मूळ साहित्याचे शीर्षक: Pour faire le portrait d'un oiseau ( पक्ष्याचे चित्र काढण्यासाठी)
लेखक: झॅक प्रीव्हेर ( Jacques Prévert)
भाषा: फ़्रेंच
----
पहिले एक पिंजरा रंगव
ज्याला दारच नसेल.
मग रंगव त्यावर काहीतरी त्या पक्ष्यासाठी
जे देखणं असेल,
सरळ साधं भुरळ पाडणारं असेल,
दिमाखदार असेल
किंवा असेल त्या पक्ष्यासाठी आत्यंतिक गरजेचं
मग तो कॅन्वास एखाद्या झाडाला टेकून ठेव
कुठल्याही अशा ठिकाणी
जिथे पक्षी येणारच याची खात्री असेल
एखाद्या बागेत,
एखाद्या राईत
किंवा एखाद्या जंगलात.
तिथल्याच एखाद्या झाडापाठी लपून बस
निशब्द
निस्तब्ध
बघत रहा काय होते ते.
कधीकधी पक्षी लवकर चालून येतो त्या पिंजरयात
तर कधी त्या पिंजरयात शिरावं का नाही याचाच विचार वर्षानुवर्षे करत राहतो
पण
निराश होऊ नकोस
वाट पाहा
वाट पाहत राहा कित्येक वर्षं, जर लागलीच तर.
लवकर किंवा उशीरा..
पक्षी तिथे येणारच असतो.
त्यामुळे पक्ष्याच्या आगमनाचा आणि चित्राच्या यशस्वीपणाचा तसा काहीही संबंध नसतो.
तो येईपर्यंत चूपचाप बसून रहा
आणि एकदा का तो पिंजरयात शिरला की
त्या पिंजरयाला एक दार रंगवून टाक
एकामागून एक जाडजूड गज पण रंगवून टाकायला विसरून नकोस.
हा..
पण हे सर्व करताना त्या मग्न पक्ष्याच्या पिसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घे.
त्या मग्न पक्ष्यासाठी मग सुंदर डहाळ्यांचं झाडही रंगव.
मग रंगव पानगळ, स्वच्छ भिरभिरता वारा आणि पानांमधून येणारे कवडसे
आणि लख्ख उन्हातली किडयांची किरकिर, भुंग्यांचा गुंजारव
आता..
तो पक्षी कधी गातोय ह्याची वाट बघ.
गायलाच नाही तो तर..
अरेरे...काय दुर्दैव
चित्र तेव्हढं जमलं नाहीये. आता काय करणार?
पण जर तो गायलाच
तर वाहवा.
तुमचं चित्र किती सुंदर यावर शिक्कामोर्तब झालंय.
आता हळूच काढून घ्या त्या पक्ष्याचं एक पीस.
आणि त्या पिसानेच त्या सुंदर चित्रावर तुमची लफ़्फ़ेदार सही ठोकून द्या.
सुंदर झाली आहे ही सुद्धा.
सुंदर झाली आहे ही सुद्धा.
मस्त
मस्त
मस्त. वा.
मस्त. वा.
फार सुरेख (संसाराचे
फार सुरेख (संसाराचे रेखाचित्रही असेच असे वाचता वाचता वाटले क्षणभर).
मणिकर्णिका. तुला आणि स्वातीला मोत्यांचा कंठा बक्षीस द्यायला हवा.
बरं आता आम्हाला जरा कवीबद्दल सांग पाहू. ओ की ठो माहित नाही. गुगलुन पाहीनच. पण तुझ्या शब्दात ऐकायला आवडेल.
व्वा! मस्त.... जाम आवडला
व्वा! मस्त.... जाम आवडला अनुवाद!
मस्तंय!!
मस्तंय!!
मस्तच! खूप आवडला अनुवाद!
मस्तच! खूप आवडला अनुवाद!
सुंदर!
सुंदर!
रैनातै, माझ्या ब्लॉगवरुनच
रैनातै, माझ्या ब्लॉगवरुनच टेपलंय. राग नसावा. गुगलताना कदाचित मिळालंही असेल हे तुला.
"मराठी कवितेला मात्रा, छंद, वृतांच्या जोखडातून सोडवणारया केशवसुत, मर्ढेकर यांना जितके मानले जाते तितकाच मान फ़्रेंच साहित्यात झॅक प्रीव्हेरला आहे. त्याने यमक, व्याकरणाच्या सगळ्या प्रचलित संकेतांना धुडकवून लावत फ़्रेंच नवकाव्याचा पाया घातला.त्यामुळे फ़्रेंच कविता-विश्वात झॅक ला एक अनन्यसाधारण असे स्थान आहे.
