आठवण

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

एका आळसटलेल्या दुपारी..
माळ्यावरून आठवणींचं एक बोचकं खाली काढताना,
ठसक्यांवर ठसके यायला लागलेत.
आणि डोळ्यातलं पाणी आवरता आवरत नाहीये.
तो खाली उभा राहून माझ्याकडे पाहतोय..
अनिमिष नजरेनं..
मी शिडीच्या वरच्या पायरीवर.
आणि " अरे मला धुळीची अ‍ॅलर्जी आहे." मी त्याला सांगायचा प्रयत्न करतेय.
ही एक आठवण..
तिला त्या बोचक्यात कोंबून मी ते पुन्हा माळ्यावर ढकलते.
इतकंच..

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

नेहमीप्रमाणे काहीतरी सुचलं की मी पळत मायबोली गाठते. मग थोडं फार कॅचप.
तुम्ही वाचलंत आणि आवडलं किंवा नाही हे सांगितलंत की फार छान वाटतं.
वाचल्याबद्दल धन्यवाद.
किरण्यके, साती, तुम्हाला स्पष्ट नाही झालं म्हणजे गंडलं काहीतरी. Sad
साजिर्‍या, हसण्याचा अर्थ.. वा च ली. असा घेऊ का? असं नुसतं हसून साजिरं करायचं म्हणजे काय.. Happy

संघमित्रा...
मला आवडली कविता...
आठवणींमुळे डोळ्यात आलेलं पाणी अ‍ॅलर्जीच्या नावाखाली लपवायचा प्रयत्न... छान वाटला.... Happy

वा वा!! Happy
बर्‍याच दिवसांनी वाचलं तुमचं लेखन!!

btw,
किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने
फुकाचे बहाणे उजेडात होते
हा तुमचा शेर आठवला! आणि 'मजा कोहरे के पर्दे मे है' तर काय भारीच होतं!! Happy

>> पराग, हो रे. लिहायला हवं.
<< मग कशात अडतयं? लिही ना प्लीज.

आणि डोळ्यातलं पाणी आवरता आवरत नाहीये.
तो खाली उभा राहून माझ्याकडे पाहतोय..
अनिमिष नजरेनं..
Happy