानंतर आलेल तुझ्या वडीलांच उत्तर एकदम रास्त आहे पण कुणाला काय केव्हा द्यायच नि कशा स्वरुपात द्यायच हे त्या त्या स्वतःचे पैसे खर्च करणा-या व्यक्तिवरच अवलंबून असाव शेवटी.

पण इथे आम्ही दोघेही काहीही न घेण्याबद्दल, अन लग्नाच्या साधेपणाबद्दल इतके ठाम होतो की त्यांनी मरणोत्तर जे देवू केल ते ते गेल्यावरच आम्हा सगळ्यांना समजल.

माझा सांगण्याचा मतितार्थ त्याच शिलकीचा आता योग्यवेळी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी उपयोग होवू शकेल
जेणेकरुन ते पैसे सत्कारणी लागतायत ही कृतज्ञता

इतकच! Happy

-सुप्रिया.

उत्तराची प्रतिक्षा आहे ! >> लोल. ज्ञानेश, उत्तराची प्रतिक्षा मुलं झाल्यावर २४ वर्षे करावी लागेल. उत्तर मिळेल.

केदार, २४ व्या वर्षी मुलं लग्न करतील याची काय गॅरेंटी ? Light 1 अगदीच रहावले नाही म्हणुन लिहिले.. हलकेच घ्या.

पण एक मुद्दा आहे कि
ज्यांना जमते , त्यांनी करावाच खर्च. त्याशिवाय फुलवाले, मंडपवाले , कपडेवाले यांचा बिझनेस कसा चालणार. किमान तो पैसा खेळता तरी होईल ( किंवा पांढरा तरी होईल )
मात्र 'दुसरे काय म्हणतील?' या भितीने परवडत नसताना अमाप खर्च करणे चुकीचे वाटते. म्हणजे याने डिजे आणला, त्याने लाखांचे कपडे घेतले या सगळ्याचे प्रेशर येऊन ' मी केले नाही तर हे लोक काय बोलतील? आपली ऐपत काढतील का? ' या गोष्टीचा विचार करुन कर्ज काढुन लग्न करणे योग्य वाटत नाही.

सुप्रिया जाधव तुमची पोस्ट झकास आणी विचारही आवडले. आता कुणी किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण जाता जाता एक घटना सांगुन जाते. माझ्या छोट्या बहिणीच्या उच्च मध्यमवर्गीय म्हणवणार्‍या एका मैत्रीणीच्या ( मैत्रीण मराठीच ) लग्नात घरच्यांनी डबलबेड सकट काय काय दिले आणी खर्च ही अफाट केला. सासरच्यांनी काही दागिने कपडे केले. बाकी यांची हौसमौज.

पण काही वर्षातच मुलीच्या वडलांना धंद्यात जबरी तोटा आला. धंदा बुडाला, कर्ज वारेमाप झाले, अजून काही जणांची देणी बाकी आहेत, ती दिली नाहीत. मुलीचे वडील एका किराणा दुकानात नोकरी करतायत. जेव्हा घरात लक्ष्मी होती तेव्हा तिला बाहेरची बरीच वाट दाखवली होती, आता तिनेच यांना वाट दाखवलीय.

भविष्याचा कुठलाही विचार न करता केवळ आहे म्हणून उधळपट्टी किती करावी याला पण मर्यादा असतात. आणी मुलींनी पण केवळ बापाकडे आहे म्हणून किती पैसे उडवावे याला पण सीमा असते. अर्थात, हे माझे वैयक्तीक मत. आता माझ्याकडुन पोस्ट बंद कारण याच्यावर + कमी आणी - जास्त येतील.

हौसेला मोल नाही हे मान्य.
देसायांनी जे आकडे सांगितले आहेत त्याबाबत-
डीजेचा खर्च- असेल बुवा. त्याला हैदराबादेहून पाचारण करणार असतील, त्यांना 'तोच्च' हवा असेल, तर असेल त्याची बिदागी तितकी. बंगलोरातलेच पर्यायी डिजे तितकेच पैसे घेतात का? - ह्याचीही चौकशी करता येईल. नाहीतर, हौस, स्टेटस सिंबल वगैरेखाली खर्च वर्ग! Happy

मात्र, फुलं. १० लाख. कितीही हौस केली, मैलोनमैल फुलंच पसरली तरी हा खर्च जास्त आहेच.
डिट्टो व्हिडियोग्राफर. कितीही मातबर व्हिडियोग्राफर आणला, तरी शूट तेच करणार ना? इथे पैसे उकळण्याबाबत शंका येऊ लागते.

