भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> असो. भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पठाण ऐवजी झहीर हा एकच बदल आहे दोन्ही संघांत.

भारताने या स्पर्धेतल्या पहिल्या व शेवटच्या ८ व्या सामन्यात नाणेफेक जिंकूनसुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारले. उरलेल्या ६ सामन्यात प्रतिपक्षाने नाणेफेक जिंकून आपल्याला क्षेत्ररक्षण दिले. या स्पर्धेत सर्व ८ सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा एक नवा जागतिक विक्रम भारताने केला आहे. निदान आज तरी नाणेफेक जिंकून फलंदाजी घ्यायला काय हरकत होती? आज तरी सेहवाग व अश्विनऐवजी राहुल शर्मा व मनोज तिवारीला खेळवायला काय हरकत होती? कसोटी संघातील प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन व रहाणे आणि एकदिवसीय संघातील मनोज तिवारी यांना एकही सामना न खेळविण्यामागचे तर्कशास्त्र समजतच नाही. जर उरलेले सर्व जण जबरदस्त फॉर्मात असतील, तर इतरांना बाकावर बसवून ठेवणे समजू शकते. पण बहुतेक सर्व सामन्यात अपयशी ठरलेले अनेक खेळाडू संघात असताना त्यांना पुन्हा पुन्हा संधी देणे व इतरांना पूर्ण कुजवून ठेवणे यामागे काय लॉजिक आहे? धोनीचे बरेचसे निर्णय अनाकलनीय असतात हेच दिसून येते.

असो. श्रीलंका ५० षटकांत ४ बाद ३२०. आज बोनस गुणासह जिंकण्याच्या ऐवजी श्रीलंका बोनस गुण मिळवून जिंकण्याची दाट शक्यता आहे.

>>> आत्ताचा फॉर्म बघता, आशा ठेवणे म्हणजे .......जरा अतीच होईल नाही का?

जरा कुठलं, हे खूपच अति होईल. Happy

धोनीचे या मालिकेतले अनाकलनीय निर्णय बघता, संघात माजलेली दुफळी बघता व धोनीचा स्वतःचा फॉर्म बघता, त्याची कर्णधारपदावरून पायउतार होण्याची वेळ जवळ आलेली आहे. शॉन पोलॉक कर्णधार म्हणून अपयशी ठरल्यावर द आफ्रिकेने धाडसी निर्णय घेऊन कॅलिससारख्या वरिष्ठ खेळाडूला बाजूला ठेवून नवोदीत ग्रॅमी स्मिथला कर्णधार करण्याचा घेतलेला निर्णय बराचसा यशस्वी ठरला होता. भारताने कोहलीला कर्णधार करण्याचा प्रयोग करायला हरकत नाही.

>>श्रीलंका बोनस गुण

त्यांना त्याची गरज नाही... असो. एकंदर तोड फोड पाहता पाटा खेळपट्टी दिसते. म्हणजे आज सेहवाग सचिन खेळणार. अगदी कोहली रैना देखिल धावा कुटणार.. आपण जिंकणार.. थोडक्यात लज्जा रक्षणाला थोडे वस्त्र शिल्लक राहिल असे वाटते.

तेंडल्या सही खेळत होता.. पण मलिंगची ती ओव्हर भेदक होती.. सगळेच यॉर्कर टाकले.. गंभीर पण वाचलाच म्हणायला लागेल...

मास्तरची बकवास बंद! तरी मी सांगतो तुला की तोंड उघडू नकोस! Proud
कोहली इतका डेंजर खेळतो हे पहिल्यांदाच समजलं! हॅट्स ऑफ टू हिम! Happy

मास्तरची बकवास बंद! तरी मी सांगतो तुला की तोंड उघडू नकोस!
कोहली इतका डेंजर खेळतो हे पहिल्यांदाच समजलं! हॅट्स ऑफ टू हिम!
>>>> चिमण्या मला म्हणावसे वाट्तेय - 'हाली कैसा है मास्तुरीका'

भारताचा पुर्ण मालिकेतला खेळ पाहील्यास जर श्रीलंकेऐवजी भारत अंतीम सामन्यात पोचला तर हा श्रीलंकेवर अन्याय ठरेल असे माझे मत आहे.

असे नेहमी का नाही खेळत >>

सोपं आहे. सगळीकडे पाटा पिच नसते. पण तरीही चेस करून ३२० काढने अवघड परत ४० ओव्हर्सच्या आतच काढणे अती अवघड. विराट रैना अ‍ॅट विल फोर मारत होते. तेंडल्या, सेहवाग ने अफलातून सुरूवात केली आणि त्याला साथ होती गंभीरच्या अँकरची.

कोहली इतका डेंजर खेळतो हे पहिल्यांदाच समजलं! हॅट्स ऑफ टू हिम>> पिचवर आहे भाऊ सगळे, बाऊन्स कमी असेल तर कोहली सुटला कि सुटला. RCB चे गेम्स बघितले नाहिस का कधी ?

