शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ६

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:42

आपलं आणि उत्सवांचं नातं अगदी जवळचं. मग ती दिवाळीतली रोषणाई, सुंदर सजवलेल्या गौरी, एखादे सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री किंवा दाराची शोभा द्विगुणीत करणारी गुढी. ही आहेत आपल्या उत्सवांची प्रतिके. या अशा उत्सवांच्या प्रकाशचित्रांचा हा झब्बू.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - उत्सव

तुम्ही पाहिलेल्या/अनुभवलेल्या कोणत्याही सणाचे/उत्सवाचे छायाचित्र इथे टाका आणि त्यातला उत्साह, मजा, जिवंतपणा यासारख्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा.

2010_MB_Utsav_Jhabbu.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोत्यांची रांगोळी, नाताळची रोषणाई मस्त एकदम !
हे होळीचे रंगात रंगलेले चेहेरे ! नंतर अपार्ट्मेंटच्या लोकांकडून कारपेट खराब झाल्याबद्दल ओरडा मिळाल्याने चांगलीच लक्षात राहिली ही होळी Wink

Holi.jpg

मोत्यांच्या रांगोळ्या सुंदरच आहेत! अशा मिळतात का? कुठे?
बाकी सगळ्यांचे फोटो सुंदर. काल टाकायला वेळ नाही मिळाला, आज टाकेन रात्री.

भोंडला Happy

r bhondala.JPG

आमच्याकडे जिचा भोंडला करायचा तिची ओटी भरून मग भोंडल्याचा फेर धरायचा अशी प्रथा आहे. Happy

अहाहा , झक्कास ! काय एकसे एक फोटोज आहेत .
मंजू , पद्धत गोड आहे , मॅडम मस्त बसल्यात . Wink
ख्रिसमस ट्रीज बघून कधी स्नो फॉल होतोय असं वाटतंय .
पणत्या बघून आता येत्या दिवाळीत स्वतः पणत्या बनवायची हुक्की आलीये . Happy

ह्या माझ्या काकूकडच्या यंदाच्या गौरी..... मागची सर्व सजावट चुलत बहिणीने एका रात्रीत घरी केली आहे :

Pages