Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29
स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.
सध्याचे मेंबर:
महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar
दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गटगला सुरवात होत आहे...
गटगला सुरवात होत आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेहे, अनिलभाई बाराकर बस कधी
हेहे, अनिलभाई बाराकर बस कधी पोचतेय गटग ला:)
चला लोकहो, आम्ही थोड्याच वेळात घरातून निघू.
भाईंचा वरचा मेसेज ऐतिहासिक
भाईंचा वरचा मेसेज ऐतिहासिक झाला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१०/१०/१०, १० वाजुन १० मिनिटांनी :).
क्या बात है डि़जे.. स्कीशो
क्या बात है डि़जे.. स्कीशो घेवुन ठेवावा म्हणतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा गटग पण एतिहासीक आहे नाही का?..
एकदम दणक्यात गटग झाले!
एकदम दणक्यात गटग झाले! महागुरू, सौ. महागुरू आणि शचि ला धन्यवाद! धमाल आली एकदम.
अनिलभाई - गटगच्या remote inauguration बद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होणार होणार म्हणुन गाजत
होणार होणार म्हणुन गाजत असलेलं बे एरिया गटग खरच एकदम दण्क्यात पार पडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महागुरु आणि फॅमीलीने खूप छान तयारी केली होती, त्याबद्दल त्यांचे अनेक धन्यवाद!
खादाडी आणि गप्पा अखंड सुरु होत्या.
मेनु :
१>सुरळीच्या वड्या
२>२ प्रकारचे चिप्स
३>७ लेअर डिप
४>सॅलड
५>आंबा , पेरू ज्युस
६>ग्रिल्ड पनीर, सिमला मिरची, चिकन
७>टोमॅटो सूप
८>पालक पनीर
९>>मेथी मलई मटर
१०>मिक्स कडधान्यांची उसळ
११>चिकन विथ ग्रेव्ही
११>पुलाव
१२>पोळ्या
१३>श्रीखंड
१४>चीझ केक
१५>ब्लुबेरी पाय
१६>दाल
१७>कलिंगड
सर्वच प्रकार एकदम मस्त झाले होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उपस्थीत माबोकरः
१>महागुरु आणि परिवार (यजमान)
२>सशल आणि परिवार
३>फारेंड आणि परिवार
४>रमा आणि परिवार
५>राखी आणि परिवार
६>सायलीमी आणि परिवार
७>मीपुणेकर/भाग्य आणि परिवार
८>पेशवा
९>रार
१०>सुयोग व परिवार
११>मिनोती व परिवार
अनीलभाई व राहुल या माबोकरांनी फोनद्वारे लावलेली हजेरी.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काही जणांना पहिल्यांदाच भेटत असून सुध्दा, खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे गप्पा झाल्या. मजा आली.
हायलाईटस ऑफ द डे:
१>फारेण्ड ने वाचलेल्या मायबोली वरच्या निवडक मनोरंजक प्रतिक्रिया, व त्या कोणी, कोणत्या लेख/कवितेवर दिल्या आहेत हे ओळखायचे क्विझ. राखी निर्विवाद पणे विजेती
२>रमा ने एक सध्याचा पॉप्युलर आयडी खरच प्रत्यक्षात अस्तिवात आहे का कसे हा निरागसपणे विचारलेला प्रश्ण, आणि त्यावर झालेला हास्यकल्लोळ
३>काही जुण्याजाणत्या माबोकरांना माहिती नसलेली मायबोलीवरची 'रिक्षा' .अरे ये पी.एस.पी.ओ नही जानता
४>माबोवरच्या काही आयडीमधे एकदम ललिता पवार मोड मधून अलका कुबल मोड मधे १८० अंशात झालेला बदल, हे नोदवलेले निरिक्षण
५>अजून बरच काही
पद्मा चव्हाण >> आं? ***
पद्मा चव्हाण >> आं? *** सौंदर्याचा अॅटम बॉम्ब अशी जाहिरात करायचे ती पद्मा चव्हाण ? अशी कोण आयडि होती ब्वा ??![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एवढी मजा झाली तरी डिटेलवार
एवढी मजा झाली तरी डिटेलवार वृत्तांत काही येत नाहीये.
मेधा, अग त्या अर्थाने नाही
मेधा, अग त्या अर्थाने नाही गं, पण सिनेमात जा. आणि ख. प्रकारच्या भूमिका करणारी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ह्म लक्षात येतेय कोण आयडी
ह्म लक्षात येतेय कोण आयडी असावी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लवकर वृत्तांत लिहा.
