'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
कधी कधी झाड झुडप सुद्धा किती
कधी कधी झाड झुडप सुद्धा किती सुंदर आणि नक्षीदार दिसतात ना
त्यांवे व्यक्तीमत्व पण
त्यांवे व्यक्तीमत्व पण जबरदस्त होते. आणीबाणी उठल्यावर त्या आमच्या कॉलेजमधे एका कार्यक्रमासाठी
आल्या होत्या. अजूनही त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आहे. >> दा तुम्ही खरोखर नशिबवान आहात
नितीन मस्त आहे ते झाड. ऑफीस
नितीन मस्त आहे ते झाड. ऑफीस टाइम / चायनीज गुलाबासारखे वाटतेय.
अनिल, सागवानाच्या पानाला जाळी पडते ना?
जिप्स्याला हल्ली कुठली गाणी आवडताहेत ते वाचलेत का?
आपल्याकडे पुर्वी रंगीत
आपल्याकडे पुर्वी रंगीत चित्रांची उत्तम छपाई होत नसे. त्यामूळे त्या काळातली अनेक उत्तम पुस्तके, आज चित्रांशिवाय अपूर्ण वाटतात.
नितीन, कुठे भटकतो आहेस ? सुंदर हिरवे रंग टिपतो आहेस. हे रंग पहिल्या पावसानंतरच दिसतात, आपल्याकडे.
ही पाने साधारण आकाराने
ही पाने साधारण आकाराने सागवानच्या झाडासारखी वाटली....
सागाची नविन पाने अशीच असतात वाटते, पण मला नाही वाटत कोणी सागाची फांदी कुंपणासाठी तोडेल, इतर प्रजा आहे कुंपणासाठी, साग जंगलचा राजा...
कदंबाचे वाळलेले पान चॉकलेटी दिसते पण ते पान म्हातारे होऊन पडलेले असते. फांदी तोडल्यामुळे तरुण पाने वाळली तर ती कदाचित अशी दिसतील. खरे तर गावी कुंपणाला लावलेल्या वाळक्या फांद्यांवर हा सोनेरी रंग मी खुप वेळा पाहिलाय. आमच्याकडे बहुतेक सगळे आंजनीच्या फांद्या कुंपणाला लावतात. त्य॑अच्या पानाचा पण हाच रंग असतो.
ह... खरे नाही त्याचे काही
ह... खरे नाही त्याचे काही सध्या... तिकडे कसलीकसलीगाणी आवडताहेत, विनोदाच्य बीबीवर धडाधडा विनोदी चकल्या पाडतोय....
माधव, साधना ये तो "वक्त"
माधव, साधना
ये तो "वक्त" वक्त कि बात है!!!
दिनेशदा तुम्ही आणि साधना अचुक
दिनेशदा तुम्ही आणि साधना अचुक उत्तर देणार हे माहितच होत. बरोबर आहे पपईचेच फुल.
आता अजुन एक कोड. हे शहरी लोकांना कठीण आहे.
अनिल, सागवानाच्या पानाला जाळी
अनिल, सागवानाच्या पानाला जाळी पडते ना?
होय, पण पानाला जाळ्या दिसत नाहीत....
सागाची नविन पाने अशीच असतात वाटते, पण मला नाही वाटत कोणी सागाची फांदी कुंपणासाठी तोडेल, इतर प्रजा आहे कुंपणासाठी, साग जंगलचा राजा.
खरंय !
जागु,
याच नाव आठवत नाही, पण याला काटेरी बोंड येतात,अंगाला घासलं कि खुप खाज सुटते..पुर्वी मुख्यतः पावसाळ्यात, खुप उगवलेली दिसायची,खुप औषधी देखील आहे अस ऐकलयं.
(नाहीतर मग मेथी,दगडी पाला....???)
नाही अनिल तुम्ही म्हणताय
नाही अनिल तुम्ही म्हणताय त्यापैकी नाही.
सागाची पाने खुप मोठी असतात. पावासाळ्यात खाली पडलेल्या पानांना जाळी पडते. कारण पानावरील आवरण पाण्याने कुजते व पानाला जाळी येते.
इतर वेळी सागाचे पान खडबडीत दिसते. पुर्वी माझी आजी कोंबडी खुडक्याला म्हणजे अंडी द्यायचे दिवस आले की एका मोठ्या टोपलीत सागाची पाने भोवताली लावत, त्यावर राखाडी टाकून ठेवी. मग कोंबडी तिथे अंडी द्यायची आणि त्यातच पिले उबवायची.
सागाचे कोवळे बोंड किंवा पाला हाताला लाल रंग येतो.
