निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलपाखरांसारखा सजुन येतो
हा दिवस तुमच्यासाठी
फुलांच्या गंधकोषी रूजुन येतो
हा दिवस तुमच्यासाठी

आनंदाचे मेघ दाटुन येतात
अन् आभाळ गाऊ लागतो
आपल्याच मस्ती दंग होऊन
सारा "निसर्ग" न्हाऊ लागतो

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन् आज किनारी आली
शुभेच्छांची भरती
वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा!!!!

—आम्हा सर्वांकडुन

सगळ्यांना मनापास्न धन्यवाद. जिप्सी फोटो आणि कविता सुरेखच.

हिरा चार वृक्षा नाही बघितला कधी. असल्यास लिंक द्या इथे. तुम्ही म्हणता त्या नावाशी साधर्म्य असलेले वाघाटी नावाचे झाड असते. सापडल्यास लिंक देतो.

सर्व निसर्गप्रेमींना सुप्रभात !

माधव,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
(बिलेटेड)

जागु,
ही सगळी कोडी दहावीतली आहेत्,मी अजुन पाचवीत आहे...!

माधव यांना वा. दि. शुभेच्छा !
काल मस्त अकोला शेगांव (गायगांव) पायी वारी करुन आलो ! साधारण ३८ ते ४० किमि

दरडी का कोसळतात, उल्का का पडतात, धबधबे का तयार होतात, जमिनीची धूप का होते, या अनेक प्रश्नांना
गुरुत्वाकर्षण हे उत्तर आहे. याचे फायदे जसे आहेत तसे थोडेसे तोटे पण आहेत. कुठल्याही वस्तूचे वजन
हे गुरुत्वाकर्षण ठरवते, आणि त्यामूळे मानवी प्रयत्नाने किंवा सध्या उपलब्ध असलेल्या अवजारांनी आणि
यंत्रानीदेखील, आपण किती जड वस्तू उचलू शकतो याला मर्यादा आहेत.

काँक्रिट वापरून ज्या इमारती उभारल्या जातात त्यातले काँक्रिट द्रवरुपात वर नेले जाते आणि तिथे ते जमते.
मी काल तूर्कस्तानातील उत्खननावरची क्लीप बघत होतो. कार्बन डेटींग प्रमाणे ते बंधकाम किमान १२ हजार
वर्षांपूर्वीचे आहे. आजही उभारणे अशक्य वाटतील असे अजस्त्र खांब तिथे आहेत. शिवाय कोरीव काम आहे ते नूसते कोरीव काम नसून, उठावदार शिल्पं देखील आहेत. १३ वर्षे उत्खनन करुन देखील, तिथे एकही अवजार
सापडलेले नाही. तिथल्या शिल्पांचा आणि चित्राचा नीटसा अर्थही लागत नाही.

जर शिळा उचलणे शक्य नव्हते तर निदान त्या वितळवून तयार करण्याची एखादी प्रक्रिया असावी.तीदेखील
आज आपल्याला ज्ञात नाही.

किंवा गुरुत्वाकर्षणावर मात करेल अशी एखादी यंत्रणा असू शकेल, ओमानमधे सलालाह जवळ आणि
केनयात मचाकोस जवळ अशा काही जागा आहेत. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. तिथे
चढावावर गाडी आपोआप वरच्या दिशेने जाते. उतारावर मात्र चालवत आणावी लागते. पण लक्षात घ्या
गाड्या या बहुतांशी लोखंडाच्या बनलेल्या असतात. त्यामुळे दगडांवर त्याचा प्रभाव पडणार नाही.

वरचे उल्लेख हे अगदी प्राचीन काळातले आहेत. पण अगदी गेल्या शतकात, अमेरिकेतील मायामी जवळ.
एका माणसाने रॉक गार्डन उभारले आहे, जे आजही बघता येते. तिथेही त्याने अजस्त्र शिळा रचल्या आहेत.
त्या माणसाने एकाहाती, आणिअगदी प्राथमिक अवजारे वापरुन हे काम केले आहे.

त्या माणसाचे आणि त्याच्या अवजाराचे फोटो उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्ष काम करतानाचे नाहीत. त्याने
हे काम कुणाच्याही उपस्थितीमधे केले नाही. तसेच ते त्याने फक्त रात्रीच केले. तो माणूसही दिसायला
चारचौघांसारखाच होता. फक्त त्याच्या अवजारांच्या फोटोत एक छोटीशी पेटी दिसते आणि तिच्यात हि
शक्ती असावी असा कयास आहे. पण त्याने ते तंत्र कुणालाही शिकवले नाही.

मानवाला हे तंत्र ज्ञात होईपर्यंत, एकच सोपे उत्तर आहे आणि ते म्हणजे परकिय शक्ती किंवा परग्रहावरील माणसे.

