हल्ली बहुतेक लहान मुलींना बार्बी डॉल आणि तिच्या केकची फारच अपुर्वाई असते. माझी मुलगीही त्याला अपवाद नाही. बरिच वर्ष तिला हा केक हवा होता. अर्थात केक शॉप्स मधे हा सहज उपलब्ध आहे. मला त्यासाठी मोजावी लागणारी किंमत बरीच जास्त वाटत होती. ह्या वर्षी ठरवलं की करुन पाहुया म्हणून १५ दिवसांपुर्वी सगळं साहीत्य घेऊन आले, थोडाफार सराव केला आणि शेवटी घेतलाच करायला.
केक काही मी घरी बनवू शकले नाही ते मी बाहेरुन बेक करुन घेतले.
१) बसिक केक (आवडीच्या फ्लेवर मधे, मी बेकरीतुन करुन आणले. जे स्वतः बनवू शकतात ते उत्तमच)
मी एकूण २ किलोचे होतील असे ३ केक्स बनवून घेतले होते. फ्रॉक शेपचा मोल्ड मी दिला होता स्वत:कडचा आणि २ गोल आकारात थोडे लहान मोठे एकावर एक बसतील असे.
२) ऑरेंज किंवा आवडी प्रमाणे कोणतेही सिरप किंवा ज्युस.
३) फळांचे क्रश किंवा जॅम
आयसिंग साठी:
१) घरी बनवलेले बटर क्रिम किंवा व्हिप्ड क्रिम
२) खाण्याचे रंग
३) सजावटीसाठी लागणारे इतर सामान जसे पायपिंग बॅग, डिझाईन नोझल्स, एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल्स इ.
१) प्रथम तीनही केक फुगीर भाग कापून टाकून लेव्हल करुन घेतलेत.
२) प्रत्येक केकचे आडवे दोन भाग करुन त्यातील खालच्या भागावर प्रथम ऑरेंज ज्युस लावून घेतला.
३) त्यावर प्लेन व्हिप्ड क्रिम पसरवून घेतले.
४) क्रिम वर साखरेत मुरवलेल्या स्ट्रॉबेरीज क्रश करुन पसरवल्यात.
५) त्यावर उरलेला अर्धा भाग लावून घेतला.
६) ह्याच पद्धतीने तीनही केक एकावर एक अरेन्ज करुन घेतले. डोम शेपचा केक सर्वात वरती ठेवला.
७) ह्या संपुर्ण स्ट्रक्चरला बाहेरुन प्लेन क्रिमचा थर देऊन क्रम्ब कोटींग करुन घेतले व ते ३० मिनीटांसाठी फ्रिज मधे ठेवले.
८) मधल्या वेळात क्रिम मधे वेगवेगळे रंग घालून डिझाईनच्या अंदाजाप्रमाणे छटा बनवून घेतल्या.
९) अर्ध्या तासाने स्ट्रक्चर बाहेर काढून त्याला फ्रॉकच्या डिझाईन प्रमाणे बेस छटा लावून घेतल्या. बेस निळा करुन घेतला.
१०) बाहुलीचे मुळ कपडे काढून तिला अॅल्युमिनीयम फॉईलअने कवर करुन घेतले.
११) केकच्या वरच्या थरातून बारीक सुरीने थोडा केक आतमधून कापून बाहुलीसाठी जागा करुन घेतली.
१२) बाहूलीला त्यात हळू हळू सरकवून फिक्स करुन घेतले.
१३) ठरवलेल्या डिझाईन प्रमाणे पायपिंगचे बेसिक शेप्स आणि वेगवेगळ्या नोझल्स वापरुन फ्रॉक पुर्ण भरुन घेतला. निळा बेसही भरुन घेतला.
१४) एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल इ वरुन लावून सजवून घेतले.
आणि बाहुलीसाठी बाहुली तयार!!!!
१) अतिशय संयमाचे काम आहे असे मला वाटले ईथे मी अंदाजे ३ तास वेळ दिली आहे पण मला प्रत्यक्शात ५ तास लागले कारण क्रिमचे तापमान सारखे घसरत होते. ते अॅडजस्ट करुन घेण्यात माझा बरच वेळ गेला. मला बेकिंग, आयसिंगचा काहीच अनुभव नसल्याने असे होत होते. ज्याना अनुभव आहे ते जास्त सहज करु शकतील.
२) हा केक कापणे आणि सारख्या भागात वाटणे बर्यापईकी त्रासदायक भाग आहे. आम्ही कापताना वरचा भाग वेगळा करुन घेतला.
मेहनत बरीच आहे पण लेकीच्या चेहर्यावरचा आनंद सगळी वसुल करुन गेला.
फोटो...........??????
फोटो...........??????
वर्णनाने बाहुली उभी वाटतेय.
वर्णनाने बाहुली उभी वाटतेय. छानच दिसत असणार !
फोटो टाकताना ते जर क्रमवार
फोटो टाकताना ते जर क्रमवार टाकले तर खुप छान होईन
कुणीतरी हमखास स्पाँज केकची
कुणीतरी हमखास स्पाँज केकची रेसिपी द्या ना
बाहुली छानच झालीये
ह्या रेसिपीबरोबर फोटो
ह्या रेसिपीबरोबर फोटो अनिवार्य आहेत
ह्या रेसिपीबरोबर फोटो
ह्या रेसिपीबरोबर फोटो अनिवार्य आहेत >> अगदी अगदी. खायला नका देऊ पण फोटो तर दाखवाल का नाही?
फोटो लेखात देता आले नाहीत. ते
फोटो लेखात देता आले नाहीत. ते ईथे देत आहे:
१) प्रथम तीनही केक फुगीर भाग कापून टाकून लेव्हल करुन घेतलेत.
