नैवेद्यम् समर्पयामि!!!

Submitted by संयोजक on 1 September, 2012 - 14:14

Naivedya_2_1.jpg

तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका..अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कूळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंचखाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत...हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...

देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं... नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
नैवेद्याची प्रकाशचित्रे, खास आठवणी इथे प्रतिसादात भरभरून द्या. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतीच्या धाग्यावरच टाका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचेच मस्त मोदक्स !
लोलाचा नैवद्य बघुन गणपती ढेकर देणार.
गणपती देवा आता थोडी रनिंग करा ! Proud

सगळ्यांचे नैवेद्य भारी.
लोला संपूर्ण ताट अहाहा!
नंदिनी, तुला चेन्नेत उकडीचे मोदक जमणारी स्वयंपाकीण मिळाली? बाप्पाची कृपा.

साती, नाय नाय. योगिता मावशी रत्नागिरीच्या आहेत. मी मेलमधून आलेल्या फोटोवरच समाधान मानलय.

बाकी, इकडे चेन्नईत पण उकडीचे मोदकच करतात बाप्पाच्या नैवेद्याला. फक्त इकडे ते कळ्याची आणि सुबकपणाची वगैरे भानगड नसते. पिरमिडसदृश त्रिकोणी इवलालेसे मोदक करतात.

>> निगुतीनं आणि नजाकतीनं केले-सजवलेले नाहीत, तरीही
मृण, म्हणजे आणखी काय करायचं असतं? किती मस्त दिसतायत ते मोदक! Happy
(मलई बर्फी!!! Angry :P)

लालूचा नैवेद्य आला का? आता बाप्पालाही उत्सव सुरू झाल्यासारखं वाटलं असेल. Happy

सर्वांचेच नैवेद्य मस्त दिसतायत. Happy
आर्च, मोदकांवर तूप घाल की. Proud

बाई Lol

मस्त आहेत नैवेद्य! मी मोदकांचा फोटू काढायची विसरले! Sad गेल्या वेळपेक्षा जास्त छान जमले होते... Happy

उकडीचे मोदक काय अफाट सुंदर आहेत सगळ्यांचे! आर्च, मुखर्‍या सुबक!

लालूचं नैवेद्याचं उत्सवी दिसणारं ताट आलं. गंपतीबाप्पा प्रसन्न झाले!

>>देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं... नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
स्वाती, बघ, असा संयोजकांचा आग्रह आहे. पण ५ घटक, ३ मिनिटं एकत्र शिजवून, साच्यात घालून, मोदक पाडण्यात काय निगुती आणि कौशल्य आहे? Proud

Lol

सगळ्यांचे नैवेद्य अगदी तोंपासु. Happy बाप्पा खुष Happy

लोलाच्या नैवेद्याला बाप्पा कडुन नक्कीच 'सुपरलाईक' Happy

Pages