सर्वसाधारणपणे कविता वाचायला सुरुवात करतानाच ’मला ही कळेल का?’ हा गंड आपल्या मनात असतो. पण झॅकची कविता जसजशी वाचत जाऊ तशी अधिकाधिक सोप्पी होत जाते. शब्दांच्या साध्यासुध्या मांडणीतली आशयघनता हा झॅक च्या कवितांचा फ़ॉटे.
बंडखोरी मला तशीही आवडतेच आणि साधेपणा त्याहून जास्त भावतो. त्यामुळे झॅक आवडायला वेळ लागलाच नाही. शब्दबंबाळ करण्यापेक्षा आशयाने कविता मनात रुतली तर ती जास्त काळ स्मरणात राहते हा बरयाच जणांचा अनुभव. माझाही अनुभव फ़ारसा वेगळा नाही. तस्मात झॅक प्रीव्हेर."
आणि तुला जर ही कविता आवडली असेल तर ही पण आवडेल-
http://shabd-pat.blogspot.com/2010/12/blog-post.html
मस्त !
मस्त !
आवडली.
आवडली.
मणिकर्णिका, ब्लॉगवरची कविता
मणिकर्णिका, ब्लॉगवरची कविता अफाट आहे.
विशेषतः
>> एका राजाची गोष्ट सांगते,
>> ज्याला सगळं माहीत होतं, सगळं येत होतं,
>> पण ज्याने सगळं गमावलं..
या कवीची ओळख करून दिल्याबद्दल अनेकानेक आभार.
स्वातीतै, बस काय. तुम्हाला
स्वातीतै, बस काय.
तुम्हाला आवडला यातच सगळं आलं नाही का?
सुंदर
सुंदर
>>एका राजाची गोष्ट सांगते, >>
>>एका राजाची गोष्ट सांगते,
>> ज्याला सगळं माहीत होतं, सगळं येत होतं,
>> पण ज्याने सगळं गमावलं..
--- काय आहे हे ख त र ना क. किती साधे शब्द. आतिषबाजी नाही नी काही नाही. तो 'पण' किती साधा, सरळ. 'तरीही' नाही तिथे. एका 'पणात' सर्व कसं सांगतात लोकं ?
फुलाच्या दरवळा सारखा ह्या कवितेत सत्याचा परिचय होतो की.
ऑस्सम. खूप खूप धन्यवाद. आणि जॅक च्या माहितीबद्दलही.
मस्त! रैनाप्रमाणे मलाही
मस्त!
रैनाप्रमाणे मलाही संसारच आठवला, आणि त्याबरोबर खूप आधी वाचलेली एक कवीता:
If you love someone, set her free,
If she comes back, she is yours,
If she doesn't, it was never meant to be.
या कवीतेचे अनेक variations आहेत. खालील मला सर्वात आवडते:
Playful:
If you love someone, set her free ...
*If she comes back, and if you love her still,
Set her free again, Repeat*
(अर्थात हवे तसे she आणि he ची अदलाबदल करु शकता - गरज भासल्यास)
छान!
छान!
मस्त मणि!
मस्त मणि!
खुप सुंदर मणी!!!
खुप सुंदर मणी!!!
अनुवाद आवडला मणि !
अनुवाद आवडला मणि !
मस्तच!
मस्तच!
'झॅक प्रीव्हेर' मला तुम्हा
'झॅक प्रीव्हेर' मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवता आला यातच खूप आनंद आहे.
ज्या दिवसाचे औचित्य साधून हा अनुवाद इथे लिहीला गेला तो 'मराठी भाषा दिवस' काल गाजत-वाजत संपन्न जाहला.
झॅक प्रीव्हेर अजून काही लोकांपर्यंत पोहचण्यासाठी याहून दुसरा चांगला दिवस कुठला असणार?
मराठी-फ्रेंच मैत्र मी पुढे चालू ठेवीनच, ठेवत आले आहे, पण मायबोलीवर तशी संधी उपलब्ध करुन दिल्याकरता संयुक्ताच्या संयोजकांचे आभार!
'झॅक प्रीव्हेर' मला तुम्हा
'झॅक प्रीव्हेर' मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवता आला यातच खूप आनंद आहे.
ज्या दिवसाचे औचित्य साधून हा अनुवाद इथे लिहीला गेला तो 'मराठी भाषा दिवस' काल गाजत-वाजत संपन्न जाहला.
झॅक प्रीव्हेर अजून काही लोकांपर्यंत पोहचण्यासाठी याहून दुसरा चांगला दिवस कुठला असणार?
मराठी-फ्रेंच मैत्र मी पुढे चालू ठेवीनच, ठेवत आले आहे, पण मायबोलीवर तशी संधी उपलब्ध करुन दिल्याकरता संयुक्ताच्या संयोजकांचे आभार!
मस्त केलाय अनुवाद.
मस्त केलाय अनुवाद.:)
छान कर्णिक बाई
छान कर्णिक बाई