पत्रिका- इथेही हौस म्हणून कमेन्ट्स बाजूला ठेवल्या. तरी एका पत्रिकेमागे किती खर्च करावा, ह्यामागे काहीतरी लॉजिक/ विचार/ लिमिट असेलच की नाही?

मला वाटतं, बार्गेन केलं तर होऊ शकेल. सरळ डॉलरांमध्ये किंमती सांगत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष देखरेखीला येऊ शकणार नाही, त्याची किंमत असावी ती. पण अशी सेवा देणारेही अनेक असतील. तुलना करता येईल त्यांच्यामध्ये.

आणि हो. तरीही भारतात महागाई आहेच. पेट्रोलच्या किंमती अजून वाढणार आहेत. ह्यापेक्षाही महागाईला पर्याय नाही.

बरनॉल नसेल तर कैलास जीवन लाव, आग शांत होईल.:फिदी:
मी तुला उद्देशुन आधीची पोस्ट जर लिहीलेली नव्हती तर त्याच्यावर एवढे आकाडतांडव कशाला ? उगीच स्वतःवर ओढवुन घायचे आणी मग पेटले पेटले म्हणून ताथैय्या करायचे.

बास आता.

माझी वरची पोस्ट नताशाला उद्देशुन होती कारण तिने अक्कल वगैरे काढली आणी स्वतःची पोस्ट डीलीट केली.

तू मला उद्देशून पोस्ट लिहिली नव्हतीस हे मलाही माहीत आहे. पण मी एक जेनेरिक प्रश्न विचारला होता. कुठलेही लॉजिकल प्रश्न विचारायला बंदी आहे का?
सुरुवातीपासूनच मी विचारतेय की नक्की किती खर्च म्हणजे मर्यादेत? कुणी ठरवायची ही मर्यादा? प्रत्यकाच्या मर्यादा वेगळ्या असणार हे जर मान्य असेल तर उगाच इतरांना लेबलं लावत का सूटताय?

व्हिडिओग्राफर कशावर शूट करणारे? फायनल आउटपुट काय फॉर्मॅटमधे देणार आहे? आणि काय काय देणारे? एकूण किती तास/मिनिटे वगैरे? किती कॉपीज देणारे?
अश्या बर्‍याच गोष्टींवर किंमत अवलंबून असेल. पण तरी हे जास्त वाटतेय...

डिजे जर सर्वसाधारण आहे तर त्याला हैद्राबादहून का आयात करायचे? त्याच्या मागण्या कैच्याकै आहेत.

फुले आणि पत्रिका दोन्ही अति वाटतेय.

नताशा हेच तू जर नीट भाषेत अक्कल वगैरे न काढता विचारले असतेस तर मी पण उत्तर लगेच दिले असते. जाऊ दे झाले गेले गंगेला मिळाले. संबंध नसलेली कहाणी नाही ती खरी घटना आहे, लग्नातल्या खर्चाबद्दल इथे लिहीले आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख केला, कारण जे त्यावेळी घडले ते आता डोळ्याने पाहुन वाईट वाटते, पण आता काही उपाय नाही.

खर्चाची मर्यादा ही आपण ठरवावी, त्याचे कारण म्हणजे कुणाच्याही टोमण्यांना बळी न पडता आपल्याला आपला आवाका ठरवता येतो. वर अशोकजींनी पण समपर्क उदाहरण दिले आहे, त्यामुळेच मी माझी पोस्ट लिहीली होती.

