Submitted by limbutimbu on 8 October, 2010 - 02:27
नुकताच मामाचा मृत्यु झाला त्यावेळेस, व त्या आधीही कित्येक वेळेस असा अनुभव आला की मृतकाचा दाह सन्स्कार झाल्यादिवशीच्या लगेचच्या रात्री जर मृतकाचे घरी (किन्वा ज्या घरी दिवा लावला जातो तिथे) राहिले तर पुढील दहा दिवस तिथेच रहावे लागते अशा काहीशा गैरसमजुतीतून (किन्वा त्या गैरसमजुतीचा अजुनच गैरफायदा घेत), सर्वजण तेथून पळ काढतात. याबाबतीत काही जळजळीत अनुभव आल्याने, त्यावरील मते जाणून घेण्यासाठी, व अशा अनेक वेळी, मी काय कृती केली हे सान्गण्यासाठी हा धागा उघडला आहे.
[कृपया, हा धागा सार्वजनिक असला तरीही, जी लोक "हिन्दू धर्मपद्धतीतील" अन्त्येष्टी वगैरे कसल्याच धार्मिक विधीन्वर वा भूतप्रेतदेवदानव इत्यादिकान्वर विश्वास ठेवत नाहीत त्यान्नी येथे येऊन काही वाचण्याचे वा लिहीण्याचे कष्ट घेऊ नयेत ही आगावू (आगाऊ नव्हे) सूचना]
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पैला मते जाणून
मी पैला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मते जाणून घेण्यासाठी, व अशा अनेक वेळी, मी काय कृती केली हे सान्गण्यासाठी हा धागा उघडला आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अहो, एवढं सगळं लिहून कृती लिहायची राहून गेली काय ???
नाही शर्विलका, आधी मते जाणून
नाही शर्विलका, आधी मते जाणून घेतो, मग प्रत्यक्ष घटना सान्गतो! (आत्ता गडबडीत आहे रे भो, ते लिहायचे, वैखरी पाजळायची तर थोडा निवान्त वेळ हवाय, तोवर इतरान्चे अनुभव ऐकायला बरे पडेल)
लिंबू, हा समज आहे खरा. पण मला
लिंबू, हा समज आहे खरा.
पण मला वाटते त्याच दिवशी, कुटूंबीयाना सोबतीची जास्त गरज असते.
माझ्या वडीलांच्या मृत्यूनंतर आमच्या घरी, एक काका, घरचे घरीच राहणार ना, मग मी पण राहणार, असे म्हणत राहिला होता.
आणि त्यानंतर आम्हीही हा नियम पाळत नाही.
मला शास्त्र काय म्हणते ते
मला शास्त्र काय म्हणते ते माहित नाही पण एक वाईट अनुभव मात्र गाठीशी जमा आहे.
माझ्या सासुबाईंच्या मते दाहसंस्कार करुन परतल्यावर मृतकाच्या घरात आंघोळ केली असता दहावे होईपर्यंत तिथेच राहावे लागते. माझे वडील गेल्यावर त्यांनी हे मत जोरजोरात सगळ्यांना सांगत माझ्या नव-याला त्यांच्याबरोबर जाण्यास भाग पाडले. एरवी तो माझ्या माहेरी पडुन असलेला त्यांना चालायचा पण घरातली जवळची व्यक्ती गेल्यावर मात्र तिथे राहायचे नाही.... तेव्हा मला काय वाटले ते सांगणे अशक्य![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दिनेशदा, हा समज नसून सपशेल
दिनेशदा, हा समज नसून सपशेल "गैरसमज" तरी आहे, किन्वा "जबाबदारीतून" सुटका करुन घेण्याकरता शोधलेली पळवाट आहे असे मानायला देखिल भरपुर वाव आहे.
