कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mansmi18. कुणी कितीही नाकारलं, किंवा कितीही विचित्र वाटत असलं, तरी हा क्रायटेरिया असतोच असतो. नाहीतर 'चार चाके' एवढीच फक्त गरज असती, तर कोट्यवधी रुपयांच्या गाड्या तयार करणारे सुपर-लक्झरी ब्रँड्स निर्माण झाले नसते. शिवाय सोशल स्टेटस हे पैशाशी किंवा फायनान्शियल स्टेटसच्या संदर्भात बोललेले नसून 'प्रोफेशनल स्टेटस'शी संबंधित बोलले गेले आहे, असा विचार करून पाहा की. उदाहरणार्थ मुंबईच्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमधला सुप्रसिद्ध सर्जन (साधारणतः) कुठची गाडी पसंत करेल? एखादी सेदान कार, की एखादे स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल? (दोघींची किंमत सारखी आहे, असं समजू या). आणि एखादा गोल्फ प्लेयर? आणि एखादा सुप्रसिद्ध चित्रकार- कलाकार? शिवाय, गरज भागवली जात असूनही एखादा माणूस मारूती८०० विकून झेन का घेतो? आणि सी-क्लास विकून ई-क्लास का घेतो?
Happy

एसएक्स ४ आम्हाला खूप आवडलेली आहे, पण पाचव्या सीटने घात केला! Sad

परवा महिन्द्रा झायलोत बसलो होतो.. आता ह्या छोट्या सोडून डायरेक मोठीच घ्यावी अन् तुकडा पाडावा वाटायला लागलंय! Proud सही आहे झायलो फारच, इनोव्हापेक्षाही ऐसपैस वाटली, अर्थात फिनेस अन् लूक्स इनोव्हाचे जास्त चांगले आहेत, झायलो नो-नॉन्सेन्स वाटते लूक्सवाईजही.

फिगोबद्दल जस्ट विचारत होते रे, पण तोही ऑप्शन काय वाईट आहे? Wink

इतक्यातल्या मांझा, लिनिया ह्या मोठ्या आणि आय२० ही छोटी (?) आवडल्या आहेत. मांझाचा आफ्टरसेल्सचा प्रॉब्लेम आणि लिनियाचा ग्राऊन्ड क्लीयरन्स हे विचारात घेतोय. शेवटी कुठलीच घेतली नाही, किंवा ह्या सगळ्याच सोडून चौथीच घेतली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका! Happy

मनीष, पेट्रोल लिनिया १.४ लि. आहे रे.
आणि एसेक्स४ पिकप-परफॉर्मंस साठी सहीच आहे. पेट्रोल लिनियापेक्षा तर नक्कीच पन मायलेज मात्र किंचित मार खाते. अर्थात हे कुणाला महत्वाचे वाटेल, तर कुणाला नाही.

शेवटी कुठलीच घेतली नाही, >> Lol असं नका हो करू. त्या टण्याने झुमु थेअरीवर एवढ्यात लेक्चर नाही ना घेतले तुमचे?

लिनियाचा ग्राऊंड क्लियरन्स हा प्रॉब्लेम आहे आणि सिटीचा तर त्याहीपेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे. पण ज्यांचा या गाड्यांपेक्षा जास्त आहे, तो फक्त ५-७ मिलीमीटरने- हेही लक्षात ठेवा.

टाटाच्या (म्हणजेच फियाटचाही) आफ्टर सेल्स सर्व्हिसचा प्रॉब्लेम आता जास्त दिवस राहणार नाही. बिलीव्ह मी.

आय२०>> वैतागून सेदान कारचा निर्णय नाहीच घेता आला तर नथिंग लाईक धिस! हॉटेस्ट अँड बिगेस्ट स्मॉल कार ऑफ इंडिया. Happy फिगोशी अर्थातच हिची तुलना होणार नाही.

आणि डायरेक्ट झायलो??!!

आता ह्या छोट्या सोडून डायरेक मोठीच घ्यावी अन् तुकडा पाडावा वाटायला लागलंय >> कोणाचा? गाडी घेतल्यावर लांबच राहा रे. Happy

http://economictimes.indiatimes.com/articleshowpics/6336448.cms

स्पेशली, गेल्या वर्षीपासून मर्क आता जबरी डिझाईन घेउन येतेय येथील C क्लास पण ऊच्च आहे.

वैनी : इनोव्हाचा विचार चांगला आहे. मी पण माझी फिएस्टा (२००६ चं मॉडेल) विकून इनोव्हा घेण्याचा विचार करतो आहे.

