जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती.
------------------------------------------------
आज.. उद्या... कधीतरी..
या तालातच आतलं काहीतरी फिरतंय.
खूप खूप ठासून भरल्यासारखं काहीतरी आहे.
स्फोट व्हावा किंवा गळू फुटावं,
तसं ते बाहेर येणार.
वाट बघणं चालू आहे.
स्फोटासाठी सुद्धा एक काडी लागते,
गळू फुटण्यासाठीही एक वार लागतो,
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो.
मी त्या काडीची, त्या एका वाराची वाट बघतेय का?
एवढी मोठी वेदना सोसण्याचं बळ खरंच माझ्यात आहे?
हे असले प्रश्न येतात मनात आणि तिथेच..
माझ्या मिडीऑकर असण्याची खूण पटायला लागते
ती खूण टाळण्यासाठी मी उगाचच प्रश्नांचं जाळं विणत रहाते.
या जाळ्यातला प्रत्येक धागा
माझ्या कमकुवतपणाची साक्ष देत रहातो.
त्या साक्षीची वेदना वाढत रहाते.
आतलं काहीतरी फिरतच असतं.
मी वाटही बघत असते फुटण्याची.
कदाचित अजून पूर्ण ठासून भरली नसेल वेदना
............
बहुतेक तेव्हाच माझ्या मर्यादित असण्याचा अंत असेल
बहुतेक..
- नी
कदाचित अजून पूर्ण ठासून भरली
कदाचित अजून पूर्ण ठासून भरली नसेल वेदना >> क्या बात है... !!
अप्रतिम..
कवितेत दम आहे..
क्या बात है!!
क्या बात है!!
बहुतेक तेव्हाच माझ्या
बहुतेक तेव्हाच माझ्या मर्यादित असण्याचा अंत असेल>>> व्व्वा......................!!!
(No subject)
सुरेख आहे कविता.
सुरेख आहे कविता.
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो.
>>>
मग पुन्हा सुरु होतो प्रवास,
नव्या वेदनेच्या दिशेने,
आपण आपल्याही नकळत असतो,
नित्य नविन वेदनेच्या शोधात.
सुख क्षणभंगुर आहे,
चिरंतन आहे ती वेदना आणि वेदनाच फक्त!
असो. ही पण आवडली.
(No subject)
वाह...
वाह...
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो. >>>>>> ह्म्म सत्य वचन..
रच्याक पर्याशेट लै दिवसांनी दिसल्ये हिकडं. बरं वाटलं !
वैचारिक द्वंद चांगले मांडलेय.
वैचारिक द्वंद चांगले मांडलेय.
मस्त.
मस्त.
मस्तय
मस्तय
विशाल, पर्याशेठची तब्येत
विशाल, पर्याशेठची तब्येत बिघडलीये थोडीशी त्यामुळे होतं असं...
पर्या
आवडली...
आवडली...