कसे ते बघू
मृतकाचे घरी, दाह सन्स्कारादिवशी, स्वैंपाक केला जात नाही, तर बाहेरून कुणीतरी पिठलभात वगैरे आणून देते, त्यान्च्यावर जास्त मुक्कामी माणसान्चा सन्ख्यात्मक ताण येऊ नये म्हणून असे असेल, अशी समजुत मनाची करुन घेतली तरीही, वरील गैरसमजाचा जो गैरवापर होताना दिसतो तो बघता, जेवणाखाण्याच्या वाढीव ताणाचे कारण पटत नाही. तसेच, सगोत्री व्यक्ती नसेल, तर ती त्याच दिवशी स्वैंपाक करू शकतेच शकते, शिवाय घरात लहान मूल वगैरे असेल, तर स्वैंपाक्/दुध इत्यादीची सोय करणे भाग पडते जे इतरान्वर सोपवता येत नाही. अशा वेळेस, स्वैंपाकघर वगळून पडवी/ग्यालरी/अन्गण वगैरे ठिकाणी स्वैंपाक केला जातो. खेडेगावात, लाम्बच्या गावाहून आलेली नातेवाईक लोक सन्ख्येने बरीच असतील तर प्रसन्गी असे केले जाते. अर्थातच, जेवण्याखाण्याचे कारणामुळे ही प्रथा पडत्ये असे म्हणता येणे अवघड वाटते.
मग दुसरे कोणते कारण असू शकेल? मृतकाचा आत्मा पहिल्या रात्री मुक्कामी राहिल्यावर मग बाकी दहा दिवसही का राहिला नाहीस असे म्हणून मानगुटीस बसतो असे म्हणायचे आहे का? तसे असेल तर त्याने स्मशानात खान्देकरी वा तत्सम पद्धतीने आलेल्या प्रत्येकाच्या मानगुटीस बसले पाहिजे, नै का? अन स्मशानात अन्तिमविधी करणार्या भटजीने तर कायमस्वरुपी स्मशानातच मुक्काम ठोकला पाहिजे, नै?
वरील प्रथेमागचे "कारण काय" वा यास शास्त्राधार काय असे विचारले असता कोणीही धड उत्तर देऊ शकलेले नाही
मी या मूर्ख प्रथेस खरोखरच काही "शास्त्राधार" आहे का याची चौकशी केली, तेव्हा शास्त्रात असे काहीही लिहीलेले नाही हेच उत्तर मिळाले.
याचबरोबर तुरळक ठिकाणी, "जिचा बाप जिवन्त आहे अशा व्यक्तिने खान्दा देऊ नये" वगैरे खुळचट पळपुट्या कल्पना देखिल आचरणात आणताना व त्याची मौखिक प्रसिद्धी करताना पाहिल्यात!
यासही शास्त्राधार नाही. व जो आहे तो केवळ अश्म्यावर/पिन्डावर पाणी घालताना सरळ हाताने घालावे इतकाच आहे. बाप जिवन्त असलेल्या व्यक्तिने अन्गठ्यावरुन पाणी घालू नये! मग तिरडी बान्धू नये, खान्दा देऊ नये, शिवू नये, स्मशानात जाऊ नये वगैरे बाबी या जबाबदारीतून सुटका करुन घेण्याकरताचा सोईस्कर पळपुटेपणाच म्हणायला हवा ना?
ही लोक असा का विचार करू शकत नाहीत, की आज ही वेळ यान्चेवर आहे, अन उद्या कदाचित नव्हे तर नक्कीच, ही वेळ आपल्यावरही येणारच आहे! अर्थात आयशीबापसान्ना वृद्धाश्रमात वा गावी कुठेतरी पाठवुन देणार्यान्ना याची फिकीर करण्याची तितकीशी गरज वाटत नसेलही!
साधना, असेच प्रकार प्रत्यक्ष
साधना, असेच प्रकार प्रत्यक्ष बघितले/अनुभवल्यामुळे माझ्या पहिल्याच पोस्ट मधे मी "(किन्वा त्या गैरसमजुतीचा अजुनच गैरफायदा घेत)" हे वाक्य घातलेले आहे.
चूकुन दोनदा पडलेली पोस्ट,
चूकुन दोनदा पडलेली पोस्ट, खोडली आहे.