स्कॉर्पियो आणि झायलो हे पण दोन ऑप्शन्स आहेत. या दोन मध्ये निदान मला तरी स्कॉर्पियो दणकट किंवा manly वाटते आणि झायलो त्याच्या थोडी विरुद्ध. त्यामुळे स्कॉर्पियो घेण्याकडे कल वाढतो आहे. अर्थात अर्धांगाला हे मत मान्य नसल्यामुळे हे दोन्ही ऑप्शन्स बाद होण्याचे चान्सेस जास्त आहेत..... Happy

आय १० घ्यायच नक्कि करतोय.सध्या कोणी वापरत असेल तर क्रुपया अनुभव सांगावा.

एस एक्स ४ आणि इंडिगो मांझा मधे गोंधळलो आहे... कुणी सविस्तर माहिती देउ शकेल का? बजेट चा प्रॉब्लेम नसेल तर कुठली घ्यायला हवी?

नविन Wagon R घ्यायच नक्कि करतोय.सध्या कोणी वापरत असेल तर क्रुपया अनुभव सांगावा.

मला activa / access 125 / pleasure यापैकी कोणती घेऊ ते कळत नाहिए. कशा आहेत या सगळ्या गाड्या. त्यातली activa बहुदा बाद कारण डिसेंबर पर्यंत बुकिंगच घेत नाहिएत. माझी पसंती प्लेझरला आहे. कोणाला अनुभव आहे का?

मी गाडी घेताना केला होता या ऑप्शन्सचा विचार. टेक्निकली फार सांगता येणार नाही. पण निरीक्षणांवरुन जे लक्षात आले ते सांगते.
pleasure : हीरो होंडाची ही गाडी आटोपशीर. चालवायला इझी, अ‍ॅक्टिव्हा, अ‍ॅक्सेसइतकी जड नाही. परंतू अ‍ॅव्हरेजलाही त्यांच्याशी स्पर्धा करत नाही. स्कूटी वापरली असेल तर त्याचंच हे जरासं अपग्रेडेड व्हर्जन. मेंटेनन्सच्याही बाबतीत. Happy लुक अँड फीलही ही टिपीकल गर्लिश आहे. जर आधीची स्कूटी असेल तर फारसं नावीन्य वाटणार नाही नवीन गाडी म्हणून. हीच पहिली असेल तर गुड ऑप्शन.
Access 125 आणि Activa : दोन्हीसाठीही बुकींग आणि वेटिंग पीरीयड आहेच. दोघींच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स मध्ये फारसा फरक नाही. पण निर्णय घेण्यासाठी दोन महत्त्वाचे घटक म्हणजे अ‍ॅक्सेस ही अजून तशी नवीन आहे. त्यामुळे यूजर फीडबॅक, मेंटेनन्स याबद्दल फारसे ऐकिवात नाही. एक दीड वर्षात कोणतीच नवी गाडी खर्च काढत नाही. (अशी अपेक्षा आहे.) याउलट अ‍ॅक्टिव्हा गेली पाच वर्षे मार्केटमध्ये आहे आणि तिला अजूनही वेटिंग लिस्ट आहे याचाच अर्थ कुछ तो दम है. अ‍ॅक्टिव्हाचे अ‍ॅव्हरेज, मेंटेनन्सचे रिपोर्टसही आशादायक आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे लुक अँड फील. तर अ‍ॅक्सेसचा लुक हा थोडाफार जुन्या अ‍ॅक्टिव्हासारखा आहे त्याउलट नव्या अ‍ॅक्टिव्हाचा लुक हा कट्स मुळे मुलींनाही सूट होणारा आहे, जो आधी नव्हता. कलर्सही कॅची आहेत.
नॉन गियरच्या गाड्यांमध्ये खालील गाड्यांचाही विचार करता येईल.
१. स्कूटी पेप प्लस, टीन्झ - वजनाला कमी, ट्रेन्डी, कॅची लुक्स, TVS इज स्टेबल इन मार्केट शिवाय अ‍ॅक्टिव्हापेक्षा पाच दहा हजार कमी. आणि पहिलीच गाडी ही चालवणार असाल तर गुड टू गो! मॅनेजेबल.
२. डिओ, अ‍ॅविएटर - अ‍ॅक्टिव्हाचेच फीचर्स यंग कॉलेज लुक्स मध्ये. तुमची हाईट चांगलीच असेल तर या एकदम सूट होतात. शिवाय मुलगा/मुलगी दोघे शेअर करंणार असाल तरी अ‍ॅक्टिव्हासारख्याच या ही मस्त वाटतात.
३.महिंद्राची ड्युरो म्हणजे कायनेटिक ची नोव्हा च आहे. लेबल बदललेली. नोव्हा प्रचंड मेंटेनन्स काढते. त्यामुळे सावधान!
४.गाडीचा फार वापर होणार नसेल आणि पार्किंगमध्ये चार्जिंगची सोय असेल (तुमचा बंगला इ असेल तर) इलेक्ट्रिक बाईक्स त्यातही यो बाईक हा चांगला पर्याय आहे. पेट्रोलचा खर्च खूप वाचतो. पण त्याची रिसेल व्हॅल्यू काय आहे याची चौकशी करा. Happy

