तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो. मित्रांमध्ये, मामाबरोबर बोलताना प्रेमाबिमाचा विषय निघाला की विषयच बदलतो किंवा निघून जातो, तिच्यासाठी आपल्या दोस्तांनाही बरोबर 'वापरून' घेतो - असं काय काय करतो. पण वेळ येते तेव्हा मात्र तिला थेट सांगतो. आपण केलं होतं असं? आणि ते ही शाळेत असतांना? अर्थात, आता आपण एकमेकांजवळ कबूल करायला हरकत नाही - हो! अनेकदा केलं होतं, पण मनात! कारण मुख्य प्रॉब्लेम हा होता, की 'हे' नक्की काय वाटतंय हे तेव्हा आपल्याला कळलंच नव्हतं! ही मनात जपलेली, आणि काळाच्या ओघात पुसट झालेली 'शाळा' घेऊन दिग्दर्शक सुजय डहाके आपल्याला भेटायला आलाय!
मिलिंद बोकीलांच्या प्रसिद्ध "शाळा" या कादंबरीवर आधारित 'मधल्या सुटी'सह दोन तासांचा 'शाळा' हा चित्रपट म्हणजे गतकाळाची सुंदर सफर आहे. चित्रपटाला कथानक असं विशेष नाही. जे कादंबरीत आहे तेच, पण थोडक्यात आणि प्रभावीपणे! शाळकरी वयातलं भावविश्व, मनात फुलणारे वसंत, अधमुर्या वयातली हिरवळ... असं सगळं सगळं चित्रपटात खूप सुंदर टिपलंय! मुकुंद जोशी (अंशुमन जोशी) या मुलाभोवती फिरणारा हा चित्रपट! पहिल्या परिच्छेदातला 'तो' म्हणजेच हा मुक्या! मग त्याचे दोस्त, त्या प्रत्येकाचं 'सामान', जणू 'त्या' एका मंजिलसाठी जगायच्या इच्छा - अगदी आपल्याही जिव्हाळ्याचं विश्व! शिरोडकर (केतकी माटेगावकर) ही मुक्याची 'लाईन'!
अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर ही निवड अत्यंत अचूक झाली आहे. त्या दोघांचे सीन्स, त्या वयातील भावना, ती उर्मी, लज्जा, एकंदरीत वागणं - केवळ लाजवाब! सर्वात कौतुक म्हणजे, त्या धडधडत्या भावना संवादातून बाहेर येताना कुठेही थिल्लरपणा, उथळपणा झालेला नाही! अत्यंत संयमित तरीही थेट पोचणारा अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी गुण! एक-दोन ठिकाणी केतकी थोडी भूमिका सोडून बाहेर आल्यासारखी वाटते, पण इट्स ओकेच! ती खूप फ्रेश आणि सुंदरही दिसली आहे! इंटर्वलच्या आधी त्याला 'लाईन' क्लिअर असल्याचं सांगताना, 'चेस'स्पर्धेच्या वेळी 'आता जिंकून टाक' हे सुचवताना तिने दिलेले 'सिग्नल' पाहून थेटर 'खल्लास' होतं हे 'त्या' सरलेल्या वयाचे स्मरणे! अंशुमनचा चेहरा पूर्ण चित्रपटभर छान बोलतो. मुळात त्यांचं खरं वय लक्षात घेतलं तर अभिनयातले अगदी बारकावे माफ करावेसे वाटतात. सुर्या, चित्र्या, फावड्या - एकदम झक्कास! 'चष्मा लावणार्या ढासू मुलांमुळे देशाचं काहीही होत नाही, ते होतं ते या असल्या मुलांमुळेच!' हे सांगणारा नरूमामा (जितेंद्र जोशी) आपल्यालाही हवा होता एवढं वाटतं, ते पुरेच आहे! मुक्याच्या वडिलांच्या भूमिकेत नंदू माधव अगदी मस्त - अगदी समजूतदार बाप! मुख्याध्यापक अप्पा (दिलीप प्रभावळकर), बेंद्रे बाई (देविका दफ्तरदार) ठीक. मांजरेकर सर (संतोष जुवेकर) म्हणजे 'आपले' सर वाटतात. बाकी अमृता खानविलकर का आहे याचं उत्तर बहुधा पहिल्याच प्रसंगात दडलेलं असावं! (तात्पर्य सुरूवात चुकवू नका!)