२) प्रत्येक केकचे आडवे दोन भाग करुन त्यातील खालच्या भागावर प्रथम ऑरेंज ज्युस लावून घेतला.
३) त्यावर प्लेन व्हिप्ड क्रिम पसरवून घेतले.
४) क्रिम वर साखरेत मुरवलेल्या स्ट्रॉबेरीज क्रश करुन पसरवल्यात.
५) त्यावर उरलेला अर्धा भाग लावून घेतला.
६) ह्याच पद्धतीने तीनही केक एकावर एक अरेन्ज करुन घेतले. डोम शेपचा केक सर्वात वरती ठेवला.
७) ह्या संपुर्ण स्ट्रक्चरला बाहेरुन प्लेन क्रिमचा थर देऊन क्रम्ब कोटींग करुन घेतले व ते ३० मिनीटांसाठी फ्रिज मधे ठेवले.
८) मधल्या वेळात क्रिम मधे वेगवेगळे रंग घालून डिझाईनच्या अंदाजाप्रमाणे छटा बनवून घेतल्या.
९) अर्ध्या तासाने स्ट्रक्चर बाहेर काढून त्याला फ्रॉकच्या डिझाईन प्रमाणे बेस छटा लावून घेतल्या. बेस निळा करुन घेतला.
१०) बाहुलीचे मुळ कपडे काढून तिला अॅल्युमिनीयम फॉईलअने कवर करुन घेतले.
११) केकच्या वरच्या थरातून बारीक सुरीने थोडा केक आतमधून कापून बाहुलीसाठी जागा करुन घेतली.
१२) बाहूलीला त्यात हळू हळू सरकवून फिक्स करुन घेतले.
१३) ठरवलेल्या डिझाईन प्रमाणे पायपिंगचे बेसिक शेप्स आणि वेगवेगळ्या नोझल्स वापरुन फ्रॉक पुर्ण भरुन घेतला. निळा बेसही भरुन घेतला.
१४) एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल इ वरुन लावून सजवून घेतले.
अरे...मी फोटो टाकेपर्यंत इतके
अरे...मी फोटो टाकेपर्यंत इतके प्रतिसाद वेळ लागला खुप फोटो टाकायला
मस्तच दिसतोय केक पण फार
मस्तच दिसतोय केक पण फार चिकाटीचे काम वाटले त्याबद्दल तुमचे कौतुक.
तुमच्या चिकाटीला
तुमच्या चिकाटीला _______/\_______
सलाम. मगापासुन फोटोसाठी येथे
सलाम.
मगापासुन फोटोसाठी येथे येउन चेक करत होते. सुपर्ब. मस्त.
कित्ती गोडुली झाली आहे बाहुली
कित्ती गोडुली झाली आहे बाहुली !
तुमच्या चिकाटीला खरेच सलाम ___/\___
__/\__
__/\__
सही झालाय केक !!!!!
सही झालाय केक !!!!!
दोन्ही बाहुल्या गोड
दोन्ही बाहुल्या गोड आहेत.
मस्त केलायस, तुझी चिकाटी आणि पेशन्स दांडगा आहे.
सुंदर झालाय केक
खुपच सुरेख डेकोरेट
खुपच सुरेख डेकोरेट केलाय!
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा॓ खुष झाली असेल ना खुप?
खुप खुप आभार तुम्हा
खुप खुप आभार तुम्हा सगळ्यांचे. मी हा केक करायचाच असं आव्हानच घेतलं होतं स्वतःसाठी. तुमच्या प्रतिसादामुळे उत्साह खुप वाढलाय हे नक्की.
सही झालाय केक ! इतका सुंदर
सही झालाय केक ! इतका सुंदर केक कापावासा वाटणार नाही !
फोटो पण सुरेख आलेत !
स्मितागद्रे वत्सला, हो
स्मितागद्रे
वत्सला, हो खुपच..धन्यवाद!
भारी!!!! बाहुलीच्या झग्यावरचे
भारी!!!!
बाहुलीच्या झग्यावरचे आयसिंग करणे हे भयंकर कौशल्याचे आणि चिकाटीचे काम आहे. खूपच सुंदर
लेकीला अनेक शुभेच्छा!
स्वराली, खरच...कापताना माझाच
स्वराली, खरच...कापताना माझाच जीव होत नव्हता आणि बाकी सगळ्यांना खुप घाई झाली होती
मंजूडी ..खुप खुप आभार!!!
मंजूडी ..खुप खुप आभार!!!
सुपर्ब
सुपर्ब
फारच सुरेख झालाय केक. मेहनत
फारच सुरेख झालाय केक. मेहनत आहेच पण लेकीच्या चेहर्यावरच्या आनंदानं सगळं भरून पावलं असं वाटलं असेल ना?
मस्त!!
मस्त!!
मामी, अगदी खरं बोललात धन्स
मामी, अगदी खरं बोललात धन्स स्वाती!
वा, काय सुरेख झालेय डिझाईन
वा, काय सुरेख झालेय डिझाईन सगळेच. खरंच कौशल्याचे काम आहे. फारच भारी !
( मघाशी का कुणास ठाऊक फोटो नीट लोडच होत नव्हते. फक्त पहिले दोन-तीन आणि शेवटचा फोटो नीट दिसला. तरी घाईघाईत प्रतिक्रिया दिली. आता सगळे फोटो पाहिल्यावर डिटेलिंग लक्षात आले. )
व्वॉव!! मस्तच दिसतोय केक
व्वॉव!! मस्तच दिसतोय केक
लेकीच्या चेहर्यावर किती गोडं हसु आहे
व्वाव! खूप देखणा झालाय केक!
व्वाव! खूप देखणा झालाय केक! लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अप्रतिम!! कसला भारीय.
अप्रतिम!! कसला भारीय.
Pages