आज.. उद्या... कधीतरी...

Submitted by नीधप on 2 May, 2011 - 00:59

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती.
------------------------------------------------
आज.. उद्या... कधीतरी..
या तालातच आतलं काहीतरी फिरतंय.
खूप खूप ठासून भरल्यासारखं काहीतरी आहे.
स्फोट व्हावा किंवा गळू फुटावं,
तसं ते बाहेर येणार.
वाट बघणं चालू आहे.
स्फोटासाठी सुद्धा एक काडी लागते,
गळू फुटण्यासाठीही एक वार लागतो,
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो.

मी त्या काडीची, त्या एका वाराची वाट बघतेय का?
एवढी मोठी वेदना सोसण्याचं बळ खरंच माझ्यात आहे?

हे असले प्रश्न येतात मनात आणि तिथेच..
माझ्या मिडीऑकर असण्याची खूण पटायला लागते

ती खूण टाळण्यासाठी मी उगाचच प्रश्नांचं जाळं विणत रहाते.
या जाळ्यातला प्रत्येक धागा
माझ्या कमकुवतपणाची साक्ष देत रहातो.
त्या साक्षीची वेदना वाढत रहाते.
आतलं काहीतरी फिरतच असतं.
मी वाटही बघत असते फुटण्याची.

कदाचित अजून पूर्ण ठासून भरली नसेल वेदना
............
बहुतेक तेव्हाच माझ्या मर्यादित असण्याचा अंत असेल
बहुतेक..

- नी

गुलमोहर: 

प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो.
>>>

मग पुन्हा सुरु होतो प्रवास,
नव्या वेदनेच्या दिशेने,
आपण आपल्याही नकळत असतो,
नित्य नविन वेदनेच्या शोधात.

सुख क्षणभंगुर आहे,
चिरंतन आहे ती वेदना आणि वेदनाच फक्त!

असो. ही पण आवडली.

प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो. >>>>>> ह्म्म सत्य वचन.. Sad

रच्याक पर्‍याशेट लै दिवसांनी दिसल्ये हिकडं. बरं वाटलं ! Wink