माधव,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(बिलेटेड) Happy

दा अप्रतिम माहीती
तिथे चढावावर गाडी आपोआप वरच्या दिशेने जाते. >>> यावरची अजुन माहीती वाचायला आवडेल.

किंवा गुरुत्वाकर्षणावर मात करेल अशी एखादी यंत्रणा असू शकेल, ओमानमधे सलालाह जवळ आणि केनयात मचाकोस जवळ अशा काही जागा आहेत. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. तिथे चढावावर गाडी आपोआप वरच्या दिशेने जाते.>>> पृथ्वीचा चुंबकीय नकाशा पाहिलाय मी गुगलवर - त्यात आहे असं की ते एकसारखं नाहीये सगळीकडे, वेगवेगळी चुंबकीय क्षेत्रे असल्याने हे असे होत असणार .......
दुसरे असे की - आपल्याला माहित (ज्ञात असलेल्या) अशा फार म्हणजे फारच थोड्या गोष्टी आहेत, प्रचंड गोष्टी अज्ञातच आहेत अजून - उदा. - बॉटनीमधे अ‍ॅसेंट ऑफ सॅप - म्हणजे मुळाकडून खूप उंच असलेल्या पानांपर्यंत द्रव जातो कसा हे अजूनही माहित नाही शास्त्रज्ञांना - वेगवेगळ्या थेअरीज आहेत यासंबंधी पण कुठलीही परिपूर्ण नाही - काही ना काही त्रुटी आहेतच प्रत्येकात....
उत्क्रांतीत तर कितीतरी वाद आहेतच..... जीव (एकपेशीय प्राणी) निर्माण होताना - पहिला सेल (पेशी) कशी झाली इथपर्यंत सर्व सुसंगत सांगता येते - पण जेव्हा एन्झाईम्स आधी की डी एन ए आधी हा प्रश्न येतो तेव्हा सगळी गडबड होते - कारण डी एन ए असेल तरच एन्झाईम्स (मुळात ही सर्व प्रथिनेच आहेत) तयार होउ शकतात पण मग एन्झाईम्स नसताना डी एन ए कसा होईल - आधी अंड का आधी कोंबडी - तसेच......

तिथे चढावावर गाडी आपोआप वरच्या दिशेने जाते. >>> यावरची अजुन माहीती वाचायला आवडेल.>>>>लेह लडाखची माहिती वाचताना वाचलंय - श्रीनगर लेह लडाख रस्त्यावर मॅग्नेटिक हिल आहे. Happy जुलै महिन्यात जाणार आहे प्रत्यक्ष पहायला.

स्निग्धा, सुंदर नाजूक फुले. त्या तूर्‍यात नीट दिसतच नाहीत !

शशांक, या सगळ्या गूढ कोड्यांबाबत कायम जिज्ञासा असते नाही ? एखाद्या दिवशी अपघाताने याचा शोध
लागेल. पण मग पुढे त्या ज्ञानाचा आपण काय उपयोग करणार आहोत ?

बीबीसी वरच सिक्रेट ऑफ सेक्स (लहान मूलांना बघण्यासारखा नाही) हा माहितीपट दाखवला. त्यात मानवाचे
जेनेटील आल्टरेशन वर उत्तम चर्चा आहे.

मानवाला हे तंत्र ज्ञात होईपर्यंत, एकच सोपे उत्तर आहे आणि ते म्हणजे परकिय शक्ती किंवा परग्रहावरील माणसे. >> हो, ते एक पटण्याजोगे कारण होते.

माणसाचा मेंदू हा पृथ्वीवरील प्राण्यांत सगळ्यात मोठा मेंदू आहे. 'अधिक वापर = अवयवाचा अधिक विकास' हे उत्क्रांतीचे तत्व मानले तरी विज्ञानच म्हणते की आपल्या मेंदूचा फारच कमी भाग आपण वापरतो. म्हणजे हा अतिरीक्त विकासाचे उत्तर वरच्या तत्वाने देता येत नाही. परग्रहावरील माणसे हे उत्तर इथेही चपखल बसू शकते. म्हणजे मेंदूचा विकास हा कुठेतरी दुसरीकडेच झाला आणि पृथ्वीवरचा माणूस हा त्या प्रगत जिवाचा वंशज आहे अशी एक थेअरी मी वाचली होती मध्यंतरी. नाझका पठारावरच्या अवाढव्य रेषा फक्त अवकाशातूनच अर्थमय दिसतात. मग त्या कोणी व कशाकरता बनवल्या? एक थेअरी अश की त्या अवकाशयानांना उतरण्याकरता दिशादर्शक रेषा असू शकतील.

