Submitted by संयोजक on 1 September, 2012 - 14:14
तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका..अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कूळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंचखाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत...हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...
देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं... नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
नैवेद्याची प्रकाशचित्रे, खास आठवणी इथे प्रतिसादात भरभरून द्या. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतीच्या धाग्यावरच टाका.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय तोंपासु फोटो आहेत!! बघुनच
काय तोंपासु फोटो आहेत!! बघुनच भूक लागली!!
बस्के + १. भारी आहेत एकेक
बस्के + १.
भारी आहेत एकेक नैवेद्य
काही फरक नाही.. जेवून मग फोटो
काही फरक नाही.. जेवून मग फोटो बघितले तरी तेच... भूक!
किती अप्रतिम दिसतायत सगळेच नैवेद्यं...
केदार२०, नैवेद्याचे पान
केदार२०, नैवेद्याचे पान खाणार्याची मजा आहे बुवा, डायरेक पाच पुपो!! >>>> मंजूडी त्यातल्या मला जेमतेम तीन संपतात त्यापण नारळाच दुध असेल तर
पुपो एकदम छान मउसुत वाटताहेत. >>>> झंपी एकदम खर आहे, पण फोटोवरून कसा काय ओळखलंत
आईला आणि सौ ना सांगतो कौतुक माबोकरांचे
धन्यवाद सर्वांचे
जेवताना की बरोबर शिदोरी
जेवताना की बरोबर शिदोरी म्हणून ?>>
रावी, माझ्या माहेरी गौर घरीच शिळवतात, त्यामुळे शिदोरी नाही देत, दुपारी जेवायच्या वेळीच नैवेद्याच्या पानासाठी पाटवड्या करण्याची पद्धत आहे. खरं त्या वर फोटोत आहेत तश्याच नुसत्या थापलेल्या खायच्या असतात, पण आम्हीच तळून किंवा किमान तव्यावरतरी तेलात परतून घेऊन खमंग करून खातो
रावी, माझ्या माहेरी गौर घरीच
रावी, माझ्या माहेरी गौर घरीच शिळवतात>>>शिळवतात म्हणजे काय ?
खुप धन्यवाद सगळ्यांना! क्रुती
खुप धन्यवाद सगळ्यांना! क्रुती टाकते. अगदीच सिंपल नो कष्ट रेसिपी आहे.
टुनटुन, खरच इथे सगळ्यांना एक एक सँपल द्यायची सोय हवी होती ना? मी आहारशास्त्र विभागात दिवस्-रात्र गळ टाकून राहीले असते
शिळवतात म्हणजे काय ?>>>
शिळवतात म्हणजे काय ?>>> विसर्जित करतात.
हे घ्या उ.मो.
हे घ्या उ.मो.
तोंपासू नैवेद्य
तोंपासू नैवेद्य सगळ्यांचेच!
पुपो, नारळाची बर्फी, मोदक आणि सगळी सजावट...डोळे निवले, भूक खवळाली!
सगळ्याचे नैवेद्य खरच खुपखुप
सगळ्याचे नैवेद्य खरच खुपखुप मस्त आहेत.
मला फार काही येत नाही, पण मग बप्पा उपाशी कसा राहील मग मी तळलेले मोदक केले.
हा घ्या आमचा नैवेद्य
Pages