ललिता पवार मोड मधून अलका कुबल
ललिता पवार मोड मधून अलका कुबल मोड >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकी मजा केलेली दिसतेय.
काल एस्व्हीएस ने पण जीटॉक
काल एस्व्हीएस ने पण जीटॉक वरुन थोड्यावेळाकरीता हजेरी लावुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
एसव्हीएस उर्फ अॅडमिन: वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा !
वेटींग फॉर वृत्तांत
वेटींग फॉर वृत्तांत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वृत्तांत टाका रे! कोण
वृत्तांत टाका रे! कोण लिहीतय?कोणीही लिहा पण लिहा नक्की!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल महागुरू आणि सीमानी खूप
काल महागुरू आणि सीमानी खूप छान होस्ट केलं गटग. खूपच मजा आली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहुतेक सगळेजण सहकुटुंब आले होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील नॉन्-मायबोलीकराला पण सोबत होती, त्यांचं पण एक नॉन्-मायबोली गटग झालं
राखी जसं सायबाची बायको सायबीण
राखी जसं सायबाची बायको सायबीण , डॉक्टरची बायको डॉक्टरीण , तसचं मायबोलीकरांचे बेटर हाफ पण मायबोलीकर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुगलने सांगीतले तसे
गुगलने सांगीतले तसे महागुरुंचे घर रस्त्याच्या उजव्याहाताला कुठे दिसते का हे बघत दोन चकरा मारल्या. या आधीच्या सगळ्या गटगला आमच व.मा.घो. असल्याने यावेळेस मांडव घालत असतानाच पोचेन अशा इराद्याने निघालो होतो. पण घराचे नंबर ज्याने दिले होते त्याने बहुतेक चुकुन मिल्या अथवा बेफिकिर ऐवजी माझी शिकवणी घेतली असावी. सगळॅ नंबर मुक्तछंदात. ३२४० नंबरच्या शेजारी ३४५० नंबरचे घर. मला हवे असलेले घर ३४३८. माहागुरू फळी-चेंडू चा बा.फ. उघडुन बसलेले ज्ञात होते पण 'मराठीमधील कोडी' वैगेरे बाफशी त्यांचा संबंध असेल असे वाटले नव्हते. इतक्यात समोरच्या चायनीज वंशीय स्त्रीने कुठला नंबर पाहिजे असे विचारले. मी संगीतलेला नंबर तिच्या पर्यंत पोचायला दोन तीन मिनीटे जावी लागली. फोनवर हा अनुभव हमखास येत असल्याने ह्याला मी सरावलो आहे. नाव विचारले की लहानपणी गिरवलेले अक्शरांचे तक्ते कामास येतात जे फोर जेन्नि पासून सुरु होणारी ही ढकल गाडी ए फोर एपल पाशी येउन थडकते. असो. तीने सांगीतलेल्या गल्ली-बोळातून एकदाचा गुरूंच्या घरी पोहचलो. आणी... वाट... बघायला... लागलो.
इंग्रजी सिनेमात सिनेमा सुरू व्हायच्या आधीच मध्यंतर असते तसेच एकापाठोपठ एक असे एक दोन तीन मध्यंतर झाल्यावर मायबोलीकर उगवायला लागले. सायलीमी, सुयोग नंतर सशल व भाग्य ह्यांचे लँडींग झाल्यावर मग गुरूंनी घराच्या मागच्या बाजुला लावलेली भट्टी पेटवली आणि बेकरीचा जंगी गटग हळु हळु तापू लागला.
मराठीत नाव घ्यायला लावणे असा एक त्रासदायक प्रकार असतो. त्याच जात्कुळीचा प्रत्येक गटग मधे असणारा आयडी ओळखा नामक भयानक प्रकार ह्या गटग ला झाला नाही. म्हणजे तो होणार होता पण जीच्यावर हा प्रयोग होणार होता त्या रारने ती आयडी-आंधळी असल्याचे ठणकावून सांगीतल्यावर व वेळ-प्रसंगी केवळ शुक शुक म्हणुन हाक मारण्याची धमकी दिल्यावर तो बारगळला. अजुन एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कोण कुठला डुआयडी आहे हे ओळखणे. रारने रार हाच तीचा एकमेव दुप्लिकेट आयडी आहे असे निक्षुन सांगीतले व पेशवा हाच तिरकस आहे असे कारण नसताना माझे डुआयडी-हरण केले. एक डुआयडी कमवायला किती कष्ट पडतात....
इतक्यात हातात हेल्मेट घेउन मिनोती आली. मायबोली गटगला येतात ते ऑलरेडी डोक्यावर पडलेले असतात अथवा डोके घरी ठेऊन येतात असा माझा भा.गै.स. होता. हे डोक्याच रक्षण करणार अवजार पाहुन जरा बिचकलो होतो. मला उगीच अस वाटत की अस्चिग, एस एल आरती, फ, श्रिनी, केदार अशा थोरा-माठांच्या गटगला जायचा योग आला तर त्यांनी बरोबर आणलेल्या हेल्मेट बरोबर माझ्या मस्त गप्पा होतील. पण नंतर मिनोतीने दाखवायचे डोके वेगळे आणि चालवाय्चे वेगळॅ हे सप्रमाण सिद्ध करून माझी भिती फोल ठरवली. आता पर्यंत कोरम पुर्ण भरला होता फारेंड, राखी, रमा हे दाखल झाले होते.
विषय पटापटा बदलत होते. नवे जुने हजर नसलेले आयडी एक एक करून ऐरणिवर येत होते जात होते. असाईडः तुमचा आयडी चर्चीला गेला अशी तुमची खात्री असेरल तर तुम्ही बनचुके माय्बोलिकर आहत स्वतःची पाठ थोपटून घ्या कारण हो तुमच्या वर हवे नको ते कमेन्ट्स झालेले आहेत. जर अशी खात्री नसेल पण तिथे पोचायची इछा असेल तर खालील लोकांच्या विपुत साम्भाळुन, जिवाची पर्वा न करता, माझा हवाला न देता चौकशी करा. संपर्कः राखी, रमा, सायलीमी, व सुयोग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारेंडा ने वेगवेगळ्या बाफ वर आलेले काही नमुनेदार प्रतिसाद वाचुन कोण कोणास कोणत्या बाफवर का कधी व कोणत्या हेतुने म्हणाले असा प्रश्णमण्जुशेचा छोटा कर्यक्रम घेतला. राखी ने गरवारे शाळेचे नाव राखत पहिला नंबर पटकावला. जुने जाणते माबोकर हा शब्द प्रयोग किती चुकिचा आहे. हे रिक्षा प्रकरण ऐकताना मला जाणवले. नव्या माबो वर जुने ते सोने होत नाही तर 'सोन्या जरा गप्प बस' असे काहीसे होते हेही उमगले ह्या विदारक सत्य जाणिवेने रार ने माबोच्या सगळ्या दालनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी राखीची शिकवणी लावल्याचे समजते.
जुन्या माबोकरानी अखेरीस राखी, नंद्या, सायलीमी, भाग्य व अशा सगळ्यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतःचे एक रंगीबेरंगि पान घ्यावे व त्यावर मायबोलीवरचे आजचे खमंग बाफ ह्यंच्या लिंक्स द्याव्यात. म्हणजे बाफ-लेक्सिया झालेल्या जु.जा.माबोकरांना नव्या माबोवरची अॅक्शन मिस होणार नाही.
हा व्रुत्तांत इथेच आवरता घेतो. उरलेले गटग कर भर घालतीलच!
पेशवा जबरीच वृत्तांत...
पेशवा जबरीच वृत्तांत...
>>>> रारने रार हाच तीचा एकमेव
>>>> रारने रार हाच तीचा एकमेव दुप्लिकेट आयडी आहे असे निक्षुन सांगीतले <<<
नवतो सान्गत असे?
हे सगळ्यात लाखमोलाचे वाक्य!
मी तरी गेली पाच-सहा वर्षे काय सान्गतोहे? लिम्बुटिम्बू हीच माझी एकमेव ड्युप्लिकेट आयडी आहे!
आता या बुप्रा लोकान्चा कशावरच कै विश्वासच बसत नै त्याला मी काय करणार?
पेशवा, मस्त वृत्तांत एक
पेशवा, मस्त वृत्तांत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक सुधारणा - मी आणि फारएण्ड सशल, मिनोती, रमाच्या आधी आलो होतो बर्का. रारचा क्लास घ्यायला थोड्याच दिवसात सुरूवात होईल, अजून कोणाला यायचं आहे? हे क्लासेस विनामुल्य आहेत (आता अजून हात वर झाले ना?)
