दोन जुड्या अळू
१ नारळ वाटी
एक वाटी ब्राउन चणे ५-६ तास भिजत घातलेले.
७-८ ब्याडगी मिरच्या
६-७ पाकळ्या लसूण
लिंबाएवढी चिंच ( अमेरिकेत असाल तर की लाईम चा आकार साधारण - लेमन किंवा नेहमीचा लाईम फारच मोठा होईल )
१ च चमचा धणे
मीठ
तेल
कोवळी अळूची जुडी बघून घ्यावी मुंबैत भाजीचा अळू वेगळाच मिळतो.
अळू धुउन, देठ अन पाने बारीक चिरून चिंचेचा कोळ घालून थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. फार गचका शिजवू नये. त्यातच चणे पण घालून शिजवावेत.
थोड्या तेलावर सुक्यामिरच्या, धणे परतून घ्यावेत.
गार झाल्यावर खोबर्याबरोबर मिरच्या धणे अगदी बारी़क वाटावे. जास्त पाणी घालू नये.
हे वाटण अळू चण्याच्या मिश्रणात घालून, चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी काढावी.
ठेचलेल्या लसूण पाकळ्या पळीत फोडणीला घालाव्या व छान लालसर कुरकुरीत झाल्या की भाजीत फोडणी मिक्स करावी.
गरम गरम भाताबरोबर किंवा नुस्तीच वाटीत घेऊन ओरपावी
मी पहिली मी पहिली!!! मस्त
मी पहिली मी पहिली!!!
मस्त आहे रेसिपी. कधी खाल्ली नाहीये. नक्की करुन पहायला हवी.
आम्ही ह्यात वाल टाकतो. पण
आम्ही ह्यात वाल टाकतो. पण घोटून घेतो अळू.
हे पहिली पहिली काय प्रकरण?
हे पहिली पहिली काय प्रकरण? रेसीपी पाहिली असे हवेय ना?
मनस्विनी, आहेस कुठे मुली? अग
मनस्विनी, आहेस कुठे मुली? अग मी पहिली प्रकरण तुला माहित नाहीच का? जाऊ दे झालं, बोलून वाईटपणा घेत नाही.
मस्त आणि वेगळी वाटतेय रेसिपी. इथे पॅक्ड येतो अळू. तोच घेतलास ना?
>>>हे पहिली पहिली काय
>>>हे पहिली पहिली काय प्रकरण?
हे बहुतेक प्रतिक्रिया देण्यात पहीली असं अभिप्रेत असावं.!!
हो ना मिनोती???
वेगळा प्रकार. अळू बरोबर चणे
वेगळा प्रकार. अळू बरोबर चणे नीट शिजतात का ? ओले खोबरे नाही का ?
वेगळी आहे रेसिपी.... छान!
वेगळी आहे रेसिपी.... छान!
तोंपासु!! ईथे कधी केली नाही
तोंपासु!! ईथे कधी केली नाही पुर्वी खाल्ली आहे! त्यात खोबर्याच्या चकत्या होत्या.
मी कधी कधी कुकरमधे एका
मी कधी कधी कुकरमधे एका भांड्यात चणे अन एका भांड्यात अळू असं शिजवते - पण तो शॉर्टकट
इथे अमेरिकेत पॅकबंद मिळतो- त्यात कधी वडीची पानं निघतात तर कधी भाजीची . जीटीजीला स्वातीने आणलेल्या पाकीटात भाजीचं अळू होतं तेंव्हा ही भाजी केलेली .
कुठे मिळतो ? देसी दुकानात ?
कुठे मिळतो ? देसी दुकानात ? कधी बघितला नाही. असो, वेगळी रेसिपी आहे. करुन बघेन पुन्हा अळु मिळाला तर.
मस्त रेसिपी. अळवाचं फदफदं
मस्त रेसिपी. अळवाचं फदफदं आवडत नाही पण ह्या पद्धतीने आवडेल असं वाटतंय
कुठे मिळतो ? देसी दुकानात ?
कुठे मिळतो ? देसी दुकानात ? कधी बघितला नाही. >> मला पण सेम प्रश्न आहेत.
बाकी रेसिपी मस्त.
आमच्या जवळच्या देसी दुकानात
आमच्या जवळच्या देसी दुकानात मिळत नाही, न्यू जर्सी ला ओक ट्री रोडवर बरेचदा मिळतो.
या वर्षी मी अंगणात दोन चार अळकुड्या लावल्या होत्या - त्याची चार छोटी पानं उगवली फक्त
पुढच्यावर्षी एक मोठ्या कोल्ड ड्रिंक टबमधे लावणार आहे म्हणजे त्याला भरपुर पाणी घालता येईल.
हे असले, पण प्लास्टिक
http://www.amazon.com/Outdoor-Patio-Stainless-Steel-Beverage/dp/B0043WKY...
अळू कुठल्याही चायनीज दुकानात
अळू कुठल्याही चायनीज दुकानात मिळतो आरामात. भाजीचा नसतो पण वडीचा असतोच नेहमी.