माझ्याकडे सांगलीचे रडवे
माझ्याकडे सांगलीचे रडवे पब्लिक आले होते त्यांना घरी जागा पुरणार नाही म्हणून त्या रात्री नणंदे कडे पाठवून दिले. ते दुसर्या दिवशी पहाटे जसे आले होते तसे गाडीतून गेले पण. अस्थी कलश मला दाखिवला पण नाही. साबा कश्याबश्या १४ दिवस राहिल्या मग तुला माझे करणे जमणार नाही म्हणून गायब ते आजतागायत. माझा चुलत भाऊ दोन तीन दिवस राहिला होता. सरवात जास्त एनरजी हे पावहणे लोक येतात त्यांना जेवायला घालणे व त्यांची तिकिटे काढा, त्यांना सोडा यात जाते. you cannot get in touch with your feelings and cry in peace. I think you should leave the immediate family alone.
मला तरी वाटते अश्विनीमामी
मला तरी वाटते अश्विनीमामी यानी लिहिल्याप्रमाणे जर राहणे हे मृतकाच्या इतर नातेवाईकाना त्रासदायक होत असेल तर तिथे न थाम्बणे उत्तम. आणि हे जे लोक राहतात त्याना त्या घरीच जेवण कशाला हवे? बाहेर जाउन खाता येत नाही का??
मला वाटते आपण जर मदत करणार असु तर थाम्बणे उत्तम..आपल्यामुळे त्यानाच त्रास होणार असेल तर तिथुन गेलेले उत्तम मग शास्त्रात काहीही म्हटलेले असो. (माझे मत)
लिम्ब्या अनुभव आहे पण तो
लिम्ब्या अनुभव आहे पण तो लिहिताना फार त्रास होइल रे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
शास्त्राधार असलेल्या सर्वच
शास्त्राधार असलेल्या सर्वच गोष्टी तुम्ही करता का ? हा शास्त्राधार शोधला तरी कुठे ? भारतातल्या असंख्य जाती, उपजाती, समाजांमधे किती वैविध्य असेल अशा रितीभातींमधे ? तुम्हाला जे योग्य वाटते, सोयीचं वाटते त्यानुसार तुम्ही वागता, त्याला उगीच पुस्तकी आधार कशाला.
वरती अश्विनीमामींनी असे नातेवाईक राहून त्रास झाल्याचे लिहिलेय, तर अजून कोणी लोकांनी स्वतःची सोय पाहून या 'रुढी'चं अवलंबन केलंय. म्हणजे वन साइझ फिट्स ऑल असा नियम करूनही काही फायदा नाही. गरज असेल, मदत करायची पात्रता अन तयारी असेल तर जमेल तितके दिवस रहावे. नाहीतर राहू नये. त्याला शास्त्राधार कशाला !
गरज असेल, मदत करायची पात्रता
गरज असेल, मदत करायची पात्रता अन तयारी असेल तर जमेल तितके दिवस रहावे.
----देशी यांच्या मताशी सहमत.
मदत होणार असेल तर रहावे, पण
मदत होणार असेल तर रहावे, पण आपलेच ओझे मृतकंच्या घरच्यांवर होणार असेल तर राहू नये.
काही वेळा मृत व्याक्ती जी कर्त्या वयात अचानक गेलेली असते तेव्हा मृतकाच्या पत्नि / पती, मुलगा-मुलगी यांना सावरण्यासाठी तिथे राहिले तर मदत होती. तरिपण २-३ जण जवळ असतील तरच, त्या पेक्षा जास्त लोकांनी राहिले तर सोयी ऐवजी गैरसोय होते.
लिंबुजी तुम्ही सांगत आहात त्या प्रथे बद्दल मला माहित नाही.
लिम्ब्या, तुला मर्तिकाचे
लिम्ब्या, तुला मर्तिकाचे वगैरे एव्हडे काय फॅसिनेशन आहे? असो.