भाज्यांचे भाव, पात्रांचे वेष, जुनी घड्याळं यातून १९७५ चा काळ छान उभा राहिला आहे. छायाचित्रण, संगीत - ठीकठाक. मुळात चित्रपटाचा प्राण हा त्या वयातलं विश्व असल्यामुळे फोकस तिथेच ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
बाकी अजून सांगण्यासारखं विशेष काही नाही! तुम्ही कादंबरी आधी वाचून नंतर चित्रपट बघायला जात असाल तर उत्तम आणि न वाचता जात असाल तर अति-उत्तम! पण तुम्ही कुठल्याही प्रकारातले असा, अल्लड वयातल्या नागमोडी आणि बहुधा अव्यक वळणांवर भरलेली ही 'शाळा' एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/)
आनंद, सही लिहिलं आहेस
आनंद, सही लिहिलं आहेस परिक्षण. मी मागच्याच महिन्यात पुस्तक वाचलं होतं, पण सिनेमा येतो आहे हे माहितच नव्हतं. आता नक्की बघेन. बघावाच लागेल.
आनंदयात्री, सुरेख लिहीलंत.
आनंदयात्री, सुरेख लिहीलंत. बरं झालं नवीन धागाच काढलात. 'शाळा' त्याच मोलाचा आहे.
साजिरा, अप्रतिम लिहीले आहेस. प्रचंड आवडलं. आताच्या आता सिनेमा बघायचा मोह होतो आहे.
नचिकेत मस्त लिहीलं आहेस , या
नचिकेत मस्त लिहीलं आहेस , या शनिवारी शाळा नक्की
नुकतीच शाळा सोडलेल्या (१० वी
नुकतीच शाळा सोडलेल्या (१० वी झालेल्या) भाचीबरोबर पाहिला मागच्या शनीवारी. पुस्तकाइतका अपिल झाला नाही. बाकी सगळ्यांना अनुमोदन.
कसंही केलं तरी चालेल, पण
कसंही केलं तरी चालेल, पण दोन्हींचा आस्वाद घेणं मस्ट. >> अनुमोदन... साजिरा मस्तच
नंतर 'गमभन' ही पाहिलं. ते ही
नंतर 'गमभन' ही पाहिलं. ते ही उत्कृष्ट होतं>>>.हो अगदी माझ पण हेच मत आहे
शाळा वाचलं आहे. आता सिनेमा
शाळा वाचलं आहे. आता सिनेमा बघेन. तु परीक्षण उत्तम लिहिलं आहेस. अतिशय सुंदर लिहिलयस.
इच्छुकांनी हा ट्रेलर पहा :
इच्छुकांनी हा ट्रेलर पहा : http://www.youtube.com/watch?v=CqnEbMjUu8I
सिनेमाची भूक ट्रेलरवर. खरंच 'शिरोडकर' दिसतेय केतकी.
आनंदयात्री , साजिरा मस्त
आनंदयात्री , साजिरा मस्त लिहिलय. शाळा नक्की बघा व आपल्या बरोबर इतरांना पण घेऊन जा.
नचिकेत, छान लिहिलयेस तुला जे
नचिकेत,
छान लिहिलयेस तुला जे जाणवलं ते.. अभिनंदन..
