भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्ट्रे. १८७-७ [४३षटकं]. डेव्हीड हसी ४० नाबाद.
कालचं जयवर्धनेचं विधान आवडलं मला; " आमचं अंतिम फेरीत जाणं /न जाणं आतां आमच्याच कामगिरीवर अवलंबून असेल, इतरांच्या मेहरबानीवर नाही, याचा मला आनंद आहे", अशा अर्थाचं.

आमचं अंतिम फेरीत जाणं /न जाणं आतां आमच्याच कामगिरीवर अवलंबून असेल, इतरांच्या मेहरबानीवर नाही, याचा मला आनंद आहे", अशा अर्थाचं. >>>>>>>>>... हे धोनी कधी म्हणेल.......... ? लायकी नाही आहे भारताची फायनल मधे खेळायची...... घरी बोलवा..... असे ही पिकनिकच करत आहेत तिथे..... Angry

२०७-८. हसी नाबाद- ५५. [४५.२ षटकं].
सामन्याच निकाल [ व आपला] कांहीही लागला , तरी ऑसीज सामना जिंकायलाच खेळताहेत असं वाटतंय .

२२५-८ , [४८ षटकं] हसी नाबाद ७०. लक्ष्य - २३८.
इंटरेस्टींग !!!
२२८-९ [४८.३ षटकं], हसी अजून खेळतोय !!!

२२९- १० ! श्रीलंकेचं अभिनंदन.
चला, आता उघडूंया नवीन धागा.. सुखाचा, आपल्या घरच्या अंगणातला !!!

आताच हाती आलेल्या वृत्तानुसार....... धोनीला देवाने भिक नकारली आहे........ लाथ मारुन त्याला हकलुन दिलेले आहे...........धोनी दुखी चेहर्याने भारतात परतत आहे

मस्त मॅच झाली! डेव्हिड हसी बराचसा धोनी आहे पण शेवटच्या ओव्हरीत कल्ला करायचं स्किल नाही त्याच्याकडे Wink

श्रीलंकेचे अभिनंदन!

एप्रिल २०११ पासून ही मालिका सुरू होईपर्यंत गेल्या १० महिन्यात श्रीलंकेला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान व द आफ्रिका या चार देशांकडून कसोटी व एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करायला लागला होता. या मालिकेतले पहिले दोन्ही सामने श्रीलंका हरले होते. परंतु खचून न जाता जबरदस्त कमबॅक करून आज ते पहिल्या क्रमांकाने अंतिम फेरीत पोचले आहेत.

श्रीलंकेविरूद्धचा अतिशय सहज जिंकू शकत असलेला दुसरा सामना (ज्यात भारताचे फक्त ४ बाद झाले होते व विजयासाठी ६० चेंडूत ५९ धावांची गरज होती आणि गंभीर ९२ वर नाबाद होता) धोनीच्या आत्मघातकी (गंभीर व पठाणला त्याच्या चुकीमुळे धावबाद व्हावे लागले) व अत्यंत संथ फलंदाजीमुळे शेवटी बरोबरीत सुटला. त्या सामन्यात भारताने गमावलेले २ गुण व त्याचवेळी श्रीलंकेला दिलेले २ गुण हे अत्यंत महागात पडले. तो सामना जिंकला असता तर आज श्रीलंका जिंकूनसुद्धा त्याचे १७ गुण व आपले सुद्धा १७ गुण असते व आज भारत अंतिम फेरीत असता. पण तो सामना बरोबरीत सुटल्यामुळे आज भारताचे १५ व श्रीलंकेचे १९ गुण झाले.

>>> कालचं जयवर्धनेचं विधान आवडलं मला; " आमचं अंतिम फेरीत जाणं /न जाणं आतां आमच्याच कामगिरीवर अवलंबून असेल, इतरांच्या मेहरबानीवर नाही, याचा मला आनंद आहे", अशा अर्थाचं.

सहमत! आपली लायकीच नव्हती अंतिम फेरीत जाण्याची. स्वतःच्या कामगिरीवर पुढे जाण्यापेक्षा इतरांची खराब कामगिरी कशी होते याची वाट बघायला लागणे हे दुर्दैव आहे.

हा धागा आता शेवटचे आचके देत आहे. कोणीतरी एखादा शुभमुहूर्त, होरा, योग, करण, दिवस इ. बघून आशिया चषकासाठी नवीन धागा तयार करावा.