प्रथा, रुढी वगैरे बाजूला ठेवू एकवेळ. मुळात कुणी वारल्यावर आपण त्यांच्या घरी जातो ते त्या घरचे व आपले संबंध असतात म्हणुन. सहसा गावातच अशी काही घटना घडल्यास आपण जातोच. घाटावर वगैरे जाणे हे समाजातील आपल्या परस्परसंबंधांचा भाग आहेत. बाहेरगावच्या संबंधितांमध्ये अशी घटना घडल्यास त्यांच्याशी किती जवळचे संबंध आहेत ह्यावर जाणे-न जाणे अवलंबून असते वा घडते. अगदी सख्खे भाऊ एकमेकांची तोंडेदेखील बघत नसतील तर एखाद्याच्या घरात कुणी मेले तरी जात नाहीत आणि लांबचे नातेवाईक, मित्र वगैरे देखील संबंध असतील तर जातात. ह्याच न्यायाने शिष्टाचार म्हणुन, पद्धत म्हणुन जाणारे लोक थांबत नाहीत. जे अगदी जवळचे (मनातून) असतात ते आपणहून थांबतात, त्यांची मदत होते. आता फारसे रुढी पाळणारे नसतील तर लोक घरात जेवण करतात. रुढी पाळणारे असतील बहुतेकदा शेजारी-पाजारी मदत करतात, नातेवाईक मदत करतात.
थोडक्यात ज्याला/जिला अश्या वेळी मनापासून रहावेसे वाटते ते राहतात, ज्यांना नाही वाटत ते थांबत नाहीत. मनाविरुद्ध एखाद्याला थांब म्हणणे वा ज म्हणणे ह्यात कुणाचाच फायदा नाही. व मनाविरुद्ध जर कुणी कृती करेल तर तो शहाणा नाही.
मामीच्या पोस्ट नन्तर, काहीसा
मामीच्या पोस्ट नन्तर, काहीसा असा सूर निघतोय की, तिथे मृतकाचे अन्य नातेवाईकान्ना त्रास होत असेल, व्यवस्थेवर ताण पडणार असेल, तर राहू नये! हे तारतम्य बहुधा पाळले जातेच. पण मी उपस्थित केलेला प्रश्न यास अनुसरून नाही. शिवाय, लगेचच्या लगेच उघड वा एकान्तात, कितीक रडू द्यावे/न द्यावे यासही प्रचण्ड महत्व असल्याने, रडणे/कुढणे थाम्बविण्यासाठी, दैनन्दिन कामकाजात गुन्तविण्यासाठी, नातेवाईकान्ची उपस्थिती आवश्यक असे माझे मत आहे. असो.
सख्खे नातेवाईक, ज्यास दहा दिवस सूतक आहे, जे एकाच गावात रहाताहेत, अन तरीही, मृतकाचे जवळच्या व्यक्तिस एकटेच सोडुन आपापल्या घरी (खरे तर आपली राणी राजपुत्र/राजकन्या यान्चेसह सुखनैव नान्दायला आपल्या घररुपी राज्यात लगेचच्या लगेच) पळतात तेव्हा ते मला तरी अमानुष वाटते. बरे इतकेच असते तर वेगळे, याच मूर्ख रुढीमुळे जिस शास्त्राधार नाही, (इथे शास्त्राधार तपासण्याचा सम्बन्ध येतोच येतो, अन्यथा आहेच की शास्त्राधार नसलेल्या रुढीन्चे खापर देखिल हिन्दू धर्मावरच फोडणे) मृतकाचे मुलास, ज्याचे हातानेच दाहसन्स्कार केले गेलेत, त्यास देखिल दहा दिवस रहावे लागण्याची धास्ती दाखवित आपल्या बरोबर नेण्याचा प्रयत्न, तेव्हा, जेव्हा मृतकाची पत्नी घरात एकटीच शिल्लक रहाणार आहे, तरीही जाणते/अजाणतेपणे केला जात असला तरी तो अश्लाघ्यच म्हणावा लागेल.