सागाची फुले अतिशल सुक्ष्म असतात. मला त्या फुलांचा सुईत ओवून गजरा करण्याची फार इच्छा होई.
विदर्भात सागाची किती जंगले
विदर्भात सागाची किती जंगले आहेत.. बाप रे बाप! घरात देखील लोक साग लावतात!!!!!!!!!! माहुर तर अगदी सागाच्या झाडांनी चहुबाजुने वेढलेले आहेत. पाने जाड, मोठी आणि लगेच जाळीदार होतात.
मोनालि धन्यवाद. दुर्गाबाई भागवत फारच तेज:पुंज व्यक्तिमत्त्व होते.
किलबिलणारे पक्षी आणि सुगंधाचा
किलबिलणारे पक्षी आणि सुगंधाचा शिडकावा करणारी शिसवीची फुलं यांनी सुखावलेल्या दुर्गाबाई लेखाच्या शेवटी म्हणतात, ‘‘आता माझे वृद्ध कान सारे नाद टिपू शकत नाहीत. हा वसंत छान आला. पुढचा कसा असेल?’’
>>>> शिववीसी फुले कशी असतात. कुणीतरी दाखवा!
जागू, ती घोळू या भाजीची पानं
जागू, ती घोळू या भाजीची पानं आहेत का गं?
ईन मीन.. ते झुडुप किती देखणं आहे नै! म्हणजे त्याचा आणि पानांचा आकार आणि हिरवाकंच रंग सगळंच खूप सुंदर आहे.
साधना, मी पण कदंबाची वाळलेली पानं कधी बघितली नाहीयेत. पण मलाही ती पानं कदंबाची वाटताहेत.
बी, शिसव..Dalbergia sissoo ही
बी, शिसव..Dalbergia sissoo
ही याची नाजुक, शंकरपाळ्यांसारखी किंवा छोट्या पिंपळपानांसारखी दिसणारी पानं....
ही याची फुलं.. थोडी लांबून..
आणि या शेंगा...
याच्याच लाकडाचं फर्निचर केलं जातं. कारण याला पॉलीश खूप छान करता येतं आणि शिवाय हे टिकावूही आहे.
शांकली, पुण्यात बरीच दिसतात
शांकली, पुण्यात बरीच दिसतात शिसवीची झाडे, पण फर्निचर साठी वापरायचे तर झाड किमान ६० वर्षांचे हवे ! तेवढी वर्षे टिकवायची आहेत ती झाडे.
काही दिवसांपुर्वी सकाळी आमच्याकडच्या आभाळात पद्मजा चे चित्र तयार झाले होते !
शांकली शिसवच्या फोटो बद्दल
शांकली शिसवच्या फोटो बद्दल धंन्यवाद.
मी अश्याच पानांचं झाड पाहिलं आहे. पण त्याला वडाच्या फळांसारखी पण जरा छोटी फळं लागतात. पानं पिंपळापेक्षा खुपच छोटी आहेत.
जो_एस, पिंपरणी म्हणून एक झाड
जो_एस, पिंपरणी म्हणून एक झाड असतं, ते असेल.
सुप्रभात ! जागु, आता वरील
सुप्रभात !
जागु,
आता वरील कोड्याच उत्तर तुम्हीच सांगा ...
दिनेशदा,
यावरुन जुन्या झाडांची किती किंमत आहे हे समजलं,अशी जुनी झाडं जपली पाहिजेत, पण आजकाल शेतकरी देखील अनेक जुनी झाडं (पुर्वजांनी लावलेली) काढुन टाकतात,नारळाची अशी शेकडो झाडं मी काढुन टाकलेली पाहिली,खुप वाईट वाटलं,कारण पिकांना अडचण,जागेची कमतरता,पैशाला महत्व यामुळे.
सुदुपार. अनिल कोडे शांकलीने
सुदुपार.
अनिल कोडे शांकलीने सोडवले. घोळूचेच फुल आहे ते.
हा आहे तामण आपला राज्यव्रुक्ष
हा आहे तामण आपला राज्यव्रुक्ष बरोबर ना जागु ताई
हे रंग पहिल्या पावसानंतरच
हे रंग पहिल्या पावसानंतरच दिसतात >>> बरोबर आहे दा गेल्या पावसातलाच आहे प्रचि ह्या पावसापर्यंत पुरवुन वापरतोय
मातीचा दरवळ http://mrudgandh.wordpress.com ( खास साधनाताई साठी)
काल मी शांकलीच्या फोटोवर
काल मी शांकलीच्या फोटोवर प्रतिसाद दिला आणि रात्री स्वप्नात काय दिसले सांगू
आजपासून १०० वर्षांनी कुणी पुणेकर विद्यार्थी संशोधन करतोय आणि त्याला हा धागा कुठेतरी सायबरस्पेस
मधे सापडला. आणि तो विचार करतोय, इथे उल्लेख केलेली झाडे खरेच पुण्यात कधी होती का ?