मास्तरा, जरा असा विचार करून बघ.. लंकेविरुद्धचा सामना बरोबरीत न सुटता आपण हरलो असतो, तर आपण आधीच घरी गेलो असतो, कोहलीची ठॅणठॅण बॅटिंग झाली नसती, शेवटच्या मॅचपर्यंत उत्सुकता राहिली नसती, कधी नव्हे ते लंकेविरुद्ध ऑसीज जिंकावेत असं कधी वाटलं नसतं इ. इ.

>> स्वतःच्या कामगिरीवर पुढे जाण्यापेक्षा इतरांची खराब कामगिरी कशी होते याची वाट बघायला लागणे हे दुर्दैव आहे

असं मागं बर्‍याच वेळेला झालेलं आहे. माबोचे स्टॅटिस्टिशियन सांगतीलच! Proud

तू आपला आत्ताच नवीन धागा काढ.. धोनीच्या नावाने खडे फोडायला. आशिया कप कोण जिंकणार सांग बरं? माझं मत आपण!

>>> मास्तरा, जरा असा विचार करून बघ.. लंकेविरुद्धचा सामना बरोबरीत न सुटता आपण हरलो असतो, तर आपण आधीच घरी गेलो असतो,

आपण हरलो असतो? काहीतरीच काय? अरे, ६ विकेट्स हातात असताना, एक फलंदाज सेट होऊन ९२ वर नाबाद असताना, पाटा विकेट असताना आणि तब्बल ६० चेंडूत फक्त ५९ धावा हव्या असताना, हरण्याची प्रॉबॅबिलिटी किती आणि जिंकण्याची किती आणि टाय होण्याची किती?

तो अत्यंत सोप्या अवस्थेतला सामना विनाकारण टाय झाला, श्रीलंकेला फुकटचे २ गुण मिळाले व आपण २ गुण हकनाक घालविले हे तरी मान्य कर ना.

>>> आशिया कप कोण जिंकणार सांग बरं? माझं मत आपण!

श्रीलंका व पाकडे यांच्यात अंतिम लढत होऊन लंका जिंकेल.

तो अत्यंत सोप्या अवस्थेतला सामना विनाकारण टाय झाला, श्रीलंकेला फुकटचे २ गुण मिळाले व आपण २ गुण हकनाक घालविले हे तरी मान्य कर ना.>> अच्छा म्हणजे त्या वेळी त्यांना लायकी नसताना पण फुकटचे गुण मिळाले नि आज मात्र त्यांनी खचून न जाता जबरदस्त कमबॅक करून मिळवले Lol

आपण चांगले खेळलो नाहि म्हणून अंतिम फेरीमधे नाहि एव्हढे साधे सत्य कशाला नाकारायचे ? लंकाही आज आहे तिथे यायला हरूनच आलेली आहे. हे वर खाली होणे साहजिक नाहिये का ?

मुळीच मान्य करणार नाही.. कारण (१)ती विकेट पाटा नव्हती. पाटा विकेटींवर २७५ च्या वर स्कोअर्स होतात. जर ती असती तर लंकेच्याही जास्त धावा झाल्या असत्या. शिवाय आधीच्या ओव्हरी (३१-४०) मधे जास्त रन्स झाल्या असत्या. उदा. आपली लंकेविरुद्धची शेवटची मॅच बघ. (२)तो सेट फलंदाज ९२ वर आउट झाला. ठीक आहे धोनीने दिलेल्या चुकीच्या कॉल मुळे झाला. असं होत नाही का कधी? (३) आजचीच ऑसी आणि लंकेची मॅच पण तुझ्या थिअरी प्रमाणे ऑसीज सहज जिंकायला हवे होते. त्यांना पण शेवटच्या २० ओव्हरीत १०० रन्स हव्या होत्या ६ विकेटी होत्या शिल्लक. जिंकले का? शेवटच्या ओव्हरीत १० रना पाहीजे होत्या. मिळाल्या का? निदान टाय तरी केली का? नाही. का नाही जमलं त्यांना त्याचा विचार कर म्हणजे तुझी तुलाच उत्तर मिळतील. हा खेळ आहे, इथे मॅथेमॅटिकल प्रिसिजनने काहिही होत नाही.. आणि झालं असतं तर काहीच मजा राहिली नसती.

>>> शेवटच्या ओव्हरीत १० रना पाहीजे होत्या. मिळाल्या का?

अरे, त्यांचे त्यावेळी ९ बाद झालेले होते. फक्त ४ बाद झालेले असताना शेवटच्या १० षटकांत ५९ धावा करणे आणि ९ बाद असताना शेवटच्या षटकात १० धावा करणे, ह्या दोन सिच्युएशन सारख्याच वाटतात तुला?