अ‍ॅक्टिव्हा आणि अ‍ॅक्सेस मध्ये मी अ‍ॅक्सेस ला निवडिन. इंजिन १२५ सीसी आहे. अ‍ॅक्टिव्हाचे १०० सीसी आहे. अ‍ॅक्टिव्हाचे अ‍ॅव्हरेज फारच कमी आहे शिवाय बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. २ दा सर्व्हिसिंगला दिल्यावर आमच्या अ‍ॅक्टिव्हाच्या बॅटरीचा प्रॉब्लेम गेला.
महिंद्राची 'फ्लाइट' पण विचारात घ्यायला हरकत नाही. मी तिची टेस्ट ड्राइव्ह घेतली होती. १२५ सीसी इंजिन, लूक्स पण बरे आहेत. उंची कमी आहे. शिवाय फ्रंट फ्युएलिंग आहे जे खूपच convinient आहे. मला स्वतःला अ‍ॅक्टिव्हा का घेतली असा पश्चाताप होतोय.

एस एक्स ४ आणि इंडिगो मांझा मधे गोंधळलो आहे... कुणी सविस्तर माहिती देउ शकेल का? बजेट चा प्रॉब्लेम नसेल तर कुठली घ्यायला हवी? >>
माझी पसंती अर्थातच SX4 ला. इंजिन क्षमता, पिक-अप, स्टाइल, सर्व्हिस नेटवर्क सगळ्या बाबीत उजवी. मला अजूनपण टाटाच्या पेट्रोल गाड्यांचा भरोसा नाही वाटत.

त्यामुळे स्कॉर्पियो घेण्याकडे कल वाढतो आहे >> अ. आ... स्कॉर्पियो पेक्षा नवीन सफारी घ्या. Happy

धन्यवाद आशुडी, मनिष. अ‍ॅक्टिव्हा चांगली आहे, प्रश्नच नाही. माझ्या वडिलांकडे आहे ती मी पुण्यात आले की वापरते. पण त्याला खुपच वेटिंग आहे. सध्या मला ऑफिसला जायला खुपच वेळ लागतो. कधी बसच येत नाही, कधी बस मिळली तर ट्रॅफिकमध्येच अडकते. अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरासाठी संध्याकाळी मला २-३ तास लागतात. खुपच वैतागले आहे मी मुंबईच्या ट्रॅफिकला.:रागः

अ‍ॅक्सेस मलाही आवडली पण ती बघुनच जरा जड वाटते. गाडी घेतली की मी आणि नवरा दोघेही वापरणार. तो म्हणतोय की अ‍ॅक्सेसच घेउयात. परत किंमतीचाही प्रश्न आहेच. जर ४५०००-४६००० पर्यंत चांगली गाडी मिळत असेल तर त्यासाठी ५४०००-५५००० का घालवा. Happy

मी काल प्लेझरची टेस्ट ड्राईव घेतली मला तरी चांगली वाटली पण ५ मिनिटांसाठी चालवणे आणि रोज वापरणे वेगळे. रोज चालवणार्‍यांचा अनुभव कसा आहे ते जाणुन घ्यायचे होते मला. या आधी माझी बजाज स्पिरिट होती, त्यापेक्षा मला प्लेझर चांगली वाटली. Happy

अ‍ॅक्टिवा टॉप्स आहे. काहीही त्रास देत नाही. रोड्वर एकदम मस्का चालते. तू गाडी बूक कर कधी पण येउदे. त्याआधी एखादी सेकंड हँड बाइक घेऊन तीन महिने चालव. म्हणजे तुझे टायमिंग आटोक्यात येइल. व रूटिन सेट होईल. नवी गाडी आली की सेकंड हँड बाइक अहोंना देऊन टाक. हाकानाका. माझ्याकडे एविएटर आहे जरा उंचीचा प्रॉब्लेम येतो खरा पण होंडा गाड्या बेस्ट. हेल्मेट मात्र मस्ट आहे. त्यावर काँप्रमाइज करू नये. मी आत्ता परेन्त ३ अ‍ॅक्टिवा घेतलेल्या स्टाफ व माझ्यासाठी.

टीवीएस, महेंद्रा वगैरेंच्या बाइक्स घेऊ नका लै बोजड असतात. व रीसेल करता येत नाही लवकर.

