टाकाऊतून टिकाऊ :
शुभेच्छापत्रे आणि लग्नाच्या आमंत्रणपत्रिका वापरून केलेला आकाशकंदिल.
साहित्य : शुभेच्छापत्रे, आमंत्रणपत्रिका, आवडत्या रंगाचा जिलेटिनपेपर किंवा पतंगाचा कागद, दोरा.
१) शुभेच्छापत्रे घेऊन त्यावर आतील/कोर्या बाजूने ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढावे.
२) आता ६ सेमी त्रिज्येच्या कंपासच्या (वर्तुळक) सहाय्याने वर्तुळाच्या परिघावर सहा खुणा कराव्यात. यातले एकाआड एक बिंदू जोडून एक समभुज त्रिकोण आखून घ्यावा. टोच्याच्या(कंपास/वर्तुळक) सहाय्याने या त्रिकोणाच्या रेषा किंचित दाब देऊन पक्क्या करून घ्याव्यात.
वर्तुळाच्या केंद्रस्थानी एक रुपयाचे नाणे ठेवून त्याभोवती वर्तुळ आखून घ्यावे, (चित्र क्रमांक १)
२) वर्तुळ कापून घ्यावे. आतील लहान वर्तुळाचा भागही कापून काढावा. वर्तुळातील त्रिकोणाच्या रेघांवर घडी घालून घ्या. आखलेल्या त्रिकोणाच्या रेषांवर रंगीत/बाहेरील बाजुस कागद दुमडून घ्यावा.व बाजूच्या पाकळ्या त्रिकोणास काटकोनात येतील अशा उघडून घ्याव्यात (चित्र क्र. २अ)
३)प्रत्येक वर्तुळाला आतल्या (कोर्या) बाजूने जिलेटीन पेपर किंवा पतंगाच्या कागदाचा लहान चौकोनी/त्रिकोणी तुकडा चिकटवावा.
४)आता या १९ त्रिकोणातील ५ त्रिकोण एकास एक असे , फ़क्त त्रिकोणाच्या बाहेरचा भाग(पाकळी) ,चिकटवून एक टोपी तयार करा.(चित्र क्र.३).
अशा आणखी २ टोप्या तयार करा. या टोप्या नीट वाळल्यावर पुढली कृती करावी.
७) उरलेल्या ४ पैकी एक त्रिकोणाकार घ्या. हा आपला पाया असेल. त्याच्या प्रत्येक पाकळीला एकेका टोपीची एकेक पाकळी चिकटवा. या टोप्यांच्या एकमेकांकडल्या बाजूची एकेक पाकळी चिकटवुन घ्या. आता प्रत्येक टोपीच्या २ पाकळ्या दुसर्या टोपीला तर एक पाकळी पायाला चिकटलेली असेल. दोन पाकळ्या मोकळ्या असतील. या दोन दोन पाकळ्यांमधे उरलेले ३ त्रिकोण जुळवून चिकटवा. वर एक त्रिकोण मोकळा दिसेल, त्यातून बल्ब सोडता येईल. टांगण्यासाठी या त्रिकोणांच्या पाकळ्यांना छिद्रे पाडून त्यातून धागा गुंफ़ून बांधून घ्यावा.
पूर्ण तयार झालेला कंदिल चित्र क्र. ४.
टीपा : वेळ वाचवण्यासाठी ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ सीडीच्या सहाय्याने काढता येईल. वर्तुळावरील खुणा करताना कंपास/वर्तुळकाची त्रिज्या ६.१ सेमी घ्यावी लागेल.
झक्कासच! यन्दा दिवाळीला मी पण
झक्कासच!
यन्दा दिवाळीला मी पण करणार घरच्याघरी! मज्जा
बर, त्रिकोणा ऐवजी षटकोन घेतला तर? करुन बघायला हवे!
सही.
सही.
मस्तच!!!!!
मस्तच!!!!!
छान
छान
झक्कास. करायला ही किती सोपा.
झक्कास. करायला ही किती सोपा.
अरे वा दिवाळीला करुन बघायला
अरे वा दिवाळीला करुन बघायला हवा.
