भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
अहो, पॅकर्स, पॅट्रियट्स इ.
अहो, पॅकर्स, पॅट्रियट्स इ. दिग्गज संघ असताना जेमतेम प्ले ऑफ ला पोचलेले जायंट्स सुपर बॉल जिंकून गेले.>> जायंट्स शेवटच्या फेजमधे अतिशय चांगले खेळायला लागले हा भाग विसरून त्यांचे श्रेय नाकारू नका.
च्यायला! आज सगळेच जण जबरी
च्यायला! आज सगळेच जण जबरी खेळले. सेहवाग व सचिनची इनिंग छोटी होती पण जबरी वेगवान होती. गंभीर ज्या मॅचमध्ये ५० क्रॉस करतो तो सामना आपण जिंकतो. हे आजही सिद्ध झाले. कोहलीने तर कमालच केली. मलिंगाला आजच्याइतका चोप (७.४-०-९६-१) यापूर्वीच्या आयुष्यात कधीही मिळाला नसेल. २ एप्रिल २०११ नंतर आज प्रथमच विश्वविजेते विश्वविजेत्यांसारखे खेळले. खूप दिवसांनी मजा आली.
>>> मास्तरची बकवास बंद! तरी मी सांगतो तुला की तोंड उघडू नकोस!
अरे, वर्षाचे सर्व ३६५ दिवस माझी अशी बकवास बंद होत राहिली तर मला आनंदच होईल.
सर्वांनी खरं सांगा. आज सामना सुरू होण्यापूर्वी भारत बोनस गुणासह सामना जिंकेल असं इथल्या किती जणांना मनातून वाटत होतं? त्याहीपेक्षा, श्रीलंकेने ३२० धावा कुटल्यानंतर सुद्धा भारत बोनस गुणासह सामना जिंकेल असं इथल्या किती जणांना मनातून वाटत होतं?
आज फलंदाजीला उतरताना सर्वांनीच मनावर घेतल्यासारखं दिसत होतं. सर्वजण पेटून उठले होते. आजच्या सामन्यात जी जिद्द दिसली ती आधीच्या एकाही सामन्यात दिसली नव्हती. क्षमता असूनसुद्धा सर्वांची कामगिरी आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने कमी होती. आज पहिल्यांदाच वेगवान अर्धशतकी सलामी मिळाली आणि तिथूनच सुरूवात झाली. कोहलीने त्यावर कळस चढविला. Kohli is our present and future!
एक समजलं नाही. सामना जिंकल्यावर सुद्धा धोनी उदासवाणाच दिसत होता. त्याच्या चेहर्यावर विजयाचा आनंद हवा तेवढा दिसला नाही.
असो. आता शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला हरविले तरच आपण फायनल मध्ये जाऊ. सामना अनिर्णित राहिला, बरोबरी झाली किंवा श्रीलंकेने जिंकला तर आपण घरी परत येणार. ऑस्ट्रेलिया श्रीलंकेला जिंकून देईल असे वाटत नाही. श्रीलंका जिंकले तर ४ सामन्यात श्रीलंकेचे ३ विजय असतील आणि ऑस्ट्रेलियाला १-३ अशा अवस्थेत वरचढ असलेल्या श्रीलंकेशी खेळायला अजिबात आवडणार नाही.
रैनाला एकही bouncer नाहि ?>>
रैनाला एकही bouncer नाहि ?>> रैनाने खेळलेला पहिलाच बॉल बाउन्सर होता.. सुदैवानी तो दोन खेळाडूंच्या मध्ये पडला..
http://www.fakingnews.com/201
http://www.fakingnews.com/2012/02/nation-agrees-to-blame-indias-previous...
प्रत्येक मॅच आधी एक सेलेक्शन
प्रत्येक मॅच आधी एक सेलेक्शन ठेवत जावा म्हणजे खेळाडु किमान खेळतील.. त्याच बरोबर सामना भारता साठी ४० ओवर्स चाच करावा.. म्हणजे खेळाडुंना किमान सांगावे तसे...........
>>व मलिन्गा आयपीएलच्या मीठाला
>>व मलिन्गा आयपीएलच्या मीठाला चांगलाच जागला होता,
भाऊ,
यॉर्कर हेच मलिंगाचं मीठ आहे.. काल त्याच्या हातून मीठ निसटलं.. तरिही कोहली च्या फलंदाजीला क्रेडीट द्यायलाच हवं. त्यावर सचिन भक्त म्हणतात- हे तर काहीच नाही. सचिन ची शारजाह मधिल (Desert Storm) फलंदाजी यापेक्षा भारी होती..
