लग्न समारंभ आणि भारतातले भाव..

Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40

माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.

Videographer साडे तीन लाख रुपये.

Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.

पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.

तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा...

विनय

तुमच्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जनरलायझेशन नाहीये. "शक्यता कमी" यातून असं सुचित होतंय का की २० करोड खर्च करणार्‍यांचा पैसा व्हाइट नसतोच? Uhoh

मुलाची मुंज करताना सासुबाई अणि आई याना काही कारणाने येणे शक्य नव्हते. नवरयाला भारतात येणे शक्य नव्हते मग उस गावात बालाजी मंदिरात मुंज केली. (सम्पूर्ण खर्च =$३०) वेळ (३ तास) . लोकानी खुप नाव ठेवली पण काय थाटात समारम्भ केला तरीही नाव ठेवतात .

गीरा, अगदी सहमत. माझेही असेच मत होते पण शिनियर शिटीझन्स उसगावात यायला तयार नव्हते. यात पैसे वाचणे न वाचण्यापेक्षा दगदग आणि आपापल्या गावांमध्ये झालेले बदल माहित नसणे याचाच त्रास जास्त. जिथे रहात असतो तिथे कार्य करणे जास्त सोपे वाटते.

बँकेत कुजवण्यापेक्षा >>>>> आता हे जजमेंटल नाही का? प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असू शकतात.. तुही लेबलच लावलेच आहेस की.. Happy

मी लग्नात १२००० ची साडी घेतली होती. नंतर एकदाही नेसली नाही. तरीही पश्चात्ताप अजीबात नाहीये Happy
काही वर्षानी ई बे किन्वा तत्सम ठीकाणी विकली गेली तर विकूनही टाकेन. माझा काही तिच्यात जीव अडकलेला नाही. Wink
गीरा, लग्नाचे ठीक आहे, पण मुन्ज तर फक्त लोकांसाठीच केली जाते. नाहीतर आजच्या काळात मुन्जीला काय अर्थ आहे ? लोकांना बोलावयचे , खर्च करायचा मजा करायची या सगळ्याचे निमित्त फक्त मुन्ज

वेग-वेगळी मते वाचायला मिळत आहे. लग्नात पैसा किती आणि कसा खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो पैसा फक्त प्रामाणिकपणाने आणि स्वकष्टाने कमावलेला असावा.

पण जे लोक २० लाख कशाला २० करोड ही खर्च करतात, त्यांचं मला काही चूक वाटत नाही. फक्त तो कायदेशीर असावा. बँकेत कुजवण्यापेक्षा मार्केटमध्ये आला तर चांगलंच. जितका जास्त येईल, तितकं उत्तम. २० करोड खर्च करणार्‍यांचा पैसा व्हाइट असण्याची शक्यता कमीच, पण तरीही. अनेकांना रोजगार मिळणार असेल, तर का नाही? इट्स अ विन विन सिच्युएशन.
--------- हा युक्तीवाद मान्य नाही. मुलाचे किंवा मुलीचे लग्न वाजत गाजतच करायचे म्हणुन पैसा खोर्‍याने ओढायची चटक याने आणखिनच बळावेल.

शेवटी सगळे काही सापेक्ष आणि वैयक्तिक असतेच हो, त्यामुळे कुणी कुणाला नावे ठेवण्यात अर्थ नाहीये. तसेही इथे वाचून काय कोणी आपली मते बदलत / बनवत नाहीत. 'लग्नात वारेमाप खर्च करणे' ही एखाद्याची मानसिक गरज / हौस असणे नक्कीच समजण्यासारखे आहे. ज्यांना हे जमते आणि परवडते त्यांनी अवश्य करावे. मुद्दा एवढाच आहे, की बरेचसे लोक (माझ्या पाहण्यातले- मी मध्यमवर्गीय आहे) लग्नातला खर्च हा हौस किंवा आवड म्हणून करत नाहीत, तर निव्वळ पिअर प्रेशरखाली करतात. विरोध आहे, तो अशा प्रकारच्या खर्चाला. आणि हे जे काही प्रेशर आहे, ते अशा भपकेबाज लग्नांच्या अनुकरणातून येते ! आपला समाज प्रचंड अनुकरणप्रिय आहे. कुठेतरी काहीतरी पाहिलेले असते, ते करावेसे वाटते. आणि कालांतराने त्याची प्रथा बनून जाते.
"हम आपके है कौन" नंतर भारतीय लग्ने जास्त दिमाखदार होऊ लागली, हे निरीक्षण नाकारता येईल का?

