हल्ली बहुतेक लहान मुलींना बार्बी डॉल आणि तिच्या केकची फारच अपुर्वाई असते. माझी मुलगीही त्याला अपवाद नाही. बरिच वर्ष तिला हा केक हवा होता. अर्थात केक शॉप्स मधे हा सहज उपलब्ध आहे. मला त्यासाठी मोजावी लागणारी किंमत बरीच जास्त वाटत होती. ह्या वर्षी ठरवलं की करुन पाहुया म्हणून १५ दिवसांपुर्वी सगळं साहीत्य घेऊन आले, थोडाफार सराव केला आणि शेवटी घेतलाच करायला.
केक काही मी घरी बनवू शकले नाही ते मी बाहेरुन बेक करुन घेतले.
१) बसिक केक (आवडीच्या फ्लेवर मधे, मी बेकरीतुन करुन आणले. जे स्वतः बनवू शकतात ते उत्तमच)
मी एकूण २ किलोचे होतील असे ३ केक्स बनवून घेतले होते. फ्रॉक शेपचा मोल्ड मी दिला होता स्वत:कडचा आणि २ गोल आकारात थोडे लहान मोठे एकावर एक बसतील असे.
२) ऑरेंज किंवा आवडी प्रमाणे कोणतेही सिरप किंवा ज्युस.
३) फळांचे क्रश किंवा जॅम
आयसिंग साठी:
१) घरी बनवलेले बटर क्रिम किंवा व्हिप्ड क्रिम
२) खाण्याचे रंग
३) सजावटीसाठी लागणारे इतर सामान जसे पायपिंग बॅग, डिझाईन नोझल्स, एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल्स इ.
१) प्रथम तीनही केक फुगीर भाग कापून टाकून लेव्हल करुन घेतलेत.
२) प्रत्येक केकचे आडवे दोन भाग करुन त्यातील खालच्या भागावर प्रथम ऑरेंज ज्युस लावून घेतला.
३) त्यावर प्लेन व्हिप्ड क्रिम पसरवून घेतले.
४) क्रिम वर साखरेत मुरवलेल्या स्ट्रॉबेरीज क्रश करुन पसरवल्यात.
५) त्यावर उरलेला अर्धा भाग लावून घेतला.
६) ह्याच पद्धतीने तीनही केक एकावर एक अरेन्ज करुन घेतले. डोम शेपचा केक सर्वात वरती ठेवला.
७) ह्या संपुर्ण स्ट्रक्चरला बाहेरुन प्लेन क्रिमचा थर देऊन क्रम्ब कोटींग करुन घेतले व ते ३० मिनीटांसाठी फ्रिज मधे ठेवले.
८) मधल्या वेळात क्रिम मधे वेगवेगळे रंग घालून डिझाईनच्या अंदाजाप्रमाणे छटा बनवून घेतल्या.
९) अर्ध्या तासाने स्ट्रक्चर बाहेर काढून त्याला फ्रॉकच्या डिझाईन प्रमाणे बेस छटा लावून घेतल्या. बेस निळा करुन घेतला.
१०) बाहुलीचे मुळ कपडे काढून तिला अॅल्युमिनीयम फॉईलअने कवर करुन घेतले.
११) केकच्या वरच्या थरातून बारीक सुरीने थोडा केक आतमधून कापून बाहुलीसाठी जागा करुन घेतली.
१२) बाहूलीला त्यात हळू हळू सरकवून फिक्स करुन घेतले.
१३) ठरवलेल्या डिझाईन प्रमाणे पायपिंगचे बेसिक शेप्स आणि वेगवेगळ्या नोझल्स वापरुन फ्रॉक पुर्ण भरुन घेतला. निळा बेसही भरुन घेतला.
१४) एडिबल फ्लॉवर्स, सिल्वल बॉल इ वरुन लावून सजवून घेतले.
आणि बाहुलीसाठी बाहुली तयार!!!!
१) अतिशय संयमाचे काम आहे असे मला वाटले ईथे मी अंदाजे ३ तास वेळ दिली आहे पण मला प्रत्यक्शात ५ तास लागले कारण क्रिमचे तापमान सारखे घसरत होते. ते अॅडजस्ट करुन घेण्यात माझा बरच वेळ गेला. मला बेकिंग, आयसिंगचा काहीच अनुभव नसल्याने असे होत होते. ज्याना अनुभव आहे ते जास्त सहज करु शकतील.
२) हा केक कापणे आणि सारख्या भागात वाटणे बर्यापईकी त्रासदायक भाग आहे. आम्ही कापताना वरचा भाग वेगळा करुन घेतला.
मेहनत बरीच आहे पण लेकीच्या चेहर्यावरचा आनंद सगळी वसुल करुन गेला.