>> सर्वांनी खरं सांगा. आज
>> सर्वांनी खरं सांगा. आज सामना सुरू होण्यापूर्वी भारत बोनस गुणासह सामना जिंकेल असं इथल्या किती जणांना मनातून वाटत होतं?
लंकेविरुद्ध बोनस गुणांनी जिंकू असं मला वाटत होतं. समजा, ऑसीजविरुद्ध मॅच असती तर बोनस गुणांनी जिंकू असं वाटलं नसतं. कारण, ऑसीज जरा जास्तच खुन्नसने खेळतात. तसं मला परवा आपण ऑसीजना मारू असं पण वाटत होतं. पण ते झालं नाही.
>> त्याहीपेक्षा, श्रीलंकेने ३२० धावा कुटल्यानंतर सुद्धा भारत बोनस गुणासह सामना जिंकेल असं इथल्या किती जणांना मनातून वाटत होतं?
मी जागा होऊन स्कोअर बघेतो आपल्या १८ ओव्हरीत बर्याच किती तरी धावा झाल्या होत्या, तेव्हा क्षणभर मला वाटलं की आपण मारू. पण आपली बॅटिंग कधीही कोसळते ते आठवल्यावर मग वाटलं ते जमणार नाही. शेवटी शेवटी बदाबदा विकेटी पडतील आणि आपण हरू अशी भीति होती. पण फक्त गंभीरची (मी नेटवर स्कोअर बघायला लागल्यापासून) विकेट पडली. बाकी नुसती धुलाई चालू होती.
Extraordinary situations produce extraordinary innings sometimes! नेहमी कोहली असा खेळेल असं पण नाही. काल त्याचा दिवस होता. परत कधी येईल ते माहीत नाही. कपिलला त्या ऐतिहासिक १७५ खेळीनंतर कधी तशी खेळी जमली नाही.
दुर्देवाने, आता कोहली पुढे कधीही खेळायला आला तर प्रेक्षक त्याला या खेळीची आठवण करून देऊन त्याच्यावर प्रेशर नक्की आणतील.
फारेंडा, तुझ्यासाठी आनंदाची
फारेंडा,
तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे रे. एशिया कप मध्ये सचिन खेळणार आहे. संघात घेतलाय त्याला..
मला वाटते ते १००-१०० होणारच पाक वा बांगला विरुध्द. किंबहुना "मालिकावीर" म्हणून सचिन त्या मालिकेत गाजेल असे मला ऊगाच वाटते आहे.
आणि माझ्या साठी आनंदाची बातमी आहे- कोहली ला ऊपकर्णधार केला आहे! आणि सेहवाग ला "बसवलाय" (हाकलला नाहीये अजून).
झक्कास..! थोडक्यात कोहली आता गार्ड च्या पोस्ट वरून मधले रैना, गंभीर चे डबे ओलांडून थेट ईंजीन चालकाच्या पोस्ट च्या दिशेने हळू हळू सरकतो आहे.
आता बांगला च्या पाटा वा वळणार्या आणि महत्वाचे म्हणजे कमी ऊसळणार्या खेळपट्टीवर पहा आपले घायाळ शेर कसे भसा भसा धावा कुटतील. आणि मग आपण सर्व पुन्हा आनंदी.. यालाच म्हणतात क्रिकेट!
निवड समितीने एका दगडात बरेच पक्षी मारले आहेतः सेहवाग नसल्याने धोणी वि. सेहवाग वाद/चर्चेला वाव नाही. विराट हा भारतीय क्रिकेट चे भविष्य, आणि सचिन ला १०० वे शतक करायला अजून एक संधी.
बाकी ऊमेश यादव हवा होता पण त्याला काय म्हणे दुखापती निमित्त बसवलय..? अरे अजून एक सिझन नाही पूर्ण खेळला आणि आत्ताच दुखापत?
आशिया चषकासाठी काही कारण
आशिया चषकासाठी काही कारण नसताना मनोज तिवारी आणि राहुल शर्माला काढून टाकले आहे व धोनीचा ब्ल्यू आईड बॉय विनयकुमारला आत ठेवले आहे. सेहवागची हकालपट्टी समजू शकते पण उमेश यादवला व झहीरला का काढले खुदा जाने! युसुफ पठाणचे पुनरागमन झाले आहे.
