बाहुलीचा केक

Submitted by श्रद्धादिनेश on 18 July, 2012 - 05:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

हल्ली बहुतेक लहान मुलींना बार्बी डॉल आणि तिच्या केकची फारच अपुर्वाई असते. माझी मुलगीही त्याला अपवाद नाही. बरिच वर्ष तिला हा केक हवा होता. अर्थात केक शॉप्स मधे हा सहज उपलब्ध आहे. मला त्यासाठी मोजावी लागणारी किंमत बरीच जास्त वाटत होती. ह्या वर्षी ठरवलं की करुन पाहुया म्हणून १५ दिवसांपुर्वी सगळं साहीत्य घेऊन आले, थोडाफार सराव केला आणि शेवटी घेतलाच करायला.
केक काही मी घरी बनवू शकले नाही Sad ते मी बाहेरुन बेक करुन घेतले.

१) बसिक केक (आवडीच्या फ्लेवर मधे, मी बेकरीतुन करुन आणले. जे स्वतः बनवू शकतात ते उत्तमच)
मी एकूण २ किलोचे होतील असे ३ केक्स बनवून घेतले होते. फ्रॉक शेपचा मोल्ड मी दिला होता स्वत:कडचा आणि २ गोल आकारात थोडे लहान मोठे एकावर एक बसतील असे.
२) ऑरेंज किंवा आवडी प्रमाणे कोणतेही सिरप किंवा ज्युस.
३) फळांचे क्रश किंवा जॅम

आयसिंग साठी:
१) घरी बनवलेले बटर क्रिम किंवा व्हिप्ड क्रिम
२) खाण्याचे रंग
३) सजावटीसाठी लागणारे इतर सामान जसे पायपिंग बॅग, डिझाईन नोझल्स, एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल्स इ.

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम तीनही केक फुगीर भाग कापून टाकून लेव्हल करुन घेतलेत.
DSC01529.jpg
२) प्रत्येक केकचे आडवे दोन भाग करुन त्यातील खालच्या भागावर प्रथम ऑरेंज ज्युस लावून घेतला.
DSC01535_0.jpgDSC01536_0.jpgDSC01530.jpg
३) त्यावर प्लेन व्हिप्ड क्रिम पसरवून घेतले.
DSC01531.jpgDSC01537.jpg
४) क्रिम वर साखरेत मुरवलेल्या स्ट्रॉबेरीज क्रश करुन पसरवल्यात.
DSC01532.jpg
५) त्यावर उरलेला अर्धा भाग लावून घेतला.
DSC01543.jpg
६) ह्याच पद्धतीने तीनही केक एकावर एक अरेन्ज करुन घेतले. डोम शेपचा केक सर्वात वरती ठेवला.
DSC01544.jpgDSC01545.jpg
७) ह्या संपुर्ण स्ट्रक्चरला बाहेरुन प्लेन क्रिमचा थर देऊन क्रम्ब कोटींग करुन घेतले व ते ३० मिनीटांसाठी फ्रिज मधे ठेवले.
DSC01547.jpg
८) मधल्या वेळात क्रिम मधे वेगवेगळे रंग घालून डिझाईनच्या अंदाजाप्रमाणे छटा बनवून घेतल्या.
९) अर्ध्या तासाने स्ट्रक्चर बाहेर काढून त्याला फ्रॉकच्या डिझाईन प्रमाणे बेस छटा लावून घेतल्या. बेस निळा करुन घेतला.
DSC01548.jpgDSC01549.jpg
१०) बाहुलीचे मुळ कपडे काढून तिला अ‍ॅल्युमिनीयम फॉईलअने कवर करुन घेतले.
DSC01539_2.jpg
११) केकच्या वरच्या थरातून बारीक सुरीने थोडा केक आतमधून कापून बाहुलीसाठी जागा करुन घेतली.
१२) बाहूलीला त्यात हळू हळू सरकवून फिक्स करुन घेतले.
DSC01550.jpg
१३) ठरवलेल्या डिझाईन प्रमाणे पायपिंगचे बेसिक शेप्स आणि वेगवेगळ्या नोझल्स वापरुन फ्रॉक पुर्ण भरुन घेतला. निळा बेसही भरुन घेतला.
DSC01553.jpgDSC01555.jpgDSC01556.jpgDSC01557.jpg
१४) एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल इ वरुन लावून सजवून घेतले.
DSC01561.jpgDSC01562.jpgDSC01568.jpgDSC01584.jpgDSC01621.jpg
आणि बाहुलीसाठी बाहुली तयार!!!!

