टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ७ - दीपांजली

Submitted by संयोजक on 16 September, 2010 - 13:45


मेन्दी डिझाइन्स वरून इन्स्पायर झालेले बुकमार्क्स

मायबोली आयडी: दीपांजली

वापरलेले फेकून द्यायच्या कॅटॅगरीतले साहित्य :
शॉपिंग बॅग्स, इतर पॅकिंग मटेरिअल, जुने झाल्यामुळे रंगु शकत नाहीत असे मेन्दीचे कोन, अर्धवट उरलेले रंगीत बॉडी पेन्टिंग चे कोन्स ( जे personal hygiene म्हणून मी फक्त एका व्यक्तीला एकच वापरते, उरले तर टाकून देते.)
वापरलेले इतर साहित्यः सिलर स्प्रे.

कृति:
1. रंगीबेरंगी शॉपिंग बॅग्स च्या हँन्डल च्या दोरी पासून बुकमार्क्स च्या आकारात कापून घेतले, दोरी सकत कपल्यामुअ‍ॅळ बुकमार्क्स च्या टोकाशी ला वेगळी दोरी वापरावी लागली नाही.
काही चहाच्या खोक्यातले डिव्हायडर पन वापरलेत, त्याला शॉपिंग बॅग्स च्या दोर्‍या नंतर चिकटवल्या.
TT_DJ_mb2.jpgTT_DJ_DSC01637.JPG

2. मेन्दीच्या कोन्स नी फ्री हॅन्ड डिझाइन्स काढली आणि वाळल्यावर सिलर स्प्रे मारून फिक्स केली , झाले टाकाऊतून टिकाउ बुकमार्क्स तयार.

TT_DJ_DSC01655.JPGTT_DJ_DSC01656.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव मस्तच Happy खुप सुंदर दिसताहेत. मी आधीच बुकमार्क फॅन आहे. त्यातुन तु केलेले फारच सुंदर. प्रतिक्रीया देणार्‍या सगळ्यांना एक एक भेट म्हणुन देणार का? Wink

सिलर स्प्रे म्हणजे काय?

थँक्स सर्वांना :).
मागच्या जीटीजीला अनु-आशिष कडून पुस्तक आणलं होतं त्यांना पुस्तक परत देताना साधारण या टाइप चे बुकमार्क्स पहिल्यांदा बनवले , त्यांना आवडले म्हणून स्पर्धेसाठी बनवले :).
मागे मिनोतीने टकालेले बुकमार्क्स पण छान होते, आरती रानडेनी पण वारली च्या बुकमार्क्स च्या आयडीआ लिहिल्या होत्या , त्यां दोघींनी पण इन्स्पिरेशन दिलं :).
दिनेश,
आयडीआ चांगली आहे, मी टेबल क्लॉथ , व्हाइट कुतीज वर असं आर्टवर्क केलं आहे, इतर अ‍ॅक्सेसरीज पण छान वाटतील.

अरे काय कलाकारी आहे! डीजे रॉक्स. Happy
व्हाईट कुर्तीज वर >> पण मग पाण्याने वगैरे मेंदीचे डाग नाही का पडत? का सिलर स्प्रे ती काळजी घेतो?

ग्रेट! मेंदीच्या डिझाईन्सवर काय मास्टरी आहे तुझी डीजे! वॉव्व! Happy

ती शॉपिंग बॅग्जची हॅन्डल्स नसतील तरी चालतील ना? बूकमार्कला वर स्ट्रिंग असतेच असं नाही ना? पण रंगीत हॅन्डल्स सुंदरच दिसत आहेत!

अहाहा! मस्त गं डीजे.... सह्ही आणि एकदम ग्लॅमरस दिसत आहेत बुकमार्क्स!! शिवाय त्यावरचे नक्षीकाम तर मस्तच झाले आहे!!

DJ - अफलातून !! मला पहिल्या प्रचि मधले सर्वात उजवी कडले खूप आवडले.
सिलर स्प्रे नी मेंदी permanent चिकटून आहते का?

मिनोती आणि आरती रानाडे च्या बुकमार्क्स ची लिंक द्या ना कोणि.

खुपच सुंदरेत बुकमार्क्स...

एक्क शंका आहे... मेहंदी पडत नाही का वाळल्यावर???... का हातावरची काढुन टाकतो तशी पेपरवरुनही काढुन टाकता येते???...

मस्तच आहेत.
फक्त एक प्रश्न .. इथे डायरेक्ट मेंदीच वापरलेली आहे का? मेंदी सारखा कलर वापरला आहे? कारण तो मेंदीचा कलर एकदम सही आला आहे.

आणि जर डायरेक्ट मेंदीच वापरली असेल तर सिलर स्प्रे मारुन ती कायमस्वरुपी चिकटलेली रहाते का कागदाला?

म्हणजे मी पण ट्राय करेन. Happy

मेन्दीच आहे, जुने कोन (टकाउ ) जे जुने झाल्यावर रंगत नाहीत असे :), वर साहित्या मधे लिहिलय.
स्प्रे मुळे खरवडली तरी निघणार नाही मेन्दी.

क्या बात है यार.........अप्रतिम दिसताहेत हे बुकमार्क्स !!
मेंदी या एकाच थीम वर काय काय नवे प्रकार करत असतेस गं तू............ग्रेट !!

वाह !

थँक्स पुन्हा एकदा .
जयश्री,
अगं मेन्दी सोडून इतर काही सुचत नाही/जमत नाही मला म्हणून अगदी पेन पेन्सिल पेक्षा मेन्दी जास्त सोपी वाटते :), मेन्दी मधेच प्रयोग करते मग Proud

हे बुकमार्क्स खरच खूप छान झालेत डिजे, मला सांगा हा सिलर स्प्रे मुंबईत मिळू शकतो का?? दुकानदाराला नक्की काय सांगायचे? क्रुपया सांगाल का??

Hi दिपांजली,

तु बनविलेले बुकमार्क्स इतके आवडले की असे माझ्या friends ना भेट द्यावेत म्हणून मीहि करायला घेतले आणि माझी गाडी सिलर स्प्रे वर अडकली. प्लीज मला सांग ना की सिलर स्प्रे ला काही समान शब्द आहे का? किंवा दुकानदाराला काय मागायच? कारण मी पुण्यातल्या रविवार पेठेतल्या बर्‍याच दुकानात विचारलं पण कोणालाच माहीत नाही 'सिलर स्प्रे' म्हणजे काय?
कुठे मिळेल ते प्लीज सांग ना.

रोचिन, अशुलिका,
भारतात दुकानदाराला रंग टिकवण्याचा कुठलाही पॉलिश स्प्रे आहे का विचारा.
जसा लाकडावर varnish असतो तसा पेपर साठी काही कोट मिळतो का विचारा.

Pages