एकही कसोटी सामना न खेळवता ओझा व रहाणेला आणि एकही एकदिवसीय सामना न खेळवता मनोज तिवारीला बसवून ठेवून धोनीने काय मिळविले? अर्थात तिवारीला अजून संधी मिळू शकेल (जर आपण अंतिम फेरीत पोचलो तर).
मास्तर तू धोनीने काय केलं
मास्तर तू धोनीने काय केलं याचा विचार करून तुझा इवलासा मेंदू शिणवू नकोस. फक्त आपल्या मॅचेस चालू असतात तेव्हा खेळाचा आनंद किंवा दु:ख (दु:ख जास्त) लूट!
निवड समितीने एका दगडात बरेच
निवड समितीने एका दगडात बरेच पक्षी मारले आहेतः सेहवाग नसल्याने धोणी वि. सेहवाग वाद/चर्चेला वाव नाही. विराट हा भारतीय क्रिकेट चे भविष्य, आणि सचिन ला १०० वे शतक करायला अजून एक संधी. >>
आशिया चषकासाठी काही कारण नसताना मनोज तिवारी आणि राहुल शर्माला काढून टाकले आहे>> आहेत कि. फक्त यादव, पटेल, खान नि सेहवाग बाहेर गेलेत.
सेहवागची हकालपट्टी समजू शकते पण उमेश यादवला व झहीरला का काढले खुदा जाने!>> ह्यांची हकालपट्टी झालेली नसून त्यांना विश्रांती देण्यात आलेली आहे. दस्तरखुद्द श्रिकांत ने तसे स्पष्ट सांगितले आहे. (he said. "I can assure you that nobody has been dropped." )
रैनाला एकही bouncer नाहि ?>> रैनाने खेळलेला पहिलाच बॉल बाउन्सर होता.. सुदैवानी तो दोन खेळाडूंच्या मध्ये पडला..>> अरे कुलसेकराने त्याच्या medium pace नी टाकलेल्या शॉर्ट बॉलला bouncer म्हणतोस ? रैनाने सुद्धा midwicket पर्यंत टोलवला तो. मी खरा खरा at your throat type ball बद्दल बोलत होतो. महारुफ होता ना काल ? त्याची ती specialty आहे.
<< यॉर्कर हेच मलिंगाचं मीठ
<< यॉर्कर हेच मलिंगाचं मीठ आहे.. काल त्याच्या हातून मीठ निसटलं.. तरिही कोहली च्या फलंदाजीला क्रेडीट द्यायलाच हवं.>> योगजी, जरा मलिंगाने २४ धांवा दिल्या त्या षटकाचा रिप्ले पहा मनासमोर आणून; हल्ली त्याचा यॉर्कर पूर्वींसारखा नीट पडत नाही हे न जाणण्याइतका तो कच्चा गोलंदाज निश्चितच नाही. तरीही, ऐन मोक्याच्या वेळी 'लाईन' व 'लेंग्थ' न बदलतां कोहलीच्या पायापुढे बॅटीच्या टप्प्यात सहाही चेंडू टाकले त्याने !!! त्याच्या हेतूबद्दल शंका किंवा कोहलीचं श्रेय कमी लेखायचा माझा उद्देश आहे असं कृपया नका समजूं; पण मलिंगाने त्या एका ढील्या षटकाने स्वतःच्या संघाचा तेजोभंगच केला, असं मात्र मला वाटलं.
>>> आशिया चषकासाठी काही कारण
>>> आशिया चषकासाठी काही कारण नसताना मनोज तिवारी आणि राहुल शर्माला काढून टाकले आहे>> आहेत कि. फक्त यादव, पटेल, खान नि सेहवाग बाहेर गेलेत.
अरे हो! ते दोघेही आहेत. पार्थिव पटलला बाहेर काढलंय.
>>> फक्त आपल्या मॅचेस चालू असतात तेव्हा खेळाचा आनंद किंवा दु:ख (दु:ख जास्त) लूट!
दु:खाचं प्रमाण जास्त असणारच. बहुसंख्य सामने आपण हरलो आहोत ना.
हो योग, दुपारीच सिलेक्शन
हो योग, दुपारीच सिलेक्शन पाहिले. सचिनने तो उपलब्ध नसल्याचे कळवले नव्हते, त्यामुळे तो असणार हे माहीत होतेच.
कोहलीची उपकप्तान म्हणून निवडही योग्य आहे. पुढे तोच कप्तान होईल असे वाटते.