सुंदर.
सुंदर.
मस्त आणि सोप्पा
मस्त आणि सोप्पा
हा मी गेल्या दिवाळीला केलेला.
हा मी गेल्या दिवाळीला केलेला. शाळेत शिकलेला. तेव्हा जमला नव्हता! मग कॉलेजच्या दिवसात परत एकदा करून बघितला, तेव्हा मापे आठवत नव्हती, त्यामुळे पहिले मिनिएचर मॉडेल तयार झाले टेनिस बॉलच्या आकाराचे. मग मात्र हात बसला.
कार्डपेपरपेक्षा शुभेच्छापत्रांचा खूपच छान होतो, कारण आताचे कार्डपेपर्स अगदी पातळ हलके असतात.
षटकोनांचा कंदिल? म्हणजे काड्यांचा की अन्य काही? मी पहायला आणि शिकायला उत्सुक आहे.
चिकटवणे, सुकवणे हे
चिकटवणे, सुकवणे हे करण्यापेक्षा फटाफट स्टेपल पीन्स मारायच्या
मस्तयं!!
मस्तयं!!
इको फ्रेंडली करायचाय ना?
इको फ्रेंडली करायचाय ना?
झकासच.
झकासच.
७ मधे लिहिलेले समजायला अजुन
७ मधे लिहिलेले समजायला अजुन चित्रे टाकता येतिल का?
झक्कासच!
झक्कासच!
करुन बघायला हव या दिवाळीला
करुन बघायला हव या दिवाळीला
मस्त आहे!
मस्त! या दिवाळीसाठी नक्की
मस्त! या दिवाळीसाठी नक्की करणार!
झकास फारच छान आहे हे
झकास फारच छान आहे हे
छान दिसतोय.
छान दिसतोय.
मस्तच!! वेळ वाचवण्यासाठी
मस्तच!!
वेळ वाचवण्यासाठी सीडीच्या सहाय्याने वर्तुळ हे तर आणखीनच छान!
अफलातून !!! प्रयत्न करून
अफलातून !!!
प्रयत्न करून पहायला हवा. थोडे आणखी फोटो टाकलेत तर बनवताना सोपे जाईल.
हा कंदिल मी गेल्या वर्षीच
हा कंदिल मी गेल्या वर्षीच बनवला होता, तेव्हा आणखी मधल्या पायर्यांचे फोटो टाकायचे तर पुन्हा बनवावा लागेल.
तशीही या स्पर्धेसाठी ४ फोटोंची मर्यादा आहे.
बघून वाटतो तितका तो करताना कठीण वाटू नये. शेवटच्या आकारापर्यंत पोचायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. चुकीची शक्यता जवळपास नसलेली पद्धत मी इथे दिली आहे.
मस्त! यंदा दिवाळीला हाच कंदिल
मस्त! यंदा दिवाळीला हाच कंदिल
सुरेखंच !!
सुरेखंच !!
mee ushiraa kaa vachali hi
mee ushiraa kaa vachali hi link
अजुन थोडे स्टेप बाय स्टेप
अजुन थोडे स्टेप बाय स्टेप फोटो टकले असते तर बरोबर कळलं असतं मला.
एवढ्याच डीटेल्सवर जरा कठीण वाटतंय.
अजुन कुणी बनवलाय का?
खुपच सुरेख
खुपच सुरेख
खूप सुरेख . नक्की ट्राय
खूप सुरेख . नक्की ट्राय करणार
भरत, गोल १४ हवेत की १९ ? आणि
भरत, गोल १४ हवेत की १९ ? आणि २ टोप्या कश्या जूळवायच्या सविस्तर सांगता का? माझा टोप्या जूळवताना गोंधळ झाला आहे .
१९.
१९.
प्रत्येकी पाच त्रिकोणींच्या तीन टोप्या
या टोप्या उरलेल्या चारपैकी एका त्रिकोणाच्या तीन कडांना चिकटवायच्या.
मग या टोप्या एकमेकांना चिकटवायच्या.
दोन दोन टोप्यांमध्ये उरलेले एकेक त्रिकोण चिकटवायचे.
Pages