आईच डोरलं..
लग्नात तिला पितळेचं डोरलं मिळालं. काळ्या मण्यांची पोथ आणि त्यामधे शिंपल्याच्या आकारच इवलसं डोरलं. पितळेच असूनही ती फार जपायची त्याला. स्नानाला जाताना अलगद गळ्यातून काढून पाणी लागू न देता भिंतीवर ठेवायची. हळूहळू ते चपायला लागलं म्हणून त्यात तिनी लाख भरली. मग ते कसं चपणार! अधुनमधुन चिंचेच्या वा शिकेकईच्या पाण्यानी त्याला घासून चकचकीत करायची. आईला सारखी आस होती बाबा तिला कधीतरी सोण्याच डोरलं घेऊन देतील म्हणून. पण मग इतकी अपत्य झाल्यानंतर तिने ही अपेक्षा केली नाही की तिला सोण्याच डोरलं मिळेल म्हणून. मी दुसरीत असेल, तेंव्हा बाबांना दिवाळीचा बोनस मिळाला आणि त्यांना वाटल आईसाठी डोरलं कराव. आई, बाबा आणि मी आम्ही तिने जण दुकानात गेलो आणि शेवटी ३६० रुपये मोडून बाबांनी आईची डोरल्याची हौस पुर्ण केली.
आईच्या अवतीभवती खेळताना दमून मी तिच्या गळ्याभोवती हात टाकायचो तेंव्हा ते डोरलं मला दिसायच. पदरा आडून तिचे डोरले कधी दिसायचे नाही. कधी सुपात ज्वारी पाखळताना तिचा पदर क्षणभर डोक्यावरून ढळायचा आणि तिच्या वात्सल्यमय गौर कांतीवर ते पिवळेधम्म डोरले लखलखायचे. ते डोरले अगदीच चिकुकले होते. त्याच्या आजूबाजूला उजवीकडून सोण्याचे दोन मणी आणि डावीकडूनही सोण्याचे दोन मणी होते. शिंपल्याच्या आकाराचं ते डोरल... त्यावर मधे जांभळट गुलाबी रंगाचा खडा होता. तो काळोखात लकाकायचा. त्याच्याकडे टक लावून बघता बघता मला कधी झोप येत असे माहिती देखील पडायचे नाही.
ऐके दिवशी आई सुपात काहीतरी पाखळत असताना मी असेच दोन हात तिच्या गळ्याभोवती टाकलेत आणि ती म्हणाली पोथ तुटेल माझी. हे डोरलं तुझ्या शिक्षणासाठी. ऐरवी आईनी मला कधी अभ्यास कर, पुस्तक घे, धडा वाच, गणित सोडव असे म्हंटले नाही. ती फक्त एकच म्हणायची हे डोरल माझ्या शिक्षणासाठी. वर्षाकाठी ती एक एक मणी वाढवायची. मी तिला म्हणत असे माझ्या शिक्षणापर्यंत तुझी ही पोथ गळाभर सोण्यानी भरून जाईल. त्यावर ती म्हणायची वेळ आली की ह्यातल सोणं मोडून देईन मी तुला, तुझ्या शिक्षणासाठी.
आईच हे वाक्य मला माझ्या बालवयात एक प्रेरणा देऊन गेलेंलं आहे. त्याही पेक्षा नकळत घरातील परिस्थितीच वर्णन तिच्या त्या एका वाक्यात होत. मला काय करायला हवं ते सार काही ते वाक्य सांगयचं. मी.. आई.. तिच डोरलं.. माझ शिक्षण.. असे एक समीकरण आपोआप माझ्या डोक्यात तयार झालं होत. कुठलीही परिक्षा जवळ आली, एखादी चाचणी असली की मला हे वाक्य आठवे. मग मी मनलावून अभ्यास करायचो. खूप छान गुण मिळालेत की आईला त्याच्याबद्दल काही सांगण्या अगोदरच तिला उमजायचे की मला अभ्यासात यश आलेय म्हणून. तिची मुद्रा प्रसन्न हसायची आणि डोरल झळकायचं.
