आईच डोरलं..
लग्नात तिला पितळेचं डोरलं मिळालं. काळ्या मण्यांची पोथ आणि त्यामधे शिंपल्याच्या आकारच इवलसं डोरलं. पितळेच असूनही ती फार जपायची त्याला. स्नानाला जाताना अलगद गळ्यातून काढून पाणी लागू न देता भिंतीवर ठेवायची. हळूहळू ते चपायला लागलं म्हणून त्यात तिनी लाख भरली. मग ते कसं चपणार! अधुनमधुन चिंचेच्या वा शिकेकईच्या पाण्यानी त्याला घासून चकचकीत करायची. आईला सारखी आस होती बाबा तिला कधीतरी सोण्याच डोरलं घेऊन देतील म्हणून. पण मग इतकी अपत्य झाल्यानंतर तिने ही अपेक्षा केली नाही की तिला सोण्याच डोरलं मिळेल म्हणून. मी दुसरीत असेल, तेंव्हा बाबांना दिवाळीचा बोनस मिळाला आणि त्यांना वाटल आईसाठी डोरलं कराव. आई, बाबा आणि मी आम्ही तिने जण दुकानात गेलो आणि शेवटी ३६० रुपये मोडून बाबांनी आईची डोरल्याची हौस पुर्ण केली.
आईच्या अवतीभवती खेळताना दमून मी तिच्या गळ्याभोवती हात टाकायचो तेंव्हा ते डोरलं मला दिसायच. पदरा आडून तिचे डोरले कधी दिसायचे नाही. कधी सुपात ज्वारी पाखळताना तिचा पदर क्षणभर डोक्यावरून ढळायचा आणि तिच्या वात्सल्यमय गौर कांतीवर ते पिवळेधम्म डोरले लखलखायचे. ते डोरले अगदीच चिकुकले होते. त्याच्या आजूबाजूला उजवीकडून सोण्याचे दोन मणी आणि डावीकडूनही सोण्याचे दोन मणी होते. शिंपल्याच्या आकाराचं ते डोरल... त्यावर मधे जांभळट गुलाबी रंगाचा खडा होता. तो काळोखात लकाकायचा. त्याच्याकडे टक लावून बघता बघता मला कधी झोप येत असे माहिती देखील पडायचे नाही.
ऐके दिवशी आई सुपात काहीतरी पाखळत असताना मी असेच दोन हात तिच्या गळ्याभोवती टाकलेत आणि ती म्हणाली पोथ तुटेल माझी. हे डोरलं तुझ्या शिक्षणासाठी. ऐरवी आईनी मला कधी अभ्यास कर, पुस्तक घे, धडा वाच, गणित सोडव असे म्हंटले नाही. ती फक्त एकच म्हणायची हे डोरल माझ्या शिक्षणासाठी. वर्षाकाठी ती एक एक मणी वाढवायची. मी तिला म्हणत असे माझ्या शिक्षणापर्यंत तुझी ही पोथ गळाभर सोण्यानी भरून जाईल. त्यावर ती म्हणायची वेळ आली की ह्यातल सोणं मोडून देईन मी तुला, तुझ्या शिक्षणासाठी.
आईच हे वाक्य मला माझ्या बालवयात एक प्रेरणा देऊन गेलेंलं आहे. त्याही पेक्षा नकळत घरातील परिस्थितीच वर्णन तिच्या त्या एका वाक्यात होत. मला काय करायला हवं ते सार काही ते वाक्य सांगयचं. मी.. आई.. तिच डोरलं.. माझ शिक्षण.. असे एक समीकरण आपोआप माझ्या डोक्यात तयार झालं होत. कुठलीही परिक्षा जवळ आली, एखादी चाचणी असली की मला हे वाक्य आठवे. मग मी मनलावून अभ्यास करायचो. खूप छान गुण मिळालेत की आईला त्याच्याबद्दल काही सांगण्या अगोदरच तिला उमजायचे की मला अभ्यासात यश आलेय म्हणून. तिची मुद्रा प्रसन्न हसायची आणि डोरल झळकायचं.
आईच डोरलं मोडायचं काम अखेर पडलच नाही. पण तिच्या परिने तिने मी लहान असतानाच माझ्या पुढच्या भविष्याची काळजी केली होती हे महत्तवाचे. सिंगापुरहून मी आईला सोण्याच्या बांगड्या घेऊन गेलो त्यावेळी आईने त्या बांगड्या क्षणभर हातात घातल्यात आणि परत तिच्या आवडत्या, तिला तिच्या माहेरहून आंदणात आलेल्या, एका पितळेच्या डब्यात ठेवून दिल्यात. मी तिला विचारलं, आई घाल की आता ह्या बांगड्या नेहमीसाठी. त्यावर ती उत्तरली, "नाही नाही.. ह्या तुझ्या लेकरांसाठी मी जपून ठेवते. त्यांच्या शिक्षणासाठी कामा येतील." तिच्या मऊसुत हातांनी तिने त्या बांगड्या डब्यात ठेवल्यात. सर्वात तळाशी तिचं, तिला तिच्या लग्नातल मिळालेलं, पितळेच डोरलं होत. पिवळधम्म! चकचकीत!!
बी कडून सर्वांचे आभार..
ऐरवी मी जे काही इथे लिहितो ते घरी कुणालाच दाखवत नाही. परंतू हे ललित आईला.. फक्त तिलाच.. गुपचुप वाचून दाखविन.
