मॉर्निंग रागा
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
31
चित्रपटात शास्त्रीय अंगाने एखादे गाणे असेल तर पडद्यावर ते तितक्याच बारकाव्याने साकारणारे कलावंत किती असतील? बर्याचदा अशा गाण्यांना पडद्यावर योग्य न्याय मिळत नाही. आज अचानक हा दुवा गवसला. तीनचार वेळा बारकाईने बघूनही हे ती स्वतःच गातेय असे वाटले. (तिच्यासारख्यांचा काय भरोसा नाय, एखाद्या पंधरा-वीस सेकंदाच्या सीनमध्येही जिवंतपणा आणण्यासाठी वाटेल ती मेहनत घेतील.)
http://www.youtube.com/watch?v=MvmyPqXsAk4&NR=1&feature=fvwp
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
<<<<< तिच्यासारख्यांचा काय
<<<<< तिच्यासारख्यांचा काय भरोसा नाय, एखाद्या वीस-सेकंदाच्या सीनमध्येही जिवंतपणा आणण्यासाठी वाटेल ती मेहनत घेतील
शबाना आझमीबद्दल हे अगदी १०० % खरं आहे . तिचं डेडिकेशन ( स्मिता पाटील हा सन्माननीय अपवाद वगळता ) अतुलनीय आहे . ( सॉरी , तुझं रंगीबेरंगी पान हे ह्या डिस्कशनचे पान बनवायचे नाहीये पण अगदीच राहावले नाही . )
येस्स , नूतन तर आहेच .
शबाना बद्दल दुमत नाहीच. पण
शबाना बद्दल दुमत नाहीच. पण नूतननेही, सीमा मधे, मनमोहना बडे झूटे अप्रतिम सादर केलेय. तिला गाण्याचे अंग होतेच. (तिचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता.)
अनुमोदन जीडी, संपदा.
अनुमोदन जीडी, संपदा.
गजानन एक गाणे मी शोधतोय.
गजानन एक गाणे मी शोधतोय. शबानावर चित्रीत झालेली रागमाला आहे. त्या चित्रपटातही ती गायिकाच असते. संगीत उषा खन्ना चे होते. बहुतेक तिनेच गायलीय ही. हिरो बहुतेक विनोद मेहरा होता. शबाना सोडल्यास बाकी कुठल्याच नावाची खात्री नाही.
गजानन, तुला
गजानन,
तुला अनुमोदन.
'साज'च्या वेळी शबाना प्रत्येक ध्वनिमुद्रणासाठी उपस्थित राहिली, शिवाय कविता कृष्णमूर्ती गाताना हातवारे कसे करते, हे तिनं बघून ठेवलं, आणि त्याचप्रमाणे अभिनय केला.
'बालगंधर्व'साठी सुबोध भावेही तीन महिने गाणं शिकला आहे, शिवाय महिनाभर रोज तो आनंद भाटे रियाज करताना त्यांचं निरीक्षण करत असे.
मला हा चित्रपट आवडला होता व
मला हा चित्रपट आवडला होता व त्यातील गाणीही. खास करून शबानाने जी दाक्षिणात्य स्त्री व गायिका साकारली आहे ती मस्तच उतरली आहे. दाक्षिणात्य प्रकारची गायकी व तिची अभिनयात नक्कल करणे खरेच सोपे नाही!! पण कोठेही जाणवत नाही की शबाना खरोखरी गात नसून अभिनय करते आहे ते!
हा राग कुठला आहे? कर्नाटकी
हा राग कुठला आहे? कर्नाटकी राग कुठला आनि त्याला समांतर असा उ हिन्दु. राग कुठला? मधुन मधुन सरगम ऐकताना जोग रागासारखा वाटतो. क्वचित रे आहे. पण जोग सारखा वाटतो
राहवलं नाही.. पण शबानाने कमाल
राहवलं नाही.. पण शबानाने कमाल केलीये
जामोप्या, ही कृथी आहे,
जामोप्या, ही कृथी आहे, Muthuswamy Dikshitar Krithi in Raga Nattai.
गूगलदेवाला साकडे घाला!
http://www.vijayadhwani.com/2
http://www.vijayadhwani.com/2009/12/nattai-raaga.html
इथे दिले आहे....The Hindustani raga Jog closely resembles Nattai.
शबानाला झब्बु म्हणून तब्बुचे आस्तित्वमधले गाणे देऊ या का?
तब्बू पण शबाना सारखीच आहे, पण
तब्बू पण शबाना सारखीच आहे, पण तिला वाया घातली.
अनुमोदन गजानन. शबाना ऑस्सम
अनुमोदन गजानन. शबाना ऑस्सम आहे.
अरुंधती- होना..' इतना सारा वृंदगान है इर्द गिर्द मै क्युं गाऊं..' तब्बूच्या चेहर्यावरचे भाव सुंदर आहेत..
बाकी
'मन आनंद आनंद छायो' मध्ये रेखा नॉट बॅड आहे..
' काली घोडी द्वार खडी' मध्ये दिप्ती नवल गोड आहे.