परवाच्या केस मधे असेच होत होते, व मी व लिम्बी जेव्हा माझे मतावर ठाम राहिलो तेव्हा मृतकाचा मुलगा देखिल राहिला, बाकी सर्व सख्खे नातेवाईक आपापल्या घरी गेले!
मी अनेकान्चे मृत्यु, सख्खे, जवळचे, लाम्बचे नातेवाईक/मित्र इत्यादिन्चे पाहिलेत, व सर्व वेळेस पहिल्या रात्रीची गम्भिरता अतिशय असते व त्यामुळेच सोबतीस जिव्हाळ्याचे कुणीतरी असण्याची अत्यावश्यकता अस्ते. माझे वडीलान्चे मृत्युसमयी, पहिल्या रात्री माझे सन्घशाखेतील मित्र माझेबरोबर राहिले होते, तर भावाचे मृत्युवेळेस हा प्रश्न तितकासा उद्भवला नव्हता. अन जात्याच माझा एकखाम्बी तम्बु कायमच असल्याने कोण बरोबर येईल वा न येईल याची फिकीर करत नसल्याने, मला त्या त्या वेळेस या प्रश्नाची व्याप्ती वा मूळात अस्तित्वच जाणवले नसावे! पण गेल्या मोजक्या वर्षात या प्रथेतून निर्माण होणारी, माणसे लाम्ब करणारी अमानुष परिस्थिती नजरेसमोर प्रत्यक्ष अनुभवायास आल्यानेच मी अस्वस्थ झालो.
असो.
कदाचित पुढे मागे असेही होईल, व्यवहारी जग आहे हे, स्वार्थाशिवाय काहीही बघू न शकणार्यान्च्या जगात, कुठेकुठे रडायला जशी भाड्याने माणसे मिळतात तसेच आता सोबतीसही भाड्याने माणसे मिळतिल, तसे पुरवणार्या कम्पन्या निघतिल, त्यान्च्या टीव्ही/मिडीयातून जाहिराती होतिल... सगळे कसे? कायदेशीर व्यावहारीकपणे!
'तसेच आता सोबतीसही भाड्याने
'तसेच आता सोबतीसही भाड्याने माणसे मिळतिल, तसे पुरवणार्या कम्पन्या निघतिल, त्यान्च्या टीव्ही/मिडीयातून जाहिराती होतिल... सगळे कसे? कायदेशीर व्यावहारीकपणे''![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बापरे नुसती अशी कल्पनासुद्धा किती क्रूर आहे..आशाय..वास्तवात असं घडणार नाही.
माझ्या आईच्या वेळी आतेबहीण,आतेभाऊ,मावशी,मावसभाऊ सर्व आपणहून राहिले होते. शेजार्यांनी पुढाकार घेऊन लगेच चहा,जेवण,दुसर्या दिवशीचा नाश्ता,लंच सर्वाची जबाबदारी न बोलता,गाजावाजा न करता आपणहोऊन घेतली.. हा आधार इतका भक्कम होता कि मनाला थोडी शांतता मिळाली..
एलटी, मयताला येणारे लोक लगोलग
एलटी, मयताला येणारे लोक लगोलग परत फिरल्यावर त्यातून ते कसला गैरफायदा घेतात असे तुला म्हणायचे आहे? त्या घरातील व्यक्तींना आधाराची गरज असते म्हणून थांबणे गरजेचे असते हे ठीक. पण टण्या म्हणतो तसे ज्याला/जिला अश्या वेळी मनापासून रहावेसे वाटते ते राहतात, ज्यांना नाही वाटत ते थांबत नाहीत. मनाविरुद्ध एखाद्याला थांब म्हणणे वा जा म्हणणे ह्यात कुणाचाच फायदा नाही.
>>>> नाविरुद्ध एखाद्याला थांब
>>>> नाविरुद्ध एखाद्याला थांब म्हणणे वा जा म्हणणे ह्यात कुणाचाच फायदा नाही.
