क्लूलेस - ७

Submitted by श्रद्धा on 10 November, 2011 - 00:20

गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! Happy
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. Happy
ही लिंक:
http://ahvan.in/ahvan/ahvan11/klueless7/default.asp

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, ती लिस्ट फिक्शनल आहे. सोकोतली नावं आणि 'लिस्ट' असा प्रश्न विचारा आपल्या 'बेस्ट फ्रेंड' ला! लिस्ट मिळेल. मग तो ड्वायलॉक कोण म्हणतोय ते शोधा आधी (ओब्व्हियस आहे कारण तुम्ही त्याच्याकडे बघताय). मग उत्तर मिळणं कठीण नाही!

नववी म्हणजे ते आकडे आणि X, Y वाली ना? क्ष मिळाला की य मिळेल! ते आकडे कोणते आहेत ते कळलं का चिंगी?

चिंगे नंबर आहे ना? मग त्याला रोमनमध्ये लिहिता आलंच पाहिजे की. आणि खूप दूर जायला नको. जो पहिला शोधशील तोच आहे ... Wink

ओके. बघते श्र. पण कोणताही कळीचा शब्द मिळत नाहीये..... बरेच टाकून पाहिले. नथिंग इज टिंगलिंग माय टेल ..... Proud

श्र, त्या फिक्षनल लिस्टीतली सगळी नाव टाकली की. कायपण येईना ... जरा इस्कटून सांग कोणतं नाव नक्की ते. कारण नावं आणि त्याची काँबि टाकून कंटाळा आला .... मला पण सुडोकू सोडवायचय. मला खूप आवडतं सुडोकू.

श्र, लिस्टीतलं आबांचं नाव घालायचंय ना? पण ते कोणत्या पध्दतीनं? अनेक पर्म्युटेशनं आणि काँबिनेशनं करून थकले.

श्रद्धा, तसं डायरेक्ट उत्तर आहे. पण सुडोकु सोडवल्याशिवाय लॉजिक कळणार नाही. त्या बाणांच्या दिशेने जाऊन त्या त्या आकड्यांना फोनच्या कीपॅडवर कोण कोणते आकार येतात ते बघ आणि अक्षरं गेस कर.
चार अक्षरी शब्द आहे.(हे लिहीलं तर चालेल ना? Happy ) मस्त लेव्हेल आहे ती Happy

श्रद्धा आणि निलीमा, विपु चेका. मी सध्या १७ वर. थोड्या वेळाने खेळणार आहे आता. हा खेळ म्हणजे व्यसन झालंय, सगळी कामं बाजुला राहतात.

Pages