>>> पण मलिंगाने त्या एका
>>> पण मलिंगाने त्या एका ढील्या षटकाने स्वतःच्या संघाचा तेजोभंगच केला, असं मात्र मला वाटलं.
त्या षटकापूर्वी आपल्याला ६ षटकांत ४२ धावा हव्या होत्या. मलिंगाने २४ धावा दिल्याने त्या ४२ धावा एकूण २.४ षटकातच निघाल्या. जरी मलिंगाने अगदी कसून गोलंदाजी केली असती तरी त्या षटकात ५-६ धावा झाल्याच असत्या व कोहली आणि रैनाचा धडाका बघता ६ षटकात ४२ धावा आरामात झाल्या असत्या. पण मलिंगाच्या त्या षटकाने विजय जरा लवकर झाला. बाकी काहीच फरक पडला नसता.
निवडलेल्या १५ खेळाडूत कोण कोण
निवडलेल्या १५ खेळाडूत कोण कोण आहेत याचबरोबर महत्वाचं आहे कीं कोणत्या खेळाडूना प्रत्यक्ष खेळवलं जातं व सामन्यात त्यांचा कसा उपयोग करून घेतला जातो. धोनीसाहेबांवर मुख्य टीका याच मुद्द्यावरून तर होत असते !!!
शिवाय, माझी नेहमीची रड तर आहेच - जर 'फिरकी' हें आपलं पारंपारिक हुकमी अस्त्र आहे तर आपण त्यात विविधता आणून गोलंदाजी अधिक परिणामकारक कां करूं नये ? कधी विश्वास दाखवून लेगस्पीनला प्रतिष्ठा देणार आपण ?
भाऊ, पण त्यासाठी लेग स्पिन
भाऊ,
पण त्यासाठी लेग स्पिन गोलंदाज हवा ना.. म्हणजे खरोखरच लेग स्पिन करणारा.. आपला शेवटचा लेग स्पिनर कुंबळे होता. तोही ७५% कारकीर्द फ्लिपर व स्पीड वर विकेट्स घेत होता. फिरकी हे अस्त्र हुकूमी वापरायला एकदिवसीय मध्ये तशी खेळपट्टी देखिल नसते. मुळात शेन वॉर्न असेल तरच तो कुठल्याही खेळपट्टीवर लेग स्पिन टाकू शकतो. अन्यथा एकदिवसीय मध्ये निव्वळ लेग स्पिनर म्हणून कुणाचीच कारकीर्द अलिकडे नाही. आफ्रिडी देखिल फास्टर कुंबळे आहे..
ऑफ स्पिन मात्र एकदिवसीय मध्ये नक्कीच जास्ती परिणामकारक ठरले आहेत.
असो. तेव्हा आशिया कप मध्ये नक्कीच २७०+ चे धावफलक बघायला मिळतील यात शंका नाही. नाही झाले तर ती मालिका "ओस" पडेल आणि प्रेक्षक नाही आले तर बांगला क्रिकेट ला तोटा होईल.. ते त्यांना परवडणारे नाहीत. तेव्हा get ready for shastri saying: Its raining runs here... in every match
पण त्यासाठी लेग स्पिन गोलंदाज
पण त्यासाठी लेग स्पिन गोलंदाज हवा ना.. म्हणजे खरोखरच लेग स्पिन करणारा..>> नुसता लेग स्पिन करण्यापेक्षा त्याच्यावर control असणारा नि सिंहाचे काळीज असणारा हवा. नुसता लेग स्पिन चावला नि शर्मा पण करतात खंडीभर पण control नाहिये नि उचलून मारले गेले कि त्यांच्या lengths बदलतात. धोनीचा पण त्यात वाटा आहे अर्थात field बदलण्यामधे.
http://www.espncricinfo.com/i
http://www.espncricinfo.com/india/content/current/story/555746.html >> आपल्याला एक चांगला (खरा खुरा) media manager हवा असे कोणालाच वाटत नाहि का ? Aus नि RSA कसे मस्त मुद्देसूद उत्तरे देतात त्यामूळे.
फारशी धक्कादायक टिम न
फारशी धक्कादायक टिम न निवडण्यामागचे कारण निंबस असू शकेल ?
http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/555820.html
तसे असते तर सेहवाग नि झहिरला वगळले नसते ना ?
>> media manager हवा असे
>> media manager हवा असे कोणालाच वाटत नाहि का ?
काय करायचाय? तो बॅटिंग करून आपली लाज राखणारे का?
