हल्ली बहुतेक लहान मुलींना बार्बी डॉल आणि तिच्या केकची फारच अपुर्वाई असते. माझी मुलगीही त्याला अपवाद नाही. बरिच वर्ष तिला हा केक हवा होता. अर्थात केक शॉप्स मधे हा सहज उपलब्ध आहे. मला त्यासाठी मोजावी लागणारी किंमत बरीच जास्त वाटत होती. ह्या वर्षी ठरवलं की करुन पाहुया म्हणून १५ दिवसांपुर्वी सगळं साहीत्य घेऊन आले, थोडाफार सराव केला आणि शेवटी घेतलाच करायला.
केक काही मी घरी बनवू शकले नाही ते मी बाहेरुन बेक करुन घेतले.
१) बसिक केक (आवडीच्या फ्लेवर मधे, मी बेकरीतुन करुन आणले. जे स्वतः बनवू शकतात ते उत्तमच)
मी एकूण २ किलोचे होतील असे ३ केक्स बनवून घेतले होते. फ्रॉक शेपचा मोल्ड मी दिला होता स्वत:कडचा आणि २ गोल आकारात थोडे लहान मोठे एकावर एक बसतील असे.
२) ऑरेंज किंवा आवडी प्रमाणे कोणतेही सिरप किंवा ज्युस.
३) फळांचे क्रश किंवा जॅम
आयसिंग साठी:
१) घरी बनवलेले बटर क्रिम किंवा व्हिप्ड क्रिम
२) खाण्याचे रंग
३) सजावटीसाठी लागणारे इतर सामान जसे पायपिंग बॅग, डिझाईन नोझल्स, एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल्स इ.
१) प्रथम तीनही केक फुगीर भाग कापून टाकून लेव्हल करुन घेतलेत.
२) प्रत्येक केकचे आडवे दोन भाग करुन त्यातील खालच्या भागावर प्रथम ऑरेंज ज्युस लावून घेतला.
३) त्यावर प्लेन व्हिप्ड क्रिम पसरवून घेतले.
४) क्रिम वर साखरेत मुरवलेल्या स्ट्रॉबेरीज क्रश करुन पसरवल्यात.
५) त्यावर उरलेला अर्धा भाग लावून घेतला.
६) ह्याच पद्धतीने तीनही केक एकावर एक अरेन्ज करुन घेतले. डोम शेपचा केक सर्वात वरती ठेवला.
७) ह्या संपुर्ण स्ट्रक्चरला बाहेरुन प्लेन क्रिमचा थर देऊन क्रम्ब कोटींग करुन घेतले व ते ३० मिनीटांसाठी फ्रिज मधे ठेवले.
८) मधल्या वेळात क्रिम मधे वेगवेगळे रंग घालून डिझाईनच्या अंदाजाप्रमाणे छटा बनवून घेतल्या.
९) अर्ध्या तासाने स्ट्रक्चर बाहेर काढून त्याला फ्रॉकच्या डिझाईन प्रमाणे बेस छटा लावून घेतल्या. बेस निळा करुन घेतला.
१०) बाहुलीचे मुळ कपडे काढून तिला अॅल्युमिनीयम फॉईलअने कवर करुन घेतले.
११) केकच्या वरच्या थरातून बारीक सुरीने थोडा केक आतमधून कापून बाहुलीसाठी जागा करुन घेतली.
१२) बाहूलीला त्यात हळू हळू सरकवून फिक्स करुन घेतले.
१३) ठरवलेल्या डिझाईन प्रमाणे पायपिंगचे बेसिक शेप्स आणि वेगवेगळ्या नोझल्स वापरुन फ्रॉक पुर्ण भरुन घेतला. निळा बेसही भरुन घेतला.
१४) एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल इ वरुन लावून सजवून घेतले.
आणि बाहुलीसाठी बाहुली तयार!!!!
१) अतिशय संयमाचे काम आहे असे मला वाटले ईथे मी अंदाजे ३ तास वेळ दिली आहे पण मला प्रत्यक्शात ५ तास लागले कारण क्रिमचे तापमान सारखे घसरत होते. ते अॅडजस्ट करुन घेण्यात माझा बरच वेळ गेला. मला बेकिंग, आयसिंगचा काहीच अनुभव नसल्याने असे होत होते. ज्याना अनुभव आहे ते जास्त सहज करु शकतील.
२) हा केक कापणे आणि सारख्या भागात वाटणे बर्यापईकी त्रासदायक भाग आहे. आम्ही कापताना वरचा भाग वेगळा करुन घेतला.
मेहनत बरीच आहे पण लेकीच्या चेहर्यावरचा आनंद सगळी वसुल करुन गेला.
श्र, कसला सही केक बनवला आहेस
श्र, कसला सही केक बनवला आहेस ग.
लेकीच्या चेहर्यावरच हसू बघून मेहनत रंग लायी असेच वाटले असेल ना.
माझ्या पिल्लाने नेमका मागून येउन हा केक पाहीला आणि बघ जरा इतरांच्या मम्मा कस काय काय जमवतात नाहीतर तू असा लूक दिला पहिले आणि नंतर म्हंट्ल की वॉव कसला मस्त बनवलाय हा केक .ऑस्सम!