सध्या जी झाडे आहेत ती रस्त्याच्या कडेने किंवा खाजगी जागेत. रस्त्या रुंदीकरण आणि नवे बांधकाम यात
या झाडांचा बळी जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
या लिखित माहितीवरुन असे वाटले कि आपल्याकडे मौखिक परंपरा असल्याने, लिखाणाची परंपराच कधी
रुजली नाही. आज अनेकांना आपली या बीबी वरची पोस्ट्स निरर्थक वाटतील, पण आपण ज्या बारीक बारीक
गोष्टींची इथे दखल घेतो, याचा पुढे कधीतरी नक्कीच उपयोग होईल.
चीनमधे मात्र लेखन परंपरेमूळे गेल्या ५००० वर्षांचा इतिहास उपलब्ध आहे. इजिप्त आणि मायन संस्कृती मधे
फारसे लेखन झाले नाही, त्यामूळे त्यांच्या संस्कृतीबाबत बरीच कोडी आहेत. आणि आपल्याकडे १००० च काय ५०० वर्षांपूर्वीचे देखील, दाखवण्यासारखे काही धड उरलेले नाही.
अगदी साधी गोष्ट बघा, छत्रपति शिवाजी महाराज, जर गवताच्या गंजीबाबत सुद्धा जागरुक होते तर ते
गडांवरील वनस्पती, हवामान याबद्दलही तितकेच दक्ष असणार. पण त्या काळात गडांवर कुठल्या वनस्पती
होत्या, याबाबत मी कुठे काही वाचले नाही. सध्या आहे तसे उजाड माळरान नक्कीच नसणार.
महाराज, जिजाबाई आणि राणीवश्यातील स्त्रिया पूजा अर्चा नक्कीच करत होत्या मग त्या पूजेसाठी लागणार्या पुष्पे, पत्री यांची काय व्यवस्था असणार ? एका कादंबरीत मी रायगडावरील तलावात, हजारो कमळे असल्याचा उल्लेख वाचला ( तो काल्पनिकच असणार ) सध्या तरी तिथे काही दिसत नाही.
सध्या सगळीकडे जे सागाचे वृक्ष दिसतात त्याची लागवड ब्रिटिशांनी सुरु केली. खरे तर त्यांनी भारताचे
अनेक विभाग पाडून, त्यापैकी काहीच भागातील वृक्षतोडीची परवानगी देऊन, भविष्याची तरतूद करुन
ठेवली होती. पण सांगायचा मुद्दा असा कि साग वन्य असला तरी, पुर्वी एवढी झाडे नक्कीच नव्हती.
निलगिरी, काजू पण फार नंतर आले, मग त्या काळात कुठली झाडे होती ?
काश, त्यावेळी मायबोली असती, आणि आपल्यासारख्या मंडळींनी या नोंदी ठेवल्या असत्या !
धंन्यवाद दिनेशदा म्हणजेच
धंन्यवाद दिनेशदा
म्हणजेच पिंपरी का?
अजून एक असच मोठं झाड आहे पण त्याची पानं जरा रूंद असल्याने गोल वाटतात. व जरा मोठी फळं आहेत. आधी हिरवी असतात मग पिवळट होतात. मला वाटतं भोकराचं असेल. फोटो टाकतो काढलाकी.
जो_एस - अजून एक असच मोठं झाड
जो_एस -
अजून एक असच मोठं झाड आहे पण त्याची पानं जरा रूंद असल्याने गोल वाटतात. व जरा मोठी फळं आहेत. आधी हिरवी असतात मग पिवळट होतात. मला वाटतं भोकराचं असेल. फोटो टाकतो काढलाकी.>>>>>
पिंपरणी - पारोसा पिंपळ / पार्श्वपिंपळ - Hibiscus populneoides हे आहे का नांदरुक / नांदरुख Ficus benjamina - कृपया गुगलून बघ - दोन्ही झाडांचे फोटो -
किंवा तू म्हणतो तसे भोकरही असेल - Cordia myxa
सगळ्यांनाच फळं आहेत - हिरवट - पिवळी.....