काय करायचाय? तो बॅटिंग करून
काय करायचाय? तो बॅटिंग करून आपली लाज राखणारे का? >> बॅटींग न केल्यावर राखेल
seriously विचारतोयस ?
>> seriously विचारतोयस
>> seriously विचारतोयस ?
नाही. seriously सांगतोय. असली फालतू पिल्लावळ काय कामाची? टीमची कामगिरी चांगली होत असेल तर मिडिया फारसं काही विचारायला येत नाही आणि कामगिरी खराब होत असेल तर मिडियाशी कुणीही काहिही बोललं तर काही फरक पडत नाही. कारण लोक (इथे माबोवरही ते दिसतंच) त्यांना पाहीजे तोच अर्थ काढतात.
FAKING NEWS Digvijay Singh to
FAKING NEWS
Digvijay Singh to keep mum for 10 days if Sachin scores his 100th century
New Delhi. In a move that can motivate Sachin Tendulkar no end, Congress leader Digvijay Singh has offered to go on a ‘maun vrat’ (vow of silence) for 10 successive days if the master blaster scored his 100th international century in Australia. The moment Sachin completes his 100th run Diggi Raja will stop speaking, and will open his mouth only after full 240 hours.
“Anna Hazare and his team members will be speaking in Mumbai but I will keep mum,” Digvijay Singh described the unimaginable scenario that will be realized if Sachin scored century of centuries.
Digvijay Singh will not try to score with his mouth once Sachin scores with his bat
“I am willing to sacrifice this much for the nation,” he said. He later hastily added that his sacrifice, although paramount, was nothing compared to the sacrifices Sonia Gandhi and Rahul Gandhi have made for the nation.
The offer by Digvijay Singh has been welcomed by everyone, though many experts warn that this will add extra pressure on the shoulders of Sachin.
“He is already carrying expectations of millions of his fans. Now add to that the expectations of millions of Digvijay Singh haters. That’s almost like Dolly Bindra sitting on his shoulders and screaming in his ears, while he braces up to face bouncers from the Australian bowlers,” cricket expert Harsha Bhogle explained.
However, it seems that the pressure on Tendulkar is only going to increase as many non-Poonam-Pandey human beings are coming up with their own offers to motivate him to score his much awaited international century.
Sources say that BJP is trying to convince Navjot Singh Sidhu to go on a similar maun vrat to match Digvijay Singh’s offer. However, Sidhu is reported to be unwilling to keep mum beyond 10 hours.
“BJP could try to rope in Rakhi Sawant and make her keep mum for 100 days to better Congress’ offer,” an untrustworthy party source said.
According to some reports, Ravi Shastri has already announced his retirement from commentary if Tendulkar achieved the feat, while Suhel Seth has promised not to discuss ‘Bharat Ratna to Tendulkar’ on Times Now or anywhere.
“All these are fine, but whether or not Sachin will score his century will be known tonight when our experts would announce if Melbourne Cricket Ground is vaastu compliant,” the sports editor of India TV told Faking News.
<< Digvijay Singh has offered
<< Digvijay Singh has offered to go on a ‘maun vrat’ (vow of silence) for 10 successive days if the master blaster... >> " सचिन कधी बोलत नाही, त्याची बॅटच बोलते ", हें आतां पाठ झालंय सगळ्यांचच. त्याच्या बॅटचं मौनव्रत केंव्हा सुटतं, यातच लोकाना रस आहे; आणि, तो नुसता नांवाचाच 'दिग्विविजय' नाही, हेंही महत्वाचं !
श्रीलंका - २०६- ८ [४४
श्रीलंका - २०६- ८ [४४ षटकं].
भारताच्या आशेला मोहर आलात असेल ! मोहर करपवायला ऑस्ट्रेलियाने आतां मळभ नाय आणलं म्हणजे झालं !!
श्रीलंका- २३८. ऑस्ट्रेलिया -
श्रीलंका- २३८.
ऑस्ट्रेलिया - २२-२ [ ४ षटकांत]; मळभ भरायला सुरवात !!
अहो २६/३ गेली तिसरी विकेट
अहो २६/३
गेली तिसरी विकेट
असे पण फायनल मधे जाउन काय
असे पण फायनल मधे जाउन काय उपटणार आहे.......... त्या पेक्षा आराम करा.... असाही करत आहे टीम...
अरे वा! लंका मस्त लढतेय!
अरे वा! लंका मस्त लढतेय!
Pages