शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:35

घागरींची लावलेली उतरंड असो वा म्युझियममधे ठेवलेली एखादी सुरई असो त्यात स्पष्ट जाणवतो तो त्या भांड्याचा एक विशिष्ट आकार. काचेचा बाऊलसेट असो वा आज्जीची रोजच्या वापरातली सुंदर वाटी, त्याचा आकार मोहवून टाकतोच. तर अशा या भांड्यांच्या फोटोंचा हा झब्बू.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - भांडी

तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या सुंदर भांड्याचा (मग ते कोणत्याही प्रकारातले असो. वाटी, चमचा, ताट, इत्यादी) नमुना छायाचित्रात टिपलेला असावा. बघा बरं एखादा कमनीय आकार असलेली अत्तरदाणी किंवा अगदी वेगळ्या आकाराचा आईसक्रीम बोल मिळतोय का?

2010_MB_Zabbu-Bhandi-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आहे पुर्व आफ्रिकेतील सुफुरिया. याचा उपयोग खास करुन मके आणि राजमा उकडण्यासाठी करतात.

sufuria.jpg

स्वरूप ते दिवा, मेणबत्त्यांचे स्टँड आहे का टेराकोटाचे की बर्ड फीडर आहे, जे काय आहे ते सही आहे. कुठे बघायला मिळाले?
मृ, हे डिझाईन पण कॉपी करणार. Happy

रुपाली,
ते दिव्याचे स्टँडच आहेत....
एका नर्सरीत बघायला मिळाले....
तिथे असे अनेक एकसेएक आकार होते.... मिळेल तसे फोटो टाकतो!

वेड लावलं सगळ्यांच्या झब्बुंनी. रुनी , मिनोती , आर्च _/\_ , आणि अजुन पण कोणाकोणाची स्वनिर्मीती होती, सगळेच फोटो क्लास आहेत.
मला ३ दिवस मायबोलीवर येताच आलं नाही. घरी गौरी -गणपती होते ना .

भीमथडी जत्रेत घेतलेली मातीची छोटी बुडकुली. प्रत्येक भांडं एका तळहातापेक्षाही लहान आहे.
दोन चित्रे एकत्र जोडलीयेत कारण दोन्ही एकाच सेटची वेगळ्या कोनातून घेतलेली चित्रे आहेत.

miniature-budakuli.jpg

पुढचा झब्बू कोणीतरी लवकर टाका.

सट

zlonache.jpg

धन्स लालू... Happy
ही माझ्या आजीची पितळेची कळशी. नुकतीच माळ्यावरून काढून मुंबईला आणलीये. पितांबरी लावून चकचकवली नाहीये. एक तर वेळ झाला नाही आणि दुसरं म्हणजे आहे त्या लुकमधे आधी फोटो काढू असा प्लॅन होता. Happy

aajiche-pitali-bhande.jpg

Pages