>>> अच्छा म्हणजे त्या वेळी त्यांना लायकी नसताना पण फुकटचे गुण मिळाले

त्या सामन्यात आपण सहज मिळत असलेले ४ गुण हातचे घालविले व शेवटी २ गुणांवरच समाधान मानायला लागले. मागचे कुठलेही सामने बघा. टॉपच्या कोणत्याही संघाने हा सामना जिंकलाच असता. अगदी बांगलासारख्या लिंबूटिंबू संघाने सुद्धा विश्वचषकात इंग्लंडविरूद्ध शेवटच्या ९ षटकात ५६ धावा करून सामना जिंकला होता आणि ते सुद्धा ८ गडी बाद झाल्यावर. आपण तर त्या मानाने खूपच सुस्थितीत होतो. त्या सामन्यात सहज मिळत असताना गमावलेले २ गुण आपल्याला महागात पडले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

आपल्याला शेवटच्या ओव्हरीत किती हव्या होत्या आणि किती आउट झाले होते ते आठव, म्हणजे कळेल.

शिवाय हे ही आठव की या सिरिजमधल्या बहुतेक क्लोज मॅचेस आपण जिंकल्या किंवा टाय केल्या आहेत.

>>> आपल्याला शेवटच्या ओव्हरीत किती हव्या होत्या आणि किती आउट झाले होते ते आठव, म्हणजे कळेल.

गंभीर आणि पठाण कोणाच्या चुकीमुळे बाद झाले? शेवटच्या ओव्हरीत एवढ्या जास्त धावा हव्या असण्याची वेळ कोणाच्या संथ फलंदाजीमुळे आली? ४१ वे षटक सुरू होताना आवश्यक धावगती ५.९ होती ती शेवटच्या २ षटकांत १० च्या पुढे कोणाच्या टुकुटुकु खेळण्यामुळे गेली?

अरे तू मघा पासून १० ओव्हरी ५९ रना ६ विकेटी धरून बसला आहेस. या सिच्युएशन पासून पटकन ऑल आउट ते पटकन विजय इथपर्यंत काहीही होऊ शकतं. त्यातलं जे मोस्ट अनलाइकली होतं ते झालं. खेळात मॅथेमॅटिकल प्रिसिजन नसतं हे का मान्य नाहीये तुला? आणि आज ऑसीज का नाही जिंकले ते सांग.

>>> या सिच्युएशन पासून पटकन ऑल आउट ते पटकन विजय इथपर्यंत काहीही होऊ शकतं.

त्या परिस्थितीत ऑलआउट होण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. एकदिवसीय सामन्यांचा इतिहास बघितला अगदी क्वचितच इतक्या चांगल्या परिस्थितीतला सामना हरलेला आहे. टॉपच्या ८ संघांपैकी इतर कोणत्याही संघाने तो सामना हातचा घालविला नसता व इतिहासात घालविलेला नाही. इतक्या चांगल्या परिस्थितीतून सामना न जिंकल्याची इतिहासातील एकूण किती उदाहरणे आहेत तुझ्याकडे? एकतरी असेल का?

तो सामना खरं तर ४७ व्या किंवा फार ४८ व्या षटकातच संपायला हवा होता आणि तसा तो संपेल इतक्या चांगल्या परिस्थितीत भारत होता. षटक क्र. ४१ ते षटक ४५ या ५ षटकात भारताने फक्त १३ धावा केल्या व ती षटके विनाकारण वाया घालविली. त्या सामन्यात धोनी तर पहिले ६-७ चेंडू बॅट नुसती वर करून विकेटकीपरकडे सोडून देत होता. असे बरेच चेंडू त्याने व जडेजाने वाया घालविले. त्यामुळे ६० चेंडूत ५९ धावा वरून ३० चेंडूत ४६ धावा हव्यात अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली आणि तो सामना न जिंकण्याचे हेच मुख्य कारण आहे आणि आपण आज परतीच्या एसटीत बसलो त्याचेदेखील.

बंद करायचा का हा धागा ? का अजुनही कोणाला आशा आहेत भारत फायनला जाण्याची ? Proud
भारतात असतील असे बरेच महाभाग अजुनहि काहितरी चमत्कार होइल याची आशा ठेवुन! Proud

असो. वाईट वाटुन रडला असाल तर डोळ्यातुन येणारे पाणी वाचवुन ठेवा. उपयोगी पडेल. पुण्यातल्या लोकांना नक्किच. तेवढा तरी फायदा मिळेल क्रिकेटचा! Proud

Pages