कर्ज काढून भागवावी लागते, मनाला आनंद न मिळता मनावर ताण येतो आणि देणी फेडत बसावी लागतात ती कसली हौस? विदर्भात (आणि अन्यत्रही) आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांनी कर्ज का घेतली होती याची कारणे तपासा. "मुलीचे लग्न" हे कर्ज घेण्याच्या मुख्य कारणांपैकी एक होते. "नसेल परवडत तर नका काढू कर्ज आणि करा साधी लग्ने" असा उपदेश करणे फार सोपे आहे. पण आपला रुढीप्रिय समाज दिखावा केला नाही तर लगेच नावे ठेवायला टपलेला असतो. याच धाग्यावर मागे साती यांनी लिहिले आहे की खर्च केला नाही की लोक नावे ठेवतात. प्रॅक्टिस बसली का वगैरे टोमणे मिळतात. त्या डॉक्टर आहेत. त्यांच्या सर्कलमधले लोक नक्कीच उच्चभ्रू , किमान सुस्थित असणार. त्यांची मानसिकता अशी आहे, तर बाकी कनिष्ठ वर्गाचे काय?

(परदेसाई यांच्या प्रश्नाशी वरील पोस्टचा संबंध नाही. अवांतर विचार आहेत.)

विनयदा, शंभरी गाठली ह्या धाग्याने पण बंगळूरातील सध्याचे रेट तुम्हाला कोणीच देऊ शकले नाहीत.

माझ्या नवरयाला मुंज ही संस्कार म्हणून हवी होती (ते त्याचे मत). मी कर म्हंटले की जास्त विचार न करता हो म्हणते.
खर तर लग्नात , मुंजित आणि इतर कार्यक्रमात लोक अफाट खर्च करतात . मला बघायला आवडत पण मला इतका खर्च मानसिकाच पेलाणार नाही.मुंजी, लग्नच नाही तर चक्क एक ठिकाणी आध्यात्मिक प्रवाचानत शालू शेल्यांचे ,दागिने ,फुगाद्य,गरबा , यांचे प्रचंड प्रदर्शन बघितले.
सध्या लोकांकडे पैसे भरपूर आहेत .फक्त ते दाखवायला निमित्य हवे.
माझ्या मैत्रिनिकडे (त्याच्या जातीत) पायघड्या नव्हता पण तिच्या बहिणीच्या विहिनिणी एक लग्नात हा प्रकार बघितला .अणि मागणी केली. अशा कितीतरी नविन प्रथा केवल पैसे आहेत म्हणून येतात आहे . जिथे पैसे आहेत तिथे हे चालू शकत पण सामान्य लोक हे सोंग कुठून आणणार . या सगळ्यांचा परिणाम म्हणजे काळ सोकावतो. खर्च करायला सगळे पुढे असतात पण पैसे जमवताना डोळ्यातून पाणी येते .

>>>>बँकेत कुजवण्यापेक्षा >>>>> आता हे जजमेंटल नाही का? प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असू शकतात.. तुही लेबलच लावलेच आहेस क>>>><<
+१

>>>२० करोड खर्च करणार्‍यांचा पैसा व्हाइट असण्याची शक्यता क>>><<

हे कुठल्या फॅक्ट्स नुसार शक्यता वर्तवलीय? 'कमी वा ज्यास्त शक्यता' असली तरी अशी कशी काय ती कळली?

