Submitted by राखी on 30 September, 2010 - 16:29
स्थळ : महागुरुंचे घर
३४३८ ब्राउनटेल वे, सॅन रमोन
पॉटलकसाठी मेनु पण इथे ठरवायचा आहे.
सध्याचे मेंबर:
महागुरू : पोळ्या, बार्बेक्यु, राईस (२ मोठे + १ लहान)
सशल : सॅलड + श्रीखंड (२ मोठे +१ लहान)
राखी : मेथी मटर मलई ( २ मोठे + २ लहान)
सायलीमी : चिकन ग्रेव्ही + बार्बेक्यु करता मॅरिनेटेड (२ मोठे + २ लहान)
फारेंड : चीज पिझ्झा (२ मोठे + २ लहान)
भाग्य : मिक्स भाजी / उसळ (२ मोठे)
रमा : चीजकेक (२ मोठे + १ लहान)
पेशवा : काहीतरी गोड (१)
फुलपाखरु : अॅपेटायझर ?
सुयोग : टोमॅटो सूप (२ मोठे + १ लहान)
मिनोती : ?
rar
दक्षिण कॅलिफोर्नीयातिल माबोकरांना आग्रहाचे निमंत्रण.
बाराकरांना पेशल बस करून इथे येण्याचे आग्रहाचे निमंत्रण (शिट्टी, डि.सी., फिली कर बाराच्या बशीतून येतील असे गृहित धरले आहे)
अटलांटावासियांना कधीतरी जरा वेगळ्या ठिकाणी गटग करता आग्रहाचे निमंत्रण.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपलं इव्हेंट आपणच मॅनेज करु
आपलं इव्हेंट आपणच मॅनेज करु ..आउटसोर्स कशाला?
जेवणाचाच मेनू असेल ह्या
जेवणाचाच मेनू असेल ह्या assumption वर मी सॅलॅड आणि काही गोड पदार्थ करून आणू का?
श्रीखंड/खीर/अजून काही आयडीया?
सशल, श्रीखंड आवडेल. मला १०
सशल, श्रीखंड आवडेल.
मला १० ऑक्टोबर लंच सर्वात जास्त सोयीचं आहे. मी कटलेटस् करून आणू का? अजून काय आणू?
अरे वा, बे एरिया गटगकरता
अरे वा, बे एरिया गटगकरता आत्तापासून शुभेच्छा.
बाराकर आणि बशीच्या सोयीकरता वैद्यबुवांना संपर्क करावा.
मायबोली गटगला सॅलड ते सुद्धा
मायबोली गटगला सॅलड ते सुद्धा एका पार्ल्याक्काने म्हणजे अगदीच शो ना हो![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
चांगलं दणक्यात होऊदे गटग. शुभेच्छा !!!
गटग ९ दिवसांवर आलं आणि आत्ता
गटग ९ दिवसांवर आलं आणि आत्ता तुम्ही बाफ उघडताय? किमान ४००,५०० पोस्टी कशा पडणार अशाने? बाराकरांकडून शिका काहीतरी. (निदान १००,२०० पडायला आता आम्हीच हातभार लावतो)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे बघा, 'आमचं गर्जेल तो पडेल
हे बघा, 'आमचं गर्जेल तो पडेल काय' असं नाही .. आणि आम्हाला ४००, ५०० पोस्ट्स चं एक्स्ट्रा अॅडेड फॅट लागत नाही .. कार्य सिद्धीस नेण्यास नविन अचूक किनारा शांत आणि संयमितपणे समर्थ आहे ..
बे एरीया गटगला भरपूर
बे एरीया गटगला भरपूर शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सशल, सॅलड नाही विठाई म्हण![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे त्याला फॅट नव्हे, वातावरण
अरे त्याला फॅट नव्हे, वातावरण निर्मिती म्हणतात. ते केल्याने न यावंसं वाटणार्यांच्यातही एक प्रकारची एनर्जी येते.
मटार भात/ पुलाव किंवा कोणतीही
मटार भात/ पुलाव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किंवा कोणतीही भाजी? ( पनीर / मिक्स व्हेज / भरली वांगी /आलूगोबी? )
नॉन्व्हेज असणार आहे का?
माझ्याबरोबर कदचित माझं एक पिल्लू असेल. तुमची कोणाची मुलं असली तर मोठं नाहितर धाकटं
सॅलड अजिब्बात नको. फारतर खमंग
सॅलड अजिब्बात नको. फारतर खमंग काकडी, किंवा टॉ ची कूट घालून को चालेल. बाराच्या बशीत माझी पण जागा धरा बर्का![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझं सॅलॅड हेल्दी आणि चमचमीत
माझं सॅलॅड हेल्दी आणि चमचमीत आहे .. एकदा खाऊन बघा आणि मग ठरवा ..!
गुरुजी, माझि आठवण
गुरुजी, माझि आठवण ठेवल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद. मला ९ ला डिनर जमेल. सशल तुझि हरकत नसेल तर गोड मी आणु का? माझ लिमिटेड पाककौशल्य आणि प्रचेतस ची उपस्थिति ह्यामध्ये हा पर्याय सेफ आहे माझ्यासाठि (आणि तुमच्यासाठि सुध्धा :)). चॉकलेट व्हॅनिला मार्बल चीजकेक चालेल का लोक्स?
रमा, तु सुद्धा आण .. ते
रमा, तु सुद्धा आण .. ते जास्ती चांगलं आणि गोड होईल ना!