वाढणी/प्रमाण: 
एकुण दोन किलोचा केक झाला म्हणजे २०-२५ जणांना सहज पुरावा.
अधिक टिपा: 

१) अतिशय संयमाचे काम आहे असे मला वाटले Happy ईथे मी अंदाजे ३ तास वेळ दिली आहे पण मला प्रत्यक्शात ५ तास लागले कारण क्रिमचे तापमान सारखे घसरत होते. ते अ‍ॅडजस्ट करुन घेण्यात माझा बरच वेळ गेला. मला बेकिंग, आयसिंगचा काहीच अनुभव नसल्याने असे होत होते. ज्याना अनुभव आहे ते जास्त सहज करु शकतील.
२) हा केक कापणे आणि सारख्या भागात वाटणे बर्यापईकी त्रासदायक भाग आहे. आम्ही कापताना वरचा भाग वेगळा करुन घेतला.
मेहनत बरीच आहे पण लेकीच्या चेहर्यावरचा आनंद सगळी वसुल करुन गेला.

माहितीचा स्रोत: 
ईतरत्र बघितलेले आणि मार्गदर्शनासाठी युटुब
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या केकला व्हिप क्रिम चन्गले कि बटर क्रिम? बटर क्रिम फार गोड लागते ना! तसेच प्रत्येक केकचे दोन भाग करणे गरजेचे आहे का? मी प्रथमच ट्राय करणार आहे तर पार्टी च्या किती वेळ(दिवस) आधि करायला सुरुवात करु? तसेच स्पोन्ज केक चलेल क? केक मिक्स ने काम थोदे कमि होइल. पण केक स्पोन्ज्यी होतो त्यने. चालेल का?

कालची सुट्टी कारणी लावली Wink

GardenCake1.jpgGardenCake2.jpgGardenCake3.jpg

शेजारचा मिकी माउसचा केक विच्कत आणलेला आहे. बाहुली ठेवल्यावरचा केकचा सेपरेट फोटो नाही Happy

ही बाहुली मात्र थर्माकोलच्या चहाचा कप वापरुन केली आहे. केकचा साच्याचा केक करण्याएव्हडा वेळ नव्हता. Sad सो बाहुली नॉट ईटॅबल... बाकी कार प्राणी सोडले तर सगळे खाता येइल असेच Proud

वा वा...वर्षा...मस्तच एक्दम!!!

आर्चना, क्रिम कुठलेही चालेल, तुमच्या कंफर्ट प्रमाणे. केक सुध्दा कुठलाही. शेप देण्याआधी थोडावेळ फ्रिज मधे ठेवा म्हणजे क्रम्स कमी पडतील.
केकचे दोन भाग केल्यामुळे त्यात आपल्याला फ्लेवर अ‍ॅड करता येतात. मी बनवलेला केक साडे तीन किलोचा होता आणि त्याचे सगळे सेटींग करायला मला ५-६ तास लागले कारण मलाही काहीच अनुभव नव्हता. क्रिम सारखं पातळ होत असल्याने त्यातही बराच वेळ गेला. शक्यतो १-२ दिवस आधीच करा कारण कधी कधी वेळ जास्त लागू शकतो. पार्टीच्या दिवशीच करायला घेतल्यास जास्त गोंधळ होऊ शकतो.

खुप खुप सुंदर केक श्रध्दा.

cake decoration sathi nozzles or icing tubes bay area madhe kuthe milel?
or if its available online for purchase, can anyone put amazon link here for nozzles?

मला स्वतःला व्हिप क्रीम अवद्ते. एकदा छोट्या केक ला ट्राय केला. पण डीसाईन करताना हाताच्या उष्णतेने क्रीम विताळणे , सारखे फ्रीज ला ठेऊन परत सुरु करणे असा प्रकार झाला . बटर क्रीम सोपे जाईल का? बाहुली केक ला किती क्रीम लागेल? सोपी रेसिपी सांगता का बटर क्रीम ची .

Pages