जीडी, हे आशय वा जशीच्यातशी वाक्ये माझ्या लेखनात नाहीत.
माझे म्हणणे इतकेच की, सगोत्री, ज्यान्ना १० दिवसाचे सूतक आहे, एकाच गावात रहाताहेत, कित्येक तर रिटायर देखिल आहेत, सख्खे नातेसम्बन्ध आहेत, एरवी सणासुदीलालग्नादिक कार्याला हजेरी लावणारे आहेत, तर त्यान्नी देखिल "दहा दिवस रहावे लागेल" असला धेडगुजरी प्रथेची पळवाट शोधायची?
मग बोम्बलायला स्मशानात तरी कशासाठी आले? केवळ जनलज्जेस्तव तोन्डदेखल तोन्ड दाखवायला?
कोण कसली सक्ती करत नाहीये इथे, करुही शकत नाही, माझा प्रश्न साफ आहे की अशी प्रथा/रुढी जिला काडीचाही शास्त्राधार नाही, ती पाळली जाते व मृतकाचे अत्यन्त जवळचे आप्तास एकट्यास सोडून जाण्यास प्रवृत्त करते, ते का? भितीमुळे? व्यवहारवादामुळे? जबाबदारी नको म्हणून? की निखळ गैरसमजातून?
>>>> एलटी, मयताला येणारे लोक लगोलग परत फिरल्यावर त्यातून ते कसला गैरफायदा घेतात असे तुला म्हणायचे आहे? <<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सरसरकट सगळ्या खान्देकर्यान्नी थाम्बावे असे मी कुठेही म्हणलेले नाही, वरील पोस्ट नीट वाचल्यात तर किमान सगोत्री.... सख्खी नाती म्हणा.... त्यान्नीदेखिल पाठ फिरवुन कुठल्या तरी सोईस्कर पण फडतुस अशा नियमाचा(?) बाहुलबोवा करत आपापल्या खुराड्यात पळावे? जिच्या नवर्याला जाळून दोन तास देखिल पुरते झाले नाहीत, तो नवरा आपला भाऊ वा अन्य कुणी नाते सम्बन्ध असतानाही तिथे थाम्बू नये? अन असेच करायचे असेल तर बाकी दहाव्य्यातेराव्य्याचौदाव्याला हजेरी लावण्याचि नाटके तरी का करावित? या मागे खरोखर गैरसमज्/भिती/सोईस्कर पळवाट्/अज्ञान यापैकी काय कारण असावे?
बाकि "गैरफायदा" कसा कुणाकडून घेतला जातो/जाऊशकतो याबाबत उघड स्पष्ट "लेखी" लिहायला सार्वजनिक फोरमवर तस कोणीच धजणार नाही! तुमचे तुम्हीच उघड्या डोळ्यान्नी बघितले तर कदाचित कळेल!
पण गैरफायदा जर नसेल, तर ही प्रथा बन्द व्हायला हवी की नको? याविरुद्ध बोलायला हवे की नको?
वरच्या ठळक नोट मधे अजुन एक उल्लेख करायला हवा असे आता वाटते की, "ज्या व्यक्तिन्ना व्यक्तिस्वातन्त्र्याची महती सर्वाधिक वाटते त्यान्नी देखिल या विषयाच्या वाटेला जाऊच नये - उगाच मनःस्ताप होईल!"
>>>>. ज्याला/जिला अश्या वेळी
>>>>. ज्याला/जिला अश्या वेळी मनापासून रहावेसे वाटते ते राहतात, ज्यांना नाही वाटत ते थांबत नाहीत. मनाविरुद्ध एखाद्याला थांब म्हणणे वा जा म्हणणे ह्यात कुणाचाच फायदा नाही.
हे पूर्वापार सहज असेच चालत आले असते तर हा बीबी उघडायची गरजच पडली नस्ती!
