युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघना, हा तांदुळ जास्त पाणी घालुन मऊसर शिजऊन घ्यायचा. वरतुन तुप घेऊन, ताज्या दह्यासोबत खायचा. सोबत तळलेली, मिरची, पापड..अहाहा..आजच करते. हा खुप पौष्टीक असतो.

मेघना, हा तांदुळ जास्त पाणी घालुन मऊसर शिजऊन घ्यायचा. वरतुन तुप घेऊन, ताज्या दह्यासोबत खायचा. सोबत तळलेली, मिरची, पापड..अहाहा..आजच करते. हा खुप पौष्टिक असतो.

मेघना, असा तांदुळ वापरण्यापुर्वी, जरा चोळून धुवून बघायला हवा. मी एकदा आणलेल्या तांदळाला चक्क रंग लावलेला होता. मूगाला पण काळा रंग लावून, उडिद म्हणून विकायला ठेवले होते.

मेघना आणि वाट्ताना पण जरा जास्त वेळ वाटावे लागेल मऊ पेस्ट व्हायला.
त्याचा बारीक रवा काढून आणता आला तर?

आता वापरुन पहाते. आभार.

अरुंधती: चर्चा माहितीपुर्ण आहे. धन्यवाद.

पपई ची भाजी ( वरुन तरी हिरवी आहे , पण चित्रात दाखवले आहे कि आतुन पिकलेलि असेल .अजुन कापली नाहि) कशी करायची, अथवा अजुन काय करता येईल?

लिंक असेल तर ईथे द्या प्लिज.

आतुन पिकलेल्या पपईची माहीत नाही पण कच्चा पपईच्या काचर्‍या करतात. बटाट्याच्या काचर्‍यांसारख्या. छान होतात. थोड्या गोडसर लागतात.

पपईची कोशिंबीर येते करता असे माझ्याकडच्या पाकृ पुस्तकात लिहिले आहे. पपई अर्धवट शिजवून मीठ, साखर, तिखट व चिंचेचा जरा जाडसर रस घालून.

कच्च्या पपई ची सालं काढुन किसायची..त्यात दाण्याचे कुट्,मीठ्,हिरवी मिरची,लिंबाचा रस, चवीपुरती साखर ,वरुन तुप-जिर्‍या ची फोडणी घालायची..मस्त कोशिम्बिर तयार होते.. कळतच नाही कि ही पपई ची कोशिम्बिर आहे..तुरट पणा अजिबात नसतो...

रिमझिम , हो अगदी तशाच करायच्या [साल सोलाण्यानी काढुन मग काचर्‍या चिरुन अगदी बटाट्याच्या करतो तशाच करायच्या. ]मस्त लागतात. Happy

सुलेखाची कोशिंबिरही छान वाटत्ये. करुन पाहिली [पाहीजे एकदा.

दुध खूप उरलयं. ५-६ ली आहे. बासूंदी सोडून काय करता येईल ? बहुतेक पूर्वी discuss झालंय पण मी सर्च करुन बघितला तर मला मिळालं नाही.

<< दुध खूप उरलयं. ५-६ ली आहे. बासूंदी सोडून काय करता येईल ? >>
~ पनीर Happy
~ दुधाला विरजण लावता येत असेल तर मस्त दही विरजता येईल. दह्याचे भरपूर पदार्थ करता येतात किंवा नुसते हादडायलाही छान! (दहीवडे, कढी, दह्यातल्या भाज्या-कोशिंबिरी इ. इ. इ.)

~ मसाला दूध/ केशरी दूध/ बदाम दूध असे प्रकार करता येतील.

~ आइसक्रीम/ कुल्फी / कस्टर्ड इ.साठी वापरता येईल.

साध्या चपात्या बनवुन डीप फ्रीज मध्ये ठेवल्या व सकाळी भाजुन घेतल्या तर चालतील का?
अजुन दुसरा काही उपाय असेल तर सांगा प्लीज.
सकाळी लवकर ऑफिसला जायच्या गडबडीत पोळी-भाजी डब्यात नाही नेता येत. Sad

मी पराठे करुन पूर्ण भाजून ठेवायचे. (साधे घडीचे) ते फ्रिजमधे ठेवायची गरज नसते. बाहेरही खराब होत नाहीत. वाटलेच तर सकाळी परत हलके गरम करुन घ्यायचे. भाज्या आदल्या रात्री करता येतात. सकाळी परत चांगल्या गरम करायच्या.
शिवाय झटपट करता येण्यासारखे अनेक प्रकार इथे आहेत.