काल मी शांकलीच्या फोटोवर
काल मी शांकलीच्या फोटोवर प्रतिसाद दिला आणि रात्री स्वप्नात काय दिसले सांगू
आजपासून १०० वर्षांनी कुणी पुणेकर विद्यार्थी संशोधन करतोय आणि त्याला हा धागा कुठेतरी सायबरस्पेस
मधे सापडला. आणि तो विचार करतोय, इथे उल्लेख केलेली झाडे खरेच पुण्यात कधी होती का ?>>>> दिनेशदा - ज्या प्रकारे (म्हणजे अगदी झटपटच) वृक्षतोड होत आहे त्यावरुन असे वाटते की पुढील काही वर्षातच पुणे शहर व आसपासची सर्व झाडे जाऊन नुसती सिमेंटची जंगले दिसतील...........
फक्त एक आशा आहे - बरेच पुणेकर जागरुक होऊन अनेक प्रकारे नवी झाडे लावणे, जुन्या झाडांची माहिती काढून त्यांचे संगोपन करणे (आपापल्या परीने) यात पुढाकार घेऊन कृती करत आहेत - अगदीच निराशाजनक स्थिती नाहीये ....... प्रमाण कमी असेल - पण हे ही नसे थोडके....
दिनेशदा, आपल्याकडे वृक्षांची
दिनेशदा, आपल्याकडे वृक्षांची शास्त्रशुद्ध सूची (वृक्षांच्या पाने,फुले,फळे,बिया,व्हेनेशन्,इ.व्यवछेदक लक्षणांसह) कोणी करून ठेवलेली नसली तरी आयुर्वेदामध्ये अनेक झाडाझुडुपांचे उल्लेख आहेत. तसेच रामायण, महाभारत इ. ग्रंथ,कालिदासाचे वाङ्मय यांतून अनेक वृक्षांची माहिती उलगडते. रामायणाच्या सुंदरकांडात अशोकवनातल्या सीतेचे वर्णन आहे. त्यात अशोकवनातली वृक्षसंपदा सांगणारे काही श्लोक आहेत. कितीतरी दिवस शोधीत असलेली एक गोष्ट त्यातून मला सापडली. ती म्हणजे प्रियंगु या झाडाचे मराठी नाव वाघंटी आहे ही होय. नवग्रहस्तोत्रामध्ये बुध ग्रहाचे वर्णन 'प्रियंगुकलिकाश्यामं' असे आहे. म्हणजे प्रियंगु वृक्षाच्या कळीसारखा श्यामल रंग असलेला (बुध ग्रह). हा 'प्रियंगु' कोणता हे शोधण्यासाठी जंग जंग पछाडले. शेवटी सुंदरकांडाच्या मराठी भाषांतरात तो सापडला. आता वाघंटी शोधणे आले. शेवटी वसईविरारकडच्या एका सद्गृहस्थांनी त्याचे वर्णन करून सांगितले. (प्रत्यक्ष झाड पाहाण्याचा योग अजूनही आलेला नाही.) वाघंटीच्या कळीचा रंग हा काळसर गुलाबी जांभळट म्हणजे थोडासा लाजाळूच्या फुलाच्या रंगाचा, त्याहून थोडा काळपट असा काहीसा असतो असे त्यांनी सांगितले. अशी काही माहिती हाती लागली की स्वर्गीय खजिना मिळाल्याचा आनंद होतो.
माधव, ही पाने चाराची (चार या
माधव, ही पाने चाराची (चार या वृक्षाची) असावीत का?
हीरा, आयूर्वेदात मोठा खजिना
हीरा, आयूर्वेदात मोठा खजिना आहे हे खरे, पण ती झाडेच आता दुर्मिळ झालीत, शिवाय ओळखणारे जाणकारही
नाहीत आता. हे ज्ञान परंपरेने, काही घराण्यातच बद्ध राहिले.
एका अर्थाने ते चांगले झाले, कारण औषधासाठी जे झाड घ्यायचे ते पूर्ण श्रद्धेने, खास वयाचे, खास ठिकाणी
वाढलेले असे घ्यायचे असते.
व्यवसायाशी निष्ठ असणारे वैद्य हि काळजी घेतातच.
पण आपल्यासारख्या लोकांसाठी ते ज्ञान अप्राप्यच राहिले.
मी अश्याच पानांचं झाड पाहिलं
मी अश्याच पानांचं झाड पाहिलं आहे. पण त्याला वडाच्या फळांसारखी पण जरा छोटी फळं लागतात
वायुवर्णा/वरुणही अशाच पानांचा असतो पण त्याची फळे वडाच्या फळांपेक्षा मोठी आणि चेंडूसारखी गोल असतात.
२१० वी पोस्ट माझी ! आठवा भाग
२१० वी पोस्ट माझी ! आठवा भाग चालू होऊन एवढ्या पोस्ट ?
Pages