अरे इथे अजून तेच चालू आहे. प्रत्येक जण स्वतःच्या फूटपट्ट्या वापरत आहेत, काय साधे अन काय "अति" ते ठरवायला, तेच मुळी चूक आहे.
- जे खर्च करतात नक्की बेकायदेशीर पैसा मिळवत असणार,
- खर्च/ हौस इतरांच्या दबावाखालीच असणार,
- लग्नाचा खर्च मुले आईबापाकडूनच घेऊन उडवत असणार,
- लग्नात खर्च झाल्यावर आयुष्यातल्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे बाराच वाजणार....
- लक्ष्मी बाहेर गेली तर ती आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवते
हे सगळे गृहित धरून का चालताय ? केवढे जनरलायझेशन Happy
देसायांना एव्हाना प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी आशा आहे... तेव्हा आता असोच Happy

कुणाच्याही टोमण्यांना बळी न पडता खर्चाची मर्यादा आपणच ठरवली तरी टोमणे मारणारे कुठे थांबतात?
आता हेच बघ ना-
"भविष्याचा कुठलाही विचार न करता केवळ आहे म्हणून उधळपट्टी किती करावी याला पण मर्यादा असतात. आणी मुलींनी पण केवळ बापाकडे आहे म्हणून किती पैसे उडवावे याला पण सीमा असते. "

हे सगळं जनरलाइझ करायची गरज नाही खरंतर.

असो. फार झालं आता. थांबते.

मैत्रेयी+१

हल्ली मोठ्या लग्नात खास करुन ओपन ग्राऊंडवरच्या लग्नात , सात/आठ कॅमेरे/jimmy jib/ ऑन्लाईन एडीटींग होते. तीकडे व्हीडीओग्राफीला याहुन जास्त पैसे लागतात. तीच गोष्ट स्टील फोटोग्राफीची. किती बॅकप कॅमेरे/अस्सिस्टंट्स , प्रिंटींग यावर पैसे अवलंबुन आहेत.
जर असेल पैसा तर खर्च करायला काय हरकत आहे? नाहितर तो पैसा बाजारात येणार कुठुन?

ज्यांचे बजेट १०० करोड आहे त्यांना असले प्रश्न पडत नाहीत.
मुलीचा बाप अमेरिकेत आहे, मध्यमवर्गीय आहे, आणि ३०/४० लाख खर्च करू शकेल असाच आहे.
(टाटा/बिर्ला च्या घरचे लग्न नाही..).

आलेल्या उत्तरावरून कल्पना आली आहे.. Happy

सगळ्यांना धन्यवाद.. चर्चेमुळे मुंबईत चौकशी झाली. तिथे एका चांगल्या Photo/Video वाल्याकडून मिळालेले दर..

Two photographer
One videographer
One photo album - 40000/-
( unlimited photo )
One vdo dvd set - 20000/-
full HD vdo dvd set - 30000/-
Travelling extra , accommodation extra

DJ चे दर वरती कुणीतरी दिलेलेच आहेत..

बंगलोरवाले लुटालूट करतात बहुतेक..

हे लग्न केल्याचे परीणाम असावेत असे मला वाटतेय सशल Lol

नताशाच्या बर्‍याचशा पोस्ट्स्ना अनुमोदन.

नानबा, माझ्या लग्नात जो खर्च झाला त्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. त्याचं कारणही मी वर दिलंय. शिवाय तो या १०-२० लाख कॅटेगरीत नक्कीच नव्हता. पण जे लोक २० लाख कशाला २० करोड ही खर्च करतात, त्यांचं मला काही चूक वाटत नाही. फक्त तो कायदेशीर असावा. बँकेत कुजवण्यापेक्षा मार्केटमध्ये आला तर चांगलंच. जितका जास्त येईल, तितकं उत्तम. २० करोड खर्च करणार्‍यांचा पैसा व्हाइट असण्याची शक्यता कमीच, पण तरीही. अनेकांना रोजगार मिळणार असेल, तर का नाही? इट्स अ विन विन सिच्युएशन. Happy

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
>> बरोबर. इथल्या किमती खूप स्वस्त आहेत, तुम्हाला फुगवून सांगितले आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.
>> बरोबर. जमल्यास सगळ्या वर्‍हाडाला फेटे बांधण्याचे पर हेड १००० डॉलर्स हिशोबात धरा.

(लग्नाचा टोटल खर्च १०० रुपये रजिस्ट्रेशन फी दिलेला) इब्लिस

Pages