Submitted by देवनिनाद on 8 September, 2010 - 00:50
मनात भाव
ओठांवर शब्द
गीत फूलण्या नवे
काय हवे आणि
सुखाचे व्हावे कारण
दु:खाचा घ्यावा हिस्सा
धीराने जगण्या
काय हवे आणि
हातास हात
असावी एक साथ
पुढे जाण्यासाठी
काय हवे आणि
दिव्यात तेल
कापसाची वात
मिटवण्यास अंधार
काय हवे आणि
कुणा चोचीत दाणा
कुणा चोचीत पाणी
जगण्यासाठी
काय हवे आणि
- देवनिनाद
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त निनाद! आवडली तुझी
मस्त निनाद! आवडली तुझी कविता...
निनादचे स्क्रिप्ट
फू बाई फू चे स्टेज
हास्यस्फोटासाठी
काय हवे आणि
मस्त कविता... निनादचे
मस्त कविता...
निनादचे स्क्रिप्ट
फू बाई फू चे स्टेज
हास्यस्फोटासाठी
काय हवे आणि>>>> मस्तच सानी
धन्स चिमुरी
धन्स चिमुरी
सुंदर कविता.
सुंदर कविता.
साधी सोपी,सुंदर अन ग्रेसफूल
साधी सोपी,सुंदर अन ग्रेसफूल
सानी, चिमुरी, गंगाधरजी,
सानी, चिमुरी, गंगाधरजी, रेव्यू प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
सस्नेह देवनिनाद !!
निनाद शिर्षकात बदल करायचा
निनाद शिर्षकात बदल करायचा राहीला
विशाल, मित्रा बदल केला आहे.
विशाल, मित्रा बदल केला आहे.
ही कविता सुचण्यामागे गंम्मत आहे, परवा ज्या टॅक्सीने प्रवास करत होतो ती ज्या सिग्नलला थांबली होती तिथे काही कबूतर चणे खात होती तर काही चोचीत पाणी टिपत होती. एवढं काही क्षण पाहीलं आणि वरील काव्य पोस्टवलं. असो.
अभिप्राय आणी सुचनेबद्दल धन्यवाद.
सस्नेह !!
देवनिनाद
सहज कविता जीवनाबद्दलचा
सहज कविता
जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन आवडला
सुखाचे व्हावे कारण दु:खाचा
सुखाचे व्हावे कारण
दु:खाचा घ्यावा हिस्सा
धीराने जगण्या------------- सुंदर !!!
उल्हास, गिरीश आपल्या
उल्हास, गिरीश आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!
निनाद तुमची कविता अप्रतिम
निनाद तुमची कविता अप्रतिम
शिर्षकावरुन मला आठवली ( झ्ब्बु म्हणता येणार नाही )
http://www.maayboli.com/node/13507
निनाद, मस्त कविता...........
निनाद, मस्त कविता...........