वा! सुरेख झाला आहे केक!
वा! सुरेख झाला आहे केक!
चिकाटीचे काम आहे.
फोटोच्या लिंक्स ते पोस्ट 'संपादन' मध्ये जाऊन कॉपी करा आणि कृतीमध्येच पेस्ट करा.
कस्ला सुंदर दिसतोय केक!!
कस्ला सुंदर दिसतोय केक!! मस्त!!
मस्त दिसतोय केक. लेकीला
मस्त दिसतोय केक. लेकीला वादिहाशु
आमच्या गावातल्या एका बाईंनी
आमच्या गावातल्या एका बाईंनी या महिन्यात रोज एक केक असे ३१ केक्स करण्याचे चॅलेंज घेतले आहे.
त्याचे फोटो
https://www.facebook.com/pages/Cakes-By-Renae/214836505221451?ref=stream
वा!! सुंदर! फारच चिकाटीचे काम
वा!! सुंदर! फारच चिकाटीचे काम आहे. लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वासलेला आ !!! कमाल आहे तुमची
वासलेला आ !!!
कमाल आहे तुमची !!
कसला देखणा केक आहे! अगदी
कसला देखणा केक आहे! अगदी प्रोफेशनल बेकर-पेस्ट्री शेफनं केल्यासारखा दिस्तोय!
केवळ सुंदर .. तुमच्या
केवळ सुंदर .. तुमच्या चिकाटीला मानलं!!
लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
खूप सुंदर........केक आंणी
खूप सुंदर........केक आंणी लेकही
सुरेख!! चिकाटीला _/\_
सुरेख!!
चिकाटीला _/\_
श्रद्धा, मस्त दिसतोय केक!
श्रद्धा, मस्त दिसतोय केक! लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
फारच मस्त केक. आणि केवढी
फारच मस्त केक. आणि केवढी मेहेनत घेतली आहे तुम्ही. तुमच्या मुलीला अगदी अभिमान वाटला असेल तुमचा.
अप्रतिम!
अप्रतिम!
केवढी चिकाटी खरच! धन्य!!!!
केवढी चिकाटी खरच! धन्य!!!!
मस्त दिसतोय. प्रिन्सेसच्या
मस्त दिसतोय. प्रिन्सेसच्या झग्यावरचं काम सुरेख दिसतंय.
वा वा वा कसला गोड दिसतोय
वा वा वा
कसला गोड दिसतोय केक
तुमच्या बाहुलीला वादिशू
हॅट्स ऑफ!! ़खूप सुंदर दिसतोय
हॅट्स ऑफ!! ़खूप सुंदर दिसतोय केक!!
छान दिसतेय बाहुली ..
छान दिसतेय बाहुली ..
वॉव....एकदम टॉप..... केवढी
वॉव....एकदम टॉप.....
केवढी मेहनत.................
(मुलगी नसण्याचा आणखी एक फायदा.. (हे निव्वळ को द्रा आं न्यायाने लिहिलंय....नहीतर उगाच दुसर्^या चर्चा सुरू होतील)
हा इत्का सुंदर केक पाहिला की तो कापून खायला किती जीवावर येत असेल नै
:केक खायला न मिळालेली बाहूली:
उच्च!
उच्च!
मस्तच झालाय केक. तुझ्या
मस्तच झालाय केक. तुझ्या चिकाटीला सलाम. जाम कलाकुसरीचं आणि वेळाचं काम आहे. पण वर्थ इट केक खूपच सुरेख दिसतोय.
हॅपी बर्थ डे
हॅपी बर्थ डे
खुपच सुंदर झाला आहे बाहुलीचा
खुपच सुंदर झाला आहे बाहुलीचा केक..कल्पना आणि कृति यांची सांगड अप्रतिम घातली आहे.मेहनतीचे सार्थक लेकीच्या चेहर्यावर आपोआपच दिसुन येत आहे.आयसिंग चे काम चिकाटी आणि कौशल्याचे आहे.ते खुपच मस्त जमले आहे ना.केक चा बेस तयार करणं हे त्याच्यापुढे फार कौशल्याचे काम नाही आहे.तेव्हा ते सुद्धा सहज जमेल तुला.
वा! अप्रतीम !! तुमच्या
वा! अप्रतीम !!
तुमच्या चिकाटीला सलाम .
लेकीला वादिहाशु
फ्फारच सुंदर. डिटेलींग पण
फ्फारच सुंदर. डिटेलींग पण अतिशय छान जमलय.
जबरी झालंय सगळं...
जबरी झालंय सगळं...
सुरेख, पण हि केकची बाहुली आहे
सुरेख, पण हि केकची बाहुली आहे बाहुली चा केक नव्हे.
सुंदर! खूप मेहनत व चिकाटी
सुंदर!
खूप मेहनत व चिकाटी आहे( सहज मनात आले व आठवले, मी अशी केक करायची मेहनत कधीच केली नाही लेकीसाठी ती लहान असताना).
अल्टिमेट.... सलाम सलाम सलाम
अल्टिमेट....
सलाम
सलाम
सलाम
Pages