आईच डोरलं मोडायचं काम अखेर पडलच नाही. पण तिच्या परिने तिने मी लहान असतानाच माझ्या पुढच्या भविष्याची काळजी केली होती हे महत्तवाचे. सिंगापुरहून मी आईला सोण्याच्या बांगड्या घेऊन गेलो त्यावेळी आईने त्या बांगड्या क्षणभर हातात घातल्यात आणि परत तिच्या आवडत्या, तिला तिच्या माहेरहून आंदणात आलेल्या, एका पितळेच्या डब्यात ठेवून दिल्यात. मी तिला विचारलं, आई घाल की आता ह्या बांगड्या नेहमीसाठी. त्यावर ती उत्तरली, "नाही नाही.. ह्या तुझ्या लेकरांसाठी मी जपून ठेवते. त्यांच्या शिक्षणासाठी कामा येतील." तिच्या मऊसुत हातांनी तिने त्या बांगड्या डब्यात ठेवल्यात. सर्वात तळाशी तिचं, तिला तिच्या लग्नातल मिळालेलं, पितळेच डोरलं होत. पिवळधम्म! चकचकीत!!
बी, खूप खूप
बी, खूप खूप छान लिहिलं आहेस. तुझ्या आईची छबी डोळ्यासमोर छान उभी केलीस. एकच सजेशन म्हणजे शुद्धलेखनाकडे लक्ष. म्हणजे वाचायला जास्त मजा येईल. (अर्थात हे माझं मत).
बी
चांगलं लिहिलं आहेस .
छान!
बी खुप छान लिहील आहेस. थोडस हळव. लिहीत रहा.
छान लिहीलेस.
हळव. प्रत्येकाला आईची आठवन करुन देनारं.
पण सायोनारा म्हणते ते पण बघ.
सुंदर
बी, छान लिहीलं आहेस. तुझ्या भावना अगदी पोहोचताहेत. एखादा मराठी पाठ्यपुस्तकातला धडा वाचावा तसं वाटलं. पण सायो म्हणते तिकडे लक्ष दे जरा.
छान!
बी, छान लिहिले आहेस, हळवं.
छान
छान लिहीलय बी
बी सुरेख रे
बी सुरेख लिहिलेस. तुझ्या आईला दंडवत आणि तुझ्याही कष्टाला सलाम.
खुपच छान!!
तुझी आई तर महान आहेच, पण तिच्या कष्टांची जाण ठेवणार्या तुझ्यासारख्या मुलाने तिचा त्याग, कष्ट सार्थ लावले हे पण विशेष आहे!!
छान आहे
बी, एकदम सुरेख लिहिलं आहेस रे............ भावनांचा सच्चेपणा जाणवला.
छान लिहिलं
छान लिहिलं आहेस बी. आवडलं.
सुरेख
बी, तू जेव्हा जेव्हा आई बद्दल लिहिलयस, तेव्हा तेव्हा खूप सुरेख लिहिलयस.. कारण तेव्हा तू अतिशय मनापासुन लिहीतोस.. असचं मनापासुन लिहित जा.. पुढिल लेखनाला शुभेच्छा..
छानच!
सुंदर लिहिलंयस रे बी. आटोपशीर आणि बरोबर मनात पोचणारं. अश्विनी म्हणते तसं खरंच मराठीच्या पुस्तकातला धडा वाचल्यासारखं वाटलं.
छान
आता जेव्हा स्वत:चं खरं खरं लिहिलंस ते बघ किती छान झालं.
वा!
बी मस्तच लिहिलस बघं.

डोरलं हा शब्द देखिल किती दिवसानी ऐकला/वाचला.
ह्या शब्दात एक नाद आहे. एक लय आहे.
गावी मंगळसुत्र असा शब्द न वापरता डोरलं हाच शब्द वापरायचे.
छान आहे....
पण शुध्दलेखन बघच... एकाद्यावेळी चूक होते, पण 'सोणे' हा शब्द प्रत्येकवेळी 'ण' लिहिलास ते 'सोने' आहे....
(...णेहेमी सुध्लेकण सपष्ट काडावे..)
'परदेसाई' विनय देसाई
मस्त!
बी, मस्त लिहीले आहे. चांगले वाटले वाचायला.
आभार..
मित्रहो, अभिप्राय दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो.
- बी
खूप छान, सच्चं !
खूपच छान आणि मनापासून. आवडलं.
मी पण मनापासून सांगतोय, आशा आहे की तुला त्यात काही वावगे वाटू नये.