अशा थोरा-माठांच्या गटगला
अशा थोरा-माठांच्या गटगला जायचा योग >>
अरे पण इतकेच का? अजून येउदेत. काय काय ब्लुपर होते, कोणत्या आयडींची जास्त वेळ चर्चा झाली, मुख्य म्हणजे ही चर्चा करणार्या कळपामध्ये कोणी रॅशनल आणि सेन्सिबल होते का? कोण बुद्धिप्रामाण्यवादी, कोण अमेरिकन भारतीय, घोडा भेटला की नाही, शिव्या कश्या द्याव्यात? कुठल्या वृत्तामध्ये गझला जास्त चांगल्या? राममंदीराचे काय करायचे? हे सर्व कोण सांगणार?
नंद्याभौ तू पण होतास का तिथे?
सगळॅ नंबर मुक्तछंदात.
सगळॅ नंबर मुक्तछंदात. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
थोरा-माठांच्या गटगला जायचा योग >>
नॉन-माबोकरांचे सुद्धा गटग झाल्याने त्यांना बोअर झाले नसावे. लहान मुलेही एकमेकांशी खेळताना दिसली म्हणजे त्यांचे ही एक बालगटग झाले असावे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राखि, रार आणि पेशवा ह्यांना
राखि, रार आणि पेशवा ह्यांना पहिल्यांदा आणि बाकि सगळ्यांना पुन्हा एकदा भेटुन मस्त वाटल. गुरुजि आणि सीमा ह्यांचे मनःपुर्वक आभार. बालगटग जोरात झाल हे नक्कि, कारण " हे काय एवढ्यात निघायच? आत्ता तर आम्हि खेळायला सुरुवात केलिय!" असे उद्गार ऐकु आले मला निघताना. एकुण जनरेशन नेक्स्ट कडुन पुढच्या गटग ला प्रॉब्लेम येणार नाहि हे नक्कि.
महागुरू-सीमा खूप छान होस्ट
महागुरू-सीमा खूप छान होस्ट केलं गटग
मस्तच झालं गटग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पेशवा वृतांत मस्त
फारएण्ड अमर अकबर अँथनी ( तन्वीच्या नजरेतून) चा लेख कधी पोस्टतो आहेस?
उदगीर [बीबी] हृदयसम्राट,
उदगीर [बीबी] हृदयसम्राट, चालक, मालक आणि पालक महागुरू यांच्या सेवेसी यावेळेस जाता आले नाही, केदारभौ.
पेशव्या मस्तच रे ..
नंद्या भौ ..'उदगीर' असे नाव
नंद्या भौ ..'उदगीर' असे नाव आहे (म्हणताना काय नावे ठेवायचे ते ठेव)![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ते काय ते - दिल्गीर का काय ,
ते काय ते - दिल्गीर का काय , ते घ्या हो गुरू.
[वळसंगीकर असते तर ते म्हणाले असते "घ्या गूळ शेंगा, 'आख्ख्या' ]
मंडळी ... सर्वांना परत भेटुन
मंडळी ... सर्वांना परत भेटुन छान वाटले. पेशवा आणि रार यांना प्रथमच भेटत होतो. गटग साठी आणलेले सर्वच पदार्थ मस्त होते. तरी पण पाय केक ला न्याय देता आला नाही. इतक्या पदार्थाच्या नादात पेशवा यांनी आणलेली साकी तशीच राहिली. पुढच्या गटगला आणीन.
अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमर्-अकबर्-अँथोनी चे बहुध २-३ राउअंड झाले असावेत. बहुधा त्याच्या वृत्तांत अजुन १५ वर्षांनी ज्यु. फारेंड लिहील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पेशवा : वृत्तांत चांगला एकदम मस्त
भाई यांनी वेळोवेळी गटगला दिलेल्या प्रोत्साहनाबद्द्दल आभार.
महागुरू, साकीच्या नादात इतर
महागुरू, साकीच्या नादात इतर पदार्थ तसेच राहण्यापेक्षा बरे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्यु. फारेन्ड ला सध्या लिहायला लावायच्या मागे आहे.
महागुरु, असे म्हणुन तु माझ्या
महागुरु,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असे म्हणुन तु माझ्या डोळ्यात पाणी आणलस रे.
ती साकी ठेवुन दे. आता मी आलो की पिउ.
Pages