:p
२ गोड चालतील सशल तुझं चमचमीत
सशल तुझं चमचमीत सॅलाड पण चालेल
अरे वा वा ३-४ तासात बे एरियात
अरे वा वा ३-४ तासात बे एरियात एवढ्या एन्ट्र्या?
मला ही ९-१० जमेल बहुधा. नक्की सांगतो रात्रीपर्यंत.
९-१० भाज्या काय रे फारेंडा?
९-१० भाज्या काय रे फारेंडा? विचारल्या शिवाय खरच काही सांगू नकोस बरं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धन्यवाद हो बेकरांनो! आम्हा सगळ्या बारावाल्यांना आमच्या आप्तांनी बाथरुममध्ये जाण्यास सक्त मनाई केली आहे नाही तर.....
शुभेच्छा तुम्हाला!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैद्यबुवा : नक्की या .
वैद्यबुवा : नक्की या . बाथरुमला पर्यायी सर्व व्यवस्था करुन ठेवतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांना कशाला इव्हेंट मॅनेजमेंट? स्थळ -काळ- जागा सगळे माहित असताना एका गटग करता ६०० पोष्टी खर्च केल्या आणि तरीही गटग मध्ये नेमके काय झाले ते सांगणारे ३ वेगवेगळे वृत्तांत आले :दिवे घ्या:
सशल, चौथी स्कॉलरशीप मराठीचा अभ्यास चालु आहे का? 'निंदकाचे घर...', 'सुंठेवाचुन ..', 'गर्जेल तो ..' वगैरेचा जोरदार वापर चालु आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
९ की १० ठरवा. मला दोन्ही ओके आहेत. (तरी होममिनिस्टर कडुन खात्री करुन घेतो).
सहकुटुंब आले तरी चालेल. पत्ता, फोन लवकरच मेल कळवतो
सशल, चौथी स्कॉलरशीप मराठीचा
सशल, चौथी स्कॉलरशीप मराठीचा अभ्यास चालु आहे का? >> हो रे .. माझ्या 'महामरे बाई' स्वप्नात येऊन रोज रागारागाने खाऊ की गिळू नजरेने बघतात, मी तेव्हा(सुद्धा) नीट अभ्यास केला नाही म्हणून .. :p
मंड्ळी, मला जमेल असे वाटत
मंड्ळी, मला जमेल असे वाटत नाही. यापैकी कोणतीच तारीख/वेळ सध्या सोयिस्कर नाही. त्यातुनही काही बदल झाले तर कळवेन.
ये हुई ना बात, दणक्यात गटग
ये हुई ना बात, दणक्यात गटग
(उपस्थीती पण दणक्यात असली पाहिजे
)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
९, १६ ला रात्री नाही जमणार( दांडिया ला नाही जाणारे का कोणी?)
१०, १७ ला लंच ला जमु शकेल.
अॅपेटायझर / मँगो आईसक्रीम / व्हेज बिर्याणी /भाजी यापैकी काहीही एक आणु शकेन.
महागुरु, विपुतल्या आमंत्रणाबद्दल धन्यवाद
राखी,चेष्टा करतेस का
राखी,चेष्टा करतेस का अटलांटावाल्यांची. इतकी शॉर्ट नोटीस
असो..पण चुकीच्या किनार्याच्या पुढच्या गटगचं योग्यवेळी निमंत्रण दिल्यास अचूकवेळी येऊन पोहचू ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या ह्या गटगला शुभेच्छा!! भरपूर खा,प्या आणि गप्पा मारा
१० ला लंच चालेल. अॅपेटायझर
१० ला लंच चालेल. अॅपेटायझर /भाजी यापैकी काहीही एक आणु शकेन.
मला देखील जमेल असे दिसत
मला देखील जमेल असे दिसत नाहीय. पण रन टाईम एन्ट्री साठी परवानगी असेलच मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने अगोदरचे २४वे पोस्ट
रच्याकने अगोदरचे २४वे पोस्ट होते आणि हे २५ वे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती लोक झाली त्याची लिस्ट
किती लोक झाली त्याची लिस्ट करा रे..
९ ऑक्टोबर डिनर जास्त सोयिचे,
९ ऑक्टोबर डिनर जास्त सोयिचे, १० ऑक्टोबर लंच पण जमेल
आत्तापर्यंत आलेले
आत्तापर्यंत आलेले प्रतिसाद:
राखी : १० ऑक्टोबर
सशल: १० ऑक्टोबर
महागुरु: ९/१० ऑक्टोबर
सायलीमी: १० ऑक्टोबर
रमा: ९ ऑक्टोबर
भाग्य: १० ऑक्टोबर
फारेण्ड: ९/१० ऑक्टोबर
फुलपाखरु: १० ऑक्टोबर
सुयोगः ९/१० ऑक्टोबर
पेशवा: १० ऑक्टोबर
प्रविणपा, मिनोती: यांनी आत्ता तरी जमणार नाही असे जरी सांगितले असले तरी मायबोलीच्याप्रेमाखातर ऐनवेळी येतील अशी आशा आहे.
अजुन कोणी राहीले असल्यास update करा
मला पण सध्या १० ऑ जमेल अस
मला पण सध्या १० ऑ जमेल अस वाटतय...मुलगी आजारी आहे
त्यामूळे ऐनवेळी कॅन्सल व्हायची शक्यता पण आहे ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
जास्त लोकाना १० ऑक्टोबर सोईचे
जास्त लोकाना १० ऑक्टोबर सोईचे दिसते आहे. त्यामुळे १० ऑक्टोबर दुपारी ११:०० ते संध्याकाळी ६:०० ठेवायला हरकत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages