बाहुलीचा केक

Submitted by श्रद्धादिनेश on 18 July, 2012 - 05:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

हल्ली बहुतेक लहान मुलींना बार्बी डॉल आणि तिच्या केकची फारच अपुर्वाई असते. माझी मुलगीही त्याला अपवाद नाही. बरिच वर्ष तिला हा केक हवा होता. अर्थात केक शॉप्स मधे हा सहज उपलब्ध आहे. मला त्यासाठी मोजावी लागणारी किंमत बरीच जास्त वाटत होती. ह्या वर्षी ठरवलं की करुन पाहुया म्हणून १५ दिवसांपुर्वी सगळं साहीत्य घेऊन आले, थोडाफार सराव केला आणि शेवटी घेतलाच करायला.
केक काही मी घरी बनवू शकले नाही Sad ते मी बाहेरुन बेक करुन घेतले.

१) बसिक केक (आवडीच्या फ्लेवर मधे, मी बेकरीतुन करुन आणले. जे स्वतः बनवू शकतात ते उत्तमच)
मी एकूण २ किलोचे होतील असे ३ केक्स बनवून घेतले होते. फ्रॉक शेपचा मोल्ड मी दिला होता स्वत:कडचा आणि २ गोल आकारात थोडे लहान मोठे एकावर एक बसतील असे.
२) ऑरेंज किंवा आवडी प्रमाणे कोणतेही सिरप किंवा ज्युस.
३) फळांचे क्रश किंवा जॅम

आयसिंग साठी:
१) घरी बनवलेले बटर क्रिम किंवा व्हिप्ड क्रिम
२) खाण्याचे रंग
३) सजावटीसाठी लागणारे इतर सामान जसे पायपिंग बॅग, डिझाईन नोझल्स, एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल्स इ.

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम तीनही केक फुगीर भाग कापून टाकून लेव्हल करुन घेतलेत.
DSC01529.jpg
२) प्रत्येक केकचे आडवे दोन भाग करुन त्यातील खालच्या भागावर प्रथम ऑरेंज ज्युस लावून घेतला.
DSC01535_0.jpgDSC01536_0.jpgDSC01530.jpg
३) त्यावर प्लेन व्हिप्ड क्रिम पसरवून घेतले.
DSC01531.jpgDSC01537.jpg
४) क्रिम वर साखरेत मुरवलेल्या स्ट्रॉबेरीज क्रश करुन पसरवल्यात.
DSC01532.jpg
५) त्यावर उरलेला अर्धा भाग लावून घेतला.
DSC01543.jpg
६) ह्याच पद्धतीने तीनही केक एकावर एक अरेन्ज करुन घेतले. डोम शेपचा केक सर्वात वरती ठेवला.
DSC01544.jpgDSC01545.jpg
७) ह्या संपुर्ण स्ट्रक्चरला बाहेरुन प्लेन क्रिमचा थर देऊन क्रम्ब कोटींग करुन घेतले व ते ३० मिनीटांसाठी फ्रिज मधे ठेवले.
DSC01547.jpg
८) मधल्या वेळात क्रिम मधे वेगवेगळे रंग घालून डिझाईनच्या अंदाजाप्रमाणे छटा बनवून घेतल्या.
९) अर्ध्या तासाने स्ट्रक्चर बाहेर काढून त्याला फ्रॉकच्या डिझाईन प्रमाणे बेस छटा लावून घेतल्या. बेस निळा करुन घेतला.
DSC01548.jpgDSC01549.jpg
१०) बाहुलीचे मुळ कपडे काढून तिला अ‍ॅल्युमिनीयम फॉईलअने कवर करुन घेतले.
DSC01539_2.jpg
११) केकच्या वरच्या थरातून बारीक सुरीने थोडा केक आतमधून कापून बाहुलीसाठी जागा करुन घेतली.
१२) बाहूलीला त्यात हळू हळू सरकवून फिक्स करुन घेतले.
DSC01550.jpg
१३) ठरवलेल्या डिझाईन प्रमाणे पायपिंगचे बेसिक शेप्स आणि वेगवेगळ्या नोझल्स वापरुन फ्रॉक पुर्ण भरुन घेतला. निळा बेसही भरुन घेतला.
DSC01553.jpgDSC01555.jpgDSC01556.jpgDSC01557.jpg
१४) एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल इ वरुन लावून सजवून घेतले.
DSC01561.jpgDSC01562.jpgDSC01568.jpgDSC01584.jpgDSC01621.jpg
आणि बाहुलीसाठी बाहुली तयार!!!!

वाढणी/प्रमाण: 
एकुण दोन किलोचा केक झाला म्हणजे २०-२५ जणांना सहज पुरावा.
अधिक टिपा: 

१) अतिशय संयमाचे काम आहे असे मला वाटले Happy ईथे मी अंदाजे ३ तास वेळ दिली आहे पण मला प्रत्यक्शात ५ तास लागले कारण क्रिमचे तापमान सारखे घसरत होते. ते अ‍ॅडजस्ट करुन घेण्यात माझा बरच वेळ गेला. मला बेकिंग, आयसिंगचा काहीच अनुभव नसल्याने असे होत होते. ज्याना अनुभव आहे ते जास्त सहज करु शकतील.
२) हा केक कापणे आणि सारख्या भागात वाटणे बर्यापईकी त्रासदायक भाग आहे. आम्ही कापताना वरचा भाग वेगळा करुन घेतला.
मेहनत बरीच आहे पण लेकीच्या चेहर्यावरचा आनंद सगळी वसुल करुन गेला.

माहितीचा स्रोत: 
ईतरत्र बघितलेले आणि मार्गदर्शनासाठी युटुब
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम केक. माझा मुलगा माझ्याकडे fire engine च्या केकचा हट्ट करीत आहे. तुमच्याकडून स्फूर्ती घेऊन करायला हवे.

वॉव किती देखना केक बनवला आहे तुम्ही........... Happy
क्लास केलात का केक मेकींगचा?

एवढा सुंदर केक बनवायचा आत्मविश्वास फक्त युटयुबवरील विडीयोज बघुन आला असेल तर उत्तमच........ तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..........

सही. माझ्या मुलीच्या वाढ्दिवसाला करेन. आईसिंग बटरक्रिम/ शॉर्टनींग/ का व्हीप्ड किम?

सुरेख ! तुमच्या चिकाटीला सलाम.
लेकीच्या चेहर्‍यावरच्या आनंदानं सगळं भरून पावलं असं वाटलं असेल ना>>> +१

कित्ती गोडुली झाली आहे बाहुली !
तुमच्या चिकाटीला खरेच सलाम ___/\___
दोन्ही बाहुल्या गोड आहेत..
तुमच्या बाहुलीला वादिहाशु Happy

अ फा ट!!!
तुमच्या चिकाती, मेहनती आणि हौसेच्या कौतुकासाठी योग्य ते शब्द सुचत नाहीयेत!

अगो, लाजो, स्वाती२, नीलू, uju, लोला, के अंजली, सिंडरेला, वत्सला, अरुंधती कुलकर्णी, रैना, मृण्मयी, माधुरी१०१, निवू, बिनू, sonalisl, शूम्पी, चिन्नु, बी, सायो, रीया, बस्के, सशल, वेका, भानुप्रिया, फुलपाखरू, कु. नर्मदा बारटक्के, सुलेखा, शुगोल, मो, मवा, सुयोग, झंपी, अत्रुप्त आत्मा, charcha, मिनी, डॅफोडिल्स, प्राजक्ता, शिल्पा_के, बंडुपंत, मी वर्षा, आश, मृनिश, बागुलबुवा, रचनाशिल्प, पल्लवी८६, आरती., अवल, पौर्णिमा, दिनेशदा, वर्षा_म , monalip , रुणुझुणू , स्निग्धा, बागेश्री, आस, स्मितागद्रे, वत्सला, स्वराली , मंजूडी...खुप खुप धन्यवाद्...तुमच्या सगळ्यांच्याच प्रतिक्रीया इतक्या उत्स्फुर्त आणि उत्साहवर्धक आहेत की मला प्रत्येकाचे वैयक्तीक आभार मानायचे आहेत.

एक आवड आणि लेकीची इच्छा पुरी करायचा ध्यास म्हणून हा प्रयत्न केला. आता तुमच्या प्रतिक्रीया वाचून असं वाटतयं की फक्त इथेच थांबू नये. पुढे जायलाच हवे. व्यावसायीक प्रशिक्षण घ्यायची खुप इच्छा आहे पण नोकरी, घर संभाळून करण्यासारखे काही अजून सापडत नाहीये.सध्या तरी तुनळीलाच गुरु मानले आहे. मी कला क्षेत्रातीलच असल्यामुळे डिझाईन करणे सोप्पे गेले असावे.