शुद्धलेखनाबद्दल माझं थोडं वेगळं मत आहे. विशेषतः ण आणि न मधल्या फरकाबद्दल. खूप जण सोणे असा उच्चार करतात, तो चुकीचा असला तरी अशा प्रकारच्या लेखनात कधीकधी ते जास्त चपखल बसतं, सच्चं वाटतं. तुला जर तोच उच्चार माहिती असेल तोच ठेव.
तू स्वतःच्या मनाला, स्वतःच्या अनुभवाला वाटेल/पटेल तसं लिहित जा. त्या सच्चेपणात एक गोडवा आहे. जेंव्हा तू उगीचच कुणासारखं तरी लिहायचा प्रयत्न करतोस ते लगेच खोटं आहे हे जाणवतं. कदाचित तुला दुसर्या कुणाची शैली आवडली असेल आणि तुझ्या नकळत तसं लिहावंसं वाटत असेल. तर तसे होऊ देऊ नकोस. तुझ्यातच एक नवीन शैली करायची ताकद आहे. त्यासाठी जडबंबाळ शब्द किंवा त्याच त्या चावून चोथा झालेल्या प्रतिमा वापरून लेखन महान होत नाही. किंवा मोठ्या कवींच्या कवितांचा उल्लेख करून तुला जाणवलेला भाव लगेच वाचकाला पोहोचेलच असे नाही. उलट मी म्हणेन अशा कुबड्या वापरायची तुला गरजच नाही.
साधं सोपं सरळ ते लिहावं
उगाच कशाला शब्दात अडकावं ?
र्हस्व बी तुमची प्रतिक्रिया..
र्ह्स्व बी, वेळ काढून तुम्ही मला एक छान प्रतिक्रिया दिलीत. मी विदर्भातील असल्यामुळे काही शब्द मला जसे वाटतात ते तसेच आहेत की अपभ्रंशीत आहेत ह्याबद्दल मला सतत भिती वाटत असते लिहिताना. उदाहरण द्यायचे झाले तर वर मी 'चपायला लागले' असे लिहिले त्यावेळी मला नक्की माहिती नव्हते की 'चपायला लागले' ह्याचा अर्थ इतरांना कळेल की नाही.. मायबोलिवर हा शब्द अजून कुणी लिहिलेला आठवत नाही.
अगदी अगदी सुंदर
बी, किती सहज सोप्पं लिहिलय! आवडलंच.
असं लिहिणं कठिण आहे. थेट मनापर्यंत पोचणारं.
लिहीते रहा... चांगलं लिहिताय.
खुप छान
खुप छान लिहिले आहे तुम्ही बी.
खुप सुंदर.
शुद्धलेखन
विनयदेसाई, सोणे, चपायला लागणे ह्या शब्दात त्या त्या ठिकाणचे नाद आहेत. मला वाटते बीने मुद्दामुन तसे लिहिले आहे. ते तसेच राहु देत. बाकी जनरल शुद्धलेखन बरोबरच आहे.
आवडल हं बी.
छानच लिहिल आहेस. काही काही शब्द वातावरण निर्मिती तयार करतात आणि त्यामध्ये आपल्याला नेतात. तेथे शुध्द्लेखन तपासायची गरज नसते. भावना पोहोचायची गरज असते. बी, बघितलस न आइचं financial planning ?
छान लिहील आहेस बी
वर म्हणलय तस मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या धड्यासारख, साध्या-सोप्या भाषेत पण मनावर ठसा उमटवणार लिहीलयस.
आवडलं
कित्ती मनापासून आणि प्रेमाने लिहिलय तुम्ही आईबद्दल. खुप आवडलं. डोरल शब्द कित्तीतरी वर्षांनी ऐकला.
-प्रिन्सेस...
सुंदर
बी
श्यामची आई वाचताना व बघताना जसे डोळे पाणावतात तसेच तुझे हे आइबद्दलचे वाचताना झाले. खुपच सुंदर लिहीले आहेस.
बी! एकदम
बी! एकदम टचिंग लिहिलस.
आज वेळ मिळाला तेव्हा व्यवस्थित वाचता आले. खुप छान वाटले वाचुन.
आज बर्याच
आज बर्याच दिवसांनि इथे आले. खुपच सुरेख लिहलय बी. तुमच्या आईशि ओळख झाल्यासारख वाट्ल.
बी ला मिळाला आहे A+++
बी मझ्या कडुन तुला A+++ , सुंदर लिहिल आहेस. खरच मस्त.
Pages