काय हवे आणि

Submitted by देवनिनाद on 8 September, 2010 - 00:50

मनात भाव
ओठांवर शब्द
गीत फूलण्या नवे
काय हवे आणि

सुखाचे व्हावे कारण
दु:खाचा घ्यावा हिस्सा
धीराने जगण्या
काय हवे आणि

हातास हात
असावी एक साथ
पुढे जाण्यासाठी
काय हवे आणि

दिव्यात तेल
कापसाची वात
मिटवण्यास अंधार
काय हवे आणि

कुणा चोचीत दाणा
कुणा चोचीत पाणी
जगण्यासाठी
काय हवे आणि

- देवनिनाद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त निनाद! आवडली तुझी कविता... Happy

निनादचे स्क्रिप्ट
फू बाई फू चे स्टेज
हास्यस्फोटासाठी
काय हवे आणि Proud

मस्त कविता... Happy

निनादचे स्क्रिप्ट
फू बाई फू चे स्टेज
हास्यस्फोटासाठी
काय हवे आणि>>>> मस्तच सानी Happy

विशाल, मित्रा बदल केला आहे.

ही कविता सुचण्यामागे गंम्मत आहे, परवा ज्या टॅक्सीने प्रवास करत होतो ती ज्या सिग्नलला थांबली होती तिथे काही कबूतर चणे खात होती तर काही चोचीत पाणी टिपत होती. एवढं काही क्षण पाहीलं आणि वरील काव्य पोस्टवलं. असो.

अभिप्राय आणी सुचनेबद्दल धन्यवाद.

सस्नेह !!
देवनिनाद