फुलके रात्री करायचे, सुट्टे सुट्टे ठेवून पूर्ण गार करायचे, तेल तूप न लावता प्रत्येक फुलक्याच्या मध्ये एकेक paper napkin ठेवून ती पूर्ण चळत अॅल्युमिनीअम फॉईलमध्ये गुंडाळून डीपफ्रीजमध्ये ठेवायची. सकाळी मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेता येईल किंवा ऑफिसात मायक्रोवेव्ह असल्यास तिथेच गरम करून घेता येईल.

मंजुडी हे फुलके किती दिवस टिकतात
आणि दिनेशदा पराठे कसे करायचे, जाड केले तर तुट्तात किंवा कच्चे लागतात.

पराठे-कणीक चवीपुरते मीठ,थोडेसे मोहन घालुन भिजवुन घ्यावी..आतुन पुसटसे तेलाचे बोट फिरवुन दोन घड्या करुन त्रिकोणी पराठा लाटुन तव्यावर दोन्ही कडुन तेल्/तुप न सोडता भाजुन घ्यावा..असे थंड केलेल्या दोन पराठ्यांमधे पेपर ठेवावे...असे ४ किंवा ६ पराठे एकावर एक चळत ठेवुन त्याचा रोल बनवुन तो अल्यु .फोइल मधे गुंडाळुन फ्रीझर मधे ठेवावा,लागेल तसा रोल काढुन पराठा गरम तवा/मायक्रो,/ओव्हन मधे गरम करावा..असेच मेथी-पराठे हि करता येतात..३ आठवडे छान रहातात..[अजुन एक--भाजुन ठेवल्रेल्या पराठ्यावार गरम असताना एकदा च तुपात बुड्वलेला चमचा पराठ्याच्या दोन्ही साईड नी फिरवावा..गरम केल्यावर ताज्यासारखा लागतो..]अशीच पुरणपोळी,आलु-पराठा न तळता प्रत्येकी २ पॅक करुन ठेवावे..

साधे फुलके गार करून एका वेळी लागतील इतके फुलके छोट्या झिपलॉक मधे घालून फ्रीझर मधे ठेवावे. रोज एक बॅग डब्यात न्यावी जेवणाच्या वेळे पर्यंत मस्त थॉ होतात. किचन पेपर टावेल वर दोन थेंब पाणी शिंपडून त्यावर फुलके ठेवून २०-२५ सेकंद माय्क्रोवेव्ह करावे, मस्त गरम फुलके तयार .

अमेरिकेतल्या फ्रीझरमदे ६ महिनेपर्यंत चांगले रहातात .
दोन तीन दिवस तर फ्रीज मधे सुद्धा चांगले रहातील - एकाच डब्यात २०-२५ फुलके ठेवण्यापेक्षा एका दिवसाला लागतील एवढेच एका डब्यात ठेवावेत.

दोन तीन दिवस तर फ्रीज मधे सुद्धा चांगले रहातील >> हो मी एका वेळेला लागतील तेव्हडे फुलके अ‍ॅल्युमिनिअम फॉईल मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवायचे. ३-४ दिवस सहज चांगले राहतात. खातांना १५-२० सेकंद गरम करुन घ्यायचे.

लोकहो, दिवाळीसाठी मला फराळ सुचवा Proud

मला फक्त पोह्यांचा चिवडा , बेसन लाडु आणि शंकरपाळी करता येतात. बर्फी करायची आहे पण काहीतरी नवीन प्रकार हवाय (अर्थातच सोपा :फिदी:) प्लीज सुचवा. सायोची मलई बर्फी एकदा सोडुन दोनदा बिघडवलीय (कबुलीजबाब आज देतेय) तर प्लीज त्यापेक्षा सोपी बर्फी सुचवा.

अजुन काही सोपे सोपे इतरही फराळाचे पदार्थ सुचवावेत. जमले तर या दिवाळीला फराळ पाककला परिक्षा द्यायची आहे Wink

गाजराच्या नाही तर टोमॅटोच्या वड्या, आंब्याचा पल्प घालून नारळाची बर्फी. नारळी पाकाचे लाडू. अहाहा !!!

धन्यवाद सिंडी !!! अग तेच तर सांगतेय एवढी सोपी बर्फी बिघड(व)ली कशी तेच कळत नाही Sad प्रमाण चुकले बहुदा. त्यामुळे माझ्या पाककलेचे लिमिट्स कळलेत ना तर जरा सोपे पदार्थ सांग. नारळीपाकाचे लाडू - या जन्मी माझी करण्याची हिम्मत होणे शक्य नाही.

आंब्याचा पल्प घालुन बर्फी मस्त वाटतेय. तीच करुन पाहीन.

नारळीपाकाचे लाडू वाटतात तेव्हढे अवघड नाहीत. मी न चुकता केले आहेत एकदा. Proud

Pages