वरच्या सगळ्यांनां अनुमोदन ..
वरच्या सगळ्यांनां अनुमोदन .. शबाना बद्दल काय बोलणार पण जो आवाज वापरला आहे प्लेबॅकसाठी त्यावरून मात्र कळतं हे तीने नक्कीच गायलेलं नाही ते, असं मला वाटलं ..
जामोप्या, केदार, तब्बू तिच्या काळातल्या सगळ्यांपेक्षा नक्कीच ताकदीची होती पण शबाना, नूतन एव्हढी नाही ..
वरच्या लिंक मध्ये ती टिस्का चोप्रा (की पेरिझाद झोराबेन?) आणि तिचा आलाप(?) भलताच लेम!
परिझादच आहे ती. तिचा आलाप(?)
परिझादच आहे ती.
तिचा आलाप(?) भलताच लेम!>>> अनुमोदन.
हा मुव्ही पाहीलाय मी. मस्तच
हा मुव्ही पाहीलाय मी. मस्तच आहे!!
शबाना अफलातून आहे!
सशल, टिस्का चोप्रा म्हणजे
सशल, टिस्का चोप्रा म्हणजे तारें जमींपर मधली इशानची आई.
दिनेश, मला नाही हो सापडले
दिनेश, मला नाही हो सापडले तुम्ही म्हणताय ते गाणे.
जागो, 'अस्तित्व'मध्ये तब्बू चांगली आहे पण मोहनीश बहलने मार खाल्लाय (असे मला वाटते).
'आईशप्पथ'मधल्या बघितलेल्या बंदिशी (बघायला) अजिबात आवडल्या नाहीत.
हदिदेचुस मध्ये आलबेलाबद्दल न बोललेलंच बरं.
रैना, तू दिलेली गाणी शोधून बघतो, धन्यवाद.
आणि हो, गिरीश कर्नाड - सूरसंगम!!!
चिनूक्स, बालगंधर्व बघायची बरीच उत्सुकता आहे.
' काली घोडी द्वार खडी' मध्ये
' काली घोडी द्वार खडी' मध्ये दिप्ती नवल गोड आहे. >>> अगदी आणि 'कहासे आये बदरा..' पण तिने छान साकार केलंय.
दिलीप भाऊंना विसरू नका..
दिलीप भाऊंना विसरू नका.. त्यांनी सतार वाजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती आणि खरच वाजवत आहेत असे वाटते.. बाकी अभिनय न बोलणे जास्त इष्ट...
हा चित्रपट कोणता? मला सा.न्गा
हा चित्रपट कोणता? मला सा.न्गा ना कोणी तरी!
हिम्या अरे जरा पूर्ण लिही
हिम्या अरे जरा पूर्ण लिही ना..
कुठले गाणे- 'मधुबन मे राधिका' का?
जाजु तुला कुठला चित्रपट हवा आहे?
सीमा देव एक आठवण सांगतात.
सीमा देव एक आठवण सांगतात. त्यांच्या एका चित्रपटाला पं भीमसेन जोशी आले होते आणि पडद्यावरचे गाणे बघून त्यांनी विचारले की ही मुलगी गाणे शिकलीय का?
मला नक्की आठवत नाही, पण ते गाणे बहुतेक 'जिवलगा कधी रे येशिल तू?'
जुयग्या, शबानाचा चित्रपट
जुयग्या, शबानाचा चित्रपट विचारते आहेस का? तो 'मॉर्निंग रागा' - http://en.wikipedia.org/wiki/Morning_Raga
हदिदेचुस मध्ये आलबेलाबद्दल न
हदिदेचुस मध्ये आलबेलाबद्दल न बोललेलंच बरं.>>> म्हणजे??
हम दिल दे चुके सनम' या
हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात असलेल्या 'अलबेला सजन आयो रे' या अहिरभैरव रागातील उ. सुलतान खान व कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या व पडद्यावर विक्रम गोखले, ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांनी अभिनीत केलेल्या 'गाण्याबद्दल' न बोललेलेच बरे, असा त्याचा अर्थ.
ओके. खूप विचार करूनही
ओके. खूप विचार करूनही हदिदेचुसचा अर्थ लागत नव्हता. धन्यवाद.
बाकी त्या वाक्याला पूर्ण अनुमोदन.
'मन आनंद आनंद छायो' <<< रैना,
'मन आनंद आनंद छायो' <<< रैना, सहज आठवलं म्हणून वेळ काढून बघितलं हे गाणं. अप्रतिम आहे रेखा आणि आशा.
लै दिवस झले या धाग्याले...
लै दिवस झले या धाग्याले...
प.पू. अनन्त कोटी
प.पू. अनन्त कोटी ब्रम्हांड्नायक सुनीलबापूकी जय....
रामा रामा रघुत्तमा रे....
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=IXaRUhmgCc8
शुभा खोटे ही एक ताकदीची अभिनेत्री होती...गाण्याचा अभिनय तर खासच...जणू काय तीच गाते असे वाटतं.
Pages