आपलं आणि उत्सवांचं नातं अगदी जवळचं. मग ती दिवाळीतली रोषणाई, सुंदर सजवलेल्या गौरी, एखादे सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री किंवा दाराची शोभा द्विगुणीत करणारी गुढी. ही आहेत आपल्या उत्सवांची प्रतिके. या अशा उत्सवांच्या प्रकाशचित्रांचा हा झब्बू.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - उत्सव
तुम्ही पाहिलेल्या/अनुभवलेल्या कोणत्याही सणाचे/उत्सवाचे छायाचित्र इथे टाका आणि त्यातला उत्साह, मजा, जिवंतपणा यासारख्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा.
गुढी
गुढी
Capitol चे ख्रिसमस ट्री
Capitol चे ख्रिसमस ट्री
(No subject)
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन
सॅम लक्ष्मी पुजनात क्रेडीट
सॅम लक्ष्मी पुजनात क्रेडीट कार्ड्स पण का!
सॅम लक्ष्मी पुजनात क्रेडीट
सॅम लक्ष्मी पुजनात क्रेडीट कार्ड्स पण का >>> मी पण हेच लिहिणार होते.
पण युरो आणि आपले रुपये कसे गुण्यागोविंदाने नांदतायत.
१ रुपयाची नवीकोरी नोट?? - अरे वा!
सावली, ललिता-प्रीति, डेबिट
सावली, ललिता-प्रीति, डेबिट कार्ड पण एक रुपयातलं आणि एक युरोतलं आहे
काय करणार इथे नोटांपेक्षा कार्डच जास्त चालतं... तरी चेकबुक ठेवायचं तेंव्हा सुचलं नाही... पुढच्या वेळेस!
आमच्या यंदाच्या गौरी
आमच्या यंदाच्या गौरी
एमएमएचा गुढीपाडवा.
एमएमएचा गुढीपाडवा.
गोकुळाष्टमीला मी सजवलेला
गोकुळाष्टमीला मी सजवलेला लड्डूगोपाळ,
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.
Pages