असे जनरलायजेशन हे "शक्यतेवर" अधारीत दिसतेय. Wink

>>>>>विनयदा, शंभरी गाठली ह्या धाग्याने पण बंगळूरातील सध्याचे रेट तुम्हाला कोणीच देऊ शकले न>>>>><<

अहो ती 'शक्यता कमी" आहे सध्यातरी. आताशी कुठे मुंबई-पुण्याचे भाव चर्चिले जाताहेत... तिथून हौले हौले गाडी बँगलोर मध्ये पोहचेल.

नाहीतर मुंबई -पुण्याच्या भावावर आधारीत एक जनरालाईझ्ड माहीती पुर्णपणे ठोक माहीती आहे असे समजू शकतो. मुंबई/पूण्यात लोकं ज्यास्त पैसेवाले की बँगलोरमध्ये? की मुंबई-पुण्याच्या लोकांना ज्यास्त हौस किंवा कोणाच्या सासरी लो़कांच्या लग्नाची यादी कशी होती, किती पुढारलेले वा मागासलेले? नाहीतर मराठी लोकं अशीच पैसे कुजवणारी असतात , बिहारमध्ये बघा दहा दिवस लग्नं होतात, पंजाबी माणसं तर मेहेंदीवरच दहा लाख खर्चतात.. मी गेलेय अश्या ईवेंटला अशी चर्चा रीतसर व्हायची बाकी आहे.

तोवर लग्न पॅरीस मध्ये झाल्याची बातमी यायची. मग तिथून पॅरीस्मधली लोकं कंजूष नाहीत व तिथे रेट बरे आहेत का ह्यावर चर्चा पुढे होइल्.(मध्येच टाळं लागले नसेल तर..) Proud

Light 1

हल्ली मोठ्या लग्नात खास करुन ओपन ग्राऊंडवरच्या लग्नात , सात/आठ कॅमेरे/jimmy jib/ ऑन्लाईन एडीटींग होते. तीकडे व्हीडीओग्राफीला याहुन जास्त पैसे लागतात. <<<<
बापरे माझ्या डोक्यातही आलं नाही मल्टीकॅमेरा सेटप, जिब, ऑन्लाइन एडिट इत्यादी गोष्टी लग्नाच्या शूटमधे होत असतील असं.. Lol
मग साडेतीन लाख काय अजून लागतील.
अर्थात हे सगळं असलेलं देसाईंच्या मित्राला अपेक्षित नव्हतं हे नंतरच्या त्यांच्या पोस्टवरून लक्षात येतंय म्हणा.

>>>आन त्यो शारुक खान नाचायला येनार आसंन तं किती बज्याट जाईन ब>>><<
तुमच्याकडे किती व कुठला पैसा तसेच शारूकचा कोनचा नाच बघायचा आहे ह्यावर अवलंबून आहे असे वरच्या चर्चेतून वाटतेय. Proud

ज्ञानेश आणी झंपी तुमच्या प्रतीक्रिया आवडल्या. ज्ञानेश एकदम सहमत तुमच्याशी. गीरा एकदम बरोबर.

इब्लिस तुमचे खरच मनापासुन अभिनंदन. खूप कमी लोक असे पाऊल उचलतात.