बीबीसी वरच सिक्रेट ऑफ सेक्स (लहान मूलांना बघण्यासारखा नाही) हा माहितीपट दाखवला. त्यात मानवाचे
जेनेटील आल्टरेशन वर उत्तम चर्चा आहे.>>> दिनेशदा - तुम्ही एवढ्या चांगल्या लिंक्स देत असता - पण घरी गेल्यावर मी बहुतेक इंग्रजी चित्रपट पहाणे किंवा शास्त्रीय संगीत ऐकणे एवढ्याच गोष्टी करतो - फिफ्टी फर्स्ट डेट्स, ब्लाईंड डेटिंग, ब्यूटिफुल माईंड, माय लेफ्ट फूट, पियानिस्ट, शाईन - हे व असेच इतके सुंदर चित्रपट दाखवत असतात की बस्स.....

शशांक, मी देतो या फाईल्स.. मग बघाच.

माधव, जगभर तसे नकाशे, आराखडे दिसतात.
आपल्या विचारशक्तीला आपल्या आयूष्यमानाच्या फार मर्यादा पडतात. कोट्यावधी वर्षांचा काळ आपल्यासाठी
अतिप्रचंड आहे. पण जास्त आयूष्यमान असलेल्या एखाद्या परग्रहावरीर सजीवाला, हा काळ अगदी थोडा
वाटायची शक्यता आहे. त्यामूळे जर आपल्या आकलनातील काळात, त्यांचे पुनरागमन झाले नाही, तर
आपल्यासाठी ते कायम गूढच राहील.

वाह! कुणाकुणाला धन्यवाद द्यायचे! अगदी उत्कंठा वाढवणारी माहिती लिहिली आहे सर्वांनी. दिनेशदांचे दोन्ही तिनी मजकुर, हिर्‍याचे मजकुर, वर पुरंदरे ह्यांचे मजकुर फारच सुरेख माहिती मिळाली. दिनेशदा, तुम्ही जेंव्हा तूनळीचा संदर्भ देता तेंव्हा सोबत कंसात लिंक सुद्धा देत जा म्हणजे लगेच त्यावर टिचकी मारुन आम्ही बघू शकू.

ह्या रविवारी मी इथल्या वनस्पती उद्यानात गेलो होतो. काही फोटो काढले. नंतर सावकाश टाकेन Happy

जिप्सी, हो सुलभा ब्रम्हाळकर ह्या लेखिकेने कुठल्यातरी दिवाळी अंकात लेह लडाखवर एक लेख लिहिला तिथे मी ह्या मॅग्नेटिक रस्त्याबद्दल वाचले होते.

माधव, तुम्हाला माझ्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा!! (मला माहीत नव्हतं.. त्यामुळे उशीराने..)
दिनेशदा, इथे पुण्यात श्री. प.वि. वर्तक आहेत; त्यांनी स्वयंभू रामायण नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात पण असे अनेक उल्लेख आहेत.
जागू, तामणीचा फोटो काय क्लास आलाय! तुझ्याकडे आहे की काय?
जिप्सी, कविता खूप आवडली. आणि फुलपाखरांचं कोलाज मस्तच!!
स्निग्धा, सागाची फुलं सुंदरच! मस्त आलाय फोटो! (ही आत्ता कशी काय फुलली? म्हणजे मी समजत होते की साग पावसाळ्यात फुलतो!) डॉ.डहाणूकरांनी 'वृक्षगान'मधे या सागाचं काय सुरेख वर्णन केलंय! त्या म्हणतात..'सागासारख्या निरिच्छालाही इतकं नटता येतं हे पाहून नवल वाटलं! सागवनातून येणार्‍या त्या सुगंधाच्या लहरी...आणि सागाचं कोवळं पान.. ते कुस्करलं तरी मोडत नाही! परत ते आहे तसंच आकारात येतं.. इतकं मुलायम....'

हेम, तुम्ही या भागातल्या २ र्‍या पानावर एका फळांचा फोटो टाकलाय त्याला रामराखी म्हणतात. त्याची पानं गोलसर असतात. (त्यामुळे त्या वेलीला 'वाटोळी' असं पण गमतीशीर नाव आहे.)

माधव ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वरील सर्व सुरेख माहिती वाचून काढली ! मी सध्या प्रा. श्री. द. महाजन ह्यांचे 'देशी वृक्ष हे पुस्तक वाचतेय, वाचायला आवडते पण खरं सांगू सगळं डोक्यावरून जातेय. पण माहिती इंटरेस्टींग आहे.
तुम्ही सर्वजण हे कसं काय लक्षात ठेवता कोण जाणे ? Uhoh

शांकली अग आयुष रेसॉर्ट मध्ये काढलाय तो फोटो.

स्निग्धा जुन्या आठवणी जाग्या झाल्या सागाच्या फुलांनी. मी पुर्वी ती इटूकली फुले खेळण्यासाठी गोळा करायचे. पावसाळ्यात खच पडतो ह्या फुलांचा.

माधव वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.

दिनेशदा स्वप्न भारीच.

Pages