बापरे....... मी एवढा वेळ
बापरे....... मी एवढा वेळ टिकुच शकणार नाही... _____/\_____
फायनल प्रॉडक्ट लाजवाब
सावली ,शशांक, वर्षू नील, मीनल
सावली ,शशांक, वर्षू नील, मीनल , जाईजुई , जागूताई, भान , बघतोस काय ..., साधनाताई...तुमचे सगळ्यांचे खुप आभार!
भान, मी ट्रॅपोलाईट चे क्रिम वापरले होते. ते फेटल्यावर जवळ जवळ ३ पट होते. २ लीटरचा पॅक आहे. त्यातले पाऊण घेतले होते. अजून थोडे बाकी आहे. चवीसाठी थोडी आयसिंग शुगर, क्रिमची रॉ टेस्ट जाण्यासाठी, आणि ह्यावेळी ऑरेंज इसेन्स वापरले होते. सरावासाठी केला तेव्हा त्यात स्ट्रॉबेरी क्रश टाकला होता. तेही छान लागत होते. कोणताही जॅम टाकला तरी चालेल. पण घरातल्यांना प्लेन आवड्ल्याने ह्यात काही फ्लेवर घातला नाही.
सरावसाठी केला तेव्हा अजून छान पिक्स येत होते. आता मंगळवारी जास्त गरम होत असल्यामुळे क्रिमचं तापमान सारखं कमी होउन ते पातळ होत होतं. थोड्या थोड्या वेळाने फ्रिज मधे ठेऊन करावं लागलं.
क्रिमची कंसिस्टंसी बरोबर झलि की भराभर होत होत पायपींग.
शशांक, जाईजुई, तुमची प्रतिक्रीया पुन्हा-पुन्हा वाचावी अशी आहे
जागूताई, साधनाताई तुमच्यासारख्या एक्स्पर्ट्स चे प्रोत्साहन खासचं...पुन्हा एकदा सग्ळ्यांचे आभार!
लेकीचा आनंद वेगळेच समाधान देउन गेला तितकाच तुमच्या प्रतिक्रीया सुद्धा!!!
शनिवारी मैत्रिणींना पार्टी द्यायच्या निमीत्ताने 'अँग्री बर्डस' ची थीम ठेवली होती. त्यानिमीत्ताने अजून एक प्रयत्न करुन बघितला. त्या अनुशंगाने काही खेळ आणि मेनू ठरवला होता. मुलांनी खुपच एन्जॉय केला. कोणाला पार्टी थीम साठी इंट्रेस्ट असेल तर शेअर करेन. सध्या हा केकचा अजून एक प्रयत्न...
बापरे!!!! सोलिड अहत तुम्हि!!!
बापरे!!!! सोलिड अहत तुम्हि!!! patience ल सलाम सलाम!!!
अय्यो... मस्तय हे पण ते
अय्यो... मस्तय हे पण
ते ग्रास कसे केले
हाही केक खूपच सुंदर दिसतोय.
हाही केक खूपच सुंदर दिसतोय. मस्तच एकदम!
आता मंगळवारी जास्त गरम होत असल्यामुळे क्रिमचं तापमान सारखं कमी होउन ते पातळ होत होतं. थोड्या थोड्या वेळाने फ्रिज मधे ठेऊन करावं लागलं.
>>> क्रिम फेटताना डबल बॉयलर पद्धतीसारखी एकात एक जाणारी दोन भांडी घ्यायची, खालच्या भांड्यात बर्फाचे खडे आणि वरच्या भांड्यात क्रिम घेऊन फेटायचं अशी टीप बर्याच बेकिंग एक्स्पर्टनी दिलेली पाहिली/ वाचली आहे.
व्वॉव! हा पण मस्त आहे केक एक
व्वॉव! हा पण मस्त आहे केक
एक सज्जेशन - ह्या केकसाठी वेगळा धागा काढं... जास्त पब्लिकला बघाय्ला मिळेल. या धाग्यावर ऑलरेडी रिप्लाईज आलेले असल्यामुळे परत धागा उघडणारे आमच्यासारखे थोडेच बघतिल
बाबाबाबा!! अँग्री बर्डस'
बाबाबाबा!! अँग्री बर्डस' सॉल्लिडच. ते गवत आणि त्यातली ती फुले!!!!!!!!!! काय बोलणार
>>ह्या केकसाठी वेगळा धागा काढं.>> +१ क्रियेटीव्ह केक वगैरे असं काही तरी.
उपयुक्त सजेशन्ससाठी खुपच
उपयुक्त सजेशन्ससाठी खुपच आभार.
मंजूडी, पर्फेक्ट सजेशन! मलाही सतत क्रिम फ्रिजर मधे ठेऊन वापरावे लागत होते.
खुप सुंदर झाला आहे केक. तुला
खुप सुंदर झाला आहे केक. तुला किती परीश्रम घ्यावे लागले असतील ... लेक मात्र खुप खुष असेल .