माझं मत,
)
चित्रपटाला कथानक असं विशेष नाही. जे कादंबरीत आहे तेच, पण थोडक्यात आणि प्रभावीपणे!>> तुझ्याच लिखाणातलं हे वाक्य पुरेसं आहे. चित्रपटाला स्वतःचं कथानक असावच लागतं. त्यामुळे कितीही प्रभावी कादंबरी असली तरी चित्रपटाची खास अशी वेगळी पटकथा लिहितात. आपण बर्याचदा पुस्तकावर बेतलेला कोणताही चित्रपट पाहुन आलो की म्हणतो, "हे मनासारखं नव्हतं. इमॅजिन केलं त्यापेक्षा वेगळं निघालं वगैरे" याबाबतीत शाळा अपेक्षाभंग करत नाही. गाव, वातावरण, व्यक्तिरेखांचं दिसणं हे सगळं अपेझापूर्ती करणारं पण चित्रपटाच्या कथेला बांधलेपणा नाही. कादंबरीला प्रामाणिक राहण्याच्या नादात चित्रपट या माध्यमाची गरज कुठेतरी पूर्ण झालेली नाहीये. कादंबरीतलेच प्रसंग जसेच्या तसे. मधले काही गाळून मग पुढचा प्रसंग आणि मग पुढचा.. कुठेतरी विस्कळीत वाटतो चित्रपट त्यामुळे. यापेक्षा कथानकात थोडा बदल करुन फ्लॅशबॅक मध्ये चित्रपट दाखवला असता तर? नायक मोठा झालाय, कोणालातरी सांगतोय, लिहितोय किंवा तत्सम काही. हे करण्यातून त्यांना अनेक तपशील 'सांगता' आले असते, जे दाखवणं शक्य नाहीये.. नरुमामाचं त्याच्या आयुष्यातलं स्थान, समोरच्या बेंच वरच्या ४ मुलींचा स्वभाव इ. गोष्टी बोलून दाखवल्या असत्या, या बोलण्याच्या पाश्वभूमीवर चित्रं दिसली असती कोलाज सारखी तरी चाललं असतं.
(तो स्काऊटच्या लेक्चरला शिरोडकरला गवताचा माणूस करुन दाखवतं तो सीन का नाही घेतला राव.. अशक्य रोमँटीक दिसला असता स्क्रीनवर.
असो, बाकी शिरोडकर २-३ प्रसंगात शाळेची मुलगी न वाटता खूप मोठी वाटते (एक्सप्रेशनवाइज)
बाकी छान.! एकदा बघावा असा..
सर्वांचे आभार! हे परीक्षण
सर्वांचे आभार!

हे परीक्षण नाही, समीक्षण नाही! जे शेअर करावसं वाटलं ते लिहिलं.
मुक्ता, छान लिहिलयेस तुला जे जाणवलं ते..
तुझ्याच लिखाणातलं हे वाक्य पुरेसं आहे. तुझ्या मतांचा आदर आहे.
धन्यवाद!
तो स्काऊटच्या लेक्चरला
तो स्काऊटच्या लेक्चरला शिरोडकरला गवताचा माणूस करुन दाखवतं तो सीन का नाही घेतला राव.. अशक्य रोमँटीक दिसला असता स्क्रीनवर. >>>>>>>>>>>
अगदी, मी तर आतुरतेने वात पाहत होतो या सीनची. पण स्काऊटचा कॅम्पच दोन मिनिटात गुंडाळलाय
एकुणात काय, पुस्तक ज्यांनी वाचलेले नाहीय त्यांना एकदम भारी वाटेल चित्रपट. पण पुस्तक वाचून जाणाऱ्यानी आपल्या अपेक्षा घरी ठेवून जावे, मग चित्रपट शांतपणे बघू शकाल.
चित्रपटाच्या सुरवातीचे फळा आणि खडू च्या माध्यमातील ग्राफिक्स अत्यंत उत्तम. जोशीबुवा आणि शिरोडकर चा अभिनय पण उत्तम आणि हो, फावड्या ची बोलिंग एक्शन पाहून लोळलो !!