भुंगा .... हमारे आपके खयालात कितने मिलते जुलते है Proud

काल इथे एका बिल्डराने
६६ लाखाची ऑडी घेतली
व फॅन्सी प्लेट एपी ९ xx ९९९९ साठी
६.५१ लाख ऑक्षन मधे मोजले.
वर गाडीचा लाइफ टॅक्स पड्ला ९ लाख.
आता ती महान्/ग गाडी चालवणार येथील
६.५१ लाख खड्डे असलेल्या रस्त्यावरून.
असा हा एकटाच आहे.

मामी हौस मोठी की म्हैस मोठी, सांगा बघू. Happy आशूडे, मनीष- मस्त पोस्ट्स. माझी पण अ‍ॅक्टिव्हा झिंदाबाद. दीड वर्षात अजून तरी काही त्रास नाही. (बॅटरीचा एकदा प्रॉब्लेम आला होता, तेवढे सोडले तर).

टाटाच्या पेट्रोल गाड्यांचा भरोसा नाही वाटत >> मला पण नाही वाटत. पण मांझाला फियाटचे इंजिन आहे. शिवाय एसेक्स४ पेक्षा मायलेज जास्त आणि किंमत कमी. पण फॉर्म-फिट-फिनिश, लुक्स आणि लक्झरीमध्ये एसेक्स४ ऐकणार नाही, हे नक्कीच. Happy

असा हा एकटाच आहे.>>>
Lol
मामी.
अ‍ॅक्टिव्हा पेट्रोल जास्त खाते पण बुंगाट पळते.
मी फुल्ल थ्रॉटलला पळवली होती तेव्हा ८० स्पीड आल होत.

या आधी माझी बजाज स्पिरिट होती,>> त्या स्पिरीटचा जीव ल्हानच होता. त्यामुळे त्याची तुलना प्लेजरबरोबर नको. अ‍ॅक्टिव्हा, प्लेजर आणि डिओ ह्या तिन्ही गाड्या चालवुन जी आवडेल ती घ्या. आणी हो ह्यातली कोणती गाडी
आधी मिळेल हेही बघा. अ‍ॅक्टीव्हाला वेटींग आहे. (होंडावाले प्रॉडक्शन कपॅसिटी कधी वाढवतील देवच जाणे)
स्कुटी मला तरी पाहिल्यावर छोटीच वाटते. त्यामानाने स्कुटी स्ट्रिक्सचे लुक्स बरे वाटले मला.

धन्यवाद सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा मला खुप फायदा झाला. अ‍ॅक्टिवाच घ्यायची होती पण लवकर मिळणार नाही म्हणुन शेवटी मी अ‍ॅक्सेस १२५ बुक केली. चालवुन बघितली तर अ‍ॅक्टिवापेक्षा हलकी वाटली. आता १५-२० दिवसांनी मिळेल.

अश्विनीमामी, लक्झरी गाड्या विकल्या जाणं म्हणजेच त्या विकत घेणारे लोक्स असणं हे आपली अर्थव्यवस्था चांगली चालल्याचे लक्षण आहे. Economy depression मध्ये जायला लागली की सगळ्यात पहिले luxury आयटेम्स ची मागणी कमी होते. यात पैसा तर महत्त्वाचा आहेच पण आशावादी मानसिकता ही तेवढिच महत्वाची. शिवाय त्या एका गाडीमुळे किती जणांचे पगार निर्माण होतात बघा - कारखान्यातले कामगार, ट्रान्स्पोर्टवाले, डीलर, ड्रायवर इ.

अ‍ॅक्टिवाच घ्यायची होती पण लवकर मिळणार नाही >>> मी चौकशी केली तेव्हा ९ महिने प्रतिक्षा खिडकीवर उभ रहायल सांगितलं... म्हंटल हे बाळपंत कोण काढणार म्हणून विचार सोडून दिला. :p

शेवटी मी अ‍ॅक्सेस १२५ बुक केली >>> १५-२० दिवसात मिळणार असेल तर चांगला पर्याय आहे... पण performance?

कालच आय२० आणली. मला कुणीतरी मागे म्हणाले होते नविन गाडीला १५ दिवस तरी पाणी लावु नये... आत्ता तर धो-धो पाउस पडतोय. आणि गाडी पावसात भिजतेय Sad

खरेच असे काही आहे का.. १५ दिवस पाणि लावु नये असे Uhoh

१५ दिवस पाणि लावु नये असे >>> असे काही नाही. खरं तर नव्या गास्डीला ए जे कोटींग वगैरे करून घेतात त्यासाठी ही सूचना असते.

Pages