उजू, आपली पोरं अशीच, कितीही केलं तरी दुसर्यांच कौतुकच जास्त Wink

वत्सला, मीही विचार करते आता Happy

वेका, हे अगदी खरंय की मुलगी असली की आजु-बाजूच्या गोष्टींमधे जरा जास्तच लक्ष जातं आणि खिसाही हलका होतच असतो.

सुलेखा Happy खरच मी प्रयत्न करतेच आहे. पण मावे मुळे वेगवेगळे केक बनवण्यावर बरीच बंधनं येतात असे मला वाटते.

सुयोग डॉल केकचं शब्दशः भाषांतर करुन टाकलेय

चर्चा...गुगल आणि तुनळीला गुरु बनवा..खुप मदत होइल.

तुमच्या सगळ्यांचे पुन्हा आभार लेकीकडून शुभेच्छांसाठी. शनीवारी तिच्या मैत्रिणींना पार्टी आहे. त्यात काही कल्पना आहेत डोक्यात. यशस्वी झाल्यात तर सांगेन ईथे.

आणखी एक महत्वाचे सगळे फोटो मुळ लेखात टाकण्याची जादू ज्याने कोणी केली आहे त्यांचे खासमखास आभार!!!!!!

मी जवळ जवळ रोजच ईथे असते. ईथल्या कित्येकांची मी फॅन आहे. प्रत्येका पर्यंत पोहोचवू शकले नाही कारण इथे टंकायला खुप वेळ लागतो मला (कालपासून किती वेळ गुंतवलाय ते विचारुच नका) आज त्याच सगळ्यांकडून कौतूक करुन घेऊन माझा आत्मविश्वास नक्कीच दुणावलाय!!!!!!!

सही झालाय केक ! hats off to you...अप्रतीम .... तुमची लेक लकी आहे.
तिला वाढ्दीवसाच्या शुभेच्शा. अनेक आशीर्वाद.

सुरूवातीचे फोटोज पाहील्यावर वाटलं सोप्पंय आपण पण करून बघूया पण नंतर नंतरचं कौशल्य बघून बेत बारगळला... अप्रतिम देखणा!!! खरंच एवढ्या मेहनतीनंतर एवढा देखणा केक कापायचा म्हणजे.... पण असो खर्‍याखुर्‍या बार्बीच्या खुशीपुढे काय! तुमच्या बार्बीला वाढदिवसाच्या (बिलेटेड)शुभेच्छा

प्राची, धन्यवाद!
dreamgirl, मलाही सुरु करण्याआधी असच वाटलं होतं कि २-१ तसात होउन जाईल Happy
शुभेच्छांसाठी आभार!

सॉल्लिड्च झालाय केक...
तुमची कल्पकता, चिकाटी, सौंदर्यदृष्टी - कशाकशाला दाद द्यावी कळत नाहीये.....
हे सगळे फोटो पहात असताना आश्चर्याने माझा आ.. हळुहळू जो वासत गेला तो अगदी शेवटपर्यंत....
केवळ कम्माल आहे तुमची....
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......

बापरे..केव्हढी चिकाटी ,प्रचंड मेहनत सर्व दिसून आले,
तुझ्या कल्पकतेचं भारी कौतुक वाटलं..
पोरीचा चेहरा एव्हढा खूश दिसल्यावर तुझा थकवा दूर झाला असेल Happy
लेकीला वाढदिवसाच्या शुभकामना!!!

बाई ग! कसलं भारी काम आहे!

लेकीला मुळीच दाखवणार नाही.. आपल्याला जमायचचं नाही.. आपल्या आईला हे (पण) येत नाही.. असं वाटायला नको! Proud

भारी आहे केक. क्रिम कोणतं वापरलं. अमूलचं फ्रेश क्रीम एवढ्ं घट्टं नाहि होत ना? क्रीम कसं तयार केलं त्याची पण क्रुती लिहा ना. Happy

मस्तच केक... तुमच्या चिकाटी आणि मेहनतीला सलाम Happy
तुमच्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
लेकीला मुळीच दाखवणार नाही>>>>+१

छान

Pages