पाहिला. चांगला वाटला. मी
पाहिला. चांगला वाटला. मी पुस्तक वाचलेले नाही. कदाचीत त्यामुळे काहिसा विस्कळीत वाटला. मुक्ताने वर लिहिल्याप्रमाणे पटकथेचा अभाव चांगलाच जाणवला. अनेक प्रसंग खूप सुंदर सादर केले आहेत पण त्या प्रसंगांना गुंफणारे सूत्रच नाहीये चित्रपटात.
लहानशीच पण ठाशीव पटकथा असेल तर प्रसंग, संवाद यांच्या सहाय्याने ती खूप मस्त खुलवता येते. पण पटकथाच नसेल तर चित्रपट उभा रहाणे कठीण असते. हा चित्रपट बघितल्यावर "इयत्ता नववीतील काही घटना" असा लघुपट बघितल्यासारखे वाटले.
माधव.. "इयत्ता नववीतील काही
माधव..

"इयत्ता नववीतील काही घटना" असा लघुपट बघितल्यासारखे वाटले.>>>
मला पुस्तक न वाचलेल्या कोणाचीतरी प्रतिक्रिया हवी होती.. सो थॅक्स..
माधव, अगदी अचूक निरीक्षण
माधव, अगदी अचूक निरीक्षण चित्रपटाबद्दल. खरतर ह्या अपेक्षा उंचावल्यात त्या टिंग्यासारख्या काही मराठी चित्रपटामुळे. त्या चित्रपटांमधे जरी बालकलाकार होते तरीही पटकथा जबरदस्त होत्याच. पण हा चित्रपट लघुपट बघितल्यासारखा अजिबात नाही असे मला वाटते. एकदा पुस्तक वाचून पहाच तुम्ही. कदाचित पटकथा ठाशीव होण्यास मदत होईल. हे सगळं व्हाईसवर्सा.. झालंय. यातच सिनेमाचं, दिग्दर्शकाचं आणि पुस्तकाचं यश आहे असे मला आवर्जून वाटते.
घाबरत घाबरत पाहणार हा
घाबरत घाबरत पाहणार हा चित्रपट.
एकदा पुस्तक वाचून पहाच
एकदा पुस्तक वाचून पहाच तुम्ही. कदाचित पटकथा ठाशीव होण्यास मदत होईल. >> चित्रपट समजून घेण्याकरता किंवा तो आवडण्याकरता पुस्तक वाचावे लागणे म्हणजे त्या चित्रपटाचे अपयश आहे असे मला वाटते.
सुंदर चित्रपट
सुंदर चित्रपट आहे...देव(काकांच्या)कृपेने याचे प्रिमियर पहाण्याचा योग आला. पण राहुन राहुन हेच मनात येत होते... की पुस्तक वाचलेले असल्यास पुढे काय होणार याचा अंदाज येतो. पण पुस्तक न वाचलेल्यांना हा जरा विस्कळीत वाटु शकतो.
बाकी या किशोरवयीन कलाकारांच्या अभिनयाबद्दल तर बोलायलाच नको. अतिशय संयत अभिनय! पुस्तकातली सुर्याच्या तोंडची भाषा वापरण्यासारखी नव्हतीच.
स्काऊट कॅम्प फक्त २ मिनिटे..
स्काऊट कॅम्प फक्त २ मिनिटे.. अरेरे.. त्या सीन धमाल करता आली असती..
चिकवातलीच पोस्ट इथे
चिकवातलीच पोस्ट इथे चिकटवतो:
खर म्हणजे हा चित्रपट तीन तासांचा केला असता तर अजुन खुप छान फुलवता आला असता.... आता फक्त पुस्तकातल्या ठळक घटनांना स्पर्श करुन जातो .... त्यामुळे बर्याचदा तुटकपणा जाणवतो... नुसतेच सुटे सुटे प्रसंग बघतोय असे वाटते!