वाटते म्हणून रहाणारे वा न रहाणारे यात सन्ख्यात्मक जेव्हा शून्य वर्सेस बाकी सर्व असा फरक जिथे तिथे दिसू लागला म्हणून तर हा लेखनप्रपन्च! शाब्दिक सर्वमान्य तत्वज्ञान अन प्रत्यक्ष परिस्थिती यातिल विरोधाभास मला बोचला म्हणून हा बीबी उघडला!
http://www.vicharatar.com/dha
http://www.vicharatar.com/dharmik.html#
या इथे चांगली माहीती दिली आहे.
ही प्रथा निर्माण होण्याच्या
ही प्रथा निर्माण होण्याच्या कारणांपैकी एक कारण कदाचित असं असू शकेल(ठाम दावा नाही) की पूर्वी माणसांचे मृत्यू संसर्गजन्य रोगांमुळेच जास्त करून होत. मृत व्यक्तीला झालेला जंतुसंसर्ग टाळण्यासाठीच शवाला आंघोळ घालणे, मृत्युसमयीचे कपडे फेकून देणे, शवाला शिवलेल्या आणि स्मशानात गेलेल्या सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करणे, त्या घराशी पुढचे किमान दहा दिवस संपर्क न ठेवणे, घरातही अन्न न शिजवणे वगैरे प्रथा रूढ झाल्या असाव्यात. आपल्याकडील सोंवळे-ओंवळे, सोयर-सुतकादिच्या रूढी ह्या मुळात स्वच्छता राखण्यासाठीच्या रूढी असाव्यात. कालांतराने मात्र या सर्वांचे जबरदस्त विकृतीकरण झाले आहे यात शंका नाही.
लिंबूजी अनुस्वारासाठी "शिफ्ट
लिंबूजी अनुस्वारासाठी "शिफ्ट M" दाबा म्हणजे "प्रपञ्च, सङ्ख्यात्मक..." साठी "प्रपन्च, सन्ख्यात्मक..." असले घोळ होणार नाहीत.
बाकी पोस्टसाठी संदर्भ पाहणे चालू आहे, ते मिळाल्यावर पोस्टीन.
होय मी असेच काहीसे ऐकलेले आहे
होय मी असेच काहीसे ऐकलेले आहे. पहील्या दिवशी राहीलात तर सलग १३ दिवस रहावे लागते. कोणीतरी १३ म्हणुन सांगीतले.
ह्यांचा आयडी उडाला आहे,
ह्यांचा आयडी उडाला आहे,
नवीन जन्म कोणत्या नावाने आहे ?
मला, तर सर्व नातेवाईक कधी
मला, तर सर्व नातेवाईक कधी जातात असं झालेलं. कारणं बरीच होती. माझे वडील गेले तेव्हा...
मला स्वतःला ते सर्व सिंक इन करायला वेळ हवा होता. मी शारीरीक व मानसिक त्रासाने थकले होते. इतर पुरुष मंडळी, दाह संस्कारास गेलेली तोवर इथे बायकांचे / म्हातार्या नातेवाईकांना कसलीच काय पडली न्हवती व फक्त सध्या तुझं काय चालू, घरात सर्व फिरून कधी घरात बदल केलेत, खर्च किती आला वगैरे इतर गप्पा सुरु झाल्या.
मी अपेक्षित न्हवते करत, त्यांनी माझ्याबरोबर रडावे. पण कळस म्हणजे एका वहिनीने विचारले, अमेरीकेला जायचे असेल तर काय करावे? माझ्या मुलाशी बोलता का? आणि फोन लावला. तोवर , त्यांना नाश्ता दिला(चहा /कॉफी/फळं). त्यानंतर, माझी चौकशी सुरु, इतके महागडे हॉस्पिटल मग असे कसे झाले? किती खर्च झाला? माझी बोलायची इच्छा सुद्धा न्हवती. आणि ह्यांना खर्चाचे पडले होते.
मला तर , वाटते नातेवाईकांने मदत हवीच असल्यास रहावे पण फाजील प्रश्ण न विचारता जमलं तर सांभाळावे. नाहितर निघून गेलेलच बरं.
बाप रे झंपी
बाप रे झंपी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)