हो निलम, लेक खुषच आणि तिची आई
हो निलम, लेक खुषच आणि तिची आई पण :)!!!
हा माझा झब्बु
हा माझा झब्बु
सही आहेत केक्स!! वर्षा, मस्त
सही आहेत केक्स!!
वर्षा, मस्त झालाय तुझा पण
श्रद्धादिनेश खुपच छान
श्रद्धादिनेश खुपच छान छान...
तुमची लेक खुपच लकि आहे....:)
तुमच्या चिकाटीला
तुमच्या चिकाटीला _______/\_______.....................
...अप्रतीम.........
सही झालाय केक
सही झालाय केक
वर्षा_म, मस्त दिसतोय तू
वर्षा_म, मस्त दिसतोय तू केलेला केक.. एकदमच छान!
वर्षा, मस्त दिसतोय केक.
वर्षा, मस्त दिसतोय केक.
श्रद्धादिनेश,वर्षा_म,दोघींचेह
श्रद्धादिनेश,वर्षा_म,दोघींचेही केक्स खूपच सुरेख! खूपच चिकाटीचे काम आहे हे! पण मुलांच्या चेहेर्यावरची पसंती श्रम विसरायला लावतेच.
वर्षा, श्रध्दा दिनेश मस्तच
वर्षा, श्रध्दा दिनेश मस्तच आहेत केक्स.
माझ्या मुलीचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे. असा केक खुप करावासा वाटतोय पण जमेल का नाही अशी भिती वाटते
तुम्ही कलर कुठले वापरले आहेत्.(पावडर,जेल की लिक्वीड)
केकच्या आत प्लेन क्रीम म्हणजे साखर न घालता लावले आहे का?
वॉव, वर्षा...मस्त झालाय
वॉव, वर्षा...मस्त झालाय केक!!! लेकीला बर्थडे सरप्राइज का?
अमृता
धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो...तुमच्या निमीत्ताने परत एकदा स्वतःच बघायला मस्त वाटलं..नंतर खुप इच्छा असुनही परत काही करणं जमलच नाही. आता पुन्हा वाटायला लागलयं नविन प्रयोग करुन बघावसं.
निर्जरा, कर ना...एक दिवस फक्त वेगळा काढून ठेव. म्हणजे डोक शांत ठेवून करता येईल
मी एडिबल लिक्वीड कलर वापरले आहेत. क्रिम मधे साखरेची गरज नसते. इसेंस घालावं पण आवडी प्रमाणे थोडी साखर किंवा वेगळा फ्लेवर मिसळला तरी छान लागत.
अप्रतीम... हे बनवताना देखील
अप्रतीम... हे बनवताना देखील बघायला, फोटो काढायला मज्जा येते...
हे सर्व सामान कुठे मिळेल ?
हे सर्व सामान कुठे मिळेल ? फारच घोंचु प्रश्न आहे पण उत्तर देणेचे करावे.
श्रध्दा, तुम्हाला _/\_ . कौतुक वाटते तुमचे. वर्शे तू पण ग्रेट आता
धन्यवाद, रोहन..दीप्स दीप्स,
धन्यवाद, रोहन..दीप्स
दीप्स, तुम्हे कुठे रहाता? इथे मुंबईत क्रॉफ्रर्ड मार्केट आणि वाशी मधे मिळते सगळे सामान.
वर्षा, मस्त दिसतोय केक.
वर्षा, मस्त दिसतोय केक.
बाप्रे काय प्रचंड सुंदर
बाप्रे काय प्रचंड सुंदर बाहुली आहे. श्रद्धादिनेश - सलाम!!!
आणि तुमची बाहुली पण खूप गोड आहे.
तो दुसरा रागीट पक्ष्याचा केक पण सुंदर आहे.
वर्षा_म - तुझी बाहुली सुद्धा अशक्य सुंदर.
केक ही माझ्यासाठी तरी फक्त मनसोक्त खायची गोष्ट आहे पण या बाहुल्या कापाव्याशा वाटत नाहीत.
अप्रतिम दिसतोय केक...
अप्रतिम दिसतोय केक...
विकतच्या केकवरच्या क्रीममध्ये
विकतच्या केकवरच्या क्रीममध्ये साखर असते ना. यु ट्युबवर बटरक्रीमच्या रेसीपीत आयसिंग शुगर आहे त्यामुळे प्लेन क्रीम वापरावे की आयसिंग शुगर वाले क्रीम वापरावे कळत नाही. श्रध्दा दिनेश सांगाल का?
इथे मुंबईत क्रॉफ्रर्ड मार्केट
इथे मुंबईत क्रॉफ्रर्ड मार्केट आणि वाशी मधे मिळते सगळे सामान.
वाशीत कुठे मिळते?
(No subject)
अरे
अरे वा.....सुंदर...वर्षा...मस्तच!!!!!
Pages