म्हणजे शाळेचे स्केच तर अगदी तंतोतंत काढलय पण रंग भरायचे कुठेतरी राहुन गेलेत अस वाटत रहात
अभिनय मात्र सगळ्यांचाच चांगला.... मुळात पात्रयोजना फार छान आहे!
जोशी, शिरोडकर, सुर्या, बेंद्रेबाई आणि नरुमामा विषेश उल्लेखनीय.
तो काळ, ते वातावरण खुप छान उभे केलय... शाळाही अगदी खरी-खरी!
पुस्तक वाचल्यानंतर मनात उमटलेल्या चित्राच्या बराच जवळ जातो शाळा .... त्याबद्दल सुजय डहाकेंचे अभिनंदन!
नक्की बघणार! मस्त
नक्की बघणार! मस्त लिहिलंय:-)
मी पुस्तक वाचलं नाहीये - अति उत्तम!!!
इयत्ता नववीतील काही घटना" असा
इयत्ता नववीतील काही घटना" असा लघुपट बघितल्यासारखे वाटले. >>> माधव,
कालच पाहिली शाळा ... मस्तय
कालच पाहिली शाळा ... मस्तय
काल पाहिला शाळा. आपल्याला
काल पाहिला शाळा. आपल्याला बुवा जाम आवडला. काय कामं केल्येत मुलांनी. मुक्या, शिरोडकर, आंबेकर, सुर्या, फावड्या सगळेच बेश.
धमाल आली. जुने शाळेतले दिवस पुन्हा यावेत असं वाटलं.
नक्की नक्की पहा.
मी पण कालच पाहिला. तूफान
मी पण कालच पाहिला. तूफान आवडला हा चित्रपट.
फावड्या, मुक्या, जोशी आणि शिरोडकर रॉक्स्स्स्स!!!!
पूर्वी झी मराठीच्या "सूरताल" या कार्यक्रमात ऐकलेल्या छान छान मनीमाऊचं बाळ किती गोर गोरं पान या गाण्याने तर आपण पहिल्यापासुनच केतकीचा फॅन झालो होतो. शाळेतली "लाईन"ही मस्त वठवलीय.
पाहिला. मलाही आवडला. पॉश झाला
पाहिला. मलाही आवडला. पॉश झाला आहे अगदी.
कादंबरीला चक्कं बर्यापैकी न्याय.
लै पकाऊ पिच्चर है राव, पुस्तक
लै पकाऊ पिच्चर है राव, पुस्तक वाचल असल तर फाल्तूत बोर व्हचाल, नुसतं आपलं पुस्तकातल्या घटनांची रेलगाडी, न वाचलेल्या लोकाला नीट संबंध लागत नै अन वाचलेल्या लोकाचा मूड जातो, वाचलेले लोक सगळं समजून घेतात कारण त्यांना श्टोरी माहितीये.अन ती गोष्टच इतकी झकास मांड्लीये पुस्तकात की गाढव जरी त्यातली एखादी घटना काढून गप्पा मारायला चालू करल तर आम्ही मनात आमची शाळा भरवायला चालू करू, अन आपोआप थोबाडावर स्माईल यील ना राव! ते शिरोड्कर-जोशी प्रकरन इत्का टाईम चालत की राव बाकीच्यांशी आडबाजी होते ना भें____.फावड्या मात्र मस्त काम करतो. सु-या च मात्र आमच्या या प्रतिसादासारखं झालयं. ना ते धड कायम बिंधास बोलतय,अन मधनच पुणेरी शुद्ध हेल काढतयं,अन कधी कधी म्हात्रेशेट च्या पोरावानी, पप्पा जोशी पन फुल्ल गंडलेत.१. मांजरेकर सर जातानाचा सीन, २. अन देवळात आमचं जोशी वाकून बघतय, ३. अन तो के.के. नं दिलेला चे गवेरा चा फोटो असलेला मगmug(नक्की आर्चीज, फक रोड(FC Road हितून घेतला असनार) बघताना तर फिदीफिदी हसावं वाटतय. पन काय कराव राव पुस्तक हमारे दिक के लै करीब हाय. चित्र्याचं घर त्याची कामवाली बाई, लहान भाऊ, आईबापाचं भांडन्,चित्र्याच्या घरी येनारी केवडा, शिरोड्करची ताई, वडील, बटाटेवडे विकनारी बाई, तिला वडे ताजे आहेत का विचार्नारा सु-या, तिच्या उत्तराने वरमलेला सु-या, आईस्फ्रुटीवाला, चाळीतला कॅरम,चेस,शंक-याचा बाप शेताडीच्या वाटेचे बदलनारे रंग, अन अजून खूप खूप खूप खूप काय काय काय सगळं गायबचं केलयं की राव???? जाऊदे राव पुस्तक वाचलं असलं तर जाऊच नका.. इचिभना त्यापेक्षा त्या पैशाचं पॉप्कॉर्न घरी बसून खावा. लै मूड हाप केला हिज्या मारी.... जाऊंदे लै अपेक्षा होते राव आम्हाला. पन काय आता झालं ना अश्लील.
