आठवण
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
22
एका आळसटलेल्या दुपारी..
माळ्यावरून आठवणींचं एक बोचकं खाली काढताना,
ठसक्यांवर ठसके यायला लागलेत.
आणि डोळ्यातलं पाणी आवरता आवरत नाहीये.
तो खाली उभा राहून माझ्याकडे पाहतोय..
अनिमिष नजरेनं..
मी शिडीच्या वरच्या पायरीवर.
आणि " अरे मला धुळीची अॅलर्जी आहे." मी त्याला सांगायचा प्रयत्न करतेय.
ही एक आठवण..
तिला त्या बोचक्यात कोंबून मी ते पुन्हा माळ्यावर ढकलते.
इतकंच..
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
सहीच... मस्त.. आवडलं
सहीच... मस्त.. आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
kay ki bai?
kay ki bai?
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान !
छान !
आवडली.
आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्म्म.. पोचलीय काहीशी..
ह्म्म.. पोचलीय काहीशी..
" अरे मला धुळीची अॅलर्जी
" अरे मला धुळीची अॅलर्जी आहे."
स्पष्ट नाही झालं... किंवा माझ्या मर्यादांमुळं पोहोचलं नाही
व्वा !
व्वा !
माझ्यासाठी ही कविता , मी
माझ्यासाठी ही कविता , मी त्याला सांगायचा प्रयत्न करतेय., इथेच संपली...आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचंड आवडली हि कविता.
प्रचंड आवडली हि कविता.
(No subject)
नेहमीप्रमाणे काहीतरी सुचलं की
नेहमीप्रमाणे काहीतरी सुचलं की मी पळत मायबोली गाठते. मग थोडं फार कॅचप.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही वाचलंत आणि आवडलं किंवा नाही हे सांगितलंत की फार छान वाटतं.
वाचल्याबद्दल धन्यवाद.
किरण्यके, साती, तुम्हाला स्पष्ट नाही झालं म्हणजे गंडलं काहीतरी.
साजिर्या, हसण्याचा अर्थ.. वा च ली. असा घेऊ का? असं नुसतं हसून साजिरं करायचं म्हणजे काय..
संघमित्रा... मला आवडली
संघमित्रा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला आवडली कविता...
आठवणींमुळे डोळ्यात आलेलं पाणी अॅलर्जीच्या नावाखाली लपवायचा प्रयत्न... छान वाटला....
सन्मे मस्तच गं..
सन्मे मस्तच गं..
वा वा!! बर्याच दिवसांनी
वा वा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्याच दिवसांनी वाचलं तुमचं लेखन!!
btw,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती चंद्रस्नाने तुझ्या सोबतीने
फुकाचे बहाणे उजेडात होते
हा तुमचा शेर आठवला! आणि 'मजा कोहरे के पर्दे मे है' तर काय भारीच होतं!!
संघमित्रा, बरेच दिवसात गद्य
संघमित्रा, बरेच दिवसात गद्य पण लिहिलेलं नाहीस... लिहायला लाग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा एकदा आभार. आनंदयात्री
पुन्हा एकदा आभार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आनंदयात्री इतका जुना शेर आठवतोय तुम्हाला.. am happy
पराग, हो रे. लिहायला हवं.
>> पराग, हो रे. लिहायला
>> पराग, हो रे. लिहायला हवं.
<< मग कशात अडतयं? लिही ना प्लीज.
आणि डोळ्यातलं पाणी आवरता आवरत नाहीये.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो खाली उभा राहून माझ्याकडे पाहतोय..
अनिमिष नजरेनं..
जाईजुई
जाईजुई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षीने इस्कटून
दक्षीने इस्कटून सांगितल्यानंतर कळली आणि आवडली.
निंबुडा, आभार..
निंबुडा,
आभार..