---- हा युक्तीवाद मान्य नाही. मुलाचे किंवा मुलीचे लग्न वाजत गाजतच करायचे म्हणुन पैसा खोर्‍याने ओढायची चटक याने आणखिनच बळावेल.>>>>>> फक्त लग्नासाठीच कमवतो का आपण? मोठा फ्लॅट , मोठी गाडी, ब्रँडेड कपडे,( चपला,अगदी मोजे सुद्धा.), आलिशान हॉटेलमध्ये जेवण ,थोडक्यात लॅविश लाईफस्टल जगावी असं किती जणांचं स्वप्न नाहिये? आताची तरुण पिढी रॅट रेसमध्ये धावतेय ते काय मुलांच्या लग्नाच्या तयारीकरीता?
वर बर्‍याच जणांनी लिहिलय कि ल्ग्नाचा खर्च वाचवून बाकि बर्‍याच ठिकाणि वापरता येईल. मग तसं तर आजकाल जवळजवळ प्रत्येकजण महिन्याला हॉटेल्,सिनेमावर ३००० (किमान) खर्च करतोच. म्हणजे वर्षाला ३६०००. असे दहा वर्षाचे झाले ३६००००. हिपण तर मोठी रक्कम आहे. मग काय बाहेर जेवणं वगैरे फाजिल खर्च आहे असं का कोणी म्हणत नाहि.
ज्यांना कमी खर्चात लग्न करायचीत त्यांनी तसं करावं,पण मग ज्यांना धूमधड्याक्यात लग्नं करायचीत त्यांना नावं ठेऊ नका. शेवटी ज्याची त्याची ईच्छा Happy ( अर्थात दुसरे करतायेत म्हणून कर्जं काढून लग्न करणं मलाहि पटत नाहि )

बंगलोरमधले भाव म्हणजेच भारतातले भाव हे समीकरण कितपत योग्य ठरावे.

स्थळ-काळानुसार भाव (संपुर्ण भारतामधे ) भिन्न भिन्न असावेत.

झंपी.. मी एवढे पोस्ट्स लिहून तुला विरोध करायला फक्त एकच विधान सापडलं? तेही विषयाशी संबंध नसलेलं? Wink तुला जर "२० करोड लग्नात खर्च करणार्‍यांचा पैसा व्हाइट असण्याची शक्यता कमी" या विधानाला चूक प्रुव्ह करायचे असेल तर नक्कीच कर. गो अहेड, हॅव फन Happy तुझा माबोवरचा वावर बघता तु जे म्हणशील तेच बरोबर हे मी मनात आधीच मान्य केलेलं आहे. Wink

बंगलोरमधले भाव म्हणजेच भारतातले भाव हे समीकरण कितपत योग्य ठरावे<<< बॉण्डजी... भारतातल्या शहरी रहाणीतले भाव सर्व साधारणपणे जवळपास असतील असं धरून चाललोय..

मल्टीकॅमेरा सेटप, जिब, ऑन्लाइन एडिट <<<<
नीधप.. मलाही वाटले होते की हे क्रिकेट मॅचसाठीच होते म्हणून.. Lol

>>२० करोड लग्नात खर्च करणार्‍यांचा पैसा व्हाइट असण्याची शक्यता कमी" या विधानाला चूक प्रुव्ह करायचे असेल तर नक्कीच कर. गो अहेड, हॅव फन तुझा माबोवरचा वावर बघता तु जे म्हणशील तेच बरोबर हे मी मनात आधीच मान्य केलेलं आ>><<
अरेरे, खूपच त्रागा झाला? विरोध कुठे केला? तुमचेच वाक्याचा विरोधाभास दाखवला.
लेबलं लावू नयेत म्हणत म्हणत.. लग्नात करोडोच्या वर खर्च करणार्‍यांकडे काळा पैसाची शक्यता ज्यास्त, लग्नात खर्च करणारे बँकेत पैसा कुजवत नाहीत.. हे काय आहे मग?

बरे तुमची चूक दाखवली तर तुम्ही 'वावर' वगैरे गोष्टीवर भाष्य करताय.. ह्यावरूनच तुमच्या इथल्या 'वावराविषयी' लोकांची मतं पक्की झाली असतीलच हे वाचून. ह्यापुढे आणखी काही वावराविषयी लिहायचे ते लिहा हो. तुमची चुक काढल्याने तुम्हाला राग आल्याने, तुम्हाला भान रहात नाही काही लिहिता ते असे समजून दुर्लक्ष करीन. Happy

Pages