अन हो ते हे सांगायच्म राहिलचं
अन हो ते हे सांगायच्म राहिलचं की ते आप्पा सुरुवातीला एकदा येतयं अन मध्ये दोनदा,
ती आमचं घासू गोखले तर काय, त्याच्या थोबाडावर फेसबूक वाल्यांनी टॅग तर कराय हवा होती त्याची माहिती म्हंजे न वाचलेल्यांना ते कळलं तर असतं. आंबेकर तर कधी येते, कधी आमच्या मांजरेकर सरावर लाईन मारते अन कधी गोळ्या घेते काय बोधच लागत नै. आनि हो आमचं मांजरेकर मास्तर ते तर अवो ते पोरापोरींचं फेवरीट सर हाय, ते इतकं अवघड अन लांबलच्क अन अतिव शुद्ध सात्त्विक तुपाळ पुणेरी झाडतयं, राव आमच्या सु-या फावड्याचं फेवरीट सर हाय ओ, जरा भाषा सादी सोपी करा की राव. असं जर कोन आमच्या वर्गात बोलतं तर राव आम्ही झोपेच्या गोळ्या न घेता झोपलो असतो की. अन ते जोशीबुवा, काय राव विसरले वाटतं की आपल्या लाईनक्डे सुम्म्म मध्ये बघायचं असतं की लाईन्ला पन नाई कळलं पाहिजेन, काय राव ते तर सरळ सरळ बघतयं मला सांगितला अस्ता तर मी फुक्क्ट बघायची कोचिंग दिली असती ना राओ, अजून एक इतके सीन जशी- शिरोड्कर चे हाईत पन कुठेच पोटात खड्डा पडत नै राव! पुस्तक अतिशयोक्ती अलंकार न वापरता ३०-४० वेळा तरी वाच्लं असमं राव अजून पन पोटात खड्डा पडतो राव!! पब्लिक थोड्क्यात दोनशे रुपयाचं पुस्तक घेऊन पहिल्यांदी किंवा कितव्यांदी तरी वाचा. पिच्चर बघू नका.
ट्रेलर बघुनच "शाळा" वर फिदा
ट्रेलर बघुनच "शाळा" वर फिदा झालो. मस्त लिहिलय आनंदयात्री आणि साजिरा.
आनंद, नाटक बघितले होते का ?
आनंद, नाटक बघितले होते का ? ते मस्त होते. कुणीही प्रसिद्ध कलाकार नव्हता तरी, सर्वच कलाकारांची निवड अचूक होती. शिरोडकरचा गोड चेहरा तर अजून डोळ्यासमोर आहे.
मी याचे फक्त पोस्टर, प्लाझाला बघितले. (त्यातली शिरोडकर मात्र तेवढी गोड वाटली नाही. )
चित्रपटाची पंचलाईन, जिथे मुले कधीकधी शिक्षण घेतात, मात्र पटली नाही.
Pages