१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
आख्खे उडीद संपवायचे आहेत. दाल
आख्खे उडीद संपवायचे आहेत. दाल माखनी सोडून दुसरे काय करता येईल ? दाल माखनी हा एकच प्रकार येतो मला त्याचा. २ किलो चे पॅक आहे !
पीठ करून वापरता येईल का ? किंवा इडली दोसे करताना आख्खे उडीद चालतिल का ?
मितान, इथे अख्ख्या उडदाचं मोड
मितान, इथे अख्ख्या उडदाचं मोड आणून बिरडं करायची कृती आहे बघ : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46715.html
आणि तुला अख्ख्या उडदाच्या इतर रेसिपीज ह्या लिंकला मिळतील :
http://en.petitchef.com/tags/recettes/urad
मितान तांदूळ- उडद डाळीचे
मितान
तांदूळ- उडद डाळीचे प्रमाणे नेहमी सारखेच ठेवून मी साध्या उडदाच्या डाळीऐवजी अख्ख्या उडदाची डाळ वापरून इडल्या करते. रंग जरा काळपट येतो पण मस्त लागतात.
ओह्ह मला हेच विचारायचे होते
ओह्ह मला हेच विचारायचे होते रूनी !
आजच भिजवते इडल्यांसाठी उडीद.
धन्स
अरु, तू दिलेल्या लिंकमधून बिरडं पण करते..
स्ट्रॉबेरी बेचव आहेत. पुर्ण
स्ट्रॉबेरी बेचव आहेत. पुर्ण बॉक्स तसाच्या तसाय...मिल्कशेक सोडुन काय करता येईल?
आज साखरभात केलाय पण कोरडा
आज साखरभात केलाय पण कोरडा झालाय्...आता परत साखर घालु का ? काय करता येईल ?
प्रीति स्ट्रॉबेरी बेचव असतील
प्रीति
स्ट्रॉबेरी बेचव असतील तर तुकडे करून त्यावर whipped cream घालुन खाता येईल. क्रीम गोड असल्याने फळाची चव कळणार नाही. मी एरवीपण बर्याचदा सगळ्या फळांवर whipped cream घालून खाते. अननस, सफरचंद इ. वर पण छान लागते. whipped cream मधील साखरेमुळे हा हेल्दी पर्याय आहे असे मात्र म्हणता येणार नाही.
दाल माखनी अख्ख्या उडदाची
दाल माखनी अख्ख्या उडदाची करतात का? त्यालाच काली दाल म्हणतात का?
स्ट्रॉबेरिवर चॉकलेट सिरप
स्ट्रॉबेरिवर चॉकलेट सिरप घालून पण संपवता येईल .
चॉकोलेट डिप्ड स्ट्रॉबेरीज
चॉकोलेट डिप्ड स्ट्रॉबेरीज करा. सोबत वाईन दिली तर कळणार सुद्धा नाही बेचव आहेत ते.
धन्यवाद!!
१. सिरियल्मध्ये टाकायच्या २.
१. सिरियल्मध्ये टाकायच्या
२. स्ट्रॉबेरी केक करून त्यावर लावायच्या. किंवा करताना त्यात घालायच्या.
३. स्ट्रॉबेरी जेलो करून त्यात घालायच्या.
४. स्ट्रॉबेरी पाय करायचा
५. स्ट्रॉबेरी स्मूदी ( दही वापरून)
चमकी, तूप घाला भातात आणि जरा
चमकी, तूप घाला भातात आणि जरा गरम करा परत.
धन्यवाद आर्च
धन्यवाद आर्च
भरत, दाल माखनी आख्ख्या उडदाची
भरत, दाल माखनी आख्ख्या उडदाची करतात. काली दाल माहीत नाही
मुगाच्या डाळीच्या पिठाच काय
मुगाच्या डाळीच्या पिठाच काय करता येईल ? खुप आहे. चुकुन आणल गेल आहे(हरबराडाळीच्या पिठा ऐवजी)
अनुजय, बेसनाचे करतो तसेच लाडू
अनुजय, बेसनाचे करतो तसेच लाडू करता येतात आणि काय लागतात
मी तर भजी, पिठले, धिरडी, पिठ पेरून भाजी ह्यात पण वापरले आहे. छान लागतं.
राखी लाडूची कृती सांगाल का
राखी लाडूची कृती सांगाल का प्लिज..
बाकी तुम्ही सांगीतलेल्या गोष्टीत वापरेन धन्यवाद.
मनःस्विनीने दिली आहे इथे कृती
मनःस्विनीने दिली आहे इथे कृती मुगाच्या लाडवांची. गुळात केलेले जास्त छान लागतात.
...
...
ऊप्स! चुकीच्या ठिकाणी पोस्ट
ऊप्स! चुकीच्या ठिकाणी पोस्ट पडली!!
मी काल कणिक आणी गुळाचे लाडु
मी काल कणिक आणी गुळाचे लाडु केले पण मिश्रण खुप कड्क झाले , लाडु झालेच नाहीत...
मिश्रणाचे काय करता येईल?
त्यावर पाणी शिंपडून थोडा वेळ
त्यावर पाणी शिंपडून थोडा वेळ ठेवा. मग थोडे तूप व सुका मेवा घालून, हलकेच गरम करा. कणकेचा शिरा म्हणून खाता येईल, गुरुद्वारा मधे असा प्रसाद असतो.
पाणीपूरीच्या पिठाचे काय करता
पाणीपूरीच्या पिठाचे काय करता येईल (पूरी सोडुन)? पाणीपूरी पिठ असेच लिहिले आहे पिशवीवर.
पाणीपूरी पीठ म्हणजे बारीक रवा
पाणीपूरी पीठ म्हणजे बारीक रवा असतो.
पाणीपुरीच्या पिठात रवा, मैदा,
पाणीपुरीच्या पिठात रवा, मैदा, बेकिंग सोडा असतो ना?
माझ्या घरी "हातसडीचा" समजुन
माझ्या घरी "हातसडीचा" समजुन आणला गेलेला तांदुळ आहे. १ किलो. लाल सर रंगाचा आहे. रोजचा भात करुन पाहीला पण चव आवड्ली नाही. काय करता येईल? इड्ली, दोसा साठी वापरुन टाकता येइल का?
कोणितरी उपाय सुचवा रे!!!
कोणितरी उपाय सुचवा रे!!!
मेघना, ही चर्चा आधी इथे झाली
मेघना, ही चर्चा आधी इथे झाली होती, लिंक बघा : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/119893.html?1155427878
मेघना, इडली साठी वापर तो
मेघना, इडली साठी वापर तो तांदुळ.
छान होतात इडल्या. मी असा लाल तांदूळ आणि बासमती (या नावाचा बिनवासाचा एक तांदूळ मिळतो इथे तो ) अर्धा अर्धा घेते इडल्यांसाठी.
फक्त हा तांदुळ जरा जास्त वेळ भिजवावा लागतो.
Pages