शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:35

घागरींची लावलेली उतरंड असो वा म्युझियममधे ठेवलेली एखादी सुरई असो त्यात स्पष्ट जाणवतो तो त्या भांड्याचा एक विशिष्ट आकार. काचेचा बाऊलसेट असो वा आज्जीची रोजच्या वापरातली सुंदर वाटी, त्याचा आकार मोहवून टाकतोच. तर अशा या भांड्यांच्या फोटोंचा हा झब्बू.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - भांडी

तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या सुंदर भांड्याचा (मग ते कोणत्याही प्रकारातले असो. वाटी, चमचा, ताट, इत्यादी) नमुना छायाचित्रात टिपलेला असावा. बघा बरं एखादा कमनीय आकार असलेली अत्तरदाणी किंवा अगदी वेगळ्या आकाराचा आईसक्रीम बोल मिळतोय का?

2010_MB_Zabbu-Bhandi-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ, हे पण खासच !

हे आपले नेहमीचे तांबे, चकचकीत घासून उन्हात वाळत ठेवलेले. स्थळ बालाजी मंदीर, गोवा.

tambe.jpg

डॅफो, मृ, रुनी तुम्ही केलेली भांडी मस्तच.
गजानन Happy , दिनेश छान फोटो. इथे बरेच इन्टरेस्टिन्ग फोटो बघायला मिळणार असं वाटतंय.

डॅफो, मोर सुंदर दिसतोय! Happy
रूनि, मृण, मस्त दिसतायत भांडी. Happy

हा माझा झब्बू (कॉर्निंग ग्लास म्यूझियममधला.)

pot_0.JPG

मृ, डॅफो, रुनी, लालुची किटली, दिनेश ह्यांची तांब्याचे तांबे मस्त! गजानन ह्यांची पण छान आहेत भातुकली.

लालू 'अन्न शिजवायच्या भांड्यां'बद्दल म्हणाली म्हणून :
फतेहपूर येथील जोधाबाईची रसोई :

rasoi.jpg

जयपूरचे (कोणतेसे) महाराज लंडनला गेले असतांना तिकडचं पाणी प्यावं लागू नये म्हणून शुद्ध चांदीचे असे दोन रांजण भरून गंगाजल घेऊन गेले होते म्हणे.

jaipur.jpg

वा! मस्त आहे रांजण. Happy कढईपण.

स्टेट डिनरसाठी व्हाईट हाऊसमध्ये वापरला जाणारा सेट -

statedinner.JPG

(फोटो Arkansas च्या क्लिंटन लायब्ररीमधल्या कलेक्शनचा आहे)

हि माझी नेहमीच्या वापरातली उपकरणे.
फोडणीची पळी, गार्लिक प्रेस, (अर्धवट दिसतोय) आणि खास तांदूळ धूण्याचे भांडे. यात तांदूळ, दाणे, कडधान्य, डाळी, भाज्या वगैरे धुवून निथळता येतात. कडेच्या खास रचनेमूळे, फक्त पाणीच निथळते, आतला जिन्नस नाही. हि जाळी थोडी वर असल्याने, तांदूळ / डाळी थोडा वेळ यातच भिजवून, मग निथळता येतात.

tandul dhuNe.jpg

सगळेजण काय काय मस्त फोटो टाकताहेत.
सावंतवादीची भांडी, गोव्याच्या देवळातली आणि इतरही एकदम सही
सिंडे तू ही भांडी कुठल्या बाजारात बघितलीस, सही आहेत.
हा माझा झब्बू गार्लिक जार
GarlicJar.jpg

हे आमच्या कडचं कॉफी मग कलेक्षन.
बराच जुना फोटो आहे. त्यात बरीच अ‍ॅडिशन झाली आहे आता.

हं

Pages