हो आणी भाजीचा देसी दुकानात
हो आणी भाजीचा देसी दुकानात मिळतो. मला तरी मिळालाय.
अळवाचं फदफदं आवडत नाही ???
अळवाचं फदफदं आवडत नाही ??? अरेरे कु फे ही पा ?
मेधा, ह्यात अजून मोठं मिळतं ते लाव (आणि जास्तीची पानं मला दे) अळकुड्या कशा लावल्या ? मी पण लावेन म्हणते. मला एकदा टण्याच्या आईचं गाठी देठी करुन खायचय
भाजीचा अळू आणि वडीचा अळू
भाजीचा अळू आणि वडीचा अळू ह्यात काय फरक असतो?
भाजीच्या अळूची भाजी करतात आणि
भाजीच्या अळूची भाजी करतात आणि वडीच्या अळूच्या वड्या
भाजीचा अळू आणि वडीचा अळू
भाजीचा अळू आणि वडीचा अळू ह्यात काय फरक असतो? >> भाजीच्या आळूची पाने लहान कोवळी असतात जेणेकरून शिजवल्यावर त्याचे चोथा पाणी होत नाही. वडीच्या आळूची पाने त्यामानाने मोठी आणि किंचीत जून असतात.
आळूची पाने फार पटापट मोठी होतात अगदी २ दिवसात पान जून होते त्यामुळे हे वडीचे आणि भाजीचे वेगळे कळू शकते.
भाजीच्या अळूच्या पानांच्या
भाजीच्या अळूच्या पानांच्या कडांना गोलाई असते तर वड्यांच्या अळूची पानं अगदी डोळ्यांना त्रिकोणी दिसतात. (विशेषतः पान उभं धरलं तर खालचे, मधल्या दांड्याच्या दोन बाजूंचे कोन.) मिनोतीने लिहिल्याप्रमाणे वड्यांचं अळू नुसतं शिजवलं तर चोथापाणी होतं. त्यासाठी ते शिजवण्याआधी थोड्या तेलावर परतून घेतात असं ऐकलं आहे. मी स्वतः करून पाहिलेलं नाही.
अग आमच्याकडे असे वेगळे आळू
अग आमच्याकडे असे वेगळे आळू लावत नाहीत ग वडीचे वेगळे नी भाजीचे वेगळे एकाच प्रकारचे असते.
वेगळी आहे रेसिपी.. आवडेल
वेगळी आहे रेसिपी.. आवडेल नक्कीच! कारण मुळातच अळू आवडतो.. भाजीचा असो की वड्यांचा
भाजीचा अळू आणि वडीचा अळू ह्यात काय फरक असतो?>>भाजीच्या आळूची पाने लहान कोवळी असतात जेणेकरून शिजवल्यावर त्याचे चोथा पाणी होत नाही. वडीच्या आळूची पाने त्यामानाने मोठी आणि किंचीत जून असतात. >> करेक्ट् मिनोती! तसचं वड्यांच्या अळूच्या देठांचा कलर डार्क असतो (डार्क ब्राऊन).
परवा तू आणलेला वड्याचा अळू
परवा तू आणलेला वड्याचा अळू होता ना ? त्याची भाजी छान एकजीव झाली, चोथा पाणी नाही झाली.
असं आहे होय. मग इथल्या
असं आहे होय. मग इथल्या पटेलमध्ये कायम वड्यांचाच आळू मिळतो.
माहिती बद्दल थँक्स मिनोती आणी स्वाती.
सिंडी तुला तु. क.
बाई, तसंही अळवाचं फदफदं
बाई, तसंही अळवाचं फदफदं शिजवताना अळू आधी परतूनच घेऊन कूकरला शिजायला लावतात नं?
मला वाटते कोवळी , फिकट हिरवी,
मला वाटते कोवळी , फिकट हिरवी, नाजूक पानं मिळतात ती भाजीला,
दाट, मोठी, गडद हिरवी पानं असतात ती वड्यांना वापरतात.
अगदी कोवळी पानं असली तर एकेका पानाचि वळकटी वळून त्याची गाठ घालून लसणीच्या फोडणीची भाजी करतात .. यम्मी !!
तीच गाठी देठी ना ?
तीच गाठी देठी ना ?
भाजीचा अळूचा आणखी एक फरक, तो
भाजीचा अळूचा आणखी एक फरक, तो खाजरा नसतो एवढा. त्याचा देठ हिरवट असतो.
ही चित्रं बघा - साधारण अंदाज
ही चित्रं बघा - साधारण अंदाज येईल.
भाजीचं अळू (बदामासारखा आकार)
वड्यांचं अळू (खालची टोकं बघा)
सिंडे, मला माहीत नाही कुठलं होतं.
पन्ना, भाजीचं अळू असेल तर नाही लागत परतून घ्यायला.
अरे इतकी मस्त रेसिपी पन फोटू
अरे इतकी मस्त रेसिपी पन फोटू कुठाय?
Pages