नैवेद्यम् समर्पयामि!!!
Submitted by संयोजक on 1 September, 2012 - 14:14
तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका..अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कूळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंचखाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत...हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...