जे काहि असेल ते असो, मजा आली बघायला एव्हढे खरे.

>>तेंडल्या, सेहवाग ने अफलातून सुरूवात केली

नेमकी ईथेच संपूर्ण ईंग्लंड व ऑसी च्या दौर्‍यात आपण मार खाल्ला. दमदार सुरुवात्/सलामी ही जितकी आपल्या संघाला मजबूत करते तितकेच वि. संघाचे खच्चीकरण करू शकते.
असो. गाडी त्या स्टेशनातून कवाच सुटली आहे.. आजचा खेळ म्हणजे एखाद्या पॅसेंजर ट्रेन ला अचानक एक दिवस एक्सप्रेस मेल च्या ट्रॅक वरून धावायला लावण्या सारखे आहे. ईंजीन व स्टेशने तीच आहेत फक्त आज "धावपट्टी" सोयीची आहे व करो वा मरो साठी सर्व सिग्नल ग्रीन ठेवले आहेत. कोहली या ट्रेन चा भविष्यातील गार्ड ठरेल का ईंजीन चालक हे भविष्यात स्पष्ट होईल. तूर्तास- २०० चा पल्ला गाठतानाही धापा टाकणारी ही गाडी ३२० च्या तुफान वेगाने धावू शकते ही बातमी सुखावह आहे.

>>भारताचा पुर्ण मालिकेतला खेळ पाहील्यास जर श्रीलंकेऐवजी भारत अंतीम सामन्यात पोचला तर हा श्रीलंकेवर अन्याय ठरेल असे माझे मत आहे
विश्वचषकातही आपली परिस्थिती अशीच होती... आपण विश्वचषक ऐनवेळी जिंकला ते वेगळे. glorious uncertainties of cricket!! just enjoy... Happy

आजच्या खेळाबद्दल टोटल क्रेडिट भारताला. लंका जर ऑसीज कडून हरले तर त्यात अनफेअर काही नाही.

सोपं आहे. सगळीकडे पाटा पिच नसते. पण तरीही चेस करून ३२० काढने अवघड परत ४० ओव्हर्सच्या आतच काढणे अती अवघड.>>> सहमत. ३२० पर्यंत टेम्पो मेन्टेन करणे सोपे नाही.

आपल्या लोकांना हवी असलेली किक यातून मिळाली असेल अशी आशा आहे.

विश्वचषकातही आपली परिस्थिती अशीच होती... आपण विश्वचषक ऐनवेळी जिंकला ते वेगळे.>>> हे समजले नाही. फायनल मधले दोन्ही संघ तेवढेच लायक होते असे माझे मत. त्या दिवशी भारताने मात केली.

भारताने शेवटच्या मॅचेस मधे एकदम जिगरबाज खेळ केला - ऑस्ट्रेलिया, पाक, लंका तीन्ही मॅच जबरी खेळले होते की. पाक विरूद्ध बॅटिंग चाचपडली तरी बोलिंग, फिल्डिंग जबरी होती.

विश्वचषकातही आपली परिस्थिती अशीच होती... आपण विश्वचषक ऐनवेळी जिंकला ते वेगळे. glorious uncertainties of cricket!! just enjoy. >> तू नक्की आम्ही सगळ्यांनी पाहिला तोच World cup पाहिलास का ? Lol

. पण तरीही चेस करून ३२० काढने अवघड परत ४० ओव्हर्सच्या आतच काढणे अती अवघड.>>> सहमत. ३२० पर्यंत टेम्पो मेन्टेन करणे सोपे नाही. >> +१

रैनाला एकही bouncer नाहि ? Asia Cup should not be such tough tournament now Wink

भारताचा पुर्ण मालिकेतला खेळ पाहील्यास जर श्रीलंकेऐवजी भारत अंतीम सामन्यात पोचला तर हा श्रीलंकेवर अन्याय ठरेल असे माझे मत आहे
शेवटी खेळ आहे. अहो, पॅकर्स, पॅट्रियट्स इ. दिग्गज संघ असताना जेमतेम प्ले ऑफ ला पोचलेले जायंट्स सुपर बॉल जिंकून गेले. कुणाला असे वाटले नाही की अन्याय झाला, मॅच फिक्सिंग वगैरे. 'जो जिता वोहि सिकंदर!'

आजची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती, 'बाउंडरी लाईन' जवळ होती, भारतीय फलंदाजाना गतीने धांवा काढण्याशिवाय पर्यायच नव्हता, विरोधी संघ ऑसीजचा नव्हता, व मलिन्गा आयपीएलच्या मीठाला चांगलाच जागला होता, हें सर्व असूनही आजच्या भारताच्या फलंदाजीला दाद द्यायलाच हवी.

Pages