बीटुकल्या
बीटुकल्या, चान्गल लिहिलहेस रे सोण्या!
सुरेख !
बी....... फार निरागस लिहिलं आहेस रे......!! अगदी आतपर्यंत पोचलं सगळं. तू आणि तुझी आई........ दोघांनाही सलाम !
बी...
फारच हळव लिहील आहेस...

तु रडविलेस की रे बाबा सर्वांना...
सुरेख!
बी रडवलस.
टचकन् पाणी आलं डोळ्यांत!!
जयाविंना अनुमोदक!! तुम्ही आणि आई, दोघांना सलामच!!
मस्त
मस्त लिहिलस
दिपंकर
सुरेख
मस्तच लिहीलंय रे!!!
सोपं आणि सहज!
आवडलं बी! शेवट अगदी भावपूर्ण. भाषेचा लहेजाही आवडला.
बी, आजच
बी, आजच वाचलं. इतके दिवस मी वान्या लिहिण्यातच गुंतले होते. आता एकेकाच वाचीन. डोरलं शब्द वाचूनच क्लिक केलं. मला स्वत:ला प्रत्येक बोलीभाषा फार गोड वाटते. तिच्यात स्वतःच एक एक्सप्रेशन असते. ते प्रमाण भाषेत कित्येकदा पकडता येत नाही.
खूप निर्व्याज लिहिलं आहेस. आईजवळ झोपून मुलं आईला न्याहाळत असतात. ते मुलांच भावविश्व त्यांना भावनिक दृष्ट्या समृद्ध करतं असतं. तुझ्यापुढे आईला डोरल्यातला सोन्याचा मणीही फिका होता, ही जाण तुला समंजस करून गेली. किती सुजाण आई तुझी. नशीबवान आहेस.
मीना,
मीना, शर्मिला सर्वांनाच धन्यवाद.
मीना, वान्या केवळ लिहिलंस. असं लेखन पुर्वी हितगुजवर कुणी केलच नाही ....
मितसुंदर
मितसुंदर लिहीलं आहेस रे ! अगदी आतून. भावलं.
The universe, they said, depended for its operation on the balance of four forces which they identified as charm, persuasion, uncertainty and bloody-mindedness.
एकदम छान click
एकदम छान click झालं रे. अस खरच जेंव्हा साधेसुधे लिहितोस तेंव्हा किती परीणामकारक लिहितोस.
बी जे
बी जे सांगायचं होतं ते अगदी आतपर्यंत पोहोचलं रे.:)
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
सुरेख लिहीलं आहे
सुरेख लिहीलं आहे
बी, फार मनापासून लिहिलंयस!
बी, फार मनापासून लिहिलंयस! आवडलं रे.
बी खूप सुरेख!!! अगदी छान
बी खूप सुरेख!!! अगदी छान शैली..ओघवती सुटसुटित...खुप दिवसांनी मायबोलीवर अस आतुन लिहिलेल वाचायला मिळालं..
़़खुपच छान लिहीलं आहे बी!
़़खुपच छान लिहीलं आहे बी!
फार सुंदर लिहिलं आहेस ...
फार सुंदर लिहिलं आहेस ... अगदी आतून.
र्हस्व_बी ह्यांच्या पोस्टला अनुमोदन. तुझी स्वतःची अशी खास शैली आहे. तू लिहिलेलं वाचताना त्यातले शब्द, वाक्यरचना हे सगळं त्यातल्या आशयाशी इतकं मिळून आलेलं असतं की शुद्धलेखनाचे बाह्य निकष जाणवतच नाहीत.
बी, सुंदर. अगदी मदर्स डे
बी, सुंदर. अगदी मदर्स डे स्पेशल.
मनापासून आवडलं. तूझी आई पण
मनापासून आवडलं.
तूझी आई पण ग्रेटच.
किती अक्रुत्रिम लिहीलयं..
किती अक्रुत्रिम लिहीलयं.. साधं आणि सुरेख.
माझ्या ग डोरल्याच्या पोतेचं
माझ्या ग डोरल्याच्या पोतेचं काळ मणी,
उराचि धडधड, आधार घरधनी.
एकदम बहिणाबाई आठवल्या
बी, सुरेख लिहीलं आहेस. >
बी, सुरेख लिहीलं आहेस.
> आईजवळ झोपून मुलं आईला न्याहाळत असतात. ते मुलांच भावविश्व त्यांना भावनिक दृष्ट्या समृद्ध करतं असतं....
अनुमोदन!!
खुप सुंदर लिहीलय!!
खुप सुंदर लिहीलय!!
बी किती सुरेख लिहिलं आहेस रे.
बी किती सुरेख लिहिलं आहेस रे. तुझी आई डोळ्यासमोर आली एकदम.
छानच लिहिलयस बी. आवडल एकदम.
छानच लिहिलयस बी. आवडल एकदम.
आज पुन्हा वाचलं. छान लिहिलं
आज पुन्हा वाचलं. छान लिहिलं आहेस.
छान लिहिलसं, पण सायो म्हणते
छान लिहिलसं, पण सायो म्हणते तसं शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या तर मजा येईल वाचायला.
आणखी एक, मला वाटतं पोथ नाही पोत म्हणतात.
छान 'चपायला' हा शब्द माहित
छान
'चपायला' हा शब्द माहित नव्हता